११ नोव्हेंबर चालू घडामोडी _ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा _ दिनविशेष ११ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा) अधिक घडामोडी: १० नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ९ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ८ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ७ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ६ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022 Home Page MPSC Today Daily Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
११ नोव्हेंबर चालू घडामोडी _चालू घडामोडी प्रश्नमंजुषा _दिनविशेष ११ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)अधिक घडामोडी: १० नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ९ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ८ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ७ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ६ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022 Home Page MPSC Today Daily Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 12 November 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१२ नोव्हेंबर चालू घडामोडी

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा – भारतीय महिलांचा सुवर्ण चौकार:

  • आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिलांनी सुवर्ण चौकार लगावला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लवलिना बोरगोहेन (७५ किलो), परवीन हुडा (६३ किलो), स्विटी (८१ किलो) आणि अल्फिया पठाण (८१ किलोपेक्षा अधिक) या चौघींनी चमकदार कामगिरीसह विजेतेपद मिळविले. मीनाक्षी (५२ किलो) रौप्यपदकाची मानकरी ठरली.
  • भारताची अंतिम फेरीची सुरुवात अपयशी झाली होती. पहिल्या अंतिम लढतीत मीनाक्षीला जपानच्या किनोशिता रिंकाकडून पराभव पत्करावा लागला होता. मीनाक्षीने किनोशिताला झुंज दिली, पण पंचांनी कौल १-४ असा तिच्या विरोधात दिला. त्यानंतर मात्र भारताच्या चारही खेळाडूंनी वर्चस्व राखले. परवीनने जपानच्या किटो माई, तर लवलिनाने उझबेकिस्तानच्या रुझमेटोवा सोखिबा, स्विटीने कझाकस्तानच्या गुलसाया येरझानचा  एकतर्फी लढतीत पराभव केला.
  • आक्रमकता आणि सुरेख पदलालित्याच्या जोरावर बचाव भक्कम ठेवत परवीन आणि लवलिनाने बाजी मारली. पंचांनी तिघींच्या बाजूने ५-० असा कौल दिला. अल्फियाने जॉर्डनची प्रतिस्पर्धी इस्लाम हुसेलीला निष्प्रभ केले. अल्फियाने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारले. अल्फियाच्या आक्रमणांपुढे हुसेली निष्प्रभ ठरली. अल्फियाच्या हल्ल्यासमोर ती उभीच राहू शकत नव्हती. अखेरीस पंचांनी पहिल्या फेरीतच लढत थांबवून अल्फियाला विजयी घोषित केले.

दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू:

  • येथील क्रांतिवीर सांगोली रेल्वेस्थानकात शुक्रवारी दक्षिण भारतातील पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची सेवा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही एक्स्प्रेस चेन्नई-म्हैसूरदरम्यान बंगळुरुमार्गे धावणार आहे. रेल्वेच्या भारत गौरव रेल्वे धोरणांतर्गत ‘भारत गौरव काशीदर्शन’ या रेल्वेगाडीसही पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
  • या रेल्वेमुळे काशीदर्शनाची इच्छा असणाऱ्या हजारो यात्रेकरूंचे स्वप्न पूर्ण होईल, असे र्नैऋत्य रेल्वे विभागाने सांगितले. ही रेल्वे वाराणसीसह अयोद्धा, प्रयागराज आदी तीर्थस्थळांनाही जाणार आहे.
  • केम्पेगौडा यांच्या पुतळ्याचे अनावरण  बंगळुरुचे संस्थापक नादप्रभू केम्पेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळय़ाचे अनावरण तसेच  केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. हा पुतळा एखाद्या शहर संस्थापकाचा पहिला व सर्वात उंच कांस्य पुतळा म्हणून ‘वल्र्ड बुक ऑफ रेकॉर्ड’नुसार ओळखला जाईल. ‘समृद्धीचा पुतळा’ असे त्याला ओळखले जाईल.

विश्लेषण: एक राष्ट्र, एक निवडणूक प्रत्यक्षात येणार का:

  • वारंवार होणाऱ्या निवडणुका टाळण्यासाठीच एक राष्ट्र, एक निवडणूक म्हणजेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. या दृष्टीने नीती आयोगाने अहवाल तयार केला आहे. दोनच दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यात बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एकत्रित निवडणुकांकरिता निवडणूक आयोगाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. पण निर्णय संसदेने घ्यायचा असल्याचे मत त्यांनी मांडले.
  • आर्थिक भार टाळण्याकरिता निवडणुका एकत्रित घेण्याची भूमिका मांडली जाते. काँग्रेससह काही प्रादेशिक पक्षांचा मात्र एकत्रित निवडणुकांना विरोध आहे. राजकीय सहमतीशिवाय एकत्रित निवडणुका शक्य नाही. २०१९मध्ये एकत्रित निवडणुकांची मोदी यांची योजना प्रत्यक्षात आली नव्हती. आता २०२४ मध्ये तरी प्रत्यक्षात येते का, हा प्रश्न आहे.

ट्विटरची आठ डॉलर्सची सबस्क्रिप्शन सेवा रद्द, बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने निर्णय:

  • ट्विटरनं या आठवड्यात लॉन्च केलेलं ट्विटर ‘ब्लू टीक’ सेवेचं आठ डॉलर्सचं सबस्क्रिप्शन रद्द केलं आहे. बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्विटरने ही सेवा तुर्तास मागे घेतली आहे, अशी माहिती कंपनीच्या सुत्राने दिली आहे. युजर्संकडून मोठ्या ब्रँडच्या नावांचा गैरवापर होत असल्याचंही पुढे आले आहे. ज्या ग्राहकांनी याआधी हे सबस्क्रिप्शन घेतलं आहे, त्यांच्या खात्यांवर ही सेवा सुरू राहणार आहे.
  • या प्रकारानंतर कंपनीने हाय प्रोफाईल खात्यांसाठी नव्याने अधिकृत बॅजेस तयार केले आहेत. कंपनीच्या अंतर्गत मंजूर यादीनुसार व्यवसाय आणि माध्यमांशी संबंधित खात्यांवर ‘ग्रे बॅज’ दिसून येत आहे. ट्विटर ब्लू सेवा स्थगित करण्याआधी कंपनीने महत्त्वाच्या खात्यांसाठी हे बॅज तयार केले होते.
  • व्हेरिफाईड ‘ब्लू टीक’चा युजर्सकडून गैरवापर – व्हेरिफाईड ‘ब्लू टीक’साठी सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर बनावट खात्यांमध्ये वाढ झाली आहे. एका युजरने त्याच्या खात्यावर सुपर मारिओचा फोटो वापरून आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने फार्मा कंपनी ‘इली लीली’ या नावाचा वापर करत इंन्सुलीन मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे. या ट्वीटमुळे कंपनीला ग्राहकांची माफी मागावी लागली आहे. ट्विटरच्या एका युजरने ‘टेस्ला’ कंपनीच्या सुरक्षा रेकॉर्डची खिल्ली उडवली आहे.
  • ‘ट्विटर ब्लू’ काय आहे : या सेवेअंतर्गत ट्विटर युजर्संना कुठल्याही पडताळणी प्रक्रियेशिवाय ‘व्हेरिफाईड बॅज’ मिळणार आहे. या सेवेचे सबस्क्रिप्शन असणाऱ्या युजर्संना ट्विटरच्या इतर सेवांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. या सेवेमुळे काही युजर्संमध्ये मतभेद आहेत. ट्विटर पैसे आकारून सर्वांना हा बॅज देत असल्यामुळे या सेवेचा गैरवापर होऊ शकतो, अशी शंका काही युजर्संना आहे. ‘रिप्लाय’, ‘मेन्शन’ आणि ‘सर्च’ या सेवांमध्ये ‘ट्विटर ब्लू’ युजर्संना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होईल. याशिवाय युजर्संना मोठे व्हिडीओ आणि ऑडिओदेखील पोस्ट करता येणार आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासूनही या सेवेचे सबस्क्रिप्शन घेतल्यास युजर्सची सुटका होणार आहे.

1. मणिपूरमध्ये अमूर फाल्कन फेस्टिव्हलची 7 वी आवृत्ती साजरी झाली.

मणिपूरमध्ये अमूर फाल्कन फेस्टिव्हलची 7 वी आवृत्ती साजरी झाली.
  • मणिपूर वन प्राधिकरण अमूर फाल्कन महोत्सवाची 7 वी आवृत्ती तामेंगलाँग जिल्ह्यात, इंफाळमध्ये साजरी करणार आहे. अमूर फाल्कन फेस्टिव्हलचा उद्देश अमूर फाल्कनच्या संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागरूकता पसरवणे आहे.
  • अमूर फाल्कन हा जगातील सर्वात लांब उडणारा स्थलांतरित पक्षी आहे. हा एक दिवसभर चालणारा सण आहे जो सामान्यतः नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात मानवी-निसर्ग संबंध मजबूत करण्यासाठी आणि लोकांच्या जीवनात लहान रॅप्टरचे महत्त्व ओळखण्यासाठी साजरा केला जातो. अमूर फाल्कन फेस्टिव्हलची पहिली आवृत्ती 2015 मध्ये साजरी झाली.

2. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची 2 वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली.

न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची 2 वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली.

न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांचे प्रतिस्पर्धी झिम्बाब्वे क्रिकेट (ZC) चे अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी यांनी उशिराने स्पर्धेतून माघार घेतल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष म्हणून पुन्हा दोन वर्षांच्या कालावधीसाठी एकमताने पुन्हा निवड झाली. बार्कले, ज्यांनी 2022 ते या नोव्हेंबर दरम्यान ICC चेअर म्हणून पहिला कार्यकाळ सांभाळला, ते आता 2024 पर्यंत या पदावर असतील. बार्कले, ऑकलंड-आधारित व्यावसायिक वकील, यांची मूळतः नोव्हेंबर 2020 मध्ये ICC चेअर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते यापूर्वी अध्यक्ष होते. न्यूझीलंड क्रिकेट (NZC) चे आणि ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2015 चे संचालक होते. जुलैमध्ये, बार्कलेने सार्वजनिकपणे दुसऱ्या टर्मसाठी पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली.

3. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) लागू झाल्यापासून भारतातील लोकसंख्येचे दरडोई उत्पन्न 33.4 टक्क्यांनी वाढले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) लागू झाल्यापासून भारतातील लोकसंख्येचे दरडोई उत्पन्न 33.4 टक्क्यांनी वाढले आहे.
  • 2013 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) लागू झाल्यापासून भारतातील लोकसंख्येचे दरडोई उत्पन्न 33.4 टक्क्यांनी वाढले आहे, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
  • केंद्र सरकारने म्हटले आहे की लोकांच्या दरडोई उत्पन्नातील या वाढीमुळे मोठ्या संख्येने कुटुंबे उच्च उत्पन्न वर्गात गेली आहेत.

4. बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) Q2 क्रेडिट वाढीमध्ये PSU कर्जदारांच्या यादीत अव्वल आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) Q2 क्रेडिट वाढीमध्ये PSU कर्जदारांच्या यादीत अव्वल आहे.

2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) ने कर्जाच्या टक्केवारीच्या वाढीच्या बाबतीत इतर सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदारांना मागे टाकले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने जारी केलेल्या त्रैमासिक आकडेवारीनुसार, कर्जदात्याने सप्टेंबर 2022 अखेर एकूण 1,48,216 कोटी रुपयांच्या एकूण प्रगतीमध्ये 28.62 टक्के वाढ नोंदवली.

5. भारताच्या औद्योगिक उत्पादनात सप्टेंबरमध्ये 3.1% वाढ झाली आहे.

भारताच्या औद्योगिक उत्पादनात सप्टेंबरमध्ये 3.1% वाढ झाली आहे.
  • भारताचे औद्योगिक उत्पादन, औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) द्वारे मोजल्यानुसार, सप्टेंबरमध्ये 3.1 टक्क्यांनी वाढले, ज्याला वीज निर्मितीमध्ये दुहेरी अंकी वाढीचे समर्थन केले आहे. याची तुलना मागील महिन्यात 0.8 टक्के आकुंचन आणि सप्टेंबर 2021 मध्ये 4.4 टक्के वाढीशी केली जाते.
  • सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल-सप्टेंबर 2022 या कालावधीत देशातील औद्योगिक उत्पादन 7 टक्क्यांनी वाढले आहे, जे मागील वर्षीच्या 23.8 टक्के होते.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१२ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.