Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |15 July 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१५ जुलै चालू घडामोडी
एमपीएससीच्या लिपिक टंकलेखक व करसहायक पदाचा निकाल जाहीर
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१- लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अकराशेहून अधिक पदांचा निकाल आहे. कौशल्य चाचणी आणि इतर परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.
- महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१- लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाचा निकाल जाहीर केला. सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- तसेच, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
23 ऑगस्टला यान चंद्रावर उतरविण्याचे नियोजन- इस्रो प्रमुख
- २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविण्याच प्रयत्न केला जाईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी सांगितले.
- सॉफ्ट लँडिंग यान अलगद उतरविणे हे तांत्रिकदृष्टय़ा आव्हानात्मक मानले जाते. चंद्रयान-३ हे १ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती सोमनाथ यांनी यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकारांना दिली.
- २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ मिनिटांनी चंद्रयान-३ अलगद उतरविण्याची योजना आहे. मागील मोहिमेमध्ये काय चूक झाली याचा अभ्यास करण्यासाठी एक वर्ष लागले. दुसरे म्हणजे आम्ही त्यात सुधारणा करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत आणि काय चूक होऊ शकते याचा अभ्यास केला. त्या आधारावर पुनरावलोकन केले, असे ते म्हणाले.
प्रक्षेपण केंद्रावर पुस्तकाचे प्रकाशन
- सतीश धवन अंतराळ केंद्रावरील प्रक्षेपण केंद्रावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते-लेखक विनोद मानकारा यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘प्रिझम- द अॅन्सेस्ट्रल अॅबोड ऑफ रेनबो’ असे शीर्षक असलेल्या या पुस्तकात विज्ञानविषयक लेख आहेत. धवन अंतराळ केंद्रावर ऐतिहासिक प्रक्षेपणाची उलटगणती सुरू असताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी हे पुस्तक विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायर यांच्याकडे सुपूर्द करून प्रसिद्ध केले. यावेळी इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ आणि पुस्तकाचे प्रकाशक उपस्थित होते.
- चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण हा अंतराळ संशोधन क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातून अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धता आणि अतूट बांधिलकी दिसून येते.
द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
- चंद्रयान-३ हा भारताच्या अंतराळ प्रवासातील ‘नवा अध्याय’ असून यामुळे प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावल्या आहेत. हा क्षण शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या ऊर्मीला आणि कल्पकतेला सलाम करतो! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- चंद्रयान-३चे यशस्वी प्रक्षेपण हे माजी पंतप्रधान पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या सर्व माजी पंतप्रधानांचा दृष्टिकोन, दूरदृष्टी, दृढ निश्चय,प्रयत्न यांचे फलित आहे.
मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष
- चार वर्षांपूर्वी चंद्रावर यान अलगद उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर इस्रोने सुधारात्मक पावले उचलली आहेत. हे एक अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण असून भारताला या महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.
फ्रान्समध्ये लवकरच भारताची यूपीआय प्रणाली! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान कराराची शक्यता
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात डिजिटल अर्थव्यवस्था, उत्पादन क्षेत्र आणि हरित इंधन या क्षेत्रांत दोन्ही देशांदरम्यान सहकार्याची पावले उचलली जाणार आहेत. या दौऱ्यात भारताची युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणाली फ्रान्समध्ये सुरू केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- सध्या भारताबाहेर, सिंगापूरमध्ये यूपीआय प्रणालीचा वापर सुरू आहे. याच वर्षी यूपीआय प्रणाली चालविणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि सिंगापूरमधील पेनाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केली. यामुळे यूपीआयचा वापर सिंगापूरमध्ये आणि पेनाऊचा वापर भारतामध्ये करणे शक्य झाले. एनपीसीआय आणि फ्रान्समधील लायरा या कंपन्या वर्षभरापासून यावर काम करीत आहेत. मोदींच्या दौऱ्यादरम्यान याबाबत निर्णय यूपीआयचा वापर सुरू करणारा फ्रान्स हा युरोपमधील पहिला देश ठरेल.
- नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ‘यूपीआय’ प्रणाली विकसित केली आहे. तिच्यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे आणि सध्या देशातील सुमारे ४०० बँका आणि बँकेतर वित्तीय कंपन्या ‘यूपीआय’शी जोडल्या गेल्या आहेत.
भारत-फ्रान्समधील उद्योगपतींची बैठक
- ‘भारत-फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदे’चे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या परिषदेची बैठक पॅरिसमध्ये १४ जुलैला होणार असून, त्यात दोन्ही बाजूंकडील १० ते १२ उद्योगपती उपस्थित असतील. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्युबिलंट समूहाचे सहअध्यक्ष हरी भाटिया आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कॅपजेमिनी एसईचे अध्यक्ष पॉल हर्मिलीन करणार आहेत.
‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण.. पुढे काय?
- श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून शुक्रवारी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या दिशेने झेपावले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या यानातील लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. या चांद्रमोहिमेचे तीन प्रमुख टप्पे आहेत.
पृथ्वीला निरोप..
- चंद्रयान-३चा मार्ग चा चंद्रयान-२ सारखा आहे. हे यान पृथ्वीभोवती पाच कक्षेतील आवर्तन पूर्ण करेल. प्रत्येक वेळी ते पृथ्वीपासून दूर जाणारे अंतर वाढवेल. पाचवे आवर्तन पूर्ण केल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने जाऊ लागेल.
चंद्राच्या कक्षेत प्रवेश
- पृथ्वीभोवतीच्या कक्षेतील आवर्तनाप्रमाणेच ‘चंद्रयान-३’ चंद्राभोवती चार वेळा प्रदक्षिणा घालेल आणि प्रत्येक वेळी चंद्राजवळ जाईल. अखेरीस ते १०० किमी ७ १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत पोहोचेल. या टप्प्यावर लँडर प्रोपल्शन मॉडय़ूलपासून वेगळे होते आणि त्याची कक्षा बदलते. त्यानंतर, लँडरचे अलगत अवतरण प्रक्रिया सुरू होते.
चंद्रावर अवतरण
- पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा प्रवास सुमारे एक महिना लागण्याचा अंदाज आहे. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे. चंद्रावर अवतरण केल्यावर, ते एका चांद्र दिवसासाठी कार्य करेल.
- ०१ = यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावणे
- ०२ = चांद्रपृष्ठावर अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग)
- ०३ = ‘लँडर’मधून रोव्हरची चांद्रपृष्ठावर सफर
रोव्हर डिस्कव्हरी
- चंद्रयान-३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर एक रोव्हर उतरवेल आणि चंद्राचा शोध घेण्याची क्षमता सिद्ध करेल. रोव्हर त्याच्या स्थानाजवळ वैज्ञानिक प्रयोग करेल आणि चंद्राच्या वातावरणाबाबत मौल्यवान माहिती गोळा करेल.
काय माहिती मिळवणार?
- चंद्रयान-३च्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागाची रचना, भूवैज्ञानिक वैशिष्टय़े आणि इतर माहिती मिळविली जाणार आहे. चंद्राची आवरणशिला, भूगर्भातील हालचाली, पृष्ठभागावरील प्लाझ्माचे प्रमाण, चांद्रपृष्ठातील रासायनिक मूलद्रव्ये यांचा अभ्यास केला जणार आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१५ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १४ जुलै २०२३ चालू घडामोडी
- १३ जुलै २०२३ चालू घडामोडी
- १२ जुलै २०२३ चालू घडामोडी
- ११ जुलै २०२३ चालू घडामोडी
- १० जुलै २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |