१४ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१४ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |14 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१४ फेब्रुवारी चालू घडामोडी

भारत लवकरच संरक्षण क्षेत्रात अग्रगण्य उत्पादक – पंतप्रधान मोदी

 • गेल्या आठ-नऊ वर्षांत भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात कायाकल्प घडवला आहे. त्यासाठी अवलंबलेल्या अनुकूल आर्थिक धोरणांमुळे जगातील अग्रगण्य संरक्षण उत्पादक राष्ट्रांच्या पंक्तीत सामील होण्यासाठी आपण वेगाने वाटचाल करत आहोत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला.
 • बंगळुरू लगत येलाहंका हवाई दल तळावर हवाई क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक व प्रदर्शन ‘एअरो इंडिया २०२३’ चे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. संरक्षण क्षेत्रातील अनेक अग्रगण्य भारतीय व परदेशी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मोदी म्हणाले की, अशा उपक्रमांकडे पूर्वी भारताला फक्त संरक्षण उत्पादने विकण्यासाठीची संधी म्हणून पाहिले जात होते. मात्र, आता या क्षेत्रात भारताने आपली क्षमता एवढी वाढवली आहे, की जागतिक स्तरावरून ‘संभाव्य संरक्षण भागीदार’ म्हणून  आपल्याकडे पाहिले जात आहे. भारत आता ७५ देशांना आपली संरक्षण उत्पादने निर्यात करत आहे.
 • या क्षेत्रातील विविध सुधारणा आणि यशाचा तपशील देताना मोदींनी भारत हा लष्करी उपकरण निर्मितीसाठी गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण असल्याचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, की २०२४-२५ पर्यंत भारताची संरक्षण उत्पादनांची निर्यात दीड अब्ज डॉलरवरून पाच अब्ज डॉलपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हलक्या वजनाचे तेजस हे लढाऊ विमान आणि आयएनएस विक्रांत हे ही क्षेत्रातील भारताच्या क्षमतेची झळाळती उदाहरणे आहेत. बंगळुरूचे आकाशात आज नव्या भारताच्या क्षमतांची साक्ष मिळत आहे. गाठलेली ही नवी उंची हीच नव्या भारताचे वास्तव असून, देश ही नवी उंचीही आता पार करत आहे.
 •  मोदी म्हणाले, की  अनेक दशकांपासून भारत हा संरक्षण उत्पादने आयात करणारा सर्वात मोठा देश होता. आता आपण जगातील ७५ देशांना संरक्षण उत्पादने निर्यात करत आहोत. देशाच्या संरक्षण निर्यातीत गेल्या पाच वर्षांत सहा पटीने वाढ झाली आहे. भारताने २०२१-२२ मध्ये दीड अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीची संरक्षण उत्पादने निर्यात केली आहेत. संरक्षण हे असे क्षेत्र आहे, जिथे तंत्रज्ञान, बाजार आणि व्यवसाय खूप क्लिष्ट मानले जातात. असे असूनही गेल्या आठ-नऊ वर्षांत भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात कायापालट घडवून आणला आहे. ही फक्त सुरुवात आहे.

कोलकाता पुस्तक मेळय़ाचा विक्रम; २६ लाख लोकांची भेट, २५.५० कोटींची विक्री

 • ४६व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळय़ात २५.५० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पुस्तकांची विक्रमी विक्री झाल्याचे आयोजकांनी सांगितले. ३१ जानेवारीला सुरू होऊन १२ फेब्रुवारीला संपलेल्या या वर्षीच्या पुस्तक मेळय़ाला सुमारे २६ लाख लोकांनी भेट दिली, अशी माहिती प्रकाशक व पुस्तक विक्रेते संघटनेचे सरचिटणीस त्रिदीब चौधरी यांनी दिली. १९७६ साली सुरू झालेल्या या पुस्तक मेळय़ाच्या इतिहासात भेट दिलेल्या लोकांचा आणि विक्रीचा हा विक्रम होता असेही ते म्हणाले.
 •  ‘करोना महासाथीनंतर, गेल्या वर्षी  २४ लाख नागरिकांनी मेळय़ास हजेरी लावली होती.  ही संख्या उत्साहवर्धक होती. मात्र या वर्षी त्याहून अधिक लोक आले असून त्यांची संख्या २६ लाखांपलीकडे गेली. लोकांच्या या प्रतिसादामुळे आम्ही अतिशय आनंदी आहोत. पुस्तक मेळय़ाच्या इतिहासातील हा विक्रम आहे’, असे चौधरी यांनी सांगितले. मेळय़ातील सर्व स्टॉल्सवरील विक्रीत ६ ते १० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुधांशु शेखर डे यांनी दिली.
 • ९५० स्टॉल, स्पेन ‘थीम कंट्री’ –  बांगलादेश पॅव्हिलिनमधील ७० स्टॉल्सव्यतिरिक्त मेळय़ात ९५० स्टॉल्स होते. स्पेन हा ‘थीम कंट्री’ होता. पुढील वर्षीच्या पुस्त मेळय़ातही एक युरोपीय देश ‘थीम कंट्री’ राहणार असून, हा मेळाही सॉल्ट लेक सेंट्रल पार्कमध्ये होईल, असे चॅटर्जी म्हणाले.

विश्वचषक जिंकून देणाऱ्या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला रामराम! सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती

 • इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू इऑन मॉर्गनने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडने २०१९ साली विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत मॉर्गनने इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते.
 • इंग्लंडा क्रिकेटपटू इऑन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपण निवृत्त झाल्याचे जाहीर करताना त्याने खेळापासून दूर होण्याची हीच खरी वेळ आहे, असे सांगितले आहे. इऑन मॉर्गनचे क्रिकेटमधील करिअर एकूण १६ वर्षे राहिले. मॉर्गनने एकदिवसीय क्रिकेटसाठी इंग्लंडच्या टीमचे यशस्वी नेतृत्व केले. मॉर्गनच्या नेतृत्वातच इंग्लंडलने २०१९ साली पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले. मॉर्गनने १२६ एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या टीमचे नेतृत्व केले. यापैकी ७६ सामन्यांत इंग्लंडचा विजय झाला होता.
 • इऑन मॉर्गनचे क्रिकेटमधील करिअर – मॉर्गनने आपल्या करिअरमध्ये एकू २५८ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले. त्याच्या नावावर १४ शतकं आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ७७०१ धावा केल्या. तर त्याने एकूण १६ कसोटी सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन शतक असून त्याने एकूण ७०० धावा केल्या.

किरकोळ महागाई दर पुन्हा ६.५ टक्क्यांवर, रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘समाधान पातळी’चा भंग

 • किरकोळ महागाई दराने रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘समाधान पातळी’चा भंग करत, सरलेल्या जानेवारीमध्ये ६.५२ टक्क्यांवर, तीन महिन्यांच्या उच्चांकाला पोहोचल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार मुख्यत: अन्नधान्य घटकांच्या किमतीतील वाढीचा हा परिणाम आहे.
 • ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर या आधीच्या डिसेंबर महिन्यात ५.७२ टक्के पातळीवर होता. ती या दराची २०२२ सालातील नीचांकी पातळी होती. त्या आधी नोव्हेंबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ५.८८ टक्के नोंदविण्यात आला होता. तर वर्षभरापूर्वी म्हणजे जानेवारी २०२२ मध्ये तो ६.०१ टक्के नोंदला गेला होता, असे सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. अन्नधान्य घटकांसाठी महागाईचा दर जानेवारीमध्ये ५.९४ टक्के होता, जो डिसेंबरमधील ४.१९ टक्के पातळीवरून लक्षणीय उसळलेला दिसून आला. यापूर्वी अन्नधान्य महागाईने ऑक्टोबरमध्ये ६.७७ टक्के असा उच्चांक नोंदवला होता.

काय महागले?

 • सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार डाळी, दूध आणि अंडय़ांच्या दरांमधील वाढ कायम आहे. गतवर्षी जानेवारीच्या तुलनेत डाळींचे दर तब्बल १६ टक्क्यांनी वाढले आहेत, तर दूध व अंडी प्रत्येकी ८.८ टक्के महागली आहेत. भाज्यांचे दर मात्र गतवर्षीच्या तुलनेत ११.७ टक्क्यांनी खाली आले आहेत.

व्याजदर आणखी वाढणार?

 • उत्पादनातील वाढत्या खर्चाचा परिणाम झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये महागाई दर चढाच राहण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या समाधान पातळीपेक्षा जास्त असल्यामुळे आगामी काळात व्याजदरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचा अर्थव्यवस्थेच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची भीती आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात मोठ्या ‘एअर शो’चं उद्घाटन:

 • एअरो इंडिया 2023 या आशियातील सर्वात मोठ्या एअर शोला सुरूवात झाली आहे.
 • हा एअर शो 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान बंगळुरूच्या येलाहंका येथे होणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एअर शोचं उद्घाटन पार पडलं.
 • दरम्यान, यामध्ये भारतीय हवाई दलाची वेगवेगळी प्रात्यक्षिकं पाहायला मिळणार आहेत.
 • हा एअर शो 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान बंगळुरूमधील येलहंका एअर फोर्स स्टेशनवर पार पडेल.
 • तसेच हवाई दलात नव्याने सहभागी झालेलेल्य ‘तेजस’ हे लढाऊ विमान या एअर शोचे मुख्य आकर्षण असणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात मोठ्या ‘एअर शो’चं उद्घाटन

विराट पाठोपाठ आता स्मृतीही करणार आरसीबीचे प्रतिनिधित्व:

 • भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाला महिला प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वाधिक बोली लागली आहे.
 • स्मृती मंधानाला आरसीबी संघाने 3.40 कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.
 • विशेष म्हणजे विराट कोहलीही आरसीबीकडून खेळतो.
 • विराट कोहली पाठोपाठ आता स्मृती मंधाना आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहेत.
 • महिला आयपीएलसाठी पहिली बोली स्मृती मंधानाला लागली. जी आजपर्यंतची सर्वात मोठी बोली देखील ठरली.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१४ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.