Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |13 May 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१३ मे चालू घडामोडी
आता राज्यातील शिक्षकांमध्ये होणार स्पर्धा.. ई साहित्य निर्मिती स्पर्धेसाठी शिक्षण विभागाचा पुढाकार!
- राज्यातील शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन करण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेले ई साहित्य परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी ई साहित्य निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, सर्वोत्कृष्ट ई साहित्य निर्मितीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरासाठी प्रत्येकी ८४ पुरस्कार दिले जाणार आहेत.
- शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. करोना काळात शाळा बंद असताना शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने अध्यापन केले होते. त्यानंतर शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक रंजक आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची चळवळ अधिक सक्रीय होऊन २ लाख ८९ हजार ५६० शिक्षक तंत्रस्नेही झाल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत आढळून आले आहे.
- या शिक्षकांनी केवळ आपले वर्ग ऑनलाइन पद्धतीने न घेता विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही केले आहे. त्यामुळे विद्यार्थीही स्वत: डिजिटल साहित्य तयार करून शिक्षण मनोरंजक करत आहेत. तसेच परदेशातील शिक्षक, विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधून साहित्य वापरत आहेत. त्यामुळे आता ई साहित्याची निर्मिती करण्यासाठी शिक्षकांची स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यात पहिली ते बारावी, अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे या विषयावर शिक्षकांना ॲनिमेशन, ऑग्मेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी प्रकारातील चित्रफित, खेळावर आधारित चित्रफित, ई चाचणीवर आधारित चित्रफित, दिव्यांगत्व प्रकारानुसार शिक्षणासाठी चित्रफित तयार करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. चित्रफितींची निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर समिती नियुक्त करण्यात आली आहे.
- ई साहित्यातील चित्रफिती तयार करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. तयार केलेले ई साहित्य गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याचा दुवा स्पर्धेसाठीच्या प्रणालीवर द्यावा लागेल. चित्रफीत केवळ अध्ययन अध्यापन प्रणालीशी निगडित असणे आवश्यक आहे. कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त नऊ मिनिटांची चित्रफीत असणे आवश्यक आहे. स्पष्टता, गरज, परिणाम, नावीन्यता, समन्वय, उपयोगिता, चित्रफीत दर्जा अशा निकषांवर ई साहित्याचे मूल्यमापन करण्यात येईल. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्यास, साहित्यिक चोरी केल्याचे आढळल्यास, हिंसा, लैंगिक प्रदर्शन, असभ्य भाषा, अंमली पदार्थाचा वापर केल्यास, वांशिक, धार्मिक, सांस्कृतिक, लिंग पूर्वग्रहाचे समर्थन केल्यास, तांत्रिक त्रुटी असल्यास चित्रफीत स्पर्धेतून नाकारली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘मन की बात’ न ऐकल्याने ३६ विद्यार्थिनींवर कारवाई, चंडीगडमधील वसतीगृहाबाहेर जाण्यास आठवडाभर मनाई
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा १०० वा भाग ऐकण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्या चंडीगड येथील ‘पीजीआयएमईआर’च्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग एज्युकेशनच्या (नाइन) ३६ विद्यार्थीनींना एका आठवडय़ासाठी वसतिगृहातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली.
- रुग्णालय प्रशासनाने प्रथम आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना ३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकणे अनिवार्य केले होते. मात्र, ‘नाइन’मधील ३६ विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. यानंतर, महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ३ मे रोजी एक आदेश प्रसृत केला. यानुसार तृतीय वर्षांतील २८ आणि पहिल्या वर्षांतील आठ विद्यार्थीनींना आठवडाभर वसतिगृहातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली.
- पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेने (पीजीआयएमईआर) गुरुवारी रात्री ‘मन की बात’ कार्यक्रमात सहभागी न होणाऱ्या विद्यार्थीनींवरील कारवाई बाबत सांगितले की, महाविद्यालय अधिकाऱ्यांची ही प्रतिक्रिया ‘अति’ होती. त्यामुळे ‘पीजीआयएमईआर’ प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही नम्रपणे विनंती करतो की, या प्रकाराबाबत कोणताही वेगळा अर्थ काढू नये. तसेच जनहिताच्या दृष्टीने हा मुद्दा अधिक चिघळू नये यासाठी काळजी घ्यावी’ असेही ‘पीजीआयएमईआर’ने निवेदनात नमूद केले आहे.
सीबीएसईच्या इयत्ता १० वीच्या निकालही मुलींनीच मारली बाजी; असा पाहा ऑनलाईन निकाल
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीनंतर आता इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी सीबीएसई बोर्डाचे इयत्ता १० वीतील ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२५ टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.२७ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींनी १.९८ टक्क्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या निकालाप्रमाणे इयत्ता १० वीच्या निकालात यंदा मुलींनीच बाजी मारल्याचे दिसतेय. विद्यार्थी cbseresults.nic.in, cbse.nic.in आणि cbse.gov.in वरून आपला निकाल पाहू शकतील. विद्यार्थी रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी सबमिट करू आपला निकाल पाहू शकतात.
- सीबीएसईने इयत्ता १२ वीचा निकाल आज जाहीर करताना २०२४ या वर्षातील परीक्षा सुरू होण्याची तारीखदेखील जाहीर केली आहे. सीबीएसई १५ फेब्रुवारी २०२४ मध्ये इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षा घेण्यास सुरुवात करेल.
- सीबीएसईने विद्यार्थ्यांमधील अनहेल्थी स्पर्धा कमी करण्यासाठी इयत्ता १२ वीप्रमाणे इयत्ता १० वीतीलही टॉपर्स आणि मेरीट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सीबीएसई आपल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी प्रथम, द्वितीय किंवा तृतीय मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावेही जाहीर करणार नाही. तसे सर्व विषयांमधील ज्या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या केवळ ०.१ टक्के विद्यार्थ्यांनाच सीबीएसई इयत्ता १० ची मेरिट लिस्ट
सीबीएसईचा इयत्ता १० वीचा निकाल तपासण्यासाठी वेबसाइट्सची यादी
cbse.gov.in
results.cbse.nic.in
cbseresults.nic.in
digilocker.gov.in
उद्योजकांना ३० दिवसांत परवानगी; ‘मैत्री’ कायदा लवकरच, उदय सामंत यांची ग्वाही
- उद्योगाशी संबंधित सर्व परवानग्या ३० दिवसांत देणे बंधनकारक करणारा ‘मैत्री’ कायदा लवकरच अमलात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या फायद्याकरिता बारसूमधील जमीन संपादनाची नोटीस जारी झाल्यावर या परिसरातील जमीन खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
- ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘अॅडव्हाण्टेज रायगड’ या संवादसत्राचा समारोप करताना उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाशी संबंधित अनेक बाबींवर भाष्य केले. बारसूतील माती परीक्षणाचे काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी बोअर खोदण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनीच संमतिपत्रे दिली होती. यामुळे विरोध करणारे बहुधा बाहेरचे असावेत, अशी शंकाही सामंत यांनी व्यक्त केली.
- बारसूमध्ये जमीन संपादनाची नोटीस (चॅप्टर ६) जारी झाल्यावर जमीन खरेदी- विक्रीवर बंदी घातली जाईल. कारण जमीन संपादनाची नोटीस जारी झाल्यावर बाहेरील गुंतवणूकदार किंवा व्यापारी कमी दरात जमिनी खरेदी करतात आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हडप करतात हे पूर्वी अनुभवास आले आहे.
- हे टाळण्याकरिताच बारसू परिसरात जमीन संपादनाची नोटीस जारी झाल्यावर जमीन खरेदी-विक्रीचे सारे व्यवहार बंद केले जातील, असे सामंत यांनी जाहीर केले. तसेच प्रकल्प एकदा अधिसूचित झाल्यावर या परिसरातील जमिनींची ३ ते ५ वर्षे विक्री करण्यावर बंदी घालण्याची योजना असल्याचेही सामंत यांनी सांगितले. जमिनी खरेदीवर बंदी घालण्याचा निर्णय हा स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताकरिता घेण्यात येणार आहे. शिंदे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१३ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १२ मे २०२३ चालू घडामोडी
- ११ मे २०२३ चालू घडामोडी
- १० मे २०२३ चालू घडामोडी
- ९ मे २०२३ चालू घडामोडी
- ८ मे २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |