१३ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१३ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 13 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१३ सप्टेंबर चालू घडामोडी

अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा खर्च १,८०० कोटी रुपये; विश्वस्तांची माहिती:

 • अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील बाबरी मशिद रामजन्मभूमी वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर राम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. त्यात आता राम मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे १,८०० कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती समोर आली आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या रामजन्मभूमी ट्रस्टची बैठक अयोध्या येथे पार पडली. या बैठकीत आतापर्यंत मंदिराचं झालेले निर्माण, खर्च यावरती चर्चा करण्यात आली. तसेच, तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार राम मंदिर उभारणीसाठी १,८०० कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज रामजन्मभूमी निर्माण ट्रस्टचे विश्वस्त चंपत राय यांनी व्यक्त केला.
 • त्याचसोबत राम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषादराज, शबरी आणि जटायू यांची मंदिरेही बांधण्यात येणार आहे. तर, मंदिराचे सर्व दरवाजे सागवान लाकडापासून बनवले जातील, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
 • दरम्यान, यापूर्वी राम मंदिर निर्माणासाठी ११०० कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज व्यक्त केला होता. “राम मंदिर तीन ते साडेतीन वर्षांत बांधले जाईल. त्यासाठी ३०० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च येईल. तर, संपूर्ण ७० एकर परिसराच्या निर्माणासाठी ११०० कोटींपेक्षा अधिक खर्च येणार आहे,” अशी माहिती रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी दिली होती.

मोदींच्या वाढदिवशी १२०० भेटवस्तूंचा लिलाव; १०० रुपयांपासून बोलीला सुरुवात, कसा घ्याल सहभाग :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा वयाच्या ७३ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी म्हणजेच मोदींच्या वाढदिवसासाठी भाजपकडून अनेक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबिवण्यात येणार आहेत. यातीलच एक म्हणजे दरवर्षी मोदींच्या वाढदिवस सप्ताहात पार पडणारा लिलाव कार्यक्रम. यंदाही मोदींना भेट म्हणून मिळालेल्या तब्बल १२०० वस्तूंचा लिलाव होणार आहे. या लिलावातून मिळणारे पैसे नमामी गंगे मोहिमेसाठी दान दिले जातील. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची हे चौथे वर्ष आहे.

प्राप्त माहितीनुसार, हा लिलाव pmmementos.Gov.In या वेब पोर्टलद्वारे आयोजित केला जाईल आणि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत हा लिलाव पार पडणार असल्याचे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे महासंचालक अद्वैत गडानायक यांनी सांगितले, या संग्रहालयातच भेटवस्तू प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

लिलावात यंदा कोणत्या वस्तू असणार?

 • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिलेली राणी कमलापतीची मूर्ती
 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेली हनुमानाची मूर्ती आणि सूर्यचित्र
 • हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी भेट दिलेले त्रिशूल यांचा समावेश आहे.
 • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भेट दिलेली कोल्हापूर येथील महालक्ष्मीची मूर्ती
 • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी भेट दिलेल्या भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्ती
 • पदक विजेत्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी-शर्ट, बॉक्सिंग ग्लोव्हज, भाला आणि रॅकेट
 • चित्रे, शिल्पे, हस्तकला व पारंपारिक अंगवस्त्र, शाल, टोपी-फेटे, औपचारिक तलवारी
 • अयोध्येतील श्री राम मंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृती

एलिझाबेथ यांच्याप्रमाणेच नि:स्वार्थपणे कर्तव्यपालन करू – राजे चार्ल्स ; ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पहिलेच भाषण 

 • आपण घटनात्मक सरकारच्या अनमोल सिद्धांतांचे अनुसरण करणार असून, आपल्या दिवंगत मातु:श्री महाराणी एलिझाबेथ यांनी घालून दिलेल्या नि:स्वार्थी कर्तव्याच्या वस्तुपाठाचे पालन करू, असा संकल्प ब्रिटनचे महाराज चार्ल्स तृतीय यांनी सोमवारी केला. राज्यारोहणानंतर ‘ब्रिटनचे महाराजा’ या नात्याने ब्रिटिश पार्लमेंटला संबोधित करताना ते बोलत होते.
 • लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर सभागृहात ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आणि ‘हाऊस ऑफ लॉर्डस’द्वारे व्यक्त केलेल्या भावनांना उत्तर देताना महाराज चार्ल्स तृतीय यांनी इतिहासाचा आढावा घेतला व आपल्या मातु:श्रींच्या कारकीर्दीतील अनेक प्रतीकांचा उल्लेख केला. ते म्हणाले, की कमी वयातच त्यांच्याकडे महाराणीपद आले.
 • त्यानंतर त्यांनी आपला देश आणि देशवासीयांच्या सेवेसाठी, तसेच संवैधानिक सरकारच्या अनमोल सिद्धांत पालनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. त्यांनी मोठय़ा निष्ठेने या कटिबद्धतेचे पालन केले व नि:स्वार्थी कर्तव्याचा वस्तुपाठ घालून दिला. त्याचे ईश्वर आणि आपल्या सर्वाच्या साक्षीने अनुपालन करण्याचा संकल्प मी करतो. यावेळी त्यांनी पार्लमेंट सदस्यांशी आपल्या संबंधांबाबत भाष्य करत ‘ब्रिटिश पार्लमेंट’ ही देशाच्या ‘लोकशाहीची जीवनव्यवस्था’ असल्याचे सांगून दिवंगत महाराणी व ‘पार्लमेंट’च्या संबंधांचा आढावा घेतला.

आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला कोट्यवधींचे बक्षीस; पाकिस्तानने किती रुपये जिंकले पाहा:

 • एकीकडे देशात बिकट परिस्थिती असताना दुसरीकडे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपल्या देशवासियांना चार आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली. वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू खेळी, भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि प्रमोद मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी मात करून सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले.
 • आर्थिक संकटामुळे राजकीय अशांती पसरलेल्या श्रीलंकेला या विजयांनंतर कोट्यवधींचे बक्षिसांची रक्कम मिळाली आहे. आशिया चषकातील उपविजेते पाकिस्तानवरही बक्षिसांचा वर्षाव झाला. या दोन्ही संघांना किती रुपयांचे बक्षीस मिळाले जाणून घ्या.
 • आशिया चषक २०२२ चे विजेते म्हणजेच श्रीलंकेच्या संघाला सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दीड लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. दुसरीकडे, पाकिस्तानला आशियाई क्रिकेट काउन्सिल (ACC) कडून बक्षीस म्हणून सुमारे ६० लाख रुपये मिळाले.
 • याशिवाय वैयक्तिक बक्षिसांमध्येही श्रीलंकेची चांदी झाली. प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणारा श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याला सुमारे १२ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. अंतिम फेरीतील सामनावीर ठरलेल्या भानुका राजपक्षेला सुमारे ४ लाख रुपये तर बेस्ट कॅच ऑफ द मॅचसाठी ३ हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे.

संक्षिप्त धावफलक

 • श्रीलंका: २० षटकांत ६ बाद १७० (भानुका राजपक्षे नाबाद ७१, वानिंदू हसरंगा ३६; हॅरिस रौफ ३/२९) विजयी वि. पाकिस्तान : २० षटकांत सर्वबाद १४७ (मोहम्मद रिझवान ५५, इफ्तिकार अहमद ३२; प्रमोद मदूशान ४/३४, वानिंदू हसरंगा ३/२७)

टी २० विश्वचषकात भारत- पाक कधी येणार आमनेसामने? पाहा सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक :

 • आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताचा संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाच्या मैदानात उतरणार आहे. आशिया चषकाप्रमाणेच विश्वचषकासाठी सुद्धा के. एल. राहुलवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाची बांधणी झाली असून यावेळी संघात भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याची वापसी झाली आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजा मात्र अजूनही शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरा झाला नसल्याने संघात दिसणार नाही. आयसीसी टी २० विश्वचषकात आता भारताचे सामने कधी असणार याचे वेळापत्रक सविस्तर जाणून घेऊयात..
 • आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर १२ मध्ये आहेत. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यापैकी २ संघांना १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या पात्रता फेरीत आपले बळ सिद्ध करून सुपर १२ मध्ये स्थान मिळवता येणार आहे. टी २० विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत, यामध्ये भारत एकूण पाच सामने खेळणार आहे.

भारताचे टी २० विश्वचषकाचे सामन्यांचे वेळापत्रक

 • भारत विरुद्ध पाकिस्तान – २३ ऑक्टोबर (मेलबर्न)
 • भारत विरुद्ध (ग्रुप A) मधील उपविजेते- २७ ऑक्टोबर (सिडनी)
 • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ३० ऑक्टोबर (पर्थ)
 • भारत विरुद्ध बांग्लादेश – २ नोव्हेंबर (एडिलेड)
 • भारत विरुद्ध (ग्रुप B) विजेते – ७ नोव्हेंबर (मेलबर्न)

IDF वर्ल्ड डेअरी समिट 2022
– पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10:30 वाजता ग्रेटर नोएडा येथे 4 दिवसीय जागतिक डेअरी समिटचे उद्घाटन करतील.
– अधिकृत अपडेटनुसार, इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिट (IDF WDS) 2022 12 ते 15 सप्टेंबर 2022 दरम्यान इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट, ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आली आहे.
– 50 देशांतील सुमारे 1,500 सहभागी IDF WDS 2022 मध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे, PMO नुसार.
– भारतात शेवटची शिखर परिषद 1974 मध्ये झाली होती.

IDF वर्ल्ड डेअरी समिट 2022

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी ‘रहिवासी सुरक्षा’ पोर्टल सुरू केले
– ऑनलाइन पोर्टल रहिवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म प्रदान करेल आणि अधिकार्यांसाठी एक मजबूत गुप्तचर गोळा करणारी यंत्रणा म्हणून काम करेल.
– हे पोर्टल आरोग्य सेवा क्षेत्र आणि गंभीर क्षेत्रांमध्ये मदत करेल.
या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये राज्यातील 6000 हून अधिक गावे ऑनलाइन प्रणालीद्वारे जोडण्याची क्षमता आहे.

पंतप्रधान मोदींनी केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन केले
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला संबोधित केले आणि ‘केंद्र-राज्य सायन्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये ‘सबका प्रयत्न’ चे महत्त्व अधोरेखित केले.
– भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि भारताचे विज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित लोकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे.
– केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय आणि नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी सहकार्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी ‘केंद्र-राज्य विज्ञान परिषद’ आयोजित केली जात आहे.
– ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पंतप्रधान मोदींनी केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन केले

भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचा संयुक्त सराव ‘गगन स्ट्राइक’
– भारतीय लष्कराच्या खरगा कॉर्प्स आणि भारतीय वायुसेनेने पंजाबमध्ये ‘गगन स्ट्राइक’ हा संयुक्त सराव केला आहे.
– चार दिवस चाललेल्या या सरावात भूदलाच्या समर्थनासाठी हवाई हात म्हणून हल्ला करणारे हेलिकॉप्टर तैनात करणे, शत्रूच्या संरक्षणाचा नायनाट करण्याचा सराव करणे आणि खोलवर प्रवेश करणे यांचा समावेश आहे.
– या यंत्रांना ग्राउंड ऑपरेशन्ससह एकत्रित करण्याच्या फोर्स गुणक प्रभावामुळे आमच्या सैन्याची लढाऊ श्रेष्ठता वाढली आहे.

भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचा संयुक्त सराव ‘गगन स्ट्राइक’

भारताचे सरन्यायाधीश कमल नारायण सिंह यांचे निधन
– भारताचे माजी सरन्यायाधीश कमल नारायण सिंह यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.
– न्यायमूर्ती नारायण यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून केवळ 17 दिवसांचा कार्यकाळ होता, ज्यामुळे ते सर्वात कमी कार्यकाळ असलेले मुख्य न्यायाधीश बनले.
– 25 नोव्हेंबर 1991 ते 12 डिसेंबर 1991 या कालावधीत ते भारताचे 22 वे सरन्यायाधीश होते.
– 1991-1994 या काळात त्यांनी भारताच्या 13व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.

भारताचे सरन्यायाधीश कमल नारायण सिंह यांचे निधन

रेल्वेचा महसूल 38% वाढून रु. 95,486.58 कोटी झाला
– ऑगस्ट 22 अखेरीस भारतीय रेल्वेचा एकूण महसूल ₹ 95,486.58 कोटी इतका होता, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 26271.29 कोटी (38%) रु. ची वाढ दर्शवितो.
– आकडेवारीनुसार, आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही विभागांमध्ये प्रवासी वाहतूकही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे.
– भारतीय रेल्वेच्या पार्सल विभागातील मजबूत वाढीमुळे या वाढीला चालना मिळत आहे.

पीएम मोदी पुतिन आणि शी यांच्यासोबत एससीओ बैठकीला उपस्थित राहणार
– पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 आणि 16 सप्टेंबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेसाठी उझबेकिस्तानमधील समरकंदला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
– जून 2019 नंतर किर्गिझस्तानमधील बिश्केक येथे SCO शिखर परिषद पार पडल्यानंतर ही पहिली वैयक्तिक शिखर परिषद असेल.
– शिखर परिषदेत भारताची उपस्थिती महत्त्वाची आहे कारण समरकंद शिखर परिषदेच्या शेवटी ते SCO चे रोटेशनल अध्यक्षपद स्वीकारेल. दिल्लीत सप्टेंबर 2023 पर्यंत एका वर्षासाठी गटाचे अध्यक्षपद असेल.
– त्यामुळे, पुढील वर्षी, भारत SCO शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे, ज्यामध्ये चीन, रशिया, पाकिस्तानचे नेते सहभागी होणार आहेत.
– शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ही एक कायमस्वरूपी आंतरशासकीय आंतरराष्ट्रीय संस्था आहे, ज्याची स्थापना 15 जून 2001 रोजी शांघाय (चीन) येथे झाली.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.