१६ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१६ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |16 May 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१६ मे चालू घडामोडी

नौदलाकडून ‘ब्राह्मोस’ची यशस्वी चाचणी

  • नौदलाकडून रविवारी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. नौदलाची अग्रगण्य स्वयंचलित क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारी विनाशक युद्धनौका ‘आयएनएस मुरगाव’वरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चाचणीचे ठिकाण कळू शकले नाही.
  • अधिकाऱ्यांनी सांगितले, की ही युद्धनौका व हे शक्तिशाली क्षेपणास्त्र दोन्ही स्वदेशी निर्मिती व आत्मनिर्भरतेचे झळाळणारी बोलकी प्रतिके आहेत. या यशस्वी चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या सागरातील मारक क्षमतेचे प्रदर्शन केले. या नव्या युद्धनौकेवरून केलेली ब्राह्मोसची पहिलीच चाचणी यशस्वी झाली. अचूक लक्ष्यवेध घेण्यात हे क्षेपणास्त्र यशस्वी ठरले.

ब्राह्मोसबाबत..

  • भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे या क्षेपणास्त्राची निर्मिती केली जाते. ही क्षेपणास्त्रे पाणबुडी, युद्धनौका, विमाने किंवा जमिनीवरूनही प्रक्षेपित करता येतात. ब्राह्मोस ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास तिप्पट वेगाने उडते. भारत ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यातही करत आहे. गेल्या वर्षी जानेवारीत भारताने क्षेपणास्त्राच्या तीन बॅटरी पुरवण्यासाठी फिलीपिन्ससोबत ३७ कोटी पाच लाखांचा करार केला होता.

टाटाचे टेक्नॉलॉजीत मोठे पाऊल! भारतात तयार होणार ‘मेड इन इंडिया आयफोन’, चीनला बसणार मोठा झटका

  • Apple ही टेक कंपनी आहे. याचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे. कंपनी आयफोन ,आयफोन स्मार्टफोन, आयपॅड टॅब्लेट कम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअरचे देखील उत्पादन करते. Apple कंपनीचे आयफोन हे लवकरच भारतामध्ये तयार होणार आहेत. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवर असणारी निर्भरता कमी करण्यासाठी भारतात आगामी iPhone 15 सिरीजमधील काही मॉडेल्सचे उत्पादन सुरु करणार आहे. आयफोन १५ सिरिज या वर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात तयार होणार आहेत. यासाठी टाटा ग्रुपने Apple सह करार केला आहे. म्हणजेच टाटा ग्रुपने टेक्नॉलॉजीत मोठे पाऊल टाकले आहे.

मेड इन इंडिया असणार iPhone 15 आणि iPhone 15 Plusतात

  • कंपनी आपल्या आगामी आयफोन सिरीजमधून भारतात बेस व्हेरिएंट फोन iPhone 15 आणि iPhone 15 Plus तयार करण्याची तयारी करत आहे.तैवानच्या मार्केट इंटेलिजन्स असलेल्या ट्रेंडफोर्सच्या वृत्तानुसार, Foxconn, Pegatron आणि Lux Share नंतर Apple साठी iPhones तयार करणारी टाटा समूह ही चौथी कंपनी असेल.
  • अहवालानुसार, टाटा समूहाकडून आयफोन १५ आणि १५ प्लसचे उत्पादन भारतात करण्याची योजना आखली जात आहे. आयफोनचे उत्पादन भारतात झाले तर चीनला हा मोठा धक्का असण्याची शक्यता आहे.

टाटा ग्रुप तयार करणार आयफोन

  • टाटा समूहाने विस्ट्रॉनची भारतीय उत्पादन लाइन विकत घेतली आहे. ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे जी आयफोन 15 सिरिज असेंबल करणार आहे. हा दावा अशा वेळी केला जात आहे जेव्हा विस्ट्रॉन भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. तसेच आयफोनचे उत्पादन भारतात झाल्यामुळे त्याची किंमत सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५ हजार विशेष बसेस सोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

  • आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरला जाता यावे, यासाठी राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. २५ जून ते ०५ जुलै या कालावधीत या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जून रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
  • पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
  • पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना आणि वारकऱ्यांना दिल्या जाव्यात, भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
  • आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात्रेसाठी सुमारे ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत ‘या’ ८ संघांनी घेतली भरारी, बांगलादेशनं भारताला दिला झटका

  • बांगलादेशने आर्यलॅंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४ धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर बांगलादेशच्या संघानं आर्यलॅंडविरोधात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. या मालिकेत मिळालेल्या यशानंतर बांगलादेशने वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत भरारी घेतली आहे. बांगलादेशने मालिका जिंकून गुणतालिकेत भारताला मागे टाकलं आहे.
  • वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारतीय क्रिकेट टीम चौथ्या स्थानावर आहे. यंदाच्या वर्ल्डकपचं यजमानपद भारत भूषवणार आहे. त्यामुळे भारताला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. भारताशिवाय आणखी ७ संघांना क्रिकेट वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा यात समावेश आहे.
  • जे संघ वर्ल्डकपमध्ये क्वालीफाय झाले नाहीत, ते संघ ODI वर्ल्डकप क्वालिफिकेशन राऊंड खेळतील. या राऊंडनंतर टॉपमध्ये असणाऱ्या दोन संघांना वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळेल. वनडे वर्ल्डकपसाठी क्वालिफिकेशन राऊंडची सुरुवात १८ जूनपासून होणार असून १९ जुलै शेवटची तारीख असणार आहे. या राऊंडमध्ये झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्टइंडिज आणि आर्यलॅंड संघ सहभागी होणार आहे. याशिवाय नेपाल, ओमान, स्कॉटलॅंडस नेदरलॅंड्स आणि यूएईचा संघही क्वालिफिकेशन राऊंडचा भाग असणार आहे. ही टूर्नामेंट झिम्बाब्वेमध्ये खेळवण्यात येणार आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१६ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.