१६ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१६ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 16 November 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१६ नोव्हेंबर चालू घडामोडी

मेल्टवॉटर चॅम्पियन्स बुद्धिबळ स्पर्धा – प्रज्ञानंद, एरिगेसी पराभूत:

 • भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी यांना मंगळवारी मेल्टवॉटर चॅम्पियन्स टूर बुद्धिबळ फायनल्सच्या पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले. १७ वर्षीय प्रज्ञानंदने अजरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्हकडून १.५-२.५ अशी हार पत्करली, तर पोलंडच्या यान क्रिस्तोफ डुडाने एरिगेसीला २.५-०.५ असे पराभूत केले. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या वेस्ली सो याला २.५-१.५ अशा फरकाने नमवत आपल्या मोहिमेला विजयी सुरुवात केली.
 • प्रज्ञानंद आणि मामेदेरोव्ह यांच्यातील सामन्यात सुरुवातीला अजरबैजानच्या खेळाडूने आघाडी मिळवली. यानंतर प्रज्ञानंदने दुसऱ्या डावात बरोबरीची नोंद केली. यानंतर तिसऱ्या डावात प्रज्ञानंदने विजय नोंदवत चुरस निर्माण केली.
 • मात्र, चौथ्या डावात मामेदेरोव्हने खेळ उंचावत विजय साकारला. कार्लसनचा सामना दुसऱ्या दिवशी एरिगेसीशी होईल, तर लियेम सो चा सामना करेल. मामेदेरोव्हची लढत डुडाशी तर, प्रज्ञानंदची गाठ गिरीशी पडेल. आठ खेळाडूंच्या या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू विजयी होईल.

रशियाकडून पोलंडवर क्षेपणास्त्र हल्ला? जो बायडेन यांनी बोलावली तातडीची बैठक:

 • एकीकडे जागतिक पातळीवर जी-२० परिषदेत भारत, अमेरिका, फ्रान्स यांच्यासारखे देश परस्पर सहकार्य, शास्वत विकास, पर्यावरण संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने उग्र रुप धारण केले आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष आता नाटो देशांपर्यंत पोहोचला आहे. आज (१६ नोव्हेंबर) रशियाने डागलेले क्षेपणास्त्र पोलंड देशात पडले आहे. या घटनेत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नाटो सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. रशियाच्या या कृतीमुळे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 • मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आतापर्यंत फक्त या दोनच देशांपर्यंत सीमित होते. आता मात्र रशियाने डागलेले क्षेपणास्त्र नाटोचा सदस्य असलेल्या पोलंड देशावर पडले आहे. यामध्ये पोलंडमधील दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या या कृतीचा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी निषेध केला आहे.
 • तर रशियाच्या या कृतीची पोलंड सरकारनेदेखील दखल घेतली आहे. पोलंडचे पंतप्रधान मॅथ्यूझ मोरविकी यांनी ‘प्राथमिक अंदाजानुसार डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशिय बनावटीचे आहे. मात्र आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. हे क्षेपणास्त्र नेमके कोणी डागले, हे अद्याप निश्चितपणे समजलेले नाही. आमची यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. आम्ही आमची लष्करी तयारी करत आहोत,’ असे सांगितले आहे. तर पोलंडच्या परराष्ट्र खात्यानेदेखील डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशियान बनावटीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारताची ऊर्जासुरक्षा जगासाठी महत्त्वाची; जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ठाम प्रतिपादन:

 • भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे आपल्या देशाची ऊर्जासुरक्षा जागतिक विकासासाठी महत्त्वाची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. येथे सुरू झालेल्या जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेत ‘अन्न व ऊर्जासुरक्षा’ या विषयावरील सत्रात ते बोलत होते. ऊर्जा व इंधन पुरवठय़ावर कोणतेही निर्बंध असू नयेत आणि अशा प्रकारांना प्रोत्साहनही देऊ नये, असे आवाहनही त्यांनी जागतिक समुदायाला केले. 
 • रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात ऊर्जेची टंचाई निर्माण झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘इंधन व ऊर्जा पुरवठय़ासंदर्भात जागतिक स्तरावर स्थैर्य आणि सातत्य राखले गेले पाहिजे’ असे  पंतप्रधान म्हणाले. प्रदूषणमुक्त ऊर्जा व पर्यावरण रक्षणासाठी भारत वचनबद्ध असून २०३०पर्यंत देशाची ५० टक्के गरज ही अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांमधून भागवली जाईल, असे आश्वासन त्यांनी जी-२० राष्ट्रगटाला दिले.
 • युद्धामुळे जागतिक स्तरावर अन्नसुरक्षेचे आव्हान आहे. गव्हाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या युक्रेनमधून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर टंचाईची परिस्थिती आहे. यासंदर्भात मोदी म्हणाले, की सध्या भासत असलेला खतांचा तुटवडा हे एक मोठे संकट आहे. आजच्या खत टंचाईतून उद्याच्या अन्नटंचाईचे संकट निर्माण होण्याचा धोका आहे. त्या वेळी जगाकडे कोणतीही उपाययोजना असणार नाही.
 • खत व अन्नधान्य या दोन्हींची पुरवठा साखळी स्थिर आणि खात्रीशीर राखण्यासाठी आपण सामंजस्य करार केले पाहिजेत, असा आग्रहदेखील पंतप्रधानांनी धरला. शाश्वत अन्नसुरक्षेसाठी भारतात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. तृणधान्यांसारख्या (मिलेट्स) पौष्टिक व पारंपरिक धान्यास प्रोत्साहन देऊन ते पुन्हा लोकप्रिय करत असल्याचेही मोदी म्हणाले. पुढच्या वर्षी येणारे ‘जागतिक तृणधान्य वर्ष’ आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्साहात साजरे झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

२०३० पर्यंत भारतातील ५० टक्के वीजनिर्मिती अक्षय उर्जास्त्रोतांपासून- नरेंद्र मोदी:

 • ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाच्या पूजनाची परवानगी मागणाऱ्या याचिकेवरील निकाल १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जलदगती न्यायालयाने सोमवारी हा निकाल गुरुवापर्यंत स्थगित केला आहे. हे शिविलग ज्ञानवापी मशिदीच्या संकुलात कथितरित्या सापडले आहे.
 • वरिष्ठ स्तर सत्र न्यायाधीश महेंद्र पांडे यांनी या प्रकरणाचा निकाल स्थगित केल्याची माहिती जिल्हा सहायक सरकारी वकील सुलभ प्रकाश यानी दिली. २७ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ८ नोव्हेंबपर्यंत हा निकाल राखून ठेवला होता. त्या दिवशी न्यायाधीश रजेवर असल्याने हे प्रकरण सोमवापर्यंत (१४ नोव्हेंबर) स्थगित झाले होते.
 • २४ मे रोजी विश्व वैदिक सनातन संघाचे सरचिटणीस किरण सिंह यांनी या प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असून, ‘ज्ञानवापी’ संकुलात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात यावी, संकुल सनातन संघाकडे सोपवावे आणि येथील शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. २५ मे रोजी जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

राष्ट्रीय चालू घडामोडी (National Current Affairs)

हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारत 8 व्या क्रमांकावर आहे; डेन्मार्क चौथ्या क्रमांकावर असताना कोणताही देश प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांकावर नाही
15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिन साजरा केला जातो
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फिनिश समकक्ष पेट्री होन्कोनेन यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

झारखंडचा स्थापना दिवस साजरा; 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहारमधून वेगळे राज्य निर्माण झाले.
ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कृष्णा गरू यांचे वयाच्या 80 व्या वर्षी हैदराबाद येथे निधन झाले
भारत आणि स्वीडन यांनी शर्म अल शेख, इजिप्त येथे COP27 च्या बाजूला लीडआयटी (उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व) शिखर परिषदेचे आयोजन केले
राष्ट्रीय पातळीवरील प्रजनन दर 2.2 टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे नमूद करून 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रजनन दरावर नियंत्रण मिळवल्याचे यूएनएफपीएने स्पष्ट केले.
2023 मध्ये भारत लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये भारताची लोकसंख्ये अंदाजे 141.2 कोटी असून चीनची लोकसंख्या 142.6कोटी आहे
व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस आणि मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक राजीव अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

व्हॉट्सअॅपचे सार्वजनिक धोरण संचालक शिवनाथ ठुकराल यांची आता मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्थिक चालू घडामोडी (Economic Current Affairs)

वित्तीय सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नामांकन करण्यात आले आहे.
RBI च्या मंजुरीनंतर 9 रशियन बँकांनी व्होस्ट्रो खाती रुपयात ट्रेडिंगसाठी उघडली

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी (International Current Affairs)

वार्षिक G20 शिखर परिषद बाली, इंडोनेशिया येथे 5-16 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जात आहे, थीम: ‘एकत्र पुनर्प्राप्त करा, मजबूत पुनर्प्राप्त करा’
15 नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांनी आठ अरब दिवस पाळला

क्रीडा (Sports Current Affairs)

अनुभवी टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमालला ‘खेलरत्न’ या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
तरूण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनसह २५ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१६ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.