२ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |2 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२ फेब्रुवारी चालू घडामोडी

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय; १६८ धावांनी चारली धूळ

  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर १६८ धावांनी मात करताना ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम शुबमन गिलच्या (१२६*) शतकाच्या जोरावर २० षटकात ४ गडी गमावून २३४ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर न्यूझीलंड २३५ धावांचे लक्ष्ये दिले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १२.१ षटकांत ६६ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने २-१ अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली.
  • तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव करताना एक मोठा विक्रम केला आहे. टीम इंडियाचा टी-२० इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये त्याने आयर्लंडचा १४८ धावांनी पराभव केला होता. दुसरीकडे, न्यूझीलंडचा हा टी-२० इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी २०१० मध्ये पाकिस्तानने त्याचा १०३ धावांनी पराभव केला होता.
  • २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १२.१ षटकांत ६६ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २५ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर कर्णधार मिचेल सँटनरने १३ धावांचे योगदान. या दोघां व्यतिरिक्त न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी या वेगवान गोलंदाजी त्रिकुटाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडणे सेपे झाले.

मोदींची पहिली प्रतिक्रिया “मध्यमवर्गाला सक्षम बनवणारा अर्थसंकल्प”; म्हणाले “प्राप्तिकर रचना अधिक…

  • मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातला आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वीचा आजचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने शेवटचा अर्थसंकल्प होता. तेव्हा अर्थसंकल्पात किती मोठ्या घोषणा केल्या जातात, काय विशेष तरतुदी केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अर्थसंकल्प सादर झाल्यावर एकीकडे शेयर बाजारात आलेली तेजी, बदललेल्या प्राप्तिकर कर रचनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया असं वातावारण असतांना पंतप्रधान मोदी यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचे जोरदार समर्थन केलं आहे.
  • “समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ही देशाच्या मध्यमवर्गात आहे. युवा वर्ग ही जशी भारताची ताकद आहे तसा मध्यमवर्ग ही जमेची बाजू आहे. या वर्गाला सक्षम बनवण्यासाठी आम्ही अनेक निर्णय हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेतले आहेत. प्राप्तिकर रचना अधिक पारदर्शक केल्यामुळे आता मध्यमवर्गाला आणखी दिलासा मिळणार आहे ” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.
  • २ बलुतेदारांना तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला अनेक प्रोत्साहपर योजना या अर्थसंकल्पात आहेत. यामुळे कोट्यावधी लोकांना याचा फायदा होणार आहे, सहकारी क्षेत्रासाठी विविध योजना आजच्या अर्थसंकल्पात आहेत, शेती आणि मत्स व्यवसाय जोमाने वाढेल यासाठी विविध तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली आहे.
  • शहरी आणि ग्रामीण भागातील महिला वर्गाला सक्षम बनवण्याची पावले या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उचलण्यात आलेली आहेत. हरित उर्जेशी संबंधित मोठा विस्तार यापुढच्या काळात होणार आहे. २०१४ नंतर ४०० टक्के एवढी वाढ ही सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी असलेल्या तरतुदींमध्ये अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यावेळी पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांची अभूतपूर्व तरतूद केल्यामुळे आता भारताच्या विकासाला गती येणार असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांसाठी नेमकं काय? करपात्र उत्पन्नाची मर्यादा बदलली, पण त्याचा फायदा कुणाला होणार?

  • अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. असं करणाऱ्या त्या स्वतंत्र भारताच्या फक्त सहाव्या केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या आहेत. दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही अर्थसंकल्पाच्या आधी राष्ट्रीय स्तरावर अपेक्षांची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्याअनुषंगाने अर्थसंकल्पात घोषणा होतील, असंही बोललं गेलं. मात्र, सर्वाधिक चर्चा होती ती अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांसाठी कररचनेत नेमके कोणते बदल होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली असून त्यानुसार नव्या आणि जुन्या करप्रणालीनुसार करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे.
  • करदाते बुचकळ्यात- दरम्यान, अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या घोषणांमुळे करदाते बुचकळ्यात पडल्याची प्रतिक्रिया विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे नव्या करप्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्यात आला असताना दुसरीकडे जुन्या करप्रणालीमध्ये मात्र अवघ्या ५० हजारांची वाढ करमर्यादेमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे नेमकी कोणती कररचना स्वीकारावी? या संभ्रमात करदाते सापडल्याचं संगितलं जात आहे.
  • काय म्हणाल्या निर्मला सीतारमण – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जुन्या आणि नव्या करप्रणालीसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. यानुसार, नवीन करप्रणाली नागरिकांना लागू करण्यात आली असून जुनी करप्रणाली स्वीकारण्याचा पर्याय नागरिकांना उपलब्ध असणार आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार नव्या करप्रणालीमध्ये कमाल करपात्र उत्पन्नाची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली आहे.त्यामुळे नवीन करप्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांना ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. यासोबतच नव्या घोषणेनुसार कररचनेचे स्लॅब्सही बदलण्यात आले आहेत.
  • कसे असतील नव्या कररचनेतील टप्पे?
    ० ते ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न – कोणताही कर नाही
    ३ ते ६ लाखांपर्यंतचं उत्पन्न – ५ टक्के कर
    ६ ते ९ लाखांपर्यंतचं उत्पन्न – १० टक्के कर
    ९ ते १२ लाखांपर्यंतचं उत्रन्न – १५ टक्के कर
    १२ ते १५ लाखांपर्यंतचं उत्पन्न – २० टक्के
    १५ लाखांहून जास्त उत्पन्न – ३० टक्के

स्वत:चं राज्यगीत असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर

  • राज्य मंत्रीमंडळाने “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून अधिकृतरित्या हे गीत अंगीकारण्यात येईल.
  • राज्यगीतासाठी कोणत्या मार्गदर्शक सूचना सरकारने केल्या आहेत त्या जाणून घेऊ. तसंच स्वत:चं राज्यगीत असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आता कितव्या क्रमांकावर असेल ते ही पाहू.

हुतात्म्यांच्या वारसांना २० हजार निवृत्तीवेतन

  • स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांच्या निवृत्तीवेतनात दहा हजार रुपयांची वाढ करुन ते २० हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही वाढ १ नोव्हेंबर २०२२ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.
  • सीमा आंदोलनात ज्या व्यक्तींनी बलिदान दिले, त्यांना हुतात्मे म्हणून घोषित करण्यात आले व त्यांच्या कुटुंबियांना ( हयात विधवा पत्नी, आई व वडिल यांपेकी एक)  निवृत्तीवेतन देण्याचा १९९७ मध्ये निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी १ हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जात होते. पुढे त्यात वेळोवेळी वाढ करुन २०१४ पासून ते मासिक १० हजार रुपये करण्यात आले.  
  • राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना निवृतीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २२ नोव्हेंबर २०२२ पासून स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन  दहा हजार रुपयांनी वाढवून ते २० हजार रुपये करण्यात आले. त्यांच्याप्रमाणेच सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना देण्यात येणारे निवृत्तीवेतन २० हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहा हजार रुपयांनी करण्यात आलेली वाढ १ नोव्हेंबर २०२२ पासून लागू करण्यात येणार आहे.

मुकेश अंबानी बनले जगातील सर्वात श्रीमंत भारतीय:

  • भारताचे दिग्गज उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि भारतीय व्यक्ती बनले आहेत.
  • फोर्ब्स रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानींनी गौतम अदाणींना एकूण संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे.
  • फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे 84.3 बिलियन डॉलर्स एकूण संपत्तीसह नवव्या क्रमांकावर पोहचले आहेत.
  • तर 84.1 अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदाणी दहाव्या स्थानावर आले आहेत.
  • फोर्ब्सच्या रिअर टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार बर्नाड अरनॉल्ट आणि कुटुंब टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत अव्वलस्थानी आहेत.
  • दुसऱ्या क्रमांकावर इलॉन मस्क, तिसऱ्या स्थानी जेफ बेझोस, चौथ्या क्रमांकावर लॅरी एलिसन, पाचव्या क्रमांकावर वॉरेन बफे, सहाव्या स्थानी बिल गेट्स, सातव्या क्रमांकावर कार्लोस स्लिम हेलू आणि कुटुंब, आठव्या क्रमांकावर लॅरी
  • पेज, यानंतर नवव्या स्थानी मुकेश अंबानी, त्यांच्यानंतर दहाव्या स्थानी गौतम अदाणी आहेत.

निर्मला सीतारामन यांच्या नावे अर्थसंकल्प सादर करण्याचा नवा विक्रम:

  • निर्मला सीतारामन या आपल्या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत ज्यांच्या नावे सलग पाचवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड नोंद झाला आहे.
  • मोदी सरकार 2.0 आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत.
  • माजी अर्थमंत्री अरूण जेटली, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम , यशवंत सिन्हा, मनमोहन सिंह आणि मोरारजी देसाई यांच्या यादीत आता सहावं नाव हे निर्मला सीतारामन यांचं असणार आहे.
  • आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त वेळेला अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावे आहे.
  • 1962 ते 1969 या कालावधीत त्यांनी दहावेळा अर्थसंकल्प सादर केला.
  • त्यानंतर पी. चिदंबरम यांच्या नावे नऊवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.
  • तर प्रणव मुखर्जी आणि यशवंत सिन्हा यांच्या नावे 8 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांस झुकते माप:

  • सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. हे क्षेत्र ‘उत्पादनात’ 45 टक्के योगदान देते.
  • देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 30 टक्के योगदान देत आहे, तर निर्यातीच्या संदर्भात पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग बनले आहे.
  • देशाच्या एकूण निर्यातीत याचे योगदान सुमारे 48 टक्के आहे.
  • तर रोजगारनिर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना सुमारे 110 दशलक्ष लोकांना रोजगार देतात.
  • जे भारतातील एकूण रोजगाराच्या 22-23 टक्के आहे.

आरोग्य क्षेत्राच्या तरतुदींत 13 टक्क्यांनी वाढ:

  • देशभरातील मधुमेहाचा वाढता धोका कमी करणे, सिकल सेल अ‍ॅनिमियाचे 2047 पर्यंत उच्चाटन करणे असे लक्ष्य ठेवत अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 13 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
  • 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी आरोग्य क्षेत्रासाठी 89,155 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • जगभरात सिकल सेल अ‍ॅनिमियाचा 7 कोटींहून अधिक जणांना प्रादुर्भाव झालेला आढळतो.
  • तसेच २०१४ पासून स्थापना करण्यात आलेल्या 157 वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न अशी 157 परिचारिका महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही सीतारामन यांनी केली.
  • औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यात येणार आहे. देशांतर्गत औषधनिर्माण उद्योगाने यासंदर्भात मागणी केली होती की,
  • अर्थसंकल्पात इंधन नवकल्पना व संशोधन आणि विकासासाठी मदत करण्यात यावी, ज्यामुळे औषधनिर्माण उद्योगाला चालना मिळेल. त्यानुसार अर्थमंत्र्यांनी औषधनिर्माण संशोधनासाठी नव्या कार्यक्रमांची घोषणा केली.

‘पंतप्रधान आवास’ला 79 हजार कोटी:

  • केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक (भांडवली खर्च) 33 टक्क्यांनी वाढवून ती 10 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे.
  • तर दुसरीकडे सर्वासाठी घरे असे म्हणत पंतप्रधान आवास योजनेसाठीचा खर्च 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी रुपये करण्यात आला आहे.
  • या तरतुदींमुळे पायाभूत सुविधा, विकास क्षेत्रासह बांधकाम क्षेत्रातही आनंदाचे वातावरण आहे.
  • त्यानुसार आता या क्षेत्रात 10 लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाणार आहे.

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय:

  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला.
  • या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर 168 धावांनी मात करताना ऐतिहासिक विजय नोंदवला.
  • त्यामुळे भारतीय संघाने 2-१1 अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली.
  • तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करताना एक मोठा विक्रम केला आहे.
  • टीम इंडियाचा टी-20 इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे.

सूर्या ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील तिसरा फलंदाज:

  • सूर्यकुमार यादवसाठी टी-20 क्रिकेट हा डाव्या हाताचा खेळ बनला आहे.
  • तो सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे.
  • बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-20 क्रमवारीत त्याने आणखी एक विक्रम केला आहे.
  • सूर्याने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी विराट कोहलीचा विक्रमही मोडला आहे.
  • भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले आहे.
  • रेटिंग गुणांच्या बाबतीत तो आता डेव्हिड मलानच्या सर्वोत्तमपेक्षा थोडा मागे आहे.
  • आता सूर्याने 910 रेटिंग गुण मिळवले आहेत.
  • प्रथमच कोणत्याही भारतीयाने 900 गुणांचा टप्पा ओलांडला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.