१० फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१० फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |10 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१० फेब्रुवारी चालू घडामोडी

आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल मोठी अपडेट; ‘या’ तारखेला खेळला जाणार अंतिम सामना

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर ७ ते ११ जून २०२३ दरम्यान दुसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार आहे. याबाबत आयसीसीकडून सांगण्यात आले आहे. यावेळी या फायनलसाठी १२ जून २०२३ हा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.
  • सध्या, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये अव्वल दोन संघ आहेत. तरी ते अव्वल स्थानावर राहतील की नाही, हे बॉर्डर गावस्कर मालिका आणि न्यूझीलंड आणि श्रीलंका मालिकेवर अवलंबून असेल.
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावसकर मालिका या फायनलमध्ये खेळण्याची भारताची शक्यता ठरवेल. कोणत्याही अडचणीशिवाय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत थेट पोहोचण्यासाठी, भारताला बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला ४-० ने हरवणे गरजेचे आहे. यजमानांनी ३-० असा विजय मिळवला किंवा ३-१असा विजय मिळवला, तरीही भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यासाठी त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंका मालिकेवर अवलंबून रहावे लागेल.
  • फायनल कोण खेळणार अजून ठरले नाही – अंतिम सामना डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघांमध्ये होईल आणि ऑस्ट्रेलिया सध्या ७५.५६ च्या विजयी टक्केवारीसह नऊ संघांच्या गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो, ज्यांच्या खात्यात ५८.९३ टक्के विजयाचे गुण आहेत. नागपुरात ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या मालिकेनंतर अंतिम फेरीतील संघ निश्चित होईल.

Tech Layoffs: गुगल मायक्रोसॉफ्टनंतर आता ‘ही’ टेक कंपनी १,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार!

  • सध्या अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. सगळीकडे कर्मचारी कपातीचे लोणं आले आहे. आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. आता आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे. आता ही कोणती कंपनी आहे आणि ती आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी किती कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे ते जाणून घेऊयात.
  • Yahoo Inc कंपनीने टाळेबंदीची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. जाहिरात तंत्रज्ञान विभागाची मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
  • याहू कंपनी एका युनिटमधून तिच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. म्हणजेच कंपनी १,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. या कपातीमुळे Yahoo च्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त परिणाम हा जाहिरात तंत्रज्ञान विभागाच्या होणार आहे.
  • गुरुवारी याहूमध्ये काम करणाऱ्या सांगण्यात आले होते की, १२ टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजे जवळजवळ १,००० जणांना कामावरून कमी केले जाणार आहे. तसेच येत्या ६ महिन्यांत कंपनी उर्वरित ८ टक्के म्हणजे ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करेल.

अजित डोभाल-पुतिन यांच्यात चर्चा

  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गुरुवारी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. भारताच्या रशियामधील दूतावासाने ट्वीट करून ही माहिती दिली. या भेटीमध्ये द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी यापुढेही प्रयत्न सुरू ठेवण्याविषयी सहमती झाली.
  • रशियाने सुरक्षा परिषदांचे सचिव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये डोवाल सहभागी झाले. दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जाऊ नये, या भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला, तसेच भारत कायम अफगाण नागरिकांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही डोभाल यांनी दिली. या बैठकीला भारत आणि रशियासह इराण, कझाकस्तान, किरगिझस्तान. चीन, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित होते.
  • अजित डोभाल यांचा दोनदिवसीय रशिया दौरा बुधवारी सुरू झाला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तीन महिन्यांपूर्वी रशियाचा दौरा केला होता. त्या वेळी दोन्ही देशांनी रशियाने भारताला पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करण्यासह आर्थिक व्यवहाराचा विस्तार करण्याचे मान्य केले होते. भारतामध्ये लवकरच जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डोवाल यांनी रशियाचा दौरा केला आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरही भारत आणि रशियाचे संबंध मजबूत राहिले आहेत.
  • भारताने अद्याप या हल्ल्याचा निषेध केलेला नाही. मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून या संकटावर मात करावी, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. तसेच भारताची रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात गेल्या काही महिन्यांमध्ये लक्षणीयरीत्या वाढली आहे.

युक्रेनला लढाऊ विमाने देण्यास युरोपीय महासंघ अनुकूल

  • रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करत असलेल्या युक्रेनला लढाऊ विमाने आणि अधिक लष्करी साहाय्य पुरवण्यास युरोपीय महासंघाने अनुकूलता दर्शवली आहे. युरोपच्या दौऱ्यावर असलेले युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युरोपीय महासंघाच्या संसदेमध्ये भाषण करताना लढाऊ विमानांची मागणी केली तसेच रशिया युरोपची जीवनपद्धती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला. या भाषणाच्या आधी, भाषण सुरू असताना आणि भाषण संपल्यानंतर खासदार त्यांना उभे राहून मानवंदना देत असल्याचे चित्र दिसले.
  • युरोपीय महासंघाच्या संसदेचे अध्यक्ष रॉबर्टा मेटसोला यांनी युक्रेनवरील रशियाचा हल्ला हा युक्रेनच्या अस्तित्वासाठीच धोकादायक आहे, अशी टीका करत त्याला प्रतिसादही त्याच पद्धतीने दिला पाहिजे, असे आवाहन केले. युरोपीय महासंघातील सर्व २७ देश या संकटसमयी युक्रेनच्या पाठीशी असल्याची ग्वाही झेलेन्स्की यांना देण्यात आली.
  • रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला २४ तारखेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रशिया युक्रेनवरील हल्ला अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेलेन्स्की यांनी युरोपला मदत वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्यांना दोन दिवसांच्या युरोप दौऱ्यामध्ये मोठय़ा प्रमाणात पाठिंबा मिळवण्यात यश मिळाले. ब्रिटनचे रणगाडे पुढील महिन्यात युक्रेनमध्ये पोहोचतील, तसेच युक्रेनच्या लढाऊ वैमानिकांना अद्ययावत प्रशिक्षणही देणार आहे.

जागतिक मंदीच्या तोंडावर ब्लू स्टारची ३५० कोटींची मोठी गुंतवणूक, सामान्यांना असा होऊ शकतो फायदा

सध्या संपूर्ण जग जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे. जगभरातील अनेक बड्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत असताना एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कंपनी ब्लू स्टार लिमिटेडने आंध्र प्रदेशातील श्री सिटी (Sri City) येथे एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात तीन लाख रुम एसी युनिट्सची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार वाढण्याची शक्यता आहे. ब्लू स्टारने आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत हे उत्पादन १२ लाखांपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

“सध्या आम्ही दरमहा २५ हजार एसी युनिट्सची निर्मिती करत आहोत, तिसऱ्या टप्प्यापर्यंत दरमहा सुमारे एक लाख युनिट्सचं उत्पादन करण्याचं आमचं लक्ष्य आहे,” असे ब्लू स्टार लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी त्यागराजन (B Thiagarajan) यांनी सांगितलं आहे.

देशातील उच्च शिक्षणाचा लेखाजोखा:

  • केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (एआयएसएचई) हा अहवाल नुकताच जाहीर केला.
  • देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून माहिती संकलित करून आकडेवारी जाहीर केली जाते. या आकडेवारीतून देशातील उच्च शिक्षणाचे चित्र स्पष्ट होते.
  • त्यानुसार 2020-21 मध्ये देशात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी पहिल्यांदाच चार कोटींवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • तसेच मुलींच्या प्रवेशातही वाढ झाली.
  • विद्यार्थिसंख्येनुसार देशातील 10.98 टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात होते.
  • विद्यार्थी संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी आहे.
  • 16.7 टक्क्यांसह उत्तर प्रदेश अग्रस्थानी आहे.
  • सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशखालोखाल महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे.
  • सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे चौथ्या स्थानी आहे.
  • परदेशी विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटक आघाडीवर असून, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे.

अश्विनने तोडला कुंबळेचा विक्रम:

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळवला जात आहे.

त्याचबरोबर या कसोटी सामन्यात भारत प्रथम गोलंदाजी करत आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने भारतासाठी एक मोठा विक्रम केला आहे.

अश्विनने या मालिकेत पहिली विकेट घेताच एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ऑस्ट्रेलियातील नागपूर कसोटीत टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने कांगारूंचा यष्टिरक्षक फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीला बॉलिंग देत कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळी पूर्ण केल्या.

अनिल कुंबळेला मागे टाकून तो सर्वात जलद 450 कसोटी बळी घेणारा भारतीय ठरला आहे.

अश्विनने आपल्या 89व्या कसोटीतील 167व्या डावात गोलंदाजी करताना ही कामगिरी केली.

कसोटी क्रिकेटमध्ये 450 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा अश्विन हा अनिल कुंबळेनंतरचा जगातील नववा आणि दुसरा भारतीय गोलंदाज आहे.

रविचंद्रन अश्विन

मोहम्मद शमीने वॉर्नरला बोल्ड करत रचला इतिहास:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला क्लीन-बोल्ड करून इतिहास रचला.

मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी पूर्ण केले आहेत.

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो नववा गोलंदाज ठरला आहे.

या विकेटसह शमीही स्पेशल क्लबमध्ये देखील सामील झाला आहे.

मोहम्मद शमी 400 विकेट्स घेतल्यानंतर अनिल कुंबळे, झहीर खान, कपिल देव, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा जगातील 56 वा गोलंदाज बनला आहे.

चंद्रपॉल- ब्रॅथवेटने नोंदवला सर्वात अनोखा विक्रम:

वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला कसोटी सामना पार पडला. हा सामना अनिर्णीत राहिला.

145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे घडले नाही ते या सामन्यात घडले.

बुधवारी पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अनोखा विक्रम रचला गेला.

हा विक्रम क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनारायण चंद्रपॉल हे पाचव्या दिवशी खेळायला उतरताच निर्माण झाला.

त्या दोघांनी सलग पाच दिवस फलंदाजीसाठी उतरुन नवा विक्रम केला.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१० फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.