Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |31 January 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
३१ जानेवारी चालू घडामोडी
Australian Cricket ने जाहीर केले अवॉर्ड्स; वॉर्नर-स्टॉइनिसला मिळाला मोठा पुरस्कार, पाहा सर्व विजेत्यांची लिस्ट
- सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. सिडनी येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला वनडे प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर झाला. डॅशिंग अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसची पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड म्हणून निवड करण्यात आली.
- वॉर्नरने तिसऱ्यांदा पुरुषांचा वनडे प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला आहे. ३६ वर्षीय वॉर्नर मतदानाच्या काळात ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने ४२.४६च्या सरासरीने ५५२ धावा केल्या. ज्यात चार अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. त्याने एमसीजी येथे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १०६ धावा केल्या होत्या. जवळपास तीन वर्षांतील त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते.
- स्टॉइनिसने गेल्या वर्षी टी-२० फॉरमॅटमध्ये जोरदार धुमाकूळ घातला होता. ३३ वर्षीय खेळाडूने ३१.५४च्या सरासरीने आणि १६८.५च्या स्ट्राइक रेटने ३४७ धावा केल्या. शिवाय ८ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा स्टॉइनिस हा ऑस्ट्रेलियने खेळाडू ठरला. पर्थ स्टेडियमवर त्याने श्रीलंकेविरुद्ध १७ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.
- त्याच वेळी, बेथ मुनी महिला वनडे प्लेयर ऑफ द इयर ठरली. मतदानाच्या काळात ५९४ धावा केल्याबद्दल मुनीने हा पुरस्कार पटकावला. तिने वर्षातील महिला वनडे प्लेयर ऑफ द इयर खेळाडूच्या शर्यतीत मॅग लॅनिंगला केवळ एका मताने पराभूत केले. मूनी यांना २५ तर लॅनिंग यांना २४ मते मिळाली. ताहलिया मॅकग्राला महिला टी-२० आंतरराष्ट्रीय प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले. मॅकग्राने गेल्या वर्षी १६ सामन्यांत ६२.१४ च्या सरासरीने ४३५ धावा केल्या होत्या. २७ वर्षीय खेळाडूने २०२२ मध्ये १३ विकेट्सही घेतल्या होत्या.
उच्च शिक्षणात मागासवर्गीय टक्का वाढला ; ‘एआयएसएचई’च्या अहवालातील निष्कर्ष
- देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासावर्गीय विद्यार्थ्यांचे प्रमाण २०१४-१५ ते २०२०-२१ दरम्यान वाढत असल्याचा निष्कर्ष उच्च शिक्षणाबाबत सर्वेक्षण करणाऱ्या ‘एआयएसएचई’ या संस्थेच्या अहवालात मांडण्यात आला आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण या काळात ४७ टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार, २०२०-२१मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या ४ कोटी १३ लाख विद्यार्थ्यांमध्ये १४.२ टक्के विद्यार्थी अनुसूचित जातीचे असून ५.८ टक्के विद्यार्थी अनुसूचित जमातीचे आहेत. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या ३५.८ टक्के इतकी असून एकत्रितपणे मागास विद्यार्थ्यांचे प्रमाण ५५.८ इतके आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २०१९-२०च्या तुलनेत ४.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे ओढा २०१४-१५ पासून वाढत असून हे प्रमाण २७.९६ टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.
- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील संख्या २०१९-२०मध्ये २१.६ लाख इतकी होती. ती २०२०-२१मध्ये २४.१ लाखांवर पोहोचली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच २०१४-१५ पासून या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात ४७ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.
- केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे २०११पासून ‘एआयएसएचई’ अहवाल तयार करण्यात येतो. त्यामध्ये विद्यार्थी नोंदणी, शिक्षण माहिती, पायाभूत दर्जा, आर्थिक स्थिती आदी निकषांवर माहिती गोळा करण्यात येते. २०२०-२१च्या अहवालात प्रथमच उच्च शिक्षण संस्थांनी या सर्वेक्षणासाठी संकेतस्थळावर माहिती जमा केली आहे.
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा : खेळाडूंनी सकारात्मक वातावरणाचा लाभ घ्यावा -अनुराग ठाकूर
- गेल्या काही वर्षांत भारतातील क्रीडा वातावरण बदलले आहे. खेळाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. खेळाडूंना काही कमी पडणार नाही. आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत, आता चमकदार कामगिरी करण्याची वेळ तुमची असल्याचे सांगत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना साद घातली.
- खेलो इंडिया क्रीडा स्पर्धाचे भोपाळ येथील तात्या टोपे क्रीडा संकुलात शानदार सोहळय़ात अनुराग ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. यावेळी राज्याच्या क्रीडामंत्री यशोधरा राजे सिंधिया, केंद्रीय क्रीडा व युवक खात्याचे राज्यमंत्री नितीश प्रमाणिक हे उपस्थित होते.
- खेळाडूंना मार्गदर्शन करतानाच ठाकूर यांनी गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा उल्लेख करताना महिला खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. गेल्या वर्षी स्पर्धेत नोंदविण्यात आलेले सर्व १२ विक्रम हे मुलींनी नोंदवले होते. आता मुलींनी मागे वळून न बघता पुढे जायला हवे आणि मुलांनी आपली कामगिरी विक्रमापर्यंत उंचवावी, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील क्रीडाप्रेमी आहेत. देशातील खेळाडूंशी ते सातत्याने संपर्क साधत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रातही भारत भरारी घेत आहे. क्रीडा क्षेत्रासाठी गेल्या पाच वर्षांत केंद्र शासनाने अतिशय मोठय़ा प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे. अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. भविष्यात भारताला क्रीडा ताकद करणे आता तुमच्या हातात आहे, असे सांगून ठाकूर यांनी खेळाडूंना प्रेरित केले.
- उद्घाटन सोहळय़ात अविनाश साबळे व निखहत झरीन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
पाकिस्तानमधील आर्थिक संकटाचे भारतीय उपखंडात परिणाम शक्य ; तज्ज्ञांचे मत
- झपाटय़ाने कमी होणारा विदेशी चलनाचा साठा, ऊर्जेचे देशव्यापी संकट, सरकारी अन्नधान्य वितरण केंद्रांवरील चेंगराचेंगरी आणि गेल्या वर्षभरात डॉलरच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी घसरलेला पाकिस्तानी रुपया, या घटकांमुळे पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिकदृष्टय़ा गर्तेत जात असून, याचे भारतीय उपखंडात गंभीर परिणाम होऊ शकतील, असे भारतीय तज्ज्ञांचे मत आहे.
- या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, शाहबाझ शरीफ सरकार ‘बेल-आऊट पॅकेज’साठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी मंगळवारी वाटाघाटी सुरू करणार असून, पाकिस्तानवर कठोर आणि संभाव्य राजकीदृष्टय़ा धोकादायक अशा पूर्वअटी लादल्या जाऊ शकतील, असे या तज्ज्ञांनी सांगितले.
- पाकिस्तानातील अस्थैर्याचा परिणाम म्हणून या भागात वाढणाऱ्या दहशतवादाचाच केवळ भारताला धोका नाही, तर बाह्य शत्रूवर लक्ष केंद्रित करून देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्नही पाकिस्तान करू शकतो.
- ‘पाकिस्तानातील सध्याच्या आर्थिक संकटातून राजकीय संकट जन्म घेत आहे. पैसा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्या अटी घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाकिस्तानला नक्कीच काही काळासाठी त्रास सहन करावा लागेल आणि त्याचे राजकीय परिणाम होऊ शकतील’, असे भारताचे पाकिस्तानातील माजी राजदूत टीसीए राघवन म्हणाले.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
३१ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ३० जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- २९ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- २८ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- २७ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- २६ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |