Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 12 September 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१२ सप्टेंबर चालू घडामोडी
भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार! आज ‘तारागिरी’ युद्धनौकेचे जलावतरण:
- भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत आणखी युद्धनौका दाखल होणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे प्रकल्प १७ ए मधील तिसरी युद्धनौका ‘तारागिरी’चे आज जलावतरण करण्यात येणार
- तारागिरी युद्धनौकेचे आज जलावतरण – तारगिरी प्रकल्पाची सुरुवात १० स्प्टेंबर २०२० मध्ये करण्यात आली होती. या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाईन ब्युरोने केले आहे. तर येत्या ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉक लिमिटेडने उदयगिरी आणि सूरत या युद्धनौकांचे नुकतेच लॉंचिंग केले होते. संपूर्ण तारागिरीचे काम हे इंटिग्रेटेड कंस्ट्रक्शन मेथडॉलॉजीने करण्यात येत आहे. त्यामध्ये ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक लिमिटेड येथे हे सुटे भाग जोडण्यात येणार आहेत. जवळपास ३५१० टनची युद्धनौका नौदलाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनच्या माध्यमातून या युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे.
- ‘तारागिरी’ युद्धनौकेची वैशिष्ट्ये – एमडीएलच्या माध्यमातून डिटेल डिझाईन आणि युद्धनौका बांधणीचे काम हे वॉरशीप ओव्हरसिईंग टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन गॅस टर्बाईन्स तसेच २ डिझेल इंजिनच्या माध्यमातून २८ नॉटिकल माईल्सचा वेग गाठणे हे युद्धनौकेला शक्य होणार आहे. यासाठी कार्बन मायक्रो अलॉय स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तसेच युद्धनौकेसाठीची शस्त्रे, सेन्सर, एडव्हान्स एक्शन इन्फॉर्मेशन सिस्टिमचा वापरही करण्यात आला आहे. सरफेस टू सरफेस अशा मिसाईल सिस्टिमचाही वापर युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. गनफायर सपोर्टही युद्धनौकेसाठी देण्यात आला आहे. तसेच रॉकेट लॉंचरचे फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे.
के. चंद्रशेखर राव राष्ट्रीय पक्ष स्थापन करणार, लवकरच होणार अधिकृत घोषणा:
- तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव लवकरच राष्ट्रीय पक्षाची स्थापना करणार आहेत. पक्षाचे धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती राव यांनी दिली आहे. राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या प्रवेशाबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. “विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याबाबत एकमत झाले आहे”, असे निवेदन राव यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
- के. चंद्रशेखर राव यांनी सातत्याने भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही महिन्यात विरोधकांमध्ये ऐक्य साधण्यासाठी त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या आहेत. तेलंगणातील विकासाचे मॉडेल देशभरात लागू करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात उतरेल, असे काही दिवसांपूर्वी राव यांनी जाहीर केले होते.
पाकिस्तानला F-16 विमानांसाठी अमेरिकेकडून ४५० अब्ज डॉलर्स, भारताने नोंदवला तीव्र निषेध:
- अमेरिकेने पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानांसाठी तब्बल ४५० अब्ज डॉलर्सचे पॅकेज मंजुर केले आहे. या पॅकेजबाबत भारताने अमेरिकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियाचे सहाय्यक सचिव डोनाल्ड लू यांच्याकडे भारताने या निर्णयाची वस्तुस्थिती आणि वेळेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
- जो बायडन सरकारने पाकिस्तानला दहशतवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी हे पॅकेज जाहीर केले आहे. गेल्या चार वर्षात अमेरिकेने सुरक्षा क्षेत्रासाठी पाकिस्तानला केलेली ही सर्वात मोठी मदत आहे. २०१८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांपासून सुरक्षेसाठी देण्यात येत असलेली २ अब्ज डॉलर्सची मदत रद्द केली होती. पाकिस्तानला अफगाणिस्तानातील तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांवर अंकुश ठेवण्यात आलेल्या अपयशानंतर ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला होता.
- दरम्यान, सागरी सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी भारताने ७ सप्टेंबरला अमेरिकेसोबत द्विपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत डोनाल्ड लूदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर काही दिवसातच अमेरिकेने पाकिस्तानसाठी हे पॅकेज जाहीर केले आहे. “दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तान महत्त्वाचा देश आहे. F-16 कार्यक्रम हा अमेरिका आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय संबंधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. याबाबत दिर्घकालीन धोरणानुसार अमेरिकेने पाकिस्तानसाठी हे पॅकेज जाहीर केले” अशी माहिती अमेरिकेच्या प्रवक्त्याने दिली आहे. F-16 लढाई विमानांच्या पॅकेजमध्ये कोणतेही शस्त्र किंवा युद्ध सामुग्री समाविष्ट नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेकडून देण्यात आले आहे.
सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या किबिथू छावणीला जनरल रावत यांचे नाव:
- येथील लोहित खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या किबिथू लष्करी छावणीला शनिवारी देशाचे पहिले सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचे नाव देण्यात आले. या गावाजवळून जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर ही छावणी आहे. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी जनरल रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृ्त्यू झाला होता. रावत हे प्रारंभी १९९९-२००० दरम्यान कर्नल असताना त्यांनी किबिथू येथे तैनात असलेल्या त्यांच्या गोरखा रायफल्सच्या बटालियन ५-११ चे नेतृत्व केले होते. या संवेदनशील क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर या छावणीतले सैनिक लक्ष ठेवून असतात. भारतीय लष्कराच्या याच छावणीच्या अगदी विरुद्ध बाजूला चिनी सैन्याची रिमा चौकी आहे.
- लोहित खोऱ्यातील पर्वतराजीत किबिथू ही भारताची पूर्वेकडील अखेरची छावणी आहे. याच ठिकाणी मेयोर आणि जर्किन आदिवासींची छोटीशी वस्तीही आहे. मेशाई हे रस्त्याचे शेवटचे टोक १९९७ पर्यंत या भागाला जोडले गेले नव्हते. त्यामुळे तेथे हवाई मार्गानेच दळणवळण होत होते. लोहित नदीच्या पूर्व किनाऱ्यावर जाण्यासाठी केवळ एका दोरखंडाच्या पादचारी पुलाचा पर्याय होता. ही लष्करी छावणी आणि वालांग ते किबिथू हा २२ किलोमीटर लांबीचा रस्ता यांना आता जनरल रावत यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरण समारंभाला अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडिअर (निवृत्त) बी. डी. मिश्रा, मुख्यमंत्री प्रेमा खंडू, लष्कराचे पूर्व कमांडचे प्रमुख ले. जनरल राणा प्रताप कलिता आणि जनरल रावत यांच्या कन्या तारिनी या उपस्थित होत्या.
- किबिथूबाबत.. किबिथूवर सर्वप्रथम २-आसाम रायफल्सने डिसेंबर १९५० मध्ये एक प्लॅटून फौजफाटय़ासह ताबा मिळविला होता. त्यानंतर १९५९ मध्ये तेथे आणखी एक प्लॅटून तैनात करण्यात आली. १९६२ च्या चिनी आक्रमणादरम्यान चीनला पहिला प्रतिकार किबिथू येथेच झाला. हे युद्ध संपल्यानंतर १९६४ मध्ये आसाम रायफल्सने या भागाचा पुन्हा ताबा मिळविला. १९८५ मध्ये तेथे ६-राजपूतकडे किबिथूची सूत्रे आली. जनरल रावत यांनी त्यांच्या कारकीर्दीत या छावणीत सुधारणा करून तेथे स्थानिकांशी नागरी-लष्करी संबंध प्रस्थापित केले आणि सीमा अधिकारी बैठकांची यंत्रणा सुस्थापित केली.
श्रीलंकेचा पाकिस्तानवर २३ धावांनी दणदणीत विजय:
- यूएईमध्ये सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आज पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन तगड्या संघांमध्ये अंतिम लाढत रंगणार आहे. आजचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून सायंकाळी ७.३० वाजता या लढतीला सुरुवात होईल.
- सुपर-४ फेरीतील अंतिम सामन्यात याच दोन संघांमध्ये सामना रंगला होता. यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण सरस ठरणार तसेच ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शतक झळकावून कोहलीने सही केली अन् बॅटची किंमत थेट लाखोंमध्ये गेली; पाकिस्तानी फॅन म्हणतो “१ कोटी रुपये…” :
- यूएईमधील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने निराशा केली असली तरी याच स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सूर गवसला. त्याने या स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी केली. विशेष म्हणजे याच स्पर्धेदरम्यान अफगाणिस्तानविरोधात खेळताना त्याने साधारण तीन वर्षांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले. कोहलीच्या या खेळीची चांगलीच चर्चा झाली. याच सामन्यादरम्यान विराटने एका पाकिस्तानी फॅनला बॅटवर दिलेली सहीचीही चांगलीच चर्चा होत आहे. या बॅटची किंमत आता लाखो रुपये झाली आहे.
- आशिया चषक स्पर्धेत ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहली चांगलाच तळपला. त्याने या सामन्यात ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ६ षटकार लगावत नाबाद १२२ धावा केल्या. पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत तो मैदानावर टिकून होता. विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे ७१ वे शतक होते.
- तबब्ल तीन वर्षांनी विराटने शतकी खेळी केली. त्यानंतर त्याने पाकिस्तानी फॅनला बॅटवर एक दिली. या पाकिस्तानी नागरिकाचे नाव सलाऊद्दीन असे आहे. विराटच्या सहीमुळे या बॅटला आता लाखो रुपयांची किंमत आली आहे. सलाऊद्दीद यांना एका माणसाने ही बॅट साधारण १ लाख रुपयांना मागितली होती. मात्र सलाऊद्दीनने बॅट विकण्यास नकार दिला.
- विशेष म्हणजे या बॅटच्या बदल्यात कोणी मला १ कोटी रुपये दिले तरीही मी ही बॅट विकणार नाही, असे सलाऊद्दीन यांनी सांगितले आहे. सलाऊद्दी यांच्याकडे साधारण १५० बॅट्सचा संग्रह आहे आहेत. या सर्वच बॅट्स विशेष आहेत. त्याच्याकडे शाहीद आफ्रिदी, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इम्रान खान असा दिग्गज क्रिकेटपटूंनी सही केलेल्या बॅट आहेत. त्यामुळे त्याने विराटची सही केलेली बॅट विकण्यास नकार दिला आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१२ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ११ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी
- १० सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी
- ९ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी
- ८ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी
- ७ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |