१० जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१० जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |10 July 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१० जुलै चालू घडामोडी

कॅनडा खुली बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्यची अंतिम फेरीत धडक

  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेता लक्ष्य सेनने जपानच्या केंटो निशिमोतोला सरळ गेममध्ये नमवत कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ५०० दर्जा) अंतिम फेरीत धडक मारली. लक्ष्यने जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असणाऱ्या जपानच्या खेळाडूला २१-१७, २१-१४ असे पराभूत केले. या वर्षी प्रथमच लक्ष्यने ‘बीडब्ल्यूएफ’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. सत्राच्या सुरुवातीला तो चांगल्या लयीत नव्हता. त्यामुळे त्याची क्रमवारीत १९व्या स्थानी घसरण झाली. २०२१च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत लक्ष्यने कांस्यपदक जिंकले आहे. अंतिम फेरीत त्याच्यासमोर चीनच्या लि शि फेंगचे आव्हान असेल. लक्ष्यची त्याच्याविरुद्धची कामगिरी ४-२ अशी आहे.
  • लक्ष्यने आपला अखेरचा अंतिम सामना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळला होता. उपांत्य सामन्यात तो सुरुवातीला ०-४ असा पिछाडीवर होता. मात्र, त्याने पुनरागमन करताना ८-८ अशी बरोबरी साधली. गेमच्या मध्यांतरापर्यंत निशिमोतोकडे ११-१० अशी आघाडी होती. यानंतर लक्ष्यने स्मॅशच्या जोरावर प्रतिस्पर्धी खेळाडूवर दडपण आणत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगले द्वंद्व पाहायला मिळाले. एकवेळ गेम ९-९ असा बरोबरीत होता. मध्यांतरानंतर लक्ष्यने आक्रमक खेळ करत १९-११ अशी आघाडी घेतली. आपली हीच आघाडी कायम राखत लक्ष्यने गेमसह सामना जिंकला.
  • महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूला चमकदार कामगिरी करता आली नाही. जपानची अग्रमानांकित खेळाडू अकाने यामागुचीने सिंधूला २१-१४, २१-१५ असे पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच यामागुचीने आक्रमक खेळ करताना सिंधूला पुनरागमनाची कोणतीच संधी दिली नाही. सुरुवात चांगली झाली. काही चांगले स्मॅश मारण्याचा मी प्रयत्न केला. मला अखेर नेटवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तांत्रिकदृष्टय़ा हा सामना चांगला राहिला. सामन्यातील कामगिरीने मी आनंदी आहे. स्टेडियममध्ये अनेक भारतीय चाहत्यांचा पाठिंबा देखील मिळत होता.  – लक्ष्य सेन, भारतीय बॅडमिंटनपटू

राज्याच्या शालेय शिक्षण दर्जात घसरण; केंद्राचा ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ अहवाल

  • केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ वर्षांचा ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.०’ हा अहवाल जाहीर केला असून त्यात महाराष्ट्राची कामगिरी घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. सन २०२०-२१च्या अहवालात दुसऱ्या श्रेणीत असलेला महाराष्ट्र यंदा सातव्या श्रेणीत गेला आहे. देशातील एकाही राज्याला पहिल्या पाच श्रेणींमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
  • ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ या अहवालात शालेय शिक्षण प्रणालीचे मूल्यमापन करण्यात येते. सन २०२१-२२ साठी मूल्यमापन निकषांमध्ये काही बदल करून ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.०’ असे नामकरण करण्यात आले. त्यानुसार एकूण ७३ निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. हे निकष निष्पत्ती आणि प्रशासकीय व्यवस्थापन या दोन गटांत विभागण्यात आले. त्यानंतर त्यांची सहा क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली. त्यात अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रशासकीय प्रक्रिया, शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण, समानता, उपलब्धता आदींचा त्यात समावेश होता. या मूल्यमापनात गुणांनुसार श्रेणी निश्चित करण्यात आली.
  • त्यानुसार ९४१ ते १०० गुणांसाठी दक्ष, ८८१ ते ९४० गुणांसाठी उत्कर्ष, ८२१ ते ८८० गुणांसाठी अति उत्तम, ६७१ ते ८२० गुणांसाठी उत्तम, ७०१ ते ७६० गुणांसाठी प्रचेस्ट १, ६४१ ते ७०० गुणांसाठी प्रचेस्ट २, ५८१ ते ६४० गुणांसाठी प्रचेस्ट ३ आणि ४६० ते ५२१ या गुणांसाठी आकांक्षी श्रेणी देण्यात आली.

महाराष्ट्राची कामगिरी

  • मूल्यमापनात एक हजारपैकी ५८३.२ गुण मिळाल्याने ‘प्रचेस्ट ३’ श्रेणीत समावेश.
  • अध्ययननिष्पत्ती आणि गुणवत्तेमध्ये ‘आकांक्षी १’, पायाभूत सुविधा गटात ‘प्रचेस्ट ३’ श्रेणी.
  • शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षणात अतिउत्तम.
  • शिक्षण उपलब्धता, समानता गटात उत्कर्ष श्रेणी.

हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरांच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे; राफेल विमानांपासून क्षेपणास्त्रांवर चर्चा!

  • महाराष्ट्र एटीएसने काही दिवसांपूर्वी डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक केली आहे. हेरगिरी आणि संशयित हॅनिट्रॅप प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. कुरुलकर हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. या हेरगिरी प्रकरणात डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नुकतंच आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात कुरुलकर यांच्याविरोधात असंख्य आरोप लावले आहेत. याबाबतचं व्हॉट्सॲप चॅट आता समोर आले आहेत. ३० जून रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात एटीएसने आरोपपत्र दाखल केलं आहे.
  • कुरुलकरांनी व्हॉट्सॲप चॅटींगद्वारे देशाच्या संरक्षणाबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला पाठवल्याचं एटीएसच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. कुरुलकरांनी भारतीय क्षेपणास्त्र प्रणाली, गोपनीय प्रकल्प, ड्रोन आणि डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या कामाचं वेळापत्रक आदींची माहिती पाकिस्तानी गुप्तचर एजंटला दिली. संबंधित पाकिस्तानी एजंटचं नाव ‘झरदास गुप्ता’ असल्याचं समजलं आहे. एवढंच नव्हे तर आरोपी कुरुलकर यांनी डीआरडीओच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या फोनमध्ये त्यांच्या कामाशी संबंधित गोपनीय आणि संवेदनशील कागदपत्रे संग्रहित केली होती.
  • पाकिस्तानी एजंटशी केलेल्या एका व्हॉट्सॲप चॅटमध्ये कुरुलकर कथितपणे लिहितात, “त्या लाँचरचं डिझाइन मी केलं होतं, बेबी. हे लाँचर डिझाइन करणं माझ्यासाठी महान यश होतं.” आणखी एका चॅटमध्ये कुरुलकर यांनी कथितरित्या म्हटलं की, ‘ॲस्ट्रा क्षेपणास्त्र’ (Astra missile) हे ‘मेटियर’ (Meteor) क्षेपणास्त्रापेक्षा अचूक आहे.
  • कुरुलकर आणि ‘झारा’ यांच्यात झालेल्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये ‘ब्रह्मोस’, अग्नी-६, रुस्तम (मध्यम पल्ल्याचं मानवरहित हवाई क्षेपणास्त्र), ‘सरफेस टू एअर मिसाईल्स’ (एसएएम- जमिनीवरून हवेत हल्ला करणारं क्षेपणास्त्र), मानवरहित ‘कॉम्बॅट एअर व्हेइकल्स’ (यूसीएव्ही) , DRDO चा ड्रोन प्रकल्प अशा विविध संवेदनशील प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण झाली आहे. याशिवाय क्वाडकॉप्टर, डीआरडीओ ड्युटी चार्ट, मेटियर क्षेपणास्त्र, राफेल, आकाश आणि ॲस्ट्रा क्षेपणास्त्रबाबतची माहिती लीक करण्यात आली आहे. तसेच एका खासगी भारतीय संरक्षण कंपनीच्या कार्यकारिणीचाही उल्लेख चॅटींगमध्ये करण्यात आला आहे.

रेल्वेची २५ टक्क्यांपर्यंत भाडेकपात; वातानुकूलित चेअर कार, एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी सवलत

  • ‘अनुभूती’ आणि ‘व्हिस्टाडोम’ डब्यांसह वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या रेल्वे गाडय़ांच्या चेअर कार आणि ‘एक्झिक्युटिव्ह’ श्रेणीच्या प्रवासीभाडय़ात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. ही सवलत एका वर्षांसाठी लागू असेल, मात्र सुट्टी/उत्सव विशेष रेल्वे गाडय़ांना ती लागू होणार नाही.
  • ही सवलत तात्काळ लागू होणार आहे. मात्र या निर्णयाआधी आरक्षण केलेल्या प्रवाशांना परतावा दिला जाणार नाही, असे रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे. रेल्वे मंडळाने गेल्या ३० दिवसांत प्रवाशांचा ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसाद मिळालेल्या रेल्वे गाडय़ांमधील भाडे कमी करण्याचे आदेश रेल्वे विभागांना दिले आहेत. त्यानुसार प्रामुख्याने कमी अंतराच्या रेल्वे गाडय़ांच्या भाडय़ात सूट दिली जाणार आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे दर कमी होणार आहेत. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट अधिभार आणि जीएसटीचे दर पूर्वीप्रमाणेच राहतील, त्यात सवलत मिळणार नसल्याचे रेल्वे मंडळाने म्हटले आहे.

राज्यातील ‘वंदे भारत’ला सवलत नाही

  • मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सध्या तीन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावत आहेत. सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव आणि सीएसएमटी ते सोलापूर या तिन्ही गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे मंडळाच्या सवलत निकषात या गाडय़ा बसत नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

भारतातील व्याघ्रप्रकल्प शिकाऱ्यांच्या रडारवर; ताडोबा, पेंचला ‘रेड अलर्ट’

  • भारतातील तेरा व्याघ्रप्रकल्पांना केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने धोक्याचा इशारा दिला आहे. यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील व्याघ्रप्रकल्पांचा समावेश आहे.
  • प्रामुख्याने महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्प शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. सात ते आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शिकाऱ्यांनी उच्छाद मांडला होता. मध्यप्रदेशातील कटनी येथील बहेलिया या शिकारी टोळ्यांनी मेळघाट, ताडोबा, पेंच या व्याघ्रप्रकल्पात मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार केली. २० ते २५ वाघ यात मारले गेले. शंभराहून अधिक शिकाऱ्यांना अटक झाली.
  • यात महाराष्ट्रातील वनखात्याच्या काही अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजावली. २०१६ नंतरही शिकाऱ्यांचा उच्छाद सुरूच होता. पण, बऱ्याच प्रमाणात त्यावर नियंत्रण आले आणि वनखाते निश्चिंत झाले. याचाच फायदा घेत शिकाऱ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्रप्रकल्पातील चोरना गाभा क्षेत्रातील एका जलाशयात वाघाचा मृतदेह सापडला.
  • शिकाऱ्यांनी वाघाची मान कापली होती. या घटनेनंतरच केंद्रीय वन्यजीव गुन्हे शाखेने सर्व व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांना आणि अभयारण्यासह लगतच्या क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क केले. संघटित शिकारी टोळ्या व्याघ्रक्षेत्राभोवती सक्रिय आहेत. विशेषत: सातपुडा, ताडोबा, पेंच, कार्बेट, अमनगड, पिलीभीत, वाल्मिकी, राजाजी आणि बालाघाट, गडचिरोली, चंद्रपूर यासारखे वाघांचे क्षेत्र शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे तंबू, मंदिरे, रेल्वेस्थानक, बसस्थानके, पडक्या इमारती, सार्वजनिक निवारा स्थळे या ठिकाणी संशयित भटक्या लोकांची चौकशी करावी. संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी. तसेच पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहून त्यांच्यासोबत माहितीची देवाणघेवाण करावी, असे निर्देश केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने दिले आहेत.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१० जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.