१५ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१५ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 15 November 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१५ नोव्हेंबर चालू घडामोडी

शरथला ‘खेलरत्न’, भक्तीला ‘अर्जुन’ पुरस्कार; राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे ३० नोव्हेंबरला वितरण:

  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमुळे प्रलंबित राहिलेल्या देशातील प्रतिष्ठित ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ क्रीडा पुरस्कारांवर क्रीडा मंत्रालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. अनुभवी टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमालला ‘खेलरत्न’ या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. ‘लोकसत्ता तरूण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनसह २५ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात खास कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. नामांकित क्रिकेट  प्रशिक्षक दिनेश लाड यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येईल.
  • ‘अर्जुन’ पुरस्कार विजेते : सीमा पुनिया (अ‍ॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अ‍ॅथलेटिक्स), अविनाश साबळे (अ‍ॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित पंघाल (बॉक्सिंग), निकहत झरीन (बॉक्सिंग), भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशिला देवी (ज्युडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बोल्स), सागर ओव्हाळकर (मल्लखांब), इलावेनिल वलारीवन (नेमबाजी), ओमप्रकाश मिथरवाल (नेमबाजी), श्रीजा अकुला
  • (टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेटलिफ्टिंग), अंशू मलिक (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशू), मानसी जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लॉन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्नील पाटील (पॅरा जलतरण), जर्लिन अनिका जे (कर्णबधिर बॅडमिंटन).
  • ‘द्रोणाचार्य’- जीवनज्योत सिंग तेजा (तिरंदाजी), मोहंमद अली कोमर (बॉक्सिंग), सुमा शिरुर (नेमबाजी), सुजीत मान (कुस्ती)
  • ‘द्रोणाचार्य’ (जीवनगौरव) – दिनेश लाड (क्रिकेट), बिमल घोष (फुटबॉल), राज सिंग (कुस्ती)
  • ‘ध्यानचंद’ (जीवनगौरव) – अश्विनी अकुंजी (अ‍ॅथलेटिक्स), धरमवीर सिंग (हॉकी), बी. सी. सुरेश (कबड्डी), नीर बहादूर गुरुंग (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)

‘ट्विटर’, ‘फेसबुक’नंतर आता अ‍ॅमेझॉनही मोठी कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत, हजारो कर्मचारी गमावणार नोकरी:

  • ‘ट्विटर’, ‘मेटा’नंतर आता अ‍ॅमेझॉनही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही तिमाहींपासून कंपनीच्या तोट्यात वाढ होत असल्याने खर्चकपातीबरोबरच मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची शक्यता व्यक्त होत आहे. कंपनी या आठवड्यात जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून काढण्याची शक्यता असल्याचं वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलं आहे.
  • ऑनलाइन विक्री कंपनी असणाऱ्या अ‍ॅमेझॉनने १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यास कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात असेल. जगभरात अ‍ॅमेझॉनचे १६ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. नोकरकपात झाल्यास हा आकडा एकूण कर्मचारीसंख्येच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे.
  • कर्मचारी कपात झाल्यास यामध्ये डिव्हाइस ग्रुपसह रिटेल आणि एचआर विभागाचा समावेश आहे. यामध्ये अॅलेक्सा वॉइस असिस्टंटची जबाबदारी असणाऱ्या कर्चमाऱ्यांचाही समावेश असू शकतो.
  • ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, अ‍ॅमेझॉनने तोट्यात असणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांना दुसरी नोकरी शोधण्यास सांगितलं आहे. ई-कॉमर्स कंपनीला सणांच्या दिवसातही मोठा तोटा सहन करावा लागला होता. एरव्ही नफा होणाऱ्या सणांमध्येही तोटा झाल्यानंतर काही आठवड्यातच हा निर्णय घेण्यात आला आहे. किंमती वाढत असल्याने ग्राहक आणि व्यावसिकांकडे खर्चाकरता जास्त पैसै नसल्यानेच तोटा झाल्याचं कपंनीचं म्हणणं आहे.

अमेरिका-चीन यांच्यात संघर्ष रोखण्यावर सहमती; बायडेन आणि जिनपिंग यांच्यात प्रथमच प्रत्यक्ष बैठक:

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि  चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात सोमवारी बाली येथे प्रथमच प्रत्यक्ष बैठक झाली. हिंदू-प्रशांत क्षेत्र आणि तैवानमधील चीनच्या सक्तीच्या लष्करी कारवाईबाबतचे मतभेद दूर करण्याचे आणि द्विपक्षीय संघर्ष रोखण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. ‘जी – २०’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर बायडेन आणि क्षी यांच्यातील ही उच्चस्तरीय बैठक तीन तास चालली. दोन्ही नेत्यांनी उभे राहून परस्परांशी हस्तांदोलन केले आणि हसत हसत एकमेकांचे स्वागत केले.
  • बायडेन म्हणाले, की आपल्यातील वैयक्तिक संवाद सुरू ठेवण्यासाठी मी वचनबद्ध आहे. दोन्ही देशांनी एकत्रितरित्या काही करावे यासाठी खूप मोठी संधी आहे. माझ्या मते, चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या नेत्यांची जबाबदारी सामायिकच आहे. ते आपल्यातील मतभेद व्यवस्थित हाताळू शकतात आणि स्पर्धा, संघर्ष रोखू शकतात.
  • परस्पर सहकार्याची आवश्यकता असलेल्या तातडीच्या जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्याचे मार्गही चीन आणि अमेरिका शोधू शकतात, अशी पुस्तीही बायडेन यांनी जोडली. संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या दोघांच्या चर्चेकडे आहे, असे जिनपिंग यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. सध्या चीन-अमेरिकेचे संबंध अशा स्थितीत आहेत की सर्वाना त्याबाबत चिंता आहे. कारण असे संबंध आपल्या दोन्ही देशांसाठी आणि त्यांच्या नागरिकांसाठी हिताचे नाहीत.

कोणतीही नोटीस न देता मस्क यांनी ५५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं:

  • ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यानंतर आता या कंपनीत पुन्हा नोकरकपात झाल्याची माहिती समोर येत आहे. नोकरकपातीच्या दुसऱ्या फेरीत ट्विटरमधून साडेपाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे. कर्मचाऱ्यांना पूर्वसुचनेची नोटीस न देता नोकरकपात करण्यात आली आहे. याबाबत ट्विटरकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
  • कंपनीचे ईमेल आणि इतर सुविधा बंद झाल्यानंतर नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आहे. रिअल इस्टेट, मार्केटिंग, अभियांत्रिकी आणि इतर विभागांमध्ये काम करणाऱ्या अमेरिकेसह इतर देशांमधील कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावल्याचे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे. या कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापकांनादेखील नोकरकपातीविषयी माहिती नसल्याचे पुढे आले आहे.
  • कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी नोकरीवरुन काढून टाकण्यात येत असल्याचा ईमेल ट्विटरकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. १४ नोव्हेंबर हा नोकरीचा शेवटचा दिवस असल्याचंही यात नमुद करण्यात आलं आहे.
  • एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच सर्वात आधी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली. त्यानंतर सीएफओ नेड सेगल, पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही डच्चू दिला. दरम्यान, अनेक भारतीयांच्या नोकरीवरही गदा आली आहे. ट्विटरने भारतातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.

मेरी कोम, सिंधूसह दहा क्रीडापटू ‘आयओए’च्या खेळाडू समितीवर:

  • नव्या घटनेनुसार निर्माण करण्यात आलेल्या भारतीय ऑलिम्पिक समितीवरील (आयओए) खेळाडू समितीमध्ये (अ‍ॅथलिट कमिशन) पाच वेळच्या जगज्जेत्या मेरी कोम, दोन ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू यांच्यासह दहा खेळाडूंची बिनविरोध निवड करण्यात आली. खेळाडू समितीच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीदरम्यान ही निवड करण्यात आली. हिवाळी ऑलिम्पिकमधील खेळाडू शिवा केशवन, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंग, अनुभवी टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमल, हॉकीपटू राणी रामपाल, ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवलेली तलवारबाजी खेळाडू भवानी देवी, रोईंगपटू बजरंग लाल आणि माजी गोळाफेकपटू ओपी कऱ्हाना या अन्य खेळाडूंचा या समितीत समावेश आहे.
  • निवडण्यात आलेल्या १० खेळाडूंपैकी पाच महिला खेळाडू असून, सर्वानी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे. केवळ केशवन हा हिवाळी ऑलिम्पिकचा खेळाडू आहे. समितीत १० खेळाडूंचा समावेश असणार असून, यासाठी दहाच खेळाडूंनी अर्ज भरला होता. ‘आयओए’च्या आगामी निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे उमेश सिन्हा यांनीच या खेळाडूंची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
  • अभिनव बिंद्रा, सरदार सिंगची थेट निवड – भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा २०१८ पासून आठ वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या, तर माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग २०१९ पासून चार वर्षांसाठी ऑलिम्पिक परिषदेच्या खेळाडू समितीवर आहेत. यामुळे दोघांची ‘आयओए’च्या खेळाडू समितीवर थेट निवड करण्यात आली. अशा पद्धतीने खेळाडू समितीच्या १२ जागा पूर्ण होतात. या दोघांना मतदानाचा अधिकार असेल.
  • राष्ट्रीय चालू घडामोडी (National Current Affairs)
    आयएएस अधिकारी गौरव द्विवेदी यांची प्रसार भारतीच्या सीईओपदी नियुक्ती
    UGC उच्च शिक्षण संस्थांना ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारण्यास सांगते
    ‘मिस्टर नटवरलाल’ आणि ‘याराना’चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचे निधन झाले
    20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात 53 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) होणार आहे.

आर्थिक चालू घडामोडी (Economic Current Affairs)
पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (POSOCO) चे नाव बदलून “ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड”
घाऊक किंमत महागाई (WPI) सप्टेंबरमधील 10.7% वरून ऑक्टोबरमध्ये 8.39% वर घसरली.
ग्राहक किंमत-आधारित (किरकोळ) महागाई सप्टेंबरमध्ये 7.41% वरून ऑक्टोबरमध्ये 6.77% पर्यंत घसरली.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी (International Current Affairs)
स्लोव्हेनिया: नतासा पिर्क मुसार पहिल्या महिला अध्यक्षपदी निवडून आले
14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो; थीम: ‘मधुमेह काळजीसाठी प्रवेश’

क्रीडा चालू घडामोडी (Sports Current Affairs)
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 जाहीर केले; टेबल टेनिसपटू अचंता शरथची कमल ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 साठी निवड
विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांचा आयसीसी टी-२० वर्ल्ड कप 2022च्या मोस्ट व्हॅल्युएबल टीममध्ये समावेश झाला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१५ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.