४ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
४ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |4 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

४ फेब्रुवारी चालू घडामोडी

आशिया कप २०२३ साठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? आज होणार निर्णय

  • आशिया चषक २०२३ च्या आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानकडे आहे. पीसीबी या स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार आहे, परंतु भारताने या स्पर्धेसाठी शेजारील देशात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली होती. त्यानंतर पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी एसीसीची बैठक बोलावण्याची चर्चा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बैठक बहरीनमध्ये आज म्हणजेच शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार की नाही हे स्पष्ट होईल.
  • २०२२ च्या टी-२० विश्वचषकापूर्वीही जय शाह यांनी आपल्या एका वक्तव्यात ही गोष्ट स्पष्ट केली होती. जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली होती, त्यानंतर पीसीबीचे नवे प्रमुख नजम सेठी यांनी एसीसीची बैठक बोलावण्याची चर्चा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बैठक बहरीनमध्ये आज म्हणजेच शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार की नाही हे स्पष्ट होईल.
  • आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानला जाणार नाही या निर्णयावर भारत ठाम असल्याचंही वृत्त आहे. त्यामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये हलवली जाऊ शकते, तर दुसरा पर्याय श्रीलंकेकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. जर पाकिस्ताननेही ही स्पर्धा आपल्या देशात आयोजित करण्याचा निर्णय बदलला नाही, तर यावेळी ही स्पर्धा टीम इंडियाशिवाय खेळवली जाऊ शकते.
  • बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “जय शाह एसीसीच्या बैठकीसाठी बहरीनमध्ये आहेत. बीसीसीआयची भूमिका बदलणार नाही. सरकारकडून आम्हाला कोणताही ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने भारत पाकिस्तानला जाणार नाही.”

गौतम अदाणींचा पाय आणखीन खोलात; S&P Dow Jones च्या यादीतून ‘अदाणी’ची गच्छंती! नेमकं घडतंय काय?

  • अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे गौतम अदाणी आता पहिल्या दहामधूनही बाहेर फेकले गेले आहेत. त्यांचा सर्वात मोठा FPO त्यांना बाजारातून गुंडाळावा लागला आहे. खरेदीदारांना पैसे परत करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे. इतकंच नाही, तर त्यांच्या एकूण बाजारमूल्यामध्ये तब्बल ११८ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. आर्थिक नियोजन करण्यासाठी अदाणींना पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना विनंती करावी लागत आहे. आणि हे सगळं घडलं हिंडनबर्ग रीसर्चच्या एका अहवालामुळे, ज्यामध्ये अदाणी एंटरप्रायजेसनं बाजारपेठेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता भरीस भर म्हणून S&P Dow Jones नंही आपल्या निर्देशांक यादीतून अदाणी एंटरप्रायजेसची गच्छंती केली आहे. यामुळे नेमकं काय होणार आहे?
  • S&P Dow Jones Indices काय आहे – सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास S&P Dow Jones निर्देशांकामध्ये जागतिक स्तरावरील बाजारपेठेतील कंपन्यांची त्यांच्या गुणवत्ता, विकासाचा दर आणि क्षमता या आधारावर क्रमवारी ठरवतो. S&P Dow Jones Sustainability World IndeX च्या संकेतस्थळावर अशा कंपन्यांची यादी जाहीर केली जाते. या यादीमधील कंपन्या या आर्थिकदृष्ट्या सक्षम, आवाक्याच्या दृष्टीने व्यापक आणि शाश्वततेच्या दृष्टीने दीर्घकाळापर्यंत बाजारात अस्तित्व टिकवून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या असतात. त्यामुळे या यादीमध्ये समावेश असणाऱ्या कंपन्यांची बाजारातील पत आपोआपच वाढलेली असते. पण त्याउलट या यादीतून अशा प्रकारे बाहेर काढण्यात आलेल्या कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. थोडक्यात एखाद्या कंपनीची विश्वासार्हता ठरवणारा हा एक महत्त्वाचा निकष ठरतो.
  • या यादीमध्ये S&P Global Broad Market Index अर्थात BMI मध्ये नोंद असलेल्या २५०० कंपन्यांपैकी अग्रगण्य १० टक्के कंपन्यांचा समावेश असतो. त्यामुळे या यादीमधून बाहेर पडल्यामुळे अदाणी एंटरप्रायझेसच्या शेअर्सची पत गुंतवणूकदारांच्या लेखी ढासळल्याचं मानलं जात आहे. ‘अदाणी’ला यादातून बाहेर काढल्याची घोषणा होताच त्याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये दिसून आला. अदाणी एंटरप्रायजेसचे शेअर्स १५ टक्के खाली उतरले आहेत.NSE नं अदाणी एंटरप्रायजे, अदाणी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांना अॅडिशनल सर्वेलन्स मेजर्स (ASM)खाली ठेवलं आहे. अर्थात, या कंपन्यांच्या शेअर्सच्या व्यवहारांवर आता बारीक नजर ठेवली जाणार आहे.

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही बुलेट ट्रेनचे काम वेगात; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

  • महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळे आणले होते, त्यांनी या प्रकल्पासंदर्भात एकही परवानगी दिली नाही. आता गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही बुलेट ट्रेनचे काम धडाक्यात होईल, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
  • बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून िशदे-फडणवीस सरकारने आवश्यक सर्व परवानग्या दिल्या आहेत, निविदाही काढल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुंबई ते वापी या मार्गावर खांब उभारणीची कामे सुरू होतील. गुजरातमध्ये १४० किमीच्या पट्टय़ामध्ये खांब उभारणी झालेली आहे. जपानने अलिकडेच बुलेट ट्रेनच्या कामांचा आढावा घेतला आहे, असे वैष्णव म्हणाले. बुलेट ट्रेन प्रकल्प ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
  • काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. २००९-२०१४ या काळात राज्याला रेल्वेविकासासाठी सरासरी १ हजार १७१ कोटी दिले जात होते. त्यातुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील रेल्वेविकासासाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आ ल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. राज्यातील १२३ रेल्वे स्टेशनांचे आधुनिकीकरण केले जात असून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसटीएम) आधुनिकीकरणाचे कामही गतीने होईल, असेही वैष्णव म्हणाले.

शुभमन गिल भारतीय फलंदाजीचा तारणहार ठरणार का?

  • भारताचा सलामीवीर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. गेल्या काही काळात क्रिकेटच्या सर्व प्रकारांत त्याने आपली छाप पाडली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी तो निर्णायक खेळाडू म्हणून समोर आला आहे. त्याच्याकडे भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जाते आहे. गिलचे योगदान का महत्त्वाचे ठरते आहे आणि त्याचा संघाला कसा फायदा झाला आहे, याचा आढावा.
  • ट्वेन्टी-२० मधील शतकामुळे गिलने कोणते विक्रम रचले? 
    न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यातील नाबाद १२६ धावांच्या खेळीत गिलने अनेक विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यातील भारतीय फलंदाजाची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या (नाबाद १२२) नावे होता. तसेच गिलच्या नाबाद १२६ धावा ही आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही फलंदाजांनी केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी २०१२मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड लेवीने नाबाद ११७ धावांची खेळी केली होती. गिल हा भारतासाठी ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वांत युवा (२३ वर्षे आणि १४६ दिवस) खेळाडू ठरला आहे. त्याने सुरेश रैनाचा (२३ वर्षे व १५६ दिवस) विक्रम मोडित काढला.
  • गेल्या काही काळात गिलची तिन्ही प्रकारांतील कामगिरी कशी राहिली? 
    न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात गिलने १४९ चेंडूंत २०८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय लढतीत त्याने ७८ चेंडूंत ११२ धावा केल्या. त्यापूर्वी, श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात ९७ चेंडूंत ११६ धावांची खेळी केली. आता ट्वेन्टी-२० सामन्यातही त्याने शतक झळकावत संघासाठी आपले महत्त्व सिद्ध केले आहे. डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातही त्याने १५२ चेंडूंत ११० धावा केल्या होत्या. त्यापूर्वी, ऑगस्टमध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ९७ चेंडूंत १३० धावांची खेळी केली. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक झळकावणारा गिल हा भारताचा पाचवा आणि जगातील २१वा फलंदाज आहे. तसेच तिन्ही प्रकारांत शतकी खेळी करणारा तो जगातील दुसरा सर्वांत युवा फलंदाज आहे. गिलपूर्वी पाकिस्तानच्या मोहम्मद शेहजादने २२ वर्ष आणि १२७ दिवस वय असताना ही कामगिरी केली होती.

राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी आजोबा दिवस:

  • मुलांच्या आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरिता राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
  • रविवार 10 सप्टेंबर रोजी असलेला हा दिवस त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच शाळास्तरावर राबविण्यात येणार आहे.
  • काही कारणास्तव शाळेला सदर कार्यक्रमाचे आयोजन न करता आल्यास शाळेकडून आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, यासंदर्भात शासनाने परिपत्रकदेखील जारी केले आहे.

सरकारी नोकर भरतीत EWS अंतर्गत संधी नाही:

  • महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात (MAT) ने गुरूवारी डिसेंबर 2020 चा राज्य सरकारचा ठराव बेकायदेशीर ठरवला आहे.
  • त्यामुळे मॅटने आर्थिक दृष्ट्या दुर्बल मराठा तरूणांना झटका दिला आहे.
  • सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभागातून अर्ज करण्याचा मध्यवर्ती पर्याय ज्या ठरावाद्वारे करण्यात आला होता तो ठराव रद्द करण्यात आला आहे.
  • सरकारी नोकर भरतीत मराठा उमेदवारांना मराठा आरक्षण कायद्याच्या अंतर्गत जागा राखीव करून संधी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली.
  • एवढंच नाही तर नंतर तो कायदाही रद्द केला.
  • त्यानंतर उमेदवार भरती प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) आरक्षणाची संधी पूर्वलक्ष्यी प्रभावाने खुली करण्याचा राज्य सरकारचा 2020 मधला निर्णय बेकायदा आहे असं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने गुरुवारी म्हटलं आहे.
  • भविष्यातील सरकारी नोकर भरतींमध्ये मराठा समाजातील पात्र उमेदवारांना राज्य घटनेच्या अनुच्छेद १४, १६(४) आणि १६(६) अन्वये असलेल्या तरतुदींप्रमाणे EWS चे आरक्षण खुले असले पाहिजे असंही मॅटच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर आणि सदस्य मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीच्या लवकरच नियुक्त्या:

  • सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाच न्यायमूर्तीची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यासाठी केलेली शिफारस लवकरच मंजूर केली जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिले.
  • न्यायमूर्ती एस. के. कौल व न्यायमूर्ती अभय ओक यांच्या पीठाला महाधिवक्ता आर. वेंकटरामाणी यांनी या पाच न्यायमूर्तीच्या नियुक्तीचे लेखी आदेश लवकरच निघण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
  • न्यायवृंदाने गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीच्या नियुक्तीची शिफारस केली होती. यामध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पंकज मित्तल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय करोल, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. व्ही. संजयकुमार, पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे.
  • नंतर 31 जानेवारी रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायवृंदाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल व गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या नावाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायामूर्तीपदी बढतीसाठी केंद्राकडे शिफारस केली.
  • सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 34 न्यायमूर्तीची मंजूर संख्या आहे.
  • सध्या सर्वोच्च न्यायालयात 27 न्यायमूर्ती कार्यरत आहेत.

जोगिंदर शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:

  • भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली टी-20 विश्वचषक जिंकला होता.
  • त्या विश्वचषकात फायनलचा हिरो जोगिंदर शर्मा ठरला होता.
  • या जोगिंदर शर्माने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
  • शुक्रवारी जोगिंदर शर्मा यांनी ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली.
  • हरियाणातील रोहतक येथून आलेल्या जोगिंदर शर्माने भारतासाठी फक्त 4 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत.
  • विशेष म्हणजे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्व टी-20 सामने केवळ विश्वचषकात खेळले आणि इतिहास रचला.
जोगिंदर शर्मा

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

४ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.