७ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
७ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 7 October 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

 ऑक्टोबर चालू घडामोडी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – मालविका बनसोडला रौप्यपदक:

 • महाराष्ट्राच्या अग्रमानांकित मालविका बनसोडला गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडिमटन प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच तिरंदाज गौरव लांबेने सहा तासांच्या अंतराने रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. बॅडिमटनमधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित मालविकाने दुसऱ्या मानांकित छत्तीसगडच्या आकर्शी कश्यपकडून ८-२१, २०-२२ अशी हार पत्करली.
 • तिरंदाजीत गौरव लांबेने दोन पदके मिळविली. गौरवने चारुलतासोबत रिकव्‍‌र्हच्या मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या जोडीला हरयाणाविरुद्ध टायब्रेकरमध्ये २७-२८ असा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राचे हे तिरंदाजीतील सहावे पदक ठरले.
 • गौरवने सकाळच्या सत्रात सांघिक रिकव्‍‌र्ह गटात कांस्यपदक मिळविले होते. महाराष्ट्राच्या अनुज शहाने पुरुषांच्या एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात कांस्यपदक पटकावले. निखिल दुबेने बॉक्सिंगमध्ये विजयी सलामी देताना राजस्थानच्या प्रितेश बिश्नोईला ४-१ असे नमवले. रेनॉल्ड जोसेफने आसामच्या रोशन सोनारविरुद्ध ५-० असा एकतर्फी विजय मिळविला.

फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांना साहित्याचे नोबेल:

 • फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका अ‍ॅनी अर्नो यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘व्यक्तिगत स्मरणशक्तीचे मूळ, त्यातील विसंगती आणि सामूहिक प्रतिबंध उलगडण्यासाठी दाखवलेले धैर्य आणि चिकित्सक वृत्ती’ यासाठी अर्नो यांना गौरवण्यात येत असल्याचे स्वीडिश अकॅडमीने जाहीर केले.
 • अर्नो (८२) यांनी आपल्या लेखनाची सुरुवात आत्मकथनपर कादंबऱ्यांनी केली. मात्र कालांतराने त्यांनी स्मरणशक्तीपर लेखन सुरू केले. त्यांची २०पेक्षा जास्त पुस्तके ही छोटी आणि त्यांच्या किंवा आसपासच्या व्यक्तींच्या जीवनातील घटना सांगणारी आहेत.
 • लैंगिक संबंध, गर्भपात, आजारपण, आईवडिलांचा मृत्यू अशा घटनांचे चित्र त्यातून उभे राहते. त्यांच्या २००८ साली प्रसिद्ध झालेल्या आणि सर्वाधिक गाजलेल्या ‘द इयर्स’ या आत्मकथनपर लेखनात दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समधील समाजाची स्थित्यंतरे त्या विशद करतात. या पुस्तकाची खासियत अशी की यामध्ये प्रथमच त्यांनी नायिकेचा उल्लेख तृतीयपुरुषी केला. आतापर्यंतच्या कादंबऱ्यांमध्ये त्या ‘मी’ असे लिहीत असत. ‘द इयर्स’मध्ये त्यांनी ‘ती’ची कहाणी सांगितली. या आठवडय़ात नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून शुक्रवारी ‘शांतता पुरस्कार’ जाहीर होणार आहे.
 • पूर्वाश्रमीच्या अ‍ॅनी डचेन्स यांचा जन्म १ सप्टेंबर १९४० रोजी फ्रान्समधील लिलिबोन इथे झाला. त्यांचे बालपण नर्ॉमडी येथील येटोट इथे गेले. शिक्षक होण्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी साहित्यामध्ये उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी विद्यापीठात साहित्यामध्ये अध्यापनाचे काम केले. ‘द इयर्स’ या पुस्तकासाठी २०१९ साली अ‍ॅनी अर्नो यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन होते.

भारताच्या तीन खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने, जाणून घ्या:

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर २०२२ साठी पुरूष आणि महिला गटातील प्लेअर ऑफ द मंथसाठी प्रत्येकी ३ खेळाडूंची निवड केली आहे. दोन्ही श्रेणीतील एकूण ६ खेळाडूंपैकी ३ भारतीय आहेत. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि भारतीय पुरुष क्रिकेटपटू अक्षर पटेल यांचा समावेश आहे. प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत पाकिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक क्रिकेटपटू आहे.
 • आयसीसी पुरुषांच्या टी२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला सप्टेंबर २०२२ साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी निवडण्यात आले आहे. रिझवानने गेल्या महिन्यात १० सामने खेळले. यातील त्याने २०१४ मध्ये अर्धशतक झळकावले. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनचेही नाव आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करताना ९ बळी मिळवले होते. ग्रीन याने देखील याच मालिकेत दोन आक्रमक अर्धशतके झळकावली होती. तर रिझवानने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तसेच आशिया चषकात सातत्यपूर्ण फलंदाजी केली होती.
 • हरमनप्रीत कौरसाठी सप्टेंबर २०२२ हा केवळ एक फलंदाज म्हणून नव्हे तर भारतीय संघाची कर्णधार म्हणूनही संस्मरणीय महिना होता. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा ३-० असा पराभव केला. १९९९ नंतर भारताचा इंग्लंडमध्ये हा पहिलाच मालिका विजय होता. हरमनप्रीतने या मालिकेत १०३.२७ च्या स्ट्राईक रेटने २२१ धावा केल्या. ती या मालिकेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. पहिल्या दोन सामन्यात तिने फिनिशरची भूमिका बजावली होती.

‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सोनिया गांधी यांचा सहभाग:

 • काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधत असलेले राहुल गांधी यांचे ‘भारत जोडो’ यात्रेतील छायाचित्र शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर, सोनिया व राहुल गांधी यांच्या एकत्रित सहभागाचा कर्नाटकसह अन्य राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला किती लाभ होऊ शकेल, याची चर्चा सुरू झाली आहे.
 • या चर्चेकडे भाजपलाही लक्ष द्यावे लागले असून ‘यात्रेमध्ये सोनिया फक्त अर्धा तास सहभागी झाल्या होत्या, या यात्रेमुळे निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही,’ असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच, केंद्रातील भाजपचे नेतेही करत आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यात्रा काढून काँग्रेस घाम गाळत असल्याचे दिसत असले तरी, त्याचा काँग्रेसला राजकीय फायदा होण्याची शक्यता नाही,’ असा दावा भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी केला.
 • काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या कर्नाटकमध्ये असून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी मंडय़ा जिल्ह्यातून यात्रा पुन्हा सुरू झाली. सकाळी साडेआठ वाजता सोनिया गांधी यात्रेमध्ये सहभागी झाल्या, सुमारे एक किमी अंतर चालल्यानंतर, राहुल गांधी यांनी सोनियांना सकाळच्या टप्प्यातील उर्वरित यात्रा कारमधून पूर्ण करण्याची विनंती केली. काही वेळानंतर, सोनियांनी पुन्हा दोन किमीची पदयात्रा केली. यात्रेमध्ये सोनिया गांधी जेमतेम अर्धा तास सहभागी होणार होत्या; पण त्यांनी दोन तास पदयात्रा केली, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

उत्तर कोरियाने डागलेल्या क्षेपणास्त्राचा भारताकडून निषेध, जपानची सुरक्षितता धोक्यात आल्याचे केलं नमूद:

 • उत्तर कोरियाने जपानवरून डागलेल्या क्षेपणास्त्राचा भारताने निषेध नोंदवला आहे. यामुळे जपानसह लगतच्या परिसरातील शांती आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे भारताने म्हटले आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनेही निषेध नोंदवला आहे. पाच वर्षांत उत्तर कोरियाने जपानवर डागलेले हे पहिले क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र मंगळवारी जपानच्या क्षेत्रात असलेल्या प्रशांत महासागरात सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी पडले होते.
 • या वर्षांत उत्तर कोरियाने २४ वेळा क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. “उत्तर कोरियाने डागलेल्या क्षेपणास्त्राची आम्ही दखल घेतली आहे” असे संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सुरक्षा परिषदेत म्हटले आहे. या घटनेवर संयुक्त राष्ट्रामधील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी ब्राझिल, भारत, आर्यलँड, जपान, नॉर्वे, दक्षिण कोरिया, इंग्लंड, सौदी अरेबियासह ११ देशांच्यावतीने संयुक्त निवेदन जारी केले आहे. या प्रक्षेपणाने सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन केले आहे. यामुळे केवळ जपानमधील प्रदेशालाच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजाला धोका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 • संयुक्त राष्ट्रामधील उत्तर कोरियाशी संबंधित ठरावांची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी रुचिरा कंबोज यांनी केली आहे. कोरियन द्वीपकल्पात शांती आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे सामूहिक हिताचे आहे. या द्वीपकल्पातील समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचे आम्ही समर्थन करतो, असे कंबोज यांनी म्हटले आहे. कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त व्हावा, यासाठीही पाठिंबा असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांना साहित्याचे नोबेल:

 • फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका अ‍ॅनी अर्नो यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • ‘व्यक्तिगत स्मरणशक्तीचे मूळ, त्यातील विसंगती आणि सामूहिक प्रतिबंध उलगडण्यासाठी दाखवलेले धैर्य आणि चिकित्सक वृत्ती’ यासाठी अर्नो यांना गौरवण्यात येत असल्याचे स्वीडिश अकॅडमीने जाहीर केले.
 • अर्नो यांनी आपल्या लेखनाची सुरुवात आत्मकथनपर कादंबऱ्यांनी केली.
 • त्यांची 20 पेक्षा जास्त पुस्तके ही छोटी आणि त्यांच्या किंवा आसपासच्या व्यक्तींच्या जीवनातील घटना सांगणारी आहेत.
 • ‘द इयर्स’ या पुस्तकासाठी 2019 साली अ‍ॅनी अर्नो यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन होते.
फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो

PM मोदींच्या सरकारने शिंदे गटाकडे सोपवली पहिली महत्त्वाची जाबबदारी:

 • केंद्रात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने शिंदे गटाकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.
 • केंद्र सरकाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटातील खासदाराची वर्णी लागली आहे.
 • शिंदे गटातील खासदार असणाऱ्या प्रतापराव जाधव यांना अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.
 • राज्यातील सत्तांतरण आणि खासदारांनी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर मोदी सरकारने पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी शिंदे गटाकडे सोपवली आहे.

भारताच्या तीन खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने:

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर 2022 साठी पुरूष आणि महिला गटातील प्लेअर ऑफ द मंथसाठी प्रत्येकी 3 खेळाडूंची निवड केली आहे.
 • दोन्ही श्रेणीतील एकूण 6 खेळाडूंपैकी 3 भारतीय आहेत.
 • यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि भारतीय पुरुष क्रिकेटपटू अक्षर पटेल यांचा समावेश आहे.
 • प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत पाकिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक क्रिकेटपटू आहे.

रहकीम कॉर्नवॉलने टी-२० सामन्यात ठोकलं द्विशतक:

 • वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवॉलने टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावत इतिहास रचला आहे.
 • यूएसएमध्ये सुरू असलेल्या अटलांटा ओपन टी-20 क्रिकेट स्पर्धेत रहकीमने ही कामगिरी केली.
 • रहकीमने स्वायर ड्राईव्ह संघाविरुद्ध खेळताना 77 चेंडून 17 चौकार आणि 22 षटकारांच्या मदतीने नाबाद 205 धावा काढल्या.
 • तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध टी-20 सामन्यातून रहकीम कॉर्नवॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
 • कॉर्नवॉल हा फलंदाजीबरोबरच ऑफ स्पीनर सुद्धा आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

७ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.