१० ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१० ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 10 October 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

_

१० ऑक्टोबर चालू घडामोडी

गुजरातचे मोधेरा देशातील पहिले ‘सौरऊर्जा ग्राम’:

 • मेहसाणा जिल्ह्यातील मोधेरा हे देशातील पहिले 100 टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव ठरले आहे.
 • येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.
 • सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आता ‘सौरऊर्जा ग्राम’ म्हणून ओळखले जाईल, असे ते म्हणाले.
 • मोधेरामध्ये पुष्पावती नदीच्या काठावर 10व्या शतकात बांधलेले सूर्यमंदिर आहे.
 • तिथेच आता मोकळय़ा जमिनीवरील सौरऊर्जा प्रकल्प तसेच 1,300 छपरांवर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आल्या आहेत.
 • त्यातून ‘बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टीम’मध्ये वीज साठवली जाते आणि नंतर तिचे गावात वितरण होते.

महेंद्रसिंह धोनीने लॉन्च केला ‘ड्रोनी’ कॅमेरा:

 • भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने स्वदेशी ‘ड्रोनी’ या ड्रोन कॅमेराला लॉन्च केले आहे.
 • अत्याधुनिक सुविधा असलेले हे ड्रोन ‘गरुडा एयरोस्पेस’ या कंपनीने निर्मित केले आहे.
 • धोनी या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.
 • या कंपनीने बनवलेला ‘ड्रोनी’ हा कॅमेरा 2022 च्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होईल.
 • “ड्रोनी ड्रोन हा पूर्णत: स्वदेशी बनावटीचा आहे. याचा उपयोग विविध उद्दिष्टांसाठी पाळत ठेवण्यासाठी होऊ शकतो.
 • ड्रोन अत्यंत कार्यक्षम, अखंड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आला आहे.

आयोगाकडून ‘शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावास मान्यता:

 • शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले.
 • त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली.
 • ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे.
 • ठाकरे गटाच्या वतीने ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे पक्षनावांचे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते.

हरमनप्रीत कौरने आयसीसी पुरस्कार जिंकत रचला इतिहास:

 • भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.
 • दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या श्रेणीतील महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.
 • महिला गटात हरमनप्रीत महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे, तर रिझवानला पुरुष गटात हा बहुमान मिळाला आहे.
 • हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये इतिहास रचला होता, कारण भारताला 1999 नंतर एकदाही इंग्लंडमध्ये विजय मिळवता आला नव्हता.
 • पण आता हरमनप्रीतच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 • हा पुरस्कार मिळवण्यासाठी हरमनप्रीत कौरने सहकारी खेळाडू स्मृती मानधना आणि बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना यांना मागे टाकले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१० ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.