७ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
७ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |7 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

७ फेब्रुवारी चालू घडामोडी

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना शपथ

 • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांना शपथ दिली. न्या. पंकज मित्तल, न्या. संजय कारोल, न्या. पी.व्ही. संजय कुमार, न्या. अहसानुद्दिन अमानुल्लाह आणि न्या. मनोज मिश्रा यांनी शपथ घेतली. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३२ झाली असून दोन जागा रिक्त आहेत. 
 • सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने या पाच जणांची नावे सुचवली होती, मात्र या मुद्दय़ावरून न्यायालय आणि केंद्र सरकारदरम्यान मतभेद झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना शपथ

महिला प्रीमियर लीगचे सामने मुंबईत

 • अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिला प्रीमियर लीगला (डब्ल्यूपीएल) मार्च महिन्याचा मुहूर्त मिळाला असून, ४ ते २६ मार्चदरम्यान ही स्पर्धा फक्त मुंबईत पार पडणार आहे. लीगमधील सामने ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर पार पडतील.
 • स्पर्धेचा कार्यक्रम अजून निश्चित नसला तरी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यान उद्घाटनाचा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिला प्रीमियर लीग ४ ते २६ मार्चदरम्यान मुंबईत पार पडेल, अशी माहिती इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) कार्याध्यक्ष अरुण धुमल यांनी दिली. या लीगसाठी अलीकडेच संघांचा लिलाव झाला असून, यामध्ये गुजरात संघावर अदानी समूहाकडून सर्वात मोठी बोली लावली होती. आता खेळाडूंच्या लिलावाची प्रतीक्षा असून, हा लिलाव महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर म्हणजेच १३ फेब्रुवारीला मुंबईत होणार असल्याचेही धुमल यांनी सांगितले.
 • या लीगच्या पाच संघांच्या लिलावातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ४६६९.९९ कोटी रुपये, तर प्रसारण हक्कातून ९५१ कोटी रुपये मिळाले आहेत. ‘आयपीएल’मधील मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु, दिल्ली कॅपिटल्स या संघांसह कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज आणि अदानी स्पोर्ट्सलाइन यांनी संघ खरेदी केले आहेत. या लीगसाठी १५०० खेळाडूंची नोंद झाली असून, या आठवडय़ात खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली जाईल. प्रत्येक संघाला खेळाडूंच्या खरेदीसाठी १२ कोटी रुपये खर्च करता येणार आहेत. प्रत्येक संघाला किमान १५ आणि कमाल १८ खेळाडू खरेदी करता येतील. यात प्रत्येकाला पाच परदेशी खेळाडू घेणे बंधनकारक आहे. यात एक खेळाडू सहयोगी मंडळातील असेल.
 • असे होतील सामने – पहिल्या लीगमध्ये एकूण २२ सामने होतील. साखळी सामन्यांनंतर अव्वल संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघात सामना होईल आणि त्यातून अंतिम फेरीतला दुसरा संघ निश्चित होईल.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी मुंबईत ड्रोनसह पतंग उडवण्यावर बंदी; पोलिसांकडून निर्देश जारी

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार असून येत्या १० फेब्रुवारी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली असून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
 • यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून भारतीय दंड संहितेच्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक निर्देश जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांनुसार, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी फ्लाइंग ऑब्जेक्ट्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये ड्रोन, पॅराग्लायडर्स, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट यांचा समावेश आहे. विमानतळ तसेच सहार, कुलाबा, एमआरए मार्ग, एमआयडीसी आणि अंधेरी या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपर्यंत हे निर्देश लागू असणार आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
 • महाराष्ट्रात लवकरच मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे तयार करण्यात आल्या आहेत.

गुगल, फिलिप्सपाठोपाठ आणखी एका टेक कंपनीचा कामगारांना धक्का, ६६५० जणांची नोकरी जाणार

 • सध्या जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कंपन्यांमध्ये कमर्चाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. याचा भारतातील कंपन्यांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, Dell Technology मधील कमर्चाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार आहे. डेल आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के कमर्चाऱ्यांची नोकर कपात करणार आहे. म्हणजेच डेल कंपनी ६,६५० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.
 • २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांची कपात करणारी डेल ही प्रमुख लॅपटॉप कंपन्यांपैकी पहिली कंपनी आहे. ब्लूमर्गच्या अहवालानुसार कंपनीचे को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी सांगितले की, कंपनी ही बाजारातील परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करू शकते.
 • को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या नोटमध्ये ते म्हणतात कि, आम्ही या आधीही आर्थिक मंदीचा सामना केला आहे त्यामुळे आम्ही अधिक मजबूत झालो आहोत. २०२०मध्ये करोना महामारीच्या काळात देखील आम्ही टाळेबंदीची घोषणा केली होती. नोव्हेंबर महिन्यात एचपीने जाहीर केले होते की , पर्सनल कॉम्प्युटर्सची मागणी कमी होत आहे . ज्यामुळे पुढील तीन वर्षात ६,००० लोकांना कामावरून कमी केले जाऊ शकते.
 • उद्योग विश्लेषक IDC ने सांगितले की, २०२२ च्या चौथ्या तिमाहीमधील प्रारंभीचे आकड्यानुसार पर्सनल कॉम्युटपरच्या मागणीत तीव्र घट होत आहे. IDC च्या मतानुसार सर्व प्रमुख कंपन्यांमध्ये डेलने या कालावधीच्या तुलनेत २०२१ मध्ये ३७ टक्क्यांनी घसरण झालेली पहिली. डेल कंपनीच्या कमाईमध्ये ५५ टक्के कामे ही पीसी मधून करते.

न्यायमूर्तीपदी व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान:

 • मद्रास उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निुयक्ती झालेल्या अ‍ॅड्. लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.
 • ही सुनावणी मंगळवारी होईल.
 • व्हिक्टोरिया गौरी यांचा भाजपशी संबंध असल्याचा आरोप आहे.
 • गौरी यांना अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेकडे लक्ष वेधून ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांनी नव्याने उल्लेख केलेल्या या प्रकरणाची सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने दखल घेतली.
 • यापूर्वी, गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 10 फेब्रुवारीला सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने दर्शवली होती.

तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉलने वेस्ट इंडिजसाठी रचला इतिहास:

 • झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारायन चंद्रपॉलने शतक झळकावले.
 • वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले.
 • त्याचबरोबर या बाप-लेकांनी वेस्ट-इंडिजसाठी एक खास विक्रम केला.
 • तेजनारायनने यादरम्यान सहकारी फलंदाज क्रेग ब्रॅथवेटसोबत पहिल्या विकेटसाठी 221 धावांची नाबाद शतकी भागीदारीही केली.
 • कारकिर्दीतील पहिले शतक झळकावल्यानंतर तेजनारायण आणि शिवनारायण, या जोडीने पिता-पुत्र जोडीच्या खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.
 • वेस्ट इंडिजसाठी, कसोटी क्रिकेटमध्ये शतके झळकावणारी ही पहिली पिता-पुत्र जोडी ठरली आहे.
 • त्याचबरोबर असा पराक्रम करणारी ही जगातील 12वी जोडी ठरली आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.