१३ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१३ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |13 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१३ फेब्रुवारी चालू घडामोडी

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती:

  • महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा केंद्र सरकारने रविवारी मंजूर केला.
  • आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्रासह 12 राज्यांत तसेच, लडाख या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी नव्या राज्यपालांची नियुक्ती केली.
  • सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी झालेली नियुक्ती भुवया उंचावणारी ठरली आहे.
  • कटारिया यांची थेट आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर जिल्ह्यातील बलाढय़ ब्राह्मण नेते शिवप्रताप शुक्ला यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करून त्यांचे अप्रत्यक्ष पुनर्वसन केले आहे.
  • वाराणसीतील लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना निष्ठेचे फळ मिळाले असून त्यांना सिक्कीमचे राज्यपाल करण्यात आले आहे.
  • हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना आता भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा बिहारचे राज्यपालपद देण्यात आले आहे.
  • छत्तीसगढच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची बदली मणिपूरच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे.
  • तमीळनाडूतील दोन बडय़ा भाजप नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून सी. पी. राधाकृष्णन हे हिंदूी पट्टय़ातील झारखंडचे नवे राज्यपाल झाले आहेत.
  • तर, मणिपूरचे राज्यपाल ला. गणेशन यांना नागालँडच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
  • मेघालयमध्ये फागू चौहान यांची राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.
  • आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांना आता छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहेत.
  • निवृत्त ब्रिगेडीअर बी. डी. मिश्रा या आता लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपाल असतील, तर लेफ्ट. जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक (निवृत्त) अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असतील.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस

न्या. सोनिया गोकाणी यांच्यासह चौघे मुख्य न्यायाधीशपदी:

  • या महिनाअखेरीस निवृत्त होणार असलेल्या दोघांसह चार न्यायाधीशांची रविवारी उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • गुजरात उच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. सोनिया गिरिधर गोकाणी यांना त्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आले.
  • शपथ घेतल्यानंतर त्या उच्च न्यायालयाच्या एकमेव महिला मुख्य न्यायाधीश असतील.
  • देशात 25 उच्च न्यायालये आहेत.
  • आणखी एक महिला न्यायाधीश, न्या. सबिना या सध्या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहात आहेत.

बांगलादेशच्या अध्यक्षपदासाठी चुप्पू यांचे नाव निश्चित:

  • बांगलादेशच्या संसदेत संपूर्ण बहुमत असलेल्या सत्ताधारी अवामी लीगने माजी न्यायाधीश मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू यांना अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केल्यामुळे, ते देशाचे पुढील अध्यक्ष बनणार असल्याचे निश्चित झाले आहे.
  • अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांचा कार्यकाळ 24 एप्रिलला संपत असून, चुप्पू हे त्यांची जागा घेतील.
  • 350 सदस्यांच्या सभागृहात अवामी लीगचे 305 सदस्य आहेत.
  • संसदेतील अधिकृत विरोधी पक्ष असलेल्या जातीय पार्टीने अध्यक्षपदासाठी कुणाच्याही नावाची शिफारस केलेली नाही.

भारताच्या महिला क्रिकेट संघाने टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास इतिहास:

  • महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले आहे.
  • विशेष म्हणजे पाकिस्तानने 149 धावांचा डोंगर उभारूनही भारताने हे आव्हान लिलया पेलले आहे.
  • भारताने सात गडी राखून हा सामना खिशात घातला आहे.
  • या विजयासोबतच भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत एक खास विक्रम केला आहे.
  • महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने आतार्यंतच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे.

रोहित शर्माने सचिन-सेहवागला मागे टाकत रचला खास विक्रम:

  • कर्णधार रोहित शर्माने माजी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडला आहे.
  • रोहित शर्माने भारताकडून सलामी देताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके विजयात झळकावली आहेत.
  • अशाप्रकारे तो आता भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर बनला आहे.
  • सलामीवीर म्हणून रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 31 वे शतक होते, जे विजयात आले.
  • सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 30 शतके आहेत, जी विजयात आली आहेत.
  • या यादीतील तिसरे नाव भारताच्या वीरेंद्र सेहवागचे आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 21 सामने जिंकत शतके झळकावली.

नॅथन लायनचा मोठा पराक्रम:

  • बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात पार पडला.
  • या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने इतिहास रचला आहे.
  • यादरम्यान नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये 30 हजार चेंडू फेकण्याचा विक्रम केला.
  • अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ सहावा आणि दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे.
  • त्याच्या रेकॉर्डमधील खास गोष्ट म्हणजे त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकही नो बॉल टाकलेला नाही.
  • कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असा एकही गोलंदाज नाही. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 30,000 चेंडू टाकले असतील पण त्यात एकही नो बॉल टाकला नाही.
  • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू फेकण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे.

क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा: रेयाल माद्रिदला आठव्यांदा जेतेपद

  • विनिशियस ज्युनियर आणि फेडेरिको व्हॅल्व्हर्डे यांनी झळावलेल्या दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबवर ५-३ असा विजय मिळवला आणि विक्रमी आठव्यांदा स्पर्धेचे जेतेपद मिळवले.
  • निर्णायक सामन्यात अपेक्षेनुसार माद्रिदने आक्रमक सुरुवात केली. विनिशियसने सामन्याच्या १३व्या मिनिटाला संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर काही मिनिटांतच फेडेरिकोने (१८व्या मि.) गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. अल हिलालकडून मोसा मारेगाने (२६व्या मि.) गोल झळकावत आघाडी २-१ अशी कमी केली. माद्रिदने मध्यांतरापर्यंत आपली आघाडी कायम राखली.
  • दुसऱ्या सत्रात माद्रिदने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. तारांकित खेळाडू करिम बेन्झिमाने (५४ व्या मि.) प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीला चकवत माद्रिदच्या खात्यात आणखी एका गोलची भर घातली. यानंतर फेडेरिकोने (५८व्या मि.) गोल करत संघाला ४-१ असे सुस्थितीत पोहोचवले.
  • अल हिलालकडून लूसियानो वीटोने (६३व्या मि.) गोल करत संघाच्या खात्यात दुसऱ्या गोलचा भरणा केला. यानंतर विनिशियसने (६९व्या मि.) संघाच्या खात्यात पाचव्या गोलची भर घातली. ७९व्या मिनिटाला वीटोने अल हिलालसाठी तिसरा गोल केला. यानंतर माद्रिदच्या बचावफळीने प्रतिस्पर्धी संघाला कोणतीच संधी दिली नाही.त्यापूर्वी, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात ब्राझीलचा क्लब फ्लेमिंगोने इजिप्तचा क्लब अल आहलीवर ४-२ असा विजय मिळवला.

बिग बॉस हिंदीची ट्रॉफी कोण जिंकणार? टॉप २ सदस्यांची नावे समोर

  • छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज रंगताना दिसत आहे. बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. अखेर बिग बॉसच्या टॉप २ स्पर्धकांची घोषणा झाली. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेही टॉप २ सदस्य ठरले आहेत.
  • आज (१२ फेब्रुवारी) संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने बिग बॉसचे सूत्रसंचालन केले. यंदा बिग बॉसच्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी या स्पर्धकांनी टॉप ५ स्पर्धकांबरोबर विविध खेळ खेळले.
  • बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. यातील एका टास्कदरम्यान शालीन भानोत हा घराबाहेर पडला. यानंतर अर्चना गौतम हिचा बिग बॉसचा प्रवास संपला.
  • यानंतर सलमान खानने बिग बॉसच्या टॉप २ सदस्यांची घोषणा केली. यावेळी सलमान खानने शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघं टॉप २ सदस्य ठरल्याची घोषणा केली. तर प्रियांका चौधरी हिचा बिग बॉसचा प्रवास संपल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

बांगलादेशच्या अध्यक्षपदासाठी चुप्पू यांचे नाव निश्चित

  • बांगलादेशच्या संसदेत संपूर्ण बहुमत असलेल्या सत्ताधारी अवामी लीगने माजी न्यायाधीश मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू यांना अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केल्यामुळे, ते देशाचे पुढील अध्यक्ष बनणार असल्याचे निश्चित झाले आहे.
  • अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांचा कार्यकाळ २४ एप्रिलला संपत असून, ७४ वर्षांचे चुप्पू हे त्यांची जागा घेतील. ३५० सदस्यांच्या सभागृहात अवामी लीगचे ३०५ सदस्य आहेत.
  • संसदेतील अधिकृत विरोधी पक्ष असलेल्या जातीय पार्टीने अध्यक्षपदासाठी कुणाच्याही नावाची शिफारस केलेली नाही.

न्या. सोनिया गोकाणी यांच्यासह चौघे मुख्य न्यायाधीशपदी

  • या महिनाअखेरीस निवृत्त होणार असलेल्या दोघांसह चार न्यायाधीशांची रविवारी उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.गुजरात उच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. सोनिया गिरिधर गोकाणी यांना त्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आले. शपथ घेतल्यानंतर त्या उच्च न्यायालयाच्या एकमेव महिला मुख्य न्यायाधीश असतील. देशात २५ उच्च न्यायालये आहेत. आणखी एक महिला न्यायाधीश, न्या. सबिना या सध्या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहात आहेत.
  • तथापि, वयाची ६२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर न्या. गोकाणी या २५ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. त्यांची नियुक्ती गुजरातच्या न्यायिक सेवेमधून झाली आहे.
  • ओडिशा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जसवंत सिंग यांची त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २२ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने २५ जानेवारीला त्यांच्या मुख्य न्यायाधीशपदी पदोन्नतीची शिफारस केली होती.
  • राजस्थान उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. संदीप मेहता यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, गुवाहाटी उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. कोटिस्वर सिंह यांना जम्मू- काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करण्यात आले आहे. विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना आज शपथ : राजेश बिंदल व अरिवद कुमार या दोन न्यायाधीशांना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे आज, सोमवारी पदाची शपथ देणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नत होण्यापूर्वी न्या. बिंदल हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे, तर न्या. कुमार हे गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

महिला प्रीमियर लीग लिलावात एक महिला असणार लिलावकर्ता! जाणून घ्या कोण आहे ‘ती’ महिला

  • महिला प्रीमियर लीग (WPL 2023) साठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी (१३ फेब्रुवारी) मुंबईत होणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी अडीच वाजता लिलाव सुरू होईल. यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत बीसीसीआयने एका महिला लिलावकर्त्याची निवड केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने मुंबईच्या मलिका अडवाणीची या जबाबदारीसाठी निवड केली आहे.
  • बीसीसीआयच्या आयपीएल लिलावात तीन जणांनी लिलाव करणाऱ्यांची भूमिका बजावली आहे. लिलावात प्रथम रिचर्ड मॅडलीचा आवाज घुमला. त्यांच्यानंतर ह्यू अॅडम्स यांना ही जबाबदारी मिळाली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लिलावादरम्यान ते स्टेजवरून अचानक खाली कोसळले होते. त्यांच्या जागी चारू शर्माने लिलावाची प्रक्रिया सुरु ठेवली. त्यानंतर एडमंड्स शेवटी परत आले आणि दोघांनी लिलाव पार पडला.
  • कोण आहे मलिका अडवाणी?
  • मलिका अडवाणी ही मुंबईची रहिवासी आहे. ती मुंबईस्थित आर्ट कलेक्टर सल्लागार आणि आर्ट इंडिया कन्सल्टंट्स या फर्ममध्ये भागीदार म्हणून काम करते. बीसीसीआयने आयोजित केलेल्या लिलावाची ही पहिलीच वेळ असेल ज्याची जबाबदारी एक महिला सांभाळणार आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१३ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.