९ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
९ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |9 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

९ फेब्रुवारी चालू घडामोडी

“२००४ ते २०१४ हे देशाच्या इतिहासातलं सर्वात वाईट दशक, कारण…” काँग्रेसचा मोदींकडून समाचार

  • आज जगभरातले अनेक देश कठीण काळातून जात आहेत. अशात आपला देश प्रगतीपथावर आहे सगळ्या जगात आपला देश चांगली कामगिरी करतो आहे. मात्र काही निराशावादी लोक हे आजही निराशेतच बुडाले आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसंच २००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातलं सर्वात वाईट दशक होतं अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
  • काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी – २००४ ते २०१४ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं. या दहा वर्षात महागाई डबल डिजिट झाली. त्यामुळेच काही चांगलं झालं की या लोकांची निराशा वाढते. या लोकांनी बेरोजगारी दूर करण्याची आश्वासनं दिली होती त्यांनी फक्त त्यासाठीचे कायदे तयार केले. बाकी काहीही केलं नाही. आम्ही बेरोजगारी दूर करण्यासाठी कायदा केला एवढं सांगितलं. २००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातलं घोटाळ्यांचं दशक होतं.
  • देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात दहशत पसरली होती – यूपीएची ती दहा वर्षे काश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत होते. अनोळखी वस्तूला हात लावू नका, आज इकडे स्फोट झाला, आज तिकडे स्फोट झाल्या अशाच बातम्या आल्या. २००४ ते २०१४ या कालावधीत हिंसाचाराचा कहर देशात माजला होता. त्या दहा वर्षात भारताचा आवाज जागतिक मंचावर कमकुवत झाला होता. यांच्या निराशेचं कारण हे देखील आहे की आज देशाच्या क्षमतेचा परिचय जगाला होतो आहे तेव्हा यांना वाईट वाटतं आहे.
  • या दशकात घोटाळे आणि हिंसा वाढली – आपला देश आधीही सामर्थ्यशाली होता. मात्र २००४ ते २०१४ हे दशक हे अत्यंत वाईट दशक होतं. प्रत्येक संधीला संकटात नेणारा तो काळ होता. टेक्नॉलॉजी वाढत होती तेव्हा हे टूजी मध्ये अडकून गेले. सिव्हिल न्यूक्लिअर डील झाली तेव्हा हे घोटाळ्यात अडकले. २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले. भारताचं नाव या CWG घोटाळ्यांमुळे बदनाम झालं. जगात भारताची अब्रू गेली असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’

  • निरुपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने बुधवारी जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथे या पुरस्काराची घोषणा केली.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मुलाच्या व्रतबंधन सोहळय़ासाठी रेवदंडा येथे आले होते. या सोहळय़ादरम्यान त्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी नानासाहेब धर्माधिकारी यांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता आप्पासाहेबांसाठी पुरस्काराची घोषणा होताच त्यांच्या अनुयायांनी रेवदंडा येथे फटाके फोडून जल्लोष केला. या पुरस्कारामुळे जाबाबदारी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अप्पासाहेबांनी दिली, तर हा दुग्धशर्करा योग असल्याचे सचिनदादा धर्माधिकारी म्हणाले.
  • आप्पासाहेबांचे सामाजिक कार्य – आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजप्रबोधनाचे बाळकडू वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून मिळाले. समाजप्रबोधनाला मानवी उत्थानाची जोड देण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापना केले. बाल संस्कारवर्ग, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप यासारखे उपक्रम त्यांनी हाती घेतली. त्यास श्री सदस्यांनी हातभार लावला.
  • आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य प्रेरणादायी आहे. गेली अनेक वर्षे व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता आदी क्षेत्रात त्यांचे काम अव्याहतपणे सुरु आहे. त्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे या पुरस्काराची उंची आणखी वाढणार आहे.
  • एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री – सन २००८ मध्ये वडील नानासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. आता तो मलाही जाहीर झाल्याचा आनंद आहेच. पण, पुरस्कारांबरोबर जबाबदारीही येत असते. त्यामुळे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरु असलेले सामाजिक कार्य व्यापक प्रमाणात पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’

सर्वाधिक मूळ किंमत असलेल्या खेळाडूंत हरमनप्रीत, मानधना

  • महिला प्रीमियर लीगचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. स्पर्धेची आयोजनाचे स्थळ निश्चित झाल्यावर २४ तासांत लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची लिलावाची पद्धतीही निश्चित करण्यात आली असून, भारताच्या हरमनप्रीत, स्मृती मानधनासह २४ खेळाडूंची सर्वाधिक ५० लाख रुपये इतकी मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे. महिला क्रिकेटपटूंचा १३ फेब्रुवारी रोजी मुंबईतच लिलाव होणार असून, यामध्ये एकूण ४०९ खेळाडूंचा लिलाव होईल. लिलावासाठी १५२५ खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती. यातून मंगळवारी अंतिम खेळाडूंची यादी त्यांच्या मूळ किमतीसह निश्चित करण्यात आली.
  • या लीगदरम्यान महिलांची ट्वेन्टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असेल. भारत-पाकिस्तान सामना १२ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्याच्या दुसऱ्या दिवशी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 
  • लिलावासाठी सर्वाधिक ५० लाख मूळ किंमत मिळालेल्या खेळाडूंमध्ये १३ परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने एलिस पेरी, सोफी एक्लेस्टोन, सोफी डिव्हाईन, डिआंड्रा डॉटिन या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. त्यानंतर ४० लाख ही दुसऱ्या क्रमांकाची मूळ किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी ३० खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. नवोदित खेळाडूंसाठी १० आणि २० लाख मूळ किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यांचा सर्वप्रथम लिलाव होईल. लीगमध्ये सहभागी पाच संघांना खेळाडूंच्या खरेदीसाठी प्रत्येकी १२ कोटी रुपये खर्च करता येतील. प्रत्येक संघाला १५ ते १८ खेळाडू संघात घेता येणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने मुंबईत ब्रेबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडणार आहेत.

लिलावाबाबत..

  • नोंदणी केलेल्या एकूण

खेळाडू : १५२५

लिलावपात्र खेळाडू : ४०९  
भारतीय खेळाडू : २४६  
परदेशी खेळाडू (यातील आठ खेळाडू सहयोगी सदस्य देशांच्या) : १६३  
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या : २०२  
आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलल्या : १९९  
सर्वाधिक ५० लाख मूळ किंमत : २४  
५० लाख मूळ किंमत असलेल्या परदेशी खेळाडू : १३  
 लिलावात ४० लाख मूळ किंमत असणाऱ्या खेळाडू : ३०

NASA मध्ये पोहोचले क्रिकेट; स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होणार अमेरिकेची क्रिकेट लीग

  • अमेरिकेचे मेजर लीग क्रिकेट (MLC) १९ मार्च रोजी ह्यूस्टनमधील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होईल. जुलैमध्ये खेळल्या जाणार्‍या फ्रँचायझी-आधारित टी-२० स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. ज्यामध्ये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, डॅलस, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस आणि सिएटलमधील प्रत्येकी एक संघ सहभागी होईल. स्पर्धेचा पहिला हंगाम १८ दिवसांचा असेल आणि डॅलस आणि मॉरिसविले येथील एमएलसी मैदानावर खेळवला जाईल.
  • क्रिकबझच्या अहवालानुसार, मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात प्रत्येक संघ पाच लीग सामने खेळेल. संघाची टीम पर्स सुमारे US$750,000 (६ कोटींहून अधिक) असेल. हे दक्षिण आफ्रिकन लीग एसए-टी२० आणि यूएच्या आयएल टी-२० च्या प्रति सामन्याच्या सरासरी पगाराच्या जवळपास आहे.
  • या लीगमध्ये अनेक मोठे क्रिकेट स्टार दिसणार – ही स्पर्धा अशा वेळी होणार आहे, जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एफटीपीमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने नाहीत. अशा परिस्थितीत जगातील अनेक क्रिकेट स्टार या लीगमध्ये खेळताना दिसू शकतात.
  • मेजर लीग क्रिकेटचे विधान – मेजर लीग क्रिकेटचे संचालक जस्टिन गेली म्हणाले, “मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात, जगभरातील अनेक सर्वोत्तम T20 खेळाडू अमेरिकेतील प्रतिभावान खेळाडूंसोबत खेळताना दिसतील. ह्यूस्टनमधील स्पेस सेंटरमध्ये १९ मार्च रोजी ड्राफ्ट इवेंटनंतर संघ पुढे जाताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

भारतात जाणाऱ्या पाकिस्तानी हिंदूंना रोखले

  • भारतात जाण्याच्या उद्देशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला समाधानकारक कारण न दिल्याचे सांगून, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सिंध प्रांतात राहणाऱ्या १९० हिंदूंना भारतात जाण्यापासून रोखले असल्याचे वृत्त एका माध्यमाने दिले आहे. सिंधच्या अंतर्गत भागातील मुले व महिलांसह निरनिराळी हिंदू कुटुंबे धार्मिक तीर्थयात्रेसाठी दिलेल्या व्हिसावर भारतात जाण्यासाठी मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली.
  • मात्र, आपण भारतात का जाऊ इच्छितो याचे योग्य कारण ते देऊ न शकल्यामुळे पाकिस्तानच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ देण्यास मनाई केली, असे ‘दि एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तात म्हटले आहे. हिंदू कुटुंबे बहुतेक वेळा धार्मिक तीर्थाटनासाठी व्हिसा घेतात, मात्र नंतर ते दीर्घ काळासाठी भारतात थांबतात, असे सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. सध्या मोठय़ा संख्येत पाकिस्तानी हिंदू राजस्थान व दिल्ली या राज्यांमध्ये भटके म्हणून राहात आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.
  • ‘सेंटर फॉर पीस अँड जस्टिस पाकिस्तान’ या संस्थेच्या अहवालानुसार, पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू समुदायाचे २२ लाख १० हजार ५६६ लोक राहात असून, देशाच्या १८,९८,९०,६०१ इतक्या नोंदणीकृत लोकसंख्येपैकी हे प्रमाण केवळ १.१८ टक्के आहे. पाकिस्तानातील हिंदूंसह अल्पसंख्याक लोकसंख्या गरीब असून देशाच्या विधिमंडळ यंत्रणेत त्यांचे नगण्य प्रतिनिधित्व आहे. पाकिस्तानच्या हिंदू लोकसंख्येपैकी बहुतांश सिंध प्रांतात स्थायिक आहे.

कायद्याने सरोगसी माता आणि अपत्याच्या जनुकीय नात्यास अनुमती नाही:

  • सरोगसीद्वारे झालेल्या अपत्याशी सरोगेट मातेचे जनुकीय नाते नसेल, अशी कायद्यातील तरतूद आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.
  • कोणतीही स्त्री स्वत:ची अंडपेशी दान करून स्वत:च सरोगेट माता होऊ शकत नाही, अशी या कायद्यात तरतूद असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.
  • मात्र, सरोगसी पद्धतीने जन्माला येणाऱ्या अपत्याचा युग्मक (गॅमेट) दान करणाऱ्या दांपत्याचे किंवा अंडपेशी दान करणाऱ्या इच्छुक विधवा अथवा घटस्फोटित महिलेशी जनुकीय संबंध असला पाहिजे असे या कायद्यात स्पष्ट कररण्यात आले आहे असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
  • यापैकी एका याचिकेत सरोगसी (नियमन) कायदा, 2021 आणि साहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी) (नियमन) कायदा, 2021 या दोन कायद्यांच्या काही विशिष्ट तरतुदींना आव्हान देण्यात आले आहे.
  • न्या. अजय रस्तोगी यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर या याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होणार अमेरिकेची क्रिकेट लीग:

  • अमेरिकेचे मेजर लीग क्रिकेट (MLC) 19 मार्च रोजी ह्यूस्टनमधील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होईल.
  • जुलैमध्ये खेळल्या जाणार्‍या फ्रँचायझी-आधारित टी-20 स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे.
  • ज्यामध्ये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, डॅलस, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस आणि सिएटलमधील प्रत्येकी एक संघ सहभागी होईल.
  • स्पर्धेचा पहिला हंगाम 18 दिवसांचा असेल आणि डॅलस आणि मॉरिसविले येथील एमएलसी मैदानावर खेळवला जाईल.

गॅरी बॅलेन्सने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावत रचला इतिहास:

  • झिम्बाब्वेचा खेळाडू गॅरी बॅलेन्सने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावत इतिहास रचला आहे.
  • कसोटी क्रिकेटमध्ये दोन देशांसाठी शतक झळकावणारा तो जगातील दुसरा खेळाडू आहे.
  • झिम्बाब्वेकडून गॅरी बॅलेन्सने बुलावायोमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले.
  • त्याने यापूर्वी इंग्लंड संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले असून कसोटी क्रिकेटमध्येही त्याने अनेक शतके

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.