३ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |3 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३ फेब्रुवारी चालू घडामोडी

शिवछत्रपती पुरस्कार विजेता खो-खोपटू राजू द्रविडचे निधन

  • खो-खो, कबड्डी अशा रांगड्या खेळाबरोबरच ॲथलेटिक्समध्येही छाप पाडणारा अष्टपैलू खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेता राजेंद्र द्रविडचे प्रदिर्घ आजाराने राहत्या घरी गुरुवारी निधन झाले. ते ७० वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी अर्जुन पुरस्कार विजेती सुरेखा द्रविड आणि दोन मुले असा परिवार आहे.
  • क्रीडा जगतात द्रविड ‘राजू’ म्हणूनच ओळखला जात होता. शालेय जीवनात लंगडीखेळापासून मैदानाशी जोडली गेलेली त्याची नाळ अखेरपर्यंत कायम होती. खो-खोमध्ये त्याने १९६७ ते १९८३ अशी १६ वर्षे आपली कारकीर्द घडवली. या दरम्यान त्याने कबड्डी आणि ॲथलेटिक्समध्येही आपली छाप पाडली होती. 
  • विशेष म्हणजे १९८० मध्ये राजूने भारताचा तेव्हाचा अव्वल धावपटू आदिल सुमारीवालाला हरवून राष्ट्रीय स्पर्धेत १०० मीटर धावण्याची शर्यत जिंकताना वेगवान धावपटूचा किताब मिळविला होता. राजूला १९७७-७८ मध्ये राज्य शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविले होते. राजूने महाविद्यालयीन कारकिर्दीत पुणे विद्यापाठीच्या खो-खो, कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

चंद्रपूर : फुटबॉल खेळाडूंसाठी मोठी संधी, जर्मनीत मिळणार प्रशिक्षण

  • राज्यात फुटबॉल खेळाचा विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनीशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लब पैकी एक आहे. त्याअनुषंगाने, आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे क्रीडा नैपुण्य दाखविणाऱ्या १४ वर्षांखालील २० खेळाडूंना जर्मनीत फुटबाॅलचे धडे मिळणार आहे.
  • १४ व १५ फेब्रुवारी २००३ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळांनी आपल्या शाळेतील १४ वर्षांखालील मुलांच्या संघाची नोंदणी, प्रवेशिका विहित नमुन्यात ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावयाचे आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांच्यात झालेल्या करारानुसार क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन जर्मनी येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील १४ वर्षांखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • या स्पर्धेत नैपुण्य कामगिरी करणाऱ्या फुटबॉल खेडाळूची कला-गुणाची दखल घेवून निवड करण्यात येणार आहे. करारनाम्यामुळे २० खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे फुटबॉलचे अद्ययावत प्रशिक्षण मिळणार आहे. तसचे त्यांच्या जाणे-येणे, निवास व प्रशिक्षण आदी बाबींवर संस्था खर्च करणार आहे. फुटबॉल खेळाडूंसाठी ही मोठी संधी आहे.

नळाद्वारे पाणी पुरवठय़ात महाराष्ट्र देशात १३ व्या क्रमांकावर

  • ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘जल जीवन मिशन’ या योजनेवर केंद्र व राज्य सरकारचे शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही महाराष्ट्रात डिसेंबर २०२२ अखेपर्यंत ७२.२७ टक्के ग्रामीण कुटुंबापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करता आला. संपूर्ण देशात महाराष्ट्र या योजनेत तेराव्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय पाणीपुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
  • ऑगस्ट २०१९ पासून केंद्र सरकारने ‘जल जीवन मिशन’ ही योजना हाती घेतली. २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठय़ाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले. महाराष्ट्रात १ कोटी ४६ लाख ७३ हजार ११४ ग्रामीण कुटुंब आहेत. त्यापैकी ४८.४४ लाख (३२.५४ टक्के) ग्रामीण कुटुंबांकडे योजना सुरू होण्यापूर्वीच नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता. उर्वरित ९८ लाख २९ हजार २८२ कुटुंबीयांना नळ जोडणी द्यायची होती. केंद्र व राज्याच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
  • केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १ फेब्रुवारी २०२३ पर्यंत १ कोटी ६ लाख ४३ हजार ५६४ (७२.५४ टक्के) कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली. उर्वरित २८ टक्के कुटुंबांना अजूनही नळजोडणीची प्रतीक्षा आहे. पहिल्या पाच क्रमांकावरील राज्यांमध्ये गोवा, अंदमान निकोबार, दिव दमन, हरियाणा व पंजाब आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रात जालना, जळगाव, धुळे, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात योजनेचे काम ९० ते ९९ टक्के पूर्ण झाले आहे. २०१९-२२ ते २०२२-२३ या चार वर्षांत केंद्र सरकारचे ८२३ कोटी तर राज्य सरकारचे ८५२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. विदर्भातील खासदार अनुक्रमे भावना गवळी (वाशीम-यवतमाळ) आणि कृपाल तुमाने (रामटेक) यांनी राज्यातील या योजनेविषयी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.

ऑस्ट्रेलियाच्या चलनी नोटांवरून राणी एलिझाबेथ यांचा फोटो हटवणार, ‘हे’ आहे कारण

  • ऑस्ट्रेलियातल्या चलनी नोटांवरून महाराणी एलिझाबेथ यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातल्या रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार नव्या पाच डॉलरवर आता आता स्वदेशी नक्षी असेल. यावर असलेला राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा मृत्यू झाला. त्यांचा फोटो ऑस्ट्रेलियातल्या चलनी नोटांवर होता. मात्र आता यापुढे छापण्यात येणाऱ्या नोटांवर हा फोटो असणार नाही.
  • नोटेवर महाराणींचा फोटो का छापला गेला होता? रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाच डॉलरच्या नोटेवर महाराणी एलिझाबेथ यांचा फोटो यासाठी छापला गेला होता की तो फोटो त्यांचं व्यक्तिमत्त्व दर्शवणारा होता. आता आम्ही आमच्या चलनी नोटा अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही हा फोटो यापुढे नोटांवर छापणार नाही.
  • किंग चार्ल्स यांचा फोटो छापला जाणार नाही – ऑस्ट्रेलियाने २०२२ मध्येच ही बाब स्पष्ट केली होती की महाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर किंग चार्ल्स यांचा फोटो चलनी नोटांवर छापला जाणार नाही. त्याऐवजी ऑस्ट्रेलियातली प्रतीकं नोटांवर छापली जातील. ५ डॉलरच्या नोटांचं डिझाईन हे स्वदेशी समूह करतील असंही ऑस्ट्रेलियातल्या रिझर्व्ह बँकेने सांगितलं. नव्या नोटांचं डिझाईन करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे तोपर्यंत असलेल्या नोटा चलनात असतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
  • ऑस्ट्रेलियातल्या नव्या चलनी नोटांवर संस्कृती दाखवली जाणार – ऑस्ट्रेलियातल्या नव्या चलनी नोटांवर ऑस्ट्रेलियातली संस्कृती दाखवणारी प्रतीकं आणि इतिहास असणार आहे. तर एका भागावर ऑस्ट्रेलियाची संसद दाखवली जाणार आहे. याआधी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांच्या राष्ट्रगीतामध्येही काही बदल केले होते. त्या बदलांमागे देशाची संस्कृती आणि सभ्यता याबाबत लोकांना माहिती व्हावी असा उद्देश होता.

मोदी सरकारसाठी गूड न्यूज! जानेवारी महिन्यात बेरोजगारीचा दर घसरला; महाराष्ट्रात मात्र गुजरातपेक्षा

  • केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यांनतर मोदी सरकारसाठी दिलासादायक बातमी आली आहे. देशातील बेरोजगारीचा दर जानेवारी महिन्यात घसरला आहे. मागच्या चार महिन्याती हा सर्वात कमी दर आहे. आर्थिक निगरानी संस्थेने (Centre for Monitoring Indian Economy – CMIE) ही माहिती दिली आहे. वाढत्या बेरोजगारीवरुन विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आले आहेत. याआधी देखील CMIE च्या आकडेवारीन सरकारला धारेवर धरण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये बेरोजगारीच्या दराने उच्चांक गाठला होता. आता वर्षाच्या पहिल्या महिन्यातच बेरोजगारीचा दर कमी झाल्यामुळे मोदी सरकारची वर्षाची सुरुवात चांगली झाल्याचे बोलले जात आहे.
  • बिगर शासकीय संस्था असलेल्या सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०२३ महिन्यातला महागाईचा दर ७.१४ टक्क्यांवर आला आहे. याच्याआधी डिसेंबर २०२२ मध्ये बेरोजगारीचा दर ८.३० टक्के एवढा होता. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यातला बेरोजगारीचा दर ८.५५ टक्के आहे, तर ग्रामीण भागातील बेरोजगारी ६.४३ टक्के आहे.

कोणत्या राज्यात किती बेरोजगारी?

  • भारतातील कोणत्या राज्यात किती बेरोजगारी आहे. याचीही माहिती अहवालात देण्यात आली आहे. बेरोजगारीचा सर्वाधिक दर जम्मू आणि काश्मिरमध्ये आहे. तिथे बेरोजगारीचे प्रमाण २१.८ टक्के आहे. तर हरियाणामध्ये २१.७ टक्के आणि राजस्थानमध्ये २१.१ टक्के इतके बेरोजगारीचे प्रमाण आहे. दिल्ली १६.७ टक्के, गोवा १६.२ टक्के, आसाम १६.१ टक्के आणि त्रिपुरामध्ये १६ टक्के एवढा बेरोजगारीचा दर आहे.
  • तर बेरोजगारीचा सर्वात कमी दर हा छत्तीसगडमध्ये आहे. तिथे बेरोजगारीचे प्रमाण ०.५ टक्के आहे. तर ओडिसामध्ये १.५ टक्के, तामिळनाडूमध्ये १.८ टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये ते १.९ टक्के इतके आहे.

महाराष्ट्रात बेरोजगारी किती?

  • महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर ५.५ टक्के इतका आहे. उत्तरेतील राज्यांची तुलना करता हा दर कमी असला तरी महाराष्ट्राच्या शेजारील गुजरात आणि कर्नाटकापेक्षा राज्यात बेरोजगारी जास्त असल्याचे दिसत आहे. गुजरातमध्ये बेरोजगारीचा दर २.४ टक्के आहे तर कर्नाटकात ३.४ टक्के आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मागच्यावर्षीच्या तुलनेत जानेवारीचा दर सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात मागच्या तिमाहीत बेरोजगारीचा दर चार टक्क्यांच्या वर गेला नव्हता. मात्र २०२३ च्या पहिल्याच महिन्यात बेरोजगारी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

अमेरिकेकडून भारताला मिळणार लवकरच ‘हे’ शस्त्र:

  • गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये लष्करापासून ते पोलीस विभागापर्यंत ड्रोनचा वापर केला आहेत.
  • विशेषतः काही प्रमुख देशांचा भर हा लष्करी वापरासाठी तेही सशस्त्र ड्रोनच्या वापरावर राहिला आहे.
  • अमेरिकेसारख्या देशामध्ये तर लढाऊ विमानांप्रमाणे ड्रोनची स्वतंत्र स्कॉड्रन आहेत.
  • भारत अमेरिकेकडून गेली काही वर्षे ड्रोन घेण्याबाबत चर्चा करत आहे.
  • तेव्हा दोन MQ-9 Reaper हे ड्रोन अमेरिकने प्रायोगिक वापर करायला भारतीय नौदलाकडे सूपुर्त केली आहेत.
  • भाडे तत्तावर त्याचा सध्या वापर करत असून लवकरच हे ड्रोन अमेरिकेला परत केले जाणार आहे.
  • मात्र गेल्या काही दिवसांतील चर्चेनंतर MQ-9B predator हे सशस्त्र ड्रोन अमेरिकेकडून घेण्याबाबत आता शिक्कामोर्तब झालं आहे.
  • अशी एकूण 30 ड्रोन भारत घेणार आहे. लष्कर,नौदल आणि वायू दल यांना प्रत्येकी 10 ड्रोन देण्याचे नियोजन आहे.
  • जमीन आणि हवेतील लक्ष्यावर नजर ठेवत सलग 14 तास टेहेळणी करत उड्डाण करण्याची क्षमता हे या ड्रोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
  • तसंच एका दमात 1800 पेक्षा जास्त किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमात यामध्ये आहे.
  • हवेतून हवेत मारा करु शकणारी क्षेपणास्त्रे, हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब टाकण्यााची क्षमता या ड्रोनमध्ये आहे.
  • तसंच जास्तीत जास्त 480 किलोमीटर प्रति तास या वेगाने हवेत संचार करण्याचे कौशल्य या ड्रोनमध्ये असल्याने MQ-9B predator हे सध्याच्या काळातील सर्वात घातक ड्रोन समजले जाते.
MQ-9B predator

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.