११ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
११ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |11 September 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

११ सप्टेंबर चालू घडामोडी

जगज्जेता जोकोविच! चौथ्यांदा पटकावलं अमेरिकन ओपनचं जेतेपद, २४ व्या ग्रँडस्लॅमला गवसणी!

  • सर्बियाचा टेनिसपटू, पण अवघ्या जगातल्या टेनिसप्रेमींच्या ह्रदयावर राज्य करणारा महान खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचनं आपण का टेनिसपटूंच्या गळ्यातले ताईत आहोत, हे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध केलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा तीन सेटमध्ये पराभव केला. या विजयासह नोव्हाक जोकोव्हिचनं चौथ्यांदा अमेरिक ओपन स्पर्धा जिंकली असून त्याचं हे कारकिर्दीतलं तब्बल २४वं ग्रँड स्लॅम ठरलं आहे.

तब्बल १ तास ४४ मिनिटं चालला दुसरा सेट!

  • तीन सेटमध्ये नोव्हाक जोकोविचनं डॅनिल मेदवेदेव याचा पराभव केला. मात्र, या दोघांमध्ये झालेले तिन्ही सेट टेनिस प्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फेडणारे ठरले. नोव्हाकनं त्याच्या चाहत्यांना अजिबात निराश न करता आपण जगज्जेतेपदासाठी का दावेदार आहोत? याचा नमुनाच अवघ्या जगासमोर सादर केला. पहिल्या सेटमध्ये नोव्हाकनं ६-३ असा सहज विजय मिळवत आपला क्लास दाखवून दिला. पण मेदवेदेवसाठी खरी परीक्षा दुसरा सेट ठरली!
  • दुसऱ्या सेटमध्ये मेदवेदेवनं कडवी झुंज देत आपणही यूएस ओपनच्या अंतिम फेरीला साजेसा खेळ केला. पण नोव्हाकच्या अव्वल दर्जाच्या फटक्यांसमोर मेदवेदेवला अखेर शरणागती पत्करावी लागली. हा सेट टायब्रेकरमध्ये गेल्यानंतर नोव्हाकनं आपला खेळ अजून उंचावत सेट खिशात घातला. ७-६(५) असा हा सेट जिंकून जोकोविचनं आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दमछाक झालेल्या मेदवेदेवला तिसऱ्या सेटमध्ये नोव्हाकनं ६-३ असं सहज हरवत चौथ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं!

“मी याची कधीच कल्पना केली नव्हती!”

  • दरम्यान, विजयानंतर जोकोविचनं भावनिक प्रतिक्रिया दिली. “मी कधीच कल्पना केली नव्हती की कधीतरी मी अशा प्रकारे तुमच्यासमोर उभा राहून माझ्या २४व्या ग्रँडस्लॅमविषयी बोलेन. हे कधी प्रत्यक्षात उतरेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. पण गेल्या दोन वर्षांत मला असं वाटू लागलं होतं की मी हे करू शकतो. मला संधी आहे. मला इतिहास घडवण्याची संधी असेल तर मी ती का घेऊ नये?” अशी प्रतिक्रिया ३६ वर्षीय जोकोविचनं दिली.

शासकीय नोकरीच्या स्वप्नावर पाणी!; बाह्ययंत्रणेद्वारे महत्त्वाच्या पदांवर मनुष्यबळ भरतीचा निर्णय

  • शासकीय कायमस्वरूपी नोकरीच्या आशेने राज्यातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना राज्य शासनाने विकासकामांना पुरेसा निधी मिळावा व प्रशासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी रिक्त जागांवर बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत १३८ पदांच्या भरतीसाठी नऊ बाह्य सेवापुरवठादार संस्थांच्या कंत्राटदारांना मान्यता देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.
  • राज्य शासनाच्या विविध विभागांत ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या चारही गटांच्या मिळून सरासरी तीन लाख जागा रिक्त आहेत. बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी नऊ सेवा पुरवठा संस्था आणि पॅनेलची नियुक्ती केली आहे. यामध्ये अतिकुशल मनुष्यबळाच्या वर्गवारीत तब्बल ७० प्रकारची विविध पदे भरली जातील. कुशल मनुष्यबळामध्ये ५०, अकुशलची १० प्रकारची पदे तर अर्धकुशल आठ प्रकारची पदे कंत्राटदार संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

कोणत्या पदांचा समावेश ?

  • अतिकुशल मनुष्यबळ : प्रोजेक्ट ऑफिसर, मॅनेजर, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, जिल्हा समन्वयक, जनसंपर्क अधिकारी, आयटी अधिकारी
  • कुशल मनुष्यबळ : कायदा अधिकारी, शिक्षक, साहाय्यक शिक्षक, लेखाधिकारी, वरिष्ठ लिपिक, साहाय्यक संशोधक
  • अर्धकुशल गट : काळजीवाहक, हाऊसकीपिंग
  • अकुशल गट : मजूर, मदतनीस

कंत्राटी पद्धतीने महत्त्वाच्या पदांवर बाह्ययंत्रणेकडून मनुष्यबळ घेत असल्याने स्पर्धा परीक्षार्थीचे मोठे नुकसान होणार आहे. कल्याणकारी राज्याच्या कुठल्या व्याख्येमध्ये हे धोरण बसते, ते त्यांनी स्पष्ट करावे.

राज्यातील विजेची मागणी २१ हजार मेगावॅटवर

  • राज्यात काही दिवसांपूर्वी विजेची मागणी तब्बल २६ हजार मेगावॅटवर गेली होती. त्यामुळे एफ गटातील फिडरवर भारनियमन करण्याची पाळी महावितरणवर आली. परंतु एक- दोन दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात पाऊस सुरू झाल्याने ही मागणी घसरून २१ हजार २३८ मेगावॅटवर आली आहे.
  • पावसाने दडी मारल्याने राज्यात गेल्या आठवड्यात विजेची मागणी थेट २६ हजार मेगावॅटवर गेली होती. त्यापैकी २३ हजार ते २४ हजार मेगावॅटची मागणी महावितरणची होती. पावसाळ्यातील हा गेल्या काही वर्षांतील उच्चांक होता. महावितरणकडे मागणीच्या तुलनेत ९०० ते १,२०० मेगावॅट विजेचा तुटवडा असल्याने त्यांना एफ गटातील फिडरवर भारनियमन करावे लागले.
  • परंतु, आता राज्यातील बऱ्याच भागात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे एकीकडे तापमानात घट तर दुसरीकडे कृषी पंपासह पंखे व इतरही विद्युत यंत्राचा वापर कमी झाल्याने मागणी घसरून २१ हजार २३८ मेगावॅटवर आली आहे. महानिर्मितीकडून ९ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता ४ हजार ६६८ मेगावॅट वीज निर्मिती सुरू होती. त्यापैकी ४ हजार ९ मेगावॅट औष्णिक, ४१ मेगावॅट सौर, १२६ गॅसपासून वीज निर्मिती केली जात होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ८ हजार ४१२ मेगावॅट तर खासगी कंपन्यांपैकी अदानीकडून १ हजार ८२५, जिंदलकडून ९०८, रतन इंडियाकडून ८७६, एसडब्लूपीएलकडून ३७५ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. या वृत्ताला महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला. विजेची मागणी कमी झालेले भरनियमनाचे संकट तूर्तास दूर झाले आहे.

वायुसेना विंग कमांडरने १०००० फूट उंचीवर फडकवला G-20 परिषदेचा झेंडा : 

  • दिल्लीत जी-२० समूहाची शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या परिषदेत ४० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि अधिकारी दिल्लीत पोहोचले आहेत. विदेशातून आलेल्या पाहूण्यांचं स्वागत करण्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. वायुसेनेच्या एका विंग कमांडरचा व्हिडीओही इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. जी-२० ला अविस्मरणीय बनवण्यासाठी भारतीय वायुसनेचे विंग कमांडर गजेंदर यादव यांनी तब्बल १० हजार फूट उंचीवर स्कायडायविंग केली आणि जी-२० चा झेंडा फडकवला. आकाशातील हा थरारक व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
  • @SWAC_IAF या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, जी-२० शिखर परिषद सुरु होण्यासाठी आता थोड्या दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या परिषदेला आणखी सुंदर बनवण्यासाठी भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर गजेंदर यादव यांनी जी-२० च्या झेंड्यासोबत १० हजार फूट उंचीवर स्कायडायविंग केली. २७ सेकंदाच्या व्हिडीओत पाहू शकता की, विंग कमांडर हसत हसत १० हजार फूट उंचीवर जी-२० चा झेंडा फडकावत आहेत. या झेंड्यावर जी-२० चा लोगो लावण्यात आला आहे आणि बॅकग्राऊंडला ‘८३’ चित्रपटातील ‘लहरा दो’ गाणं वाजत आहे.
  • ७ सप्टेंबरला शेअर केलेल्या या व्हिडीओला लोकांनी खूप पसंती दर्शवली आहे. या व्हिडीओला ५० हजारांहून अधिक व्यूज मिळाले असून हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका यूजरने म्हटलंय, जय हिंद की वीर सेना..भारताला १ डिसेंबर २०२२ ला जी-२० परिषदेचं अध्यक्षपद दिलं होतं. जी-२० चे आतापर्यंत ६० हून अधिक शहरांमध्ये २०० पेक्षा जास्त प्रोग्राम आयोजित करण्यात आले आहेत.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

११ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.