११ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
११ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |11 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

११ मार्च चालू घडामोडी

China President : शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी! माओंनंतर ‘हा’ विक्रम करणारे पहिले नेते

 • नॅशनल पीपल्स पार्टी च्या १४ व्या बैठकीत शी जिनपिंग हे तिसऱ्यांदाचे चीनचे राष्ट्राध्यक्ष होतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शी जिनपिंग यांची ताकद वाढली आहे. शुक्रवारी म्हणजेच आजपासूनच ते तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. माओ त्से तुंग यांच्यानंतर पहिल्यांदाच प्रदीर्घकाळ चीनचं राष्ट्राध्यक्ष पद भुषवण्याचा बहुमान शी जिनपिंग यांच्या नावावर कोरला गेला आहे. चीन सरकार आणि अर्थव्यवस्था दोहोंवर पकड मजबूत करण्याचा निश्चय शी जिनपिंग यांनी केला आहे.
 • चीनच्या खासदारांची नॅशनल पीपल्स काँग्रेसने ५ मार्चला या बैठकीची सुरूवात केली होती. ही बैठक आठवडाभर सुरू होती. या बैठकीत ६९ वर्षीय शी जिनपिंग यांना काही आव्हानांनाही सामोरं जावं लागलं आहे. त्यांच्या झीरो कोव्हिड नितीवरही काही प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र यानंतर या सगळ्या बैठकीच्या नंतर शी जिनपिंग यांचं नाव निश्चित करण्यात आलं.
 • चीनच्या राष्ट्राध्यक्षांची निवड चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांच्या बैठकीत केली जाते. ऑक्टोबरच्या मध्यात कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटीकडून देशभरात लोकप्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. यंदा सुमारे ३ हजार प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. या प्रतिनिधींची बैठक पार पडते. सेंट्रल कमिटीमध्ये २०० सदस्य असतात. ही सेंट्रल कमिटी पॉलिटब्युरो मधील २५ सदस्यांची नेमणूक करतात आणि सात सदस्यीय स्थायी समितीमधून एका व्यक्तीची राष्ट्राध्यक्ष म्हणूनही निवड करतात.
 • चीनमध्ये एकपक्षीय राजवट आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, हा चीनचा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे. शी जिनपिंग यांची दोन वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. आता शी जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत.

‘अग्निवीरां’ना ‘बीएसएफ’मध्ये १० टक्के आरक्षण; कमाल वयोमर्यादेची अटही शिथील 

 • महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी अग्निवीरांसाठी सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) रिक्त पदांच्या भरतीसाठी कमाल वयोमर्यादेची अट शिथील करण्यासह दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या, ‘जनरल डय़ुटी केडर’ (अराजपत्रित) भरती नियम,२०१५ मध्ये सुधारणा केल्यानंतर अधिसूचनेद्वारे ही घोषणा करण्यात आली. 
 • या संदर्भातील अधिसूचनेत नमूद केले, की दहा टक्के रिक्त पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील. मंत्रालयाने म्हटले आहे की माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत शिथील असेल, इतर तुकडीच्या उमेदवारांसाठी ही मर्यादा तीन वर्षांपर्यंत शिथील असेल. माजी अग्निवीरांनाही शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट दिली जाईल.
 • केंद्राने गेल्या वर्षी १४ जून रोजी लष्कर, नौदल आणि हवाई दलात साडे सतरा ते २१ वयोगटातील तरुणांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू केली होती. त्याचा चार वर्षांचा अल्प मुदतीचा सेवाकाळ आहे. या योजनेंतर्गत भरती झालेल्यांना ‘अग्निवीर’ म्हणून ओळखले जाते. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तुकडीतील २५ टक्के अग्निवीरांना नियमित सेवेत सामावून घेण्याचीही तरतूद आहे. उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांसाठी केंद्रीय निमलष्करी दल व ‘आसाम रायफल्स’मधील दहा टक्के राखीव ठेवल्या जातील. अग्निपथ योजनेंतर्गत पहिल्या तुकडीत भरती झालेल्या कमाल २१ वर्षे वयोमर्यादेतील उमेदवारास लष्कर, हवाई दल किंवा नौदलात चार वर्षांच्या सेवेनंतर ‘बीएसएफ’मध्ये भरती होण्यासाठी ३० वर्षे वयोमर्यादेपर्यंत संधी मिळेल. त्यानंतरच्या तुकडय़ांसाठी वयाच्या २८ वर्षांपर्यंत भरतीची वयोमर्यादा शिथील केली आहे.

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी आज चुरस; ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे रिंगणात

 • साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी (११ मार्च) निवडणूक होत असून त्यासाठी ज्येष्ठ मराठी साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी हिंदी साहित्यिक व अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक तसेच कन्नड साहित्यिक डॉ. मल्लेपुरम व्यंकटेश यांना आव्हान दिले आहे. मराठी साहित्यिकाला आत्तापर्यंत एकदाही अकादमीचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळालेला नसून यंदा तरी तो मिळेल का, याची साहित्य वर्तुळात उत्सुकता आहे.
 • गेल्या वेळी ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले होते. मात्र, त्यांना फक्त चार मते मिळाली होती. प्रचार न करण्याची नेमाडे यांनी केलेली चूक यावेळी दुरुस्त करण्याचा पठारे यांनी प्रयत्न केला आहे. साहित्य अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेच्या अधिकाधिक सदस्यांशी पठारे यांनी संपर्क साधला आहे. शिवाय, पठारेंच्या कादंबऱ्यांचे अन्य भाषांमध्ये अनुवाद झालेले असल्यामुळे अन्य भाषक साहित्यिकांनाही पठारे परिचित आहेत. त्यामुळे नेमांडेंपेक्षा पठारेंना विजयाची अधिक संधी असू शकते, असे या निवडणुकीच्या घडामोडींशी संबंधित समीक्षकांचे म्हणणे आहे.
 • सर्वसाधारण परिषदेमध्ये २४ भाषांतील प्रतिनिधींसह एकूण ९९ सदस्य आहेत. मंडी हाऊस येथील रवींद्र भवनातील साहित्य अकादमीच्या मुख्यालयामध्ये शनिवारी अकरा वाजल्यानंतर मतदान होईल. गेल्या वेळी ८९ सदस्यांनी मतदान केले होते, त्यापैकी ५६ मते कवी-नाटककार चंद्रशेखर कम्बार यांना मिळाली होती. ओदिशातील साहित्यिक प्रतिभा रे यांना २९ तर, साहित्यिक-समीक्षक भालचंद्र नेमाडे यांना ४ मते मिळाली होती. यापूर्वीही साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे डाव्या-उजव्या विचारांच्या संघर्षांच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले होते. कम्बार यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर उजवीकडे वळलेला प्रशासकीय लंबक संतुलित झाला आणि अकादमीची स्वायत्तता पुन्हा प्रस्थापित झाली, असे मानले गेले होते.

जुनी पेन्शन योजना गरिबांकडून घेऊन श्रीमंतांना देणारी..

 • विचारसरणी कोणतीही असो, बहुतेक सरकारे श्रीमंतांकडून त्यांची संपत्ती काढून घेऊन ती गरिबांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाटता येईल या प्रकारची धोरणे राबवतात. या संदर्भात मला जुन्या पेन्शन प्रणाली (OPS) च्या बाजूने आलेले प्रस्ताव सर्वात जास्त गोंधळात टाकणारे वाटतात.
 • लोकांच्या दृष्टीने, जुनी पेन्शन प्रणाली ही एक ‘वापराल तेवढेच पैसे द्या’ या प्रकारची योजना आहे. या योजनेतून सध्या सरकारच्या सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शनदायित्व भागवले जाते. याउलट, २००३ मध्ये एनडीए सरकारने स्थापन केलेली नवीन पेन्शन योजना किंवा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ही एक नीट योजना असून त्यात कर्मचारी त्यांच्या वेतनातील काही भाग गुंतवतात आणि सरकारही त्यात काही गुंतवणूक करते.
 • जुन्या पेन्शन योजनेमध्ये, कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या ५० टक्के समतुल्य रकमेची हमी दिली जाते. या दोन्ही धोरणांमध्ये किती भिन्न आर्थिक परिणाम होतात याची कल्पना करणे अवघड नाही. वाढते आयुर्मान पाहता, जुनी पेन्शन योजना टिकाऊ बनवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अधिकाधिक सरकारी कर्मचारी असणे, पण त्यामुळे तिच्यात संबंधित अकार्यक्षमता वाढते – किंवा उत्तरोत्तर अधिक कर्ज घेणे.
 • यातून काय होईल ते स्पष्ट आहे. पेन्शनच्या ओझ्याखाली राज्यांची आर्थिक स्थिती ठप्प होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यांच्या वित्तविषयक नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात (१९ नोव्हेंबर २०२२) राज्यांच्या निवृत्तिवेतनावरील खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. राजस्थान जुन्या पेन्शन योजनेत सगळ्यात आधी गेले, आज त्याचा पेन्शनवरील खर्च तब्बल २८ टक्के आहे. याउलट, उदाहरणार्थ, महाराष्ट्रात हीच टक्केवारी १४ टक्के आहे, तर गुजरातमध्ये १५ टक्के आहे.

आता महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल – मोदी 

 • महिला बचत गटांनी एक अब्ज डॉलरची उलाढाल करणाऱ्या ‘युनिकॉर्न’ कंपन्या होण्यापर्यंत मजल मारावी अशी अपेक्षा व्यक्त करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत भारताची वाटचाल ‘महिला विकासा’कडून ‘महिलांच्या नेतृत्वाखाली विकास’ अशी झाली आहे.
 • ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर ‘वेबिनार’मध्ये मोदी यांनी सांगितले की, भारतात आज अभियांत्रिकी, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात ४३ टक्के महिलांचा सहभाग आहे. ही संख्या अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसारख्या विकसित देशांपेक्षा जास्त आहे. वैद्यकीय क्षेत्र असो की क्रीडा, व्यवसाय, राजकारण..  महिलांचा सहभाग केवळ वाढला नाही तर त्या आघाडीवर आहेत.

H3N2 Influenza चा कहर! भारतात पहिला बळी, जाणून घ्या या व्हायरसविषयी

 • H3N2 इन्फ्लुएंझा या व्हायरसमुळे कर्नाटकमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भारतातला हा इन्फ्लुएंझामुळे झालेला पहिला बळी आहे. कर्नाटकमध्ये या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतात H3N2 ची प्रकरणं वाढत आहेत. डॉक्टरांनी या प्रकरणी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. आत्ता अजूनही इन्फ्लुएन्झाबाबत भीतीचं वातावरण नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, काळजी घ्या, मास्क लावा असे सल्ले डॉक्टरांकडून दिले जात आहेत. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
 • काय म्हटलं आहे ICMR च्या तज्ज्ञांनी?
 • आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार मागच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये इन्फ्लुएंझाचे रूग्ण वाढले आहेत. इन्फ्लुएंझा व्हायरसचा A सबटाइप म्हणजेच H3N2 या व्हायरसमुळे लोकांना सर्दी-खोकला आणि ताप या आजारांना सामोरं जावं लागतं आहे. H3N2 या व्हायरसमुळे लोकांचं रूग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढल्याचंही ICMR ने म्हटलं आहे. तसंच इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA ने असं म्हटलं आहे की सध्या वातावरणातल्या बदलांमुळेही तापाची साथ येते आहे. हा ताप पाच दिवस ते सात दिवस इतका कालावधी राहतो आहे. IMA ने सर्दी-खोकला आणि ताप आल्यावर अँटी बायोटेक घ्या आणि स्वतःचा बचाव करा असा सल्ला दिला आहे.
 • आयएमएच्या म्हणण्यानुसार काही काही रूग्ण असेही आहेत ज्यांचा ताप तीन दिवसांमध्ये जातो आहे. मात्र सर्दी आणि खोकला तीन आठवड्यांमध्येही जात नाही. प्रदूषणामुळेही १५ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयस्कर लोकांमध्ये सर्दी-खोकला आणि ताप येण्याचं प्रमाण वाढलं आहे.
 • इनफ्लुएंझा म्हणजे काय?
 • जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलेल्या माहितीनुसार इनफ्लुएंझा व्हायरस चार प्रकारचा असतो A, B, C, D असे चार प्रकार त्यात असतात. त्यातल्या A-B टाइपचे व्हायरस हे वातावरणातल्या बदलांमुळे पसरतात आणि आजारांचा प्रादुर्भाव होतो. इनफ्लुएंझा A हा टाइम महामारीसाठीही ओळखला जातो. या टाइप A चे दोन सबटाइम असतात एक असतो H3N2 आणि दुसरा H1N1. इनफ्लुएंझा टाइम B चे सबटाइप नसतात. टाइप सी हा फारसा गंभीर नाही. तर टाइप डी हा प्राण्यांमध्ये असतो.

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित :

 • आज विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
 • करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून राज्याच्या विकासाची गती मंदावलेली आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राने कात टाकली असून या क्षेत्रांना पुन्हा एकदा उभारी मिळत आहे.
 • २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालात या सर्वच क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा नोंदवण्यात आलीय. कृषी क्षेत्रासोबतच पशुसंवर्धन, वने व लाकूड तोडणी, मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती यांच्यातदेखील वाढ होण्याचे अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांना अजरामर गाण्यातून स्वरमयी आदरांजली :

 • भारतरत्न लतादीदींना इस्लामपूरच्या आविष्कार ग्रुपच्या वतीने अजरामर गाण्यांतून स्वरमयी आदरांजली वाहण्यात आली. स्वराभिषेकच्या ‘रहे ना रहे हम’ या कार्यक्रमातून इस्लामपूरची सुकन्या व सुरेश वाडकर यांची शिष्या राजेश्वरी गायकवाड, गायक शेखर गायकवाड व प्रशांत सालियन यांनी लतादीदींची बहारदार गाणी ‘दृक-श्राव्य’ पद्धतीने सादर करून कला रसिकांना मंत्रमुग्ध केले.
 • निवेदिका अर्चना थोरात यांनी केलेल्या सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाला संस्मरणीय  केले. राजेश्वरी गायकवाडने ‘मोगरा फुलला’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. लग जा गले, याद किया दिलने, आ जाने जा, कुछ दिलने कहा, न जाने क्यु, दिलकी नजरे से, रैना बिती जाए, ए जिंदगी उसी की है, तुम आ गए, अभी अभी थी दुष्मनी, चुनरी संभाल गोरी, ये रात भिगी भिगी, बाहोमे चली आ, मेरे अरमान मेरे सपने, वादा करले साजना, सायोनारा आणि शेवटी रहे ना रहे हम (ममता) आदी बहारदार गाणी तिने सादर केली. दुहेरी गाण्यात शेखर गायकवाड व प्रशांत सालियन यांनी तिला साथ दिली. 
 • या वेळी प्रा. शामराव पाटील, रोझा किणीकर, डॉ. एन.टी. घट्टे, आविष्कारचे माजी कार्याध्यक्ष नजीर शेख, माजी अध्यक्ष सतीश पाटील, डॉ. अतुल मोरे, सरपंच बाबुराव पाटील, बालाजी पाटील, खजिनदार राजेंद्र माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मोहन चव्हाण, अध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष भूषण शहा, सचिव विश्वनाथ पाटसुते, सहसचिव विजय लाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.

हा २०२४ चा कौल – मोदी :

 • उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपचा ऐतिहासिक विजय म्हणजे २०२४मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
 • केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातील विजयातून पुढे जातो, असे मानले जाते. त्याचा संदर्भ देत, मोदींनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप यशाची पुनरावृती करेल असा दावा केला. ‘’उत्तर प्रदेशातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चित केला होता असे काही विश्लेषकांचे म्हणणे होते.
 • उत्तर प्रदेशतील २०२२ च्या निकालाने २०२४मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिक्कामोर्तब केले असे हे विश्लेषक आता सांगू लागतील. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २०२२ च्या उत्तर प्रदेशातील निकालातून स्पष्ट दिसतो’’, असे मोदी म्हणाले. २०१४ व २०१९ मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, २०२४ची निवडणूक जिंकल्यास भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करू शकेल.
 • पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असून गोव्यामध्ये भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. या चारही राज्यांमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजप सत्ता स्थापन करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा,  गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या  नेत्यांनी गुरुवारी संध्याकाळी विजयोत्सव साजरा केला.

तीन विशेष विमानांनी सुमीमधील विद्यार्थी मायदेशी :

 • युक्रेनच्या ईशान्य भागातील सुमी या शहरातून स्थलांतरित करण्यात आलेला ६०० भारतीय विद्यार्थ्यांचा अखेरचा मोठा गट गुरुवारी रात्री विशेष विमानांनी मायदेशी रवाना झाला. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून तीन विमाने पाठवण्यात आली होती.
 • पोल्तावा या शहरातून या विद्यार्थ्यांना बुधवारी विशेष रेल्वेगाडीने पश्चिम युक्रेनमधील ल्यिव शहरात आणण्यात आले. त्यानंतर ल्यिव शहरातून दुसऱ्या विशेष रेल्वेगाडीने पोलंडमध्ये आणण्यात आले. पोलंडमधून तीन विशेष विमानांनी या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात येत आहे. पहिल्या विमानाने स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार
 • (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रीचे १०.३०) आणि तिसऱ्या विमानाने ६.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रीचे ११.३०) उड्डाण केले.
 • ‘‘आम्ही नुकतेच पोलंडमध्ये पोहोचलो असून लवकरच विशेष विमानाने मायदेशी परतणार आहोत,’’ असे जिस्ना जिजी या विद्यार्थिनीने सांगितले. युद्धजन्य युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेश परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम राबवली आहे.

रशियातील धनाढय़ांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी :

 • रशियाच्या धनाढय़ नागरिकांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांना ब्रिटनमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रीमियर लीग सूकर क्लब चेल्सियाचा अब्जाधीश रोमन अ‍ॅब्रामोव्हिच यांनाही ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांची ब्रिटनमधील बँक खाती गोठवण्यात आली आहे.
 • अ‍ॅब्रामोव्हिच यांना ब्रिटनमध्ये स्वतंत्रपणे किंवा व्यापारासाठी कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही, असे ब्रिटिश प्रशासनाकडून सांगण्यात आले. ब्रिटनमध्ये व्यापार करणाऱ्या आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या रशियन धनाढय़ांना तडाखा देण्यास ब्रिटनने सुरुवात केली आहे.
 • या धनाढय़ांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांची ब्रिटनमधील बँक खाती गोठवण्यात आली आहे. ‘बेसिक एलिमेंट्स’ या रशियातील मोठय़ा उद्योगसमूहाचे संस्थापक ओलेग देरिपास्का आणि रोस्नेफ्ट या ऊर्जा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयगोर सियाचिन यांनाही ब्रिटनने त्यांच्या देशात प्रवेशबंदी केली आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

११ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.