८ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
८ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |8 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

८ फेब्रुवारी चालू घडामोडी

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टला गूगलचे आव्हान

  • कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टच्या चॅट जीपीटीचा बोलबाला असतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दुसरी बलाढय़ कंपनी गूगलने बार्ड या चॅटबॉट प्रणालीची घोषणा केली आहे. सर्वसामान्य वापरकर्त्यांना ही प्रणाली उपलब्ध करून देण्यापूर्वी काही विश्वसनीय परीक्षकांकडून (टेस्टर) त्याचे मूल्यमापन केले जाईल, अशी माहिती गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी ब्लॉगमध्ये दिली आहे.
  • बार्ड ही प्रणाली सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी तसेच कुतूहल शमविण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करेल, असे पिचई यांनी सांगितले आहे. जगातील ज्ञान, सत्ता, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पिचई यांनी स्पष्ट केले आहे. वापरातील सोपेपणा हे या प्रणालीचे खास वैशिष्टय़ असेल. 
  • नासाच्या जेम्स वेब अवकाश टेलिस्कोपसारखा गुंतागुंतीचा विषय अगदी ९ वर्षांच्या लहान मुलालाही समजेल अशा भाषेत सांगितला जाईल, असा दावा पिचई यांनी केला आहे. तुम्हाला सर्चमध्ये (शोध इंजिन) लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचे सामथ्र्य लाभलेली गुंतागुंतीची माहिती आणि एकापेक्षा अधिक दृष्टिकोन पाहायला मिळतील आणि ते समजायला सोपे आणि वापरण्यासाठी सुरक्षित असतील, असे त्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी गूगलने लॅमडा हे भाषाविषयक प्रारूप वापरात आणले आहे. त्यावरच बार्डची उभारणी करण्यात आली आहे.
  • स्पर्धा वाढणार : गूगलच्या या घोषणेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील स्पर्धा वाढणार आहे. मायक्रोसॉफ्टने काहीच महिन्यांपूर्वी चॅट जीपीटी सर्वासाठी खुले केले, त्याच्या वापरकर्त्यांची संख्या काही कोटी इतकी आहे. या चॅटबॉटची निर्मिती करणाऱ्या ओपनएआयमध्ये मायक्रोसॉफ्टने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे?

  • अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासा ( National Aeronautics and Space Administration – NASA) आणि भारताची इस्रो ( Indian Space Research Organisation -ISRO) यांनी संयुक्तरित्या NISAR या कृत्रिम उपग्रहाची निर्मिती केली आहे. NISAR म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Radar. बहुदा पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेने एकत्र येत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह मोहिम हाती घेतली आहे.
  • या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील प्रसिद्ध Jet Propulsion Laboratory (JPL) या प्रयोगशाळेत झाली. या उपग्रहाचा आराखड तयार करणे आणि प्रत्यक्षात आणणे यामध्ये अर्थात इस्त्रोनेही महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आता हा उपग्रह लवकरच भारताकडे रवाना केला जाणार आहे. पुढील वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यात या NISAR उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटाहून केलं जाणार आहे.

NISAR उपग्रह नेमका कसा आहे?

  • एका SUV च्या आकाराच्या या उपग्रहाचे वजन हे सुमारे २७०० किलो एवढे असून पृथ्वीपासून सुमारे ७४७ किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे. या उपग्रहाच्या निर्मितीबाबत आणि संशोधनाबाबत भारत आणि अमेरिका दरम्यान २०१४ मध्ये करार करण्यात आला होता. या उपग्रहामध्ये मुख्यतः synthetic aperture radar (SAR)चा वापर केला गेला आहे. तसंच १२ मीटर ( ३९ फूट ) व्यासाची एक जाळीदार अँटिना या उपग्रहाला असणार आहे. यामुळे ढगाला भेदत, कोणत्याही वातावरणात जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढणे शक्य होणार आहे.
NISAR

NISAR मोहिमेची उद्दीष्ट्ये काय आहेत?

  • विशिष्ट उंची आणि शक्तीशाली रडार यामुळे अवघ्या १२ दिवसांत दिवसांत अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रांसह संपूर्ण पृथ्वीचा नकाशा-जमिनीची मोजदाद करणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. विशेषतः पृथ्वीच्या कवचामध्ये होणार बदल, त्याच्या हालचालीची अचूक नोंद करणे शक्य होणार आहे. यामुळे भूकंप, भूस्खलन किंवा जमिनीवरील अन्य घटनांची नोंद ठेवणे शक्य होणार आहे. तसंच भूजल पातळी, बर्फाची जाडी, बर्फाची हालचाल, हिमनदीचा प्रवाह यांच्या अचूक नोंदी घेणे शक्य होणार आहे. यामुळे पर्यावरणातील बदलांची नोंद, अभ्यास करणे आणि त्यावरुन अचूक अनुमान काढण्यास मदत होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; आफ्रिदीवर घातली दोन वर्षांची बंदी

  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून स्पिनर आसिफ आफ्रिदीवर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचारविरोधी संहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली आहे. खैबर पख्तुनख्वामधील या डावखुऱ्या फिरकीपटूवर भ्रष्टाचारविरोधी संहितेचे दोनदा उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यापैकी एकदाही त्याने पीसीबीला फिक्सिंगसाठी संपर्क साधल्याची माहिती दिली नाही.
  • आसिफने राष्ट्रीय टी-२० चषकातील बहुतेक सामने गमावले आहेत. आता तो दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धामध्ये भाग घेऊ शकणार नाही. पीसीबीने त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची संपूर्ण माहिती दिलेली नाही, मात्र त्याला नुकतेच निलंबित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
  • ३५ वर्षीय आसिफने ३५ प्रथम श्रेणी, ४२ लिस्ट ए आणि ६५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ११८, ५९ आणि ६३ विकेट्स घेतल्या आहेत. आसिफ आफ्रिदीच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक शतक आहे. आसिफने ३१ ऑगस्ट रोजी नॅशनल टी-२० कपमध्ये शेवटचा सामना खेळला होता.
  • या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील वनडे मालिकेसाठी, आसिफचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला होता. परंतु तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही.

अर्थसंकल्पाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवा!, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप खासदारांना कानमंत्र

  • आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिलेला कानमंत्र मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना दिला. यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून समाजातील प्रत्येकाला त्यातून लाभ मिळेल. ही बाब खासदारांनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मोदी म्हणाले.
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अदानी प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकार व पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात हल्लाबोल केला असताना ‘लोकप्रतिनिधींनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे व केंद्र सरकारच्या लोकाभिमुख निर्णयांची व योजनांची माहिती दिली पाहिजे,’ असे आवाहन मोदींनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पुढील वर्षी पूर्ण अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा करून ‘निवडणुकीचा अर्थसंकल्प’ मांडण्याची संधी केंद्र सरकारकडे होती; पण २०२३-२४चा अर्थसंकल्प लोकसभेची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून मांडल्याचा आरोप कोणीही करू शकणार नाही. या अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांसाठी तरतूद करण्यात आली आहे, असे मोदी म्हणाले.
  • तुर्कस्तान व सीरियामध्ये तीव्र भूकंपांमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल बोलताना मोदींनी गुजरातमधील भूकंपाचा अनुभव सांगितला. भूकंपामुळे गुजरातचे अतोनात नुकसान झाले. त्यातून बाहेर पडून पुन्हा गुजरातने स्वत:ला घडवले; पण त्यासाठी कित्येक वर्षे कष्ट सोसावे लागले. तुर्कस्तान व सीरियातील नागरिक कुठल्या संकटाला सामोरे जात आहेत, हे समजू शकतो. या देशांना भारताने तातडीने मदत पाठवली आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.
  • सरकारविरोधी भावनेवर संवादाचा उपाय – या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून त्यानंतर लोकसभेची निवडणूक होईल. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्याने खासदारांनी लोकांपर्यंत गेले पाहिजे, अधिकाधिक लोकसंवादातून सरकारविरोधातील मतांची तीव्रता कमी होते, असा सल्ला मोदींनी दिला.

व्हिक्टोरिया गौरी यांना न्यायमूर्तीपदाची शपथ:

  • मद्रास उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांची नियुक्ती होऊ नये, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सकाळी फेटाळली.
  • मात्र त्यापूर्वीच त्यांनी न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली.
  • व्हिक्टोरिया गौरी यांना न्यायमूर्तीपदावर नियुक्त का केले जाऊ नये यावर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच हा शपथविधी झाला.

आता परदेशातदेखील करता येणार PhonePe वरून पेमेंट:

  • भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पैकी एक असणाऱ्या फोन  पे ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर लाँच केले आहे.
  • फोन पेच्या या नवीन फीचरमुळे वापरकर्ते केवळ भारतातच नव्हे तर, इतर देशांमध्येही UPI द्वारे सहज पेमेंट करू शकणार आहेत.
  • म्हणजे फोन पे तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास मम्दत करणार आहे.
  • फोन पे ही पहिली कंपनी आहे जिने वापरकर्त्यांसाठी हे उपयुक्त फिचर तयार केले आहे.
  • फोन पे ने आणलेले हे फिचर परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे.
  • इतर देशांमध्ये प्रवास करताना तुम्ही PhonePe अ‍ॅपवरून UPI द्वारे प्रदेश व्यापाऱ्यांना , लोकांना सहज पैसे देऊ शकणार आहात.
  • हे व्यवहार तुमच्या आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डप्रमाणेच काम करणार आहे. पेमेंट केल्यावर तुमच्या बँक खात्यामधून परकीय चलन कापले जाणार आहे.
  • सध्या सुरुवातीच्या काळात या फीचरचा उपयोग संयुक्त अरब आमिराती तसेच मॉरिशस , सिंगापूर , भूतान आणि नेपाळ सर्व आंतरराष्ट्रीय व्यापारी ज्यांच्याकडे स्थानिक QR कोड आहे ते या फीचरचा लाभ घेऊ शकणार आहेत.

अ‍ॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती:

  • ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
  • गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिंचने वनडे आणि कसोटीआधीच निवृत्ती घेतली होती.
  • पण आता त्याने टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला आहे.
  • फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
  • फिंचने 12 वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळले आहे.
  • अ‍ॅरॉन फिंच तो मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता.

ICC Player of the Month नामांकन जाहीर:

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी महिन्यातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंना एक पुरस्कार देत आहे.
  • त्यामुळे मंगळवारी आयसीसीने जानेवारी 2023 साठी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकने जाहीर केली.
  • दरवेळेप्रमाणे आयसीसीने गेल्या महिन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंची निवड केली आहे.
  • ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे.
  • आयसीसीने दोन भारतीय आणि एका न्यूझीलंडच्या खेळाडूची प्लेअर ऑफ द मंथ नामांकन म्हणून निवड केली आहे.
  • भारताच्या शुबमन गिल आणि मोहम्मद सिराजला यांना स्थान मिळाले आहे, तर न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेचा देखील समावेश करण्यात आला आहे.
  • या तिन्ही खेळाडूंनी जानेवारी महिन्यात क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.