११ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
११ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |11February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

११ फेब्रुवारी चालू घडामोडी

इस्रोच्या ‘एसएसएलव्ही डी२’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी एसएसएलव्ही (लघु उपग्रह प्रक्षेपण यान) डी२ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यासह ईओएस-०७ या पृथ्वीचे निरीक्षण करणाऱ्यासह एकूण तीन उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
  • अंतरिसकडून न्यूस्पेस इंडिया लिमिटेडचा जानुस-१ हा उपग्रह आणि स्पेस किड्स इंडियाच्या आझादीसॅट हे दोन उपग्रहदेखील त्यांच्या प्रस्तावित कक्षेत यशस्वीरीत्या सोडण्यात आले. यापैकी आझादीसॅट हा विशेष महत्त्वाचा उपग्रह आहे. त्याची निर्मिती देशभरातील विद्यार्थिनींनी केली आहे. हे तिन्ही उपग्रह वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करतील. यामुळे इस्रोने आता लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे.
  • एसएसएलव्हीची क्षमता – लघु उपग्रह प्रक्षेपण यान अग्निबाण १० ते ५०० किलो वजनाचे लहान, सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म उपग्रह ५०० किमी कक्षेमध्ये सोडू शकतो. पृथ्वीपासून जवळच्या कक्षांमध्ये मागणीप्रमाणे प्रक्षेपण करण्याची त्याची क्षमता आहे. हे अग्निबाण एकाच वेळी एकापेक्षा जास्त उपग्रहांचे प्रक्षेपण करू शकतात त्यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत अवकाशाचा अभ्यास शक्य होतो. तसेच त्याच्या प्रक्षेपणासाठी तुलनेने कमी पायाभूत सुविधा आवश्यक असतात.तीन लघु उपग्रहांची वैशिष्टय़े
  • आझादीसॅट-२ – वजन – ८.२ किलो. चेन्नईमधील स्पेस किड्स इंडियाद्वारे देशभरातील ७५० विद्यार्थिनींच्या एकत्रित प्रयत्नातून निर्मिती.
  • ईओएस-०७ – वजन – १५६.३ किलो. इस्रोद्वारे रचना, विकास आणि अंमलबजावणी.
  • जानुस-१ – वजन – १०.२ किलो. अमेरिकेतील अंतरिसद्वारे बांधणी.
  • इस्रोसाठी अभिमानाचा क्षण!गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी आलेल्या अपयशातून इस्रोने अल्प काळात पुनरागमन केले आहे. ही आमच्यासाठी विस्मरणीय घडामोड आहे आणि इस्रोसाठी अभिमानाचा क्षण आहे. एस विनोद, एसएसएलव्ही डी२ प्रक्षेपण मोहीम संचालक.

जम्मू-काश्मीरमध्ये ५.९ दशलक्ष लिथियम साठय़ांचा शोध, विद्युत वाहनांच्या बॅटरीसाठी उपयुक्त

  • विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या ‘बॅटरी’तील महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लिथियम’ साठय़ाचा शोध जम्मू-काश्मीरमध्ये लागला आहे. ५.९ दशलक्ष टन लिथियम साठा सापडल्याचे सरकारने जाहीर केले आहे, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले. लिथियमसाठी भारत प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिनावर अवलंबून आहे.
  • भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाला जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सालाल-हैमाना भागात लिथियमचे साठे सापडल्याचे केंद्रीय खणीकर्म मंत्रालयाने जाहीर केले. कर्नाटकात २०२१ मध्ये या खनिजाचे अनेक छोटे साठे आढळले होते. नव्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ धातूंच्या पुरेशा पुरवठय़ासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी देशांतर्गत आणि परदेशातील स्रोतांचा शोध सुरू आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. खणीकर्म मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज म्हणाले की कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आधीच्या उपायांना नवी दिशा दिली जात आहे.
  • हवामानबदलावरील उपाय म्हणून हरित उर्जेसाठी जगभरात लिथियमसारख्या दुर्मिळ धातूंची मागणी वाढली आहे. २०२३ मध्ये, चीनने बोलिव्हियाच्या विशाल लिथियम साठय़ासंदर्भात एक अब्ज डॉलर करारावर स्वाक्षरी केली. तेथे जगातील सर्वात मोठा सुमारे २१ मिलियन टन लिथियम साठा असल्याचा अंदाज आहे.
  • लिथियम उत्खनाने पर्यावरणाचा ऱ्हास – जागतिक बँकेच्या मतानुसार २०५० पर्यंत जागतिक तापमानवाढ नियंत्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्खननात ५०० टक्के वाढ करणे आवश्यक आहे. तथापि, तज्ज्ञांच्या मतानुसार लिथियमची खाणप्रक्रिया पर्यावरणास अनुकूल नाही. लिथियम हे कठीण खडक आणि भूगर्भातील जलाशयातून काढले जाते. ऑस्ट्रेलिया, चिली आणि अर्जेटिनात हे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात. खनिज उत्खननानंतर, ते जीवाश्म इंधन वापरून भाजले जाते. तसेच हे खडक काढल्यावर तेथील भूभागाला मोठमोठी भगदाडे पडतात. शिवाय, प्रक्रिया करताना मोठय़ा प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होते. 

सूर्याला पडली भेग, एक मोठा भाग निखळल्याने जगभरातले संशोधक चिंतेत

  • सूर्य हा आपल्याला प्रकाश देणारा तेजस्वी तारा म्हणून ओळखला जातो. या सूर्याबाबतच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आपल्याला प्रकाश देणाऱ्या या सूर्याला एक भेग पडली आहे. तसंच सूर्यापासून सूर्याचा एक भलामोठा भाग वेगळा झाला आहे. सूर्यापासून वेगळा झालेला हा तुकडा आता सूर्याभोवतीच फिरतो आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून ही घटना पाहण्यात आली आहे. या घटनेमुळे वैज्ञानिक चकीत आणि चिंतित झाले आहेत.
  • जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काय नोंदवलं निरीक्षण – नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने हे निरीक्षण नोंदवलं आहे की सूर्यापासून त्याच एक भलामोठा भाग वेगळा झाला आहे. आता हा भाग सूर्याभोवती फिरतो आहे. हा भाग वेगळा झाल्याने सूर्याला एक मोठी भेग पडली आहे असं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. या अवलोकनाबाबत वैज्ञानिक जगतात काहीसं कुतूहल निर्माण झालं आहे. तमिथा स्कोव नावाच्या हवामान विषयक संशोधकांनी ही बाब सोशल मीडियावर ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी नासाचा व्हिडिओही ट्विट केला आहे.
  • नेमकं काय झालं आहे याबाबत जगभरातले वैज्ञानिक चिंतेत आहेत. अशात असंही म्हटलं जातं आह की याचा संबंध सूर्याच्या मॅग्नेटिक फिल्डसंदर्भातलाही असू शकतो. तसंच याचा संबंध ११ वर्षे चालणाऱ्या सौर चक्राशीही असू शकतो. काही अभ्यासकाचं असंही यावर म्हणणं आहे की ही घटना अनपेक्षित नाही. सौर चक्राच्या ११ वर्षांच्या कालावधीत अशी घटना घडू शकते. तसंच अशा प्रकारची घटना सौर चक्रात एका वेळी एकाच ठिकाणी घडते असंही काही अभ्यासकांनी म्हटलं आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
  • नेमकं काय पाहायला मिळालं आहे – सूर्यापासून एक भाग वेगळा झालेला पाहण्यास मिळतो आहे. लालबुंद सूर्य आणि त्यातून बाहेर पडणारा तो भाग हे या व्हिडिओत पाहण्यास मिळतं आहे. सूर्याने आत्तापर्यंत गेल्या काही वर्षात अनेकदा वैज्ञानिकांना चकित केलं आहे. मात्र यावेळी ही नवी घटना टेलिस्कोपमध्ये पाहिली गेली आहे. सूर्याच्या उत्तर ध्रुवाजवळचा एक मोठा भाग निखळला आहे. तसंच हा तुकडा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो आहे.
एसएसएलव्ही डी2

“वंदे भारत एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातली दोन आर्थिक केंद्रं…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महत्त्वाचं वक्तव्य

  • वंदे भारत एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातली मुंबई आणि पुणे ही दोन आर्थिक केंद्रं ही आपल्या धार्मिक केंद्रांशी जोडण्याचं महत्त्वाचं काम पूर्ण झालं आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी झालेल्या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ही मुंबई ते सोलापूर अशी होती तर दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस ही मुंबई ते शिर्डी अशी होती. या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
  • काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी – महाराष्ट्रात आलेल्या या दोन वंदे भारत एक्स्प्रेस पर्यटन आणि तीर्थयात्रा यांना चालना देणाऱ्या ठरणार आहेत. शिर्डीत जाऊन साईबाबाचं दर्शन घेता येईल तसंच नाशिकमध्ये जाऊन रामकुंड, प्रभू रामचंद्रांचं मंदिर आणि त्याजवळ असलेलं त्र्यंबकेश्वरही तुम्ही पाहू शकता. तसंच सोलापूरला जाणाऱ्या ट्रेनने तुम्ही अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर आणि पंढरपूरचं मंदिर पाहू शकता. सह्याद्रीच्या घाटातून जेव्हा ही एक्स्प्रेस जाईल तेव्हा तुम्ही इथलं विलोभनीय सौंदर्यही पाहू शकता असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
  • आणखी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी – मला आठवतं आहे की काळ असा होता की खासदार पंतप्रधान कार्यालयात किंवा रेल्वे मंत्रालायात चिठ्ठी पाठवायचे आणि सांगायचे की अमुक अमुक ट्रेन या स्टेशनला दोन मिनिटं, पाच मिनिटं थांबेल का पाहा. आज वंदे भारत एक्स्प्रेस आपल्याकडे का नाही? कधी येणार? यावर ते चर्चा करताना दिसतात पूर्वीच्या काळातला आणि आत्ताचा हा महत्त्वाचा फरक आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक भारताचं प्रतीक आहे. भारताची प्रगती आणि वेग या दोन्हीचं ही खूण आहे. ज्या वेगाने वंदे भारत ट्रेन लाँच करतो आहे ते तुम्ही पाहाता आहातच. आज घडीला देशातल्या १७ राज्यांमधले १०८ जोडले गेले आहेत.

चालत्या मोटारसायकलवर दहा सूर्यनमस्कार; बारामतीच्या रोहित शिंदे याची इंडिया, एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

चालत्या मोटारसायकलवर चार मिनीट आणि वीस सेकंदांमध्ये दहा सूर्यनमस्कार बारामतीच्या रोहित शिंदे या युवकाने घातले आहेत. त्याच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक रेकाॅर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.  मोटारसायकलवर दहा वेळा सूर्यनमस्कार घालणारा तो जगातील पहिला मोटारसायकलस्वार ठरला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 5.9 दशलक्ष लिथियम साठय़ांचा शोध:

  • विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या ‘बॅटरी’तील महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लिथियम’ साठय़ाचा शोध जम्मू-काश्मीरमध्ये लागला आहे.
  • 5.9 दशलक्ष टन लिथियम साठा सापडल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
  • लिथियमसाठी भारत प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिनावर अवलंबून आहे.
  • भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाला जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सालाल-हैमाना भागात लिथियमचे साठे सापडल्याचे केंद्रीय खणीकर्म मंत्रालयाने जाहीर केले.
  • कर्नाटकात 2021 मध्ये या खनिजाचे अनेक छोटे साठे आढळले होते.
  • ‘रिचार्जेबल ‘बॅटरी’त ‘लिथियम’ हा महत्त्वाचा घटक असतो.
  • स्मार्टफोन, लॅपटॉप सारखी अनेक उपकरणे तसेच विजेवरील मोटारींसाठी या ‘बॅटरी’ वापरल्या जातात.

दोन मुख्य न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती:

  • उच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी बढती देण्यात आली.
  • त्यामुळे आतार सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या सर्व 34 जागा भरल्या आहेत.
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल, गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरविंद कुमार यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे.
  • येत्या दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते शपथ घेण्याची शक्यता आहे.
  • गेल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीची नियुक्ती करण्यात आली होती.

लायन-टेलरच्या विशेष क्लबमध्ये सामील होत रचला नवा इतिहास:

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे.
  • ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर टॉड मर्फी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वप्नवत पदार्पण केले आहे.
  • त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी करत 5 बळी घेतले.
  • त्याचबरोबर त्याने एक विक्रम केला.
  • टॉड मर्फी हा पदार्पणाच्या सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा गोलंदाज ठरला.
  • तो पीटर टेलर, जेसन क्रेझा आणि नॅथन लायनच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला.

रोहित‘हा’ कारनामा करणारा जगातील चौथा खेळाडू ठरला:

  • भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरातील पहिल्या कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला आहे.
  • तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
  • रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील हे 9वे आणि घरच्या मैदानावरील 8वे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले शतक आहे.
  • रोहित शर्माने कर्णधार म्हणून न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये शतके झळकावली आहेत, तर टी-20 मध्ये त्याने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दोनदा हा पराक्रम केला आहे.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.
  • त्याच्या आधी हा पराक्रम श्रीलंकेचे माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान, फाफ डुप्लेसिस आणि बाबर आझम यांनी केला आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

११ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.