Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |15 February 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१५ फेब्रुवारी चालू घडामोडी
एअर इंडियाचा ४७० विमाने खरेदी करण्याचा सर्वात मोठा करार:
- टाटा समूहाच्या एअर इंडियाने हवाई वाहतूक क्षेत्रातला सर्वात मोठा करार केला आहे. अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रांसच्या एअरबस या कंपन्यांकडून ४७० विमाने खरेदी करण्याचा मोठा करार केला आहे. यापैकी एअरबसकडून २५० नवीन एअरक्राफ्ट आणि बोईंगकडून २२० मोठी विमाने घेण्यात येणार आहेत. टाटा समूहाने एअर इंडियाला ताब्यात घेतल्यानंतर व्यवस्थापनात खूप व्यापक बदल केले आहेत. एअर इंडिया आणि एअरबस यांच्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि फ्रांसचे राष्ट्रपती मॅक्रोन यांच्यात व्हर्चुअल बैठक झाल्यानंतर २५० विमान खरेदी करण्याचा करार झाला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा करार असून भारत-फ्रांस यांच्यामधील भागीदारीचा ही महत्त्वाची उपलब्धी आहे. तर जो बायडेन यांनी बोईंग – एअर इंडिया यांच्यामध्ये २२० विमानांच्या खरेदीचा करार झाला असल्याची घोषणा केली.
- टाटा समूहाला एअर इंडियाची पुन्हा मालकी मिळाल्यानंतर कंपनीमध्ये खूप मोठे बदल दिसत आहेत. त्यामुळेच एअर इंडियाच्या ताफ्यात नवीन विमानांचा भरणा केलेला दिसून येत आहे. एअरबस – एअर इंडिया करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रतन टाटा, फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन आणि एअरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुइलाम फाउरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यावेळी फाउरी यांनी या कराराला ऐतिहासिक करार असल्याचे सांगितले.
- त्यानंतर एअर इंडिया आणि अमेरिकेच्या बोईंग कंपनीच्या दरम्यानही मोठा करार झाला. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी मोदी आणि बायडेन यांच्यात फोनवरुन यासंदर्भात चर्चा झाली. दोघांनीही या कराराबाबत आनंद व्यक्त केला. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखी बळकट करण्याच्या दिशेने उचलले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे जो बायडेन यांनी सांगितले.
निकी हॅले अध्यक्षपदासाठी उमेदवारीच्या शर्यतीत:
रिपब्लिकन पक्षाच्या निकी हॅले यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये उतरण्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून त्यांनी त्यासंबंधी घोषणा केली. उमेदवारीसाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या रिपब्लिकन नेत्या ठरल्या आहेत. अमेरिकेत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी जानेवारी २०२४ मध्ये निवडणूक होईल.
आर्थिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी, सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी, आपला देश आणि आपला अभिमान यांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेला आता नवीन पिढीतील नेतृत्वाची गरज आहे, असा दावा ५१ वर्षांच्या हॅले यांनी या व्हिडीओ संदेशामध्ये केला. हॅले या दक्षिण कॅरोलिना राज्याच्या दोन वेळा गव्हर्नर होत्या तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. निकी हॅले यांचे आई-वडील भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत.
दुसरीकडे विवेक रामस्वामी या भारतीय वंशाच्या अमेरिकी उद्योजकाकडे निकी हॅले यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे. बायोटेकचे संस्थापक असलेले विवेक रामस्वामी गेल्या काही काळापासून अमेरिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. हवामान बदल आणि वर्णभेदासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ावर त्यांनी अनेकदा वृत्तवाहिन्यांवर रिपब्लिकन पक्षाची बाजू मांडली आहे. हॅले यांच्याप्रमाणेच रामस्वामी यांचेही आई-वडील भारतातून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले. त्यांचा जन्म सिनसिनाटी येथे झाला आहे. हार्वर्ड आणि येल या प्रतिष्ठित विद्यापीठांमधून त्यांचे शिक्षण झाले आहे आणि त्यांची संपत्ती ५० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक आहे.
महिला आयपीएलचं वेळापत्रक जाहीर! ४ मार्चपासून रंगणार थरार; पहिल्याच सामन्यात ‘हे’ दोन संघ भिडणार:
- महिला प्रीमिअर लीगसाठी (WPL Auction 2023) लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीगसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार WPL मध्ये एकूण २० सामन असतील. तर ही स्पर्धा एकूम २३ दिवस चालणार आहे.
- अंतिम सामना २६ मार्च रोजी – या वर्षी महिला आयपीएल अर्थात WPL 2023 ला येत्या चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिली लढत गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. चार मार्चापासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना २६ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. हा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
- एकूण २० साखळी सामने खेळवले जातील – WPL च्या या पहिल्या हंगामात एकूण २० साखळी सामने खेळवले जातील. त्यानंतर २ प्लेऑफसामने होतील. या स्पर्धेत एकूण चार दिवस दोन सामने खेळवले जातील. या चार दिवसांत पहिला सामना दुपारी तीन वाजता खेळवला जणार आहे. तर अन्य सर्व सामने रात्री साडे सात वाजता खेळवले जातील. एलिमिनेटर सामना २४ मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.
- हिला आयपीएलसाठी सोमवारी (१४ फेब्रुवारी) लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सर्वाधिक रक्कम मोजली आहे. बंगळुरु संघाने मंधानाला संघात घेण्यासाठी तब्बल तीन कोटी ४० लाख रुपये मोजले आहेत. मंधानाची बेस प्राईज ५० लाख रुपये होती.
100 व्या कसोटीपूर्वी पंतप्रधान मोदींनी चेतेश्वर पुजाराला दिला विजयाचा मंत्र:
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत टीम इंडिया १-०ने पुढे आहे. शुक्रवारपासून दिल्लीत दुसरी कसोटी खेळली जाणार असून कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजारासाठी हा सामना खूप खास आहे. ही त्याची १००वी कसोटी असेल आणि या विक्रमाला स्पर्श करण्यापूर्वी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या बैठकीची छायाचित्रेही बीसीसीआयने शेअर केली आहेत. विशेष सामन्यापूर्वी पीएम मोदींनी पुजाराला शुभेच्छाही दिल्या. या भेटीत क्रिकेटपटूची पत्नी पूजाही त्याच्यासोबत होती.
- ३५ वर्षीय मिस्टर डिपेंडंट पुजारा म्हणाला की, “त्याने निवृत्तीची तारीख निश्चित केलेली नाही आणि त्याला एकावेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. अजून माझ्यात खूप क्रिकेट बाकी आहे.” कसोटी सामन्यापूर्वी पुजारा आणि त्याची पत्नी पूजा यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पुजाराने ट्विट केले की, “आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटणे हा एक सन्मान होता. माझ्या १००व्या कसोटीपूर्वी मी तुमच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनासाठी आभारी आहे. धन्यवाद PMOIndia!” ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, “आज पूजा आणि तुला भेटून आनंद झाला. तुझ्या १००व्या कसोटीसाठी आणि तुझ्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा.”
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजाही त्यांच्यासोबत होती. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा १०वा वाढदिवस साजरा केला. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर पुजाराने ट्विट केले की, “पंतप्रधानांना भेटून मला खूप आनंद झाला. त्याच्याशी छान गप्पा झाल्या.” पीएम मोदींनीही ट्विटला उत्तर दिले आणि भविष्यासाठी आणि १००व्या कसोटी सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयनेही हे ट्विट पुन्हा शेअर केले आहे.
भारतात ‘या’ दिवशी लॉन्च होणार Xiaomi 13 Pro, DSLR ला टक्कर देणार ५० मेगापिक्सलचा कॅमेरा:
- Xiaomi ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. Xiaomi कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपला आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे . शाओमी कंपनीने Xiaomi 13 Pro बद्दल माहिती दिली आहे. कंपनी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार असून त्यापूर्वीच याचे फीचर्स समोर आले आहेत.
- Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन – सध्या Xiaomi कडून Xiaomi 13 Pro च्या स्पेसिफिकेशनबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याचे फीचर्स लॉन्च झाले आहेत. कंपनीने आपल्या स्थानिक बाजारात हा फोन लॉन्च केला असून भारतात देखील त्याच फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसोबत लॉन्च होणार आहे. आपण याच्या चायना व्हेरिएंटमध्ये बोलायचे झाल्यास त्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 हा प्रोसेसर असणार आहे. यामध्ये ६.७३ इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले मिळतो. त्यामध्ये 12 GB LPDDR5X RAM दिली जाईल आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध असणार आहे.
- कसा असणार कॅमेरा – Xiaomi 13 Pro मध्ये कंपनी तुम्हाला DSLR कमरेच्या लेव्हलचा कॅमेरा देणार आहे. भारतात येणाऱ्या फोनचा कॅमेरा Leica ब्रॅंडिंगसह येणार आहे. त्यामध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचे तीन कॅमेरे असतील. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये OIS फिचर देखील मिळेल ज्यामुळे तुम्ही यामधून स्मूथ व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकणार तसेच या फोनला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येणार आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माती नेणार:
शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत तसेच शिवरायांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण आणि तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१५ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १४ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १३ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १२ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- ११ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १० फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |