१६ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१६ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 16 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१६ सप्टेंबर चालू घडामोडी

भारतातील पहिला लिथियम सेल निर्मिती कारखाना

– श्री राजीव चंद्रशेखर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री, 16 सप्टेंबर 2022 रोजी तिरुपती, आंध्र प्रदेश येथे भारतातील पहिल्या लिथियम सेल उत्पादन सुविधेच्या प्री-प्रॉडक्शन रनचा शुभारंभ करतील.
– चेन्नईस्थित मुनोथ इंडस्ट्रीज लिमिटेडने रु. 165 कोटी च्या बजेटमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारली आहे.

हिंदी दिवस २०२२

– हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि तिच्या सौंदर्याचे कौतुक करण्यासाठी दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो.
– भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची प्रादेशिक भाषा आहे आणि त्यापैकी एक हिंदी आहे जी देवनागरी लिपीत लिहिलेली आहे.
– भारतात सर्वाधिक हिंदी भाषिक प्रदेश आहेत आणि इंग्रजी, मँडरीन आणि स्पॅनिश नंतर जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

रॉजर फेडररची प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्ती

– रॉजर फेडररने वयाच्या 41 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. त्याचा जन्म 1981 मध्ये झाला होता आणि त्यामुळे आता त्याला वाटते की त्याचे शरीर त्याला थांबण्याचे संकेत देत आहे. ते कारण त्यांनी निवृत्तीच्या भाषणात दिले.
– रॉजर फेडररने 2003 मध्ये विम्बल्डनमध्ये त्याची पहिली ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकली जेव्हा तो फक्त 21 वर्षांचा होता आणि 14 महिन्यांत त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

image 45
रॉजर फेडररची प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्ती

रॉबिन उथप्पाने भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली

– तो देशाच्या 2004 अंडर-19 विश्वचषक संघाचा भाग होता. त्याने दोन वर्षांनंतर भारतात पदार्पण केले आणि भारतासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळले.
– त्याने वनडे आणि टी-20 मध्ये 934 आणि 249 धावा केल्या.
– त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध होता, जिथे त्याने 44 चेंडूत 31 धावा केल्या होत्या.

image 46
रॉबिन उथप्पाने भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली

ट्विटरवर 50 मिलियन फॉलोअर्स असलेला विराट कोहली पहिला क्रिकेटर ठरला

– विराट कोहलीची सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर लोकप्रियता आहे ज्यात इंस्टाग्रामवर 211 दशलक्ष फॉलोअर्स आणि फेसबुकवर 49 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
– 2022 च्या सुरुवातीला, कोहली इंस्टाग्रामवर 200 दशलक्ष फॉलोअर्स ओलांडणारा पहिला भारतीय बनला.
– क्रिस्टियानो रोनाल्डो (450M) आणि लिओनेल मेस्सी (333M) नंतर 33 वर्षीय हा जगातील सर्वाधिक फॉलो केलेला क्रिकेटपटू आणि Instagram वर तिसरा सर्वाधिक फॉलो केलेला खेळाडू आहे.

कुमार ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धा : भारताला कुमार ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद ; नेपाळवर ४-० असा दणदणीत विजय:

 • गतविजेत्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करत नेपाळवर अंतिम सामन्यात ४-० असा एकतर्फी विजय मिळवला आणि कुमार (१७ वर्षांखालील) ‘सॅफ’ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. साखळी सामन्यात नेपाळने भारताला ३-१ असे नमवले होते, त्याचा वचपादेखील भारताने काढला.
 • भारताने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत नेपाळवर दबाव निर्माण केला. १८ व्या मिनिटाला बॉबी सिंगने नेपाळच्या बचावाला भेदत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर वन्लालपेका गुइतेच्या साहाय्याने कोरोऊ सिंगने (३० व्या मि.) गोल करीत संघाची आघाडी दुप्पट केली. यानंतर ३९व्या मिनिटाला नेपाळचा कर्णधार प्रशांत लकसामच्या आक्रमक खेळामुळे त्याला लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांना १० खेळाडूंसह खेळावे लागले.
 • मध्यांतरापर्यंत भारताने आपली ही आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या सत्रात भारताने आपला आक्रमक खेळ कायम ठेवला. गुइतेने (६३व्या मि.) नेपाळच्या खेळाडूंना चकवत गोल करत भारताला ३-० अशा सुस्थितीत पोहोचवले. यानंतर  सामन्याच्या भरपाई वेळेत अमनने गोल झळकावत भारताच्या खात्यात चौथ्या गोलचा भरणा केला.

समृद्धी महामार्गावर तुम्हाला किती टोल भरावा लागणार? दरांबाबत अधिकृत माहिती आली समोर:

 • गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच उद्घाटन केलं जाणार आहे. आधी या महामार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर त्याच्या नामकरणामुळे हा महामार्ग कायम चर्चेत राहिला. मात्र, त्याच्या उद्धाटनानंतर मुंबई ते नागपूर हे ७०१ किलोमीटरचं अंतर वेगाने पार करता येणार आहे.
 • हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं या द्रुतगती मार्गाचं नामकरण करण्यात आलं आहे. यानंतर या महामार्गावर वाहनांना नेमका किती टोल भरावा लागणार? यासंदर्भात वेगवेगळी माहिती आणि अंदाज समोर येत होते. मात्र, आता पहिल्यांदाच महामार्गावर भराव्या लागणाऱ्या टोलची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
 • समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनापूर्वी या महामार्गाच्या टोलची माहिती देणारा फलक महामार्गाच्या कडेला लावण्यात आला असून त्याचा फोटो सध्या व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नेमका किती टोल भरावा लागणार, यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. टोलचे हे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्थात पुढील जवळपास तीन वर्षांसाठी लागू असतील, असंही या फलकावर नमूद करण्यात आलं आहे.

वाहन प्रकार आणि त्यासाठीचा टोल…

१. मोटर, जीप, व्हॅन अथवा हलकी मोटर वाहने – १.७३ रुपये प्रतीकिमी

२. हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस – २.७९ रुपये प्रतिकिमी

३. बस अथवा ट्रक – ५.८५ रुपये प्रतिकिमी

४. तीन आसांची व्यावसायिक वाहने – ६.३८ रुपये प्रतिकिमी

५. अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांची वाहने – ९.१८ रुपये प्रतिकिमी

६. अतिअवजड वाहने (सात किंवा जास्त आसांची) – ११.१७ रुपये प्रतिकिमी

आयोडिनच्या रासायनिक क्रियेमुळे आक्र्टिक्ट ओझोनची हानी; संशोधनातील निष्कर्ष:

 • आक्र्टिक्टवरील ओझोनच्या नियंत्रणामध्ये आयोडिनच्या रासायनिक क्रियेची भूमिका महत्त्वाची आहे. या रासायनिक क्रियेमुळे आक्र्टिक्ट ओझोनची हानी होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आले आहे. तसेच आक्र्टिक्ट समुद्रातील बर्फाचे प्रमाण घटत असल्याने येत्या काळात आयोडिन उत्सर्जन वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
 • भारतासह अमेरिका, स्वित्र्झलड, अर्जेटिना, स्वीडन, स्पेन, फिनलंड, डेन्मार्क, सायप्रस, जर्मनी, ऑस्ट्रिया आदी वीस देशांतील शास्त्रज्ञांनी केलेल्या संयुक्त संशोधनाचा शोधनिबंध ‘नेचर जिओसायन्स’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. या संशोधनात भारतातून पुण्याच्या  उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील  डॉ. अनुप महाजन यांचा सहभाग होता.
 • अंटाक्र्टिकामधील स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन कमी झाल्याबाबत  चांगल्या रीतीने अभ्यास झाला आहे. क्लोरोफ्युरोकार्बनचे होणारे उत्सर्जन हे त्यामागील मुख्य कारण आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ ओझोनमध्ये घट होताना ओझोन केंद्रीकरण  शून्यावर येते. बर्फाळ   प्रदेशातून उत्सर्जित होणाऱ्या ब्रोमाईनमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील ओझोन कमी होत असल्याचे  
 • मानले जात होते. ब्रोमाईनसारख्याच असलेल्या आयोडिन या घटकाचा काय परिणाम होतो हे अभ्यासण्यात आले नव्हते. त्यामुळे मल्टिडिसिप्लिनरी ड्रििफ्टग ऑब्झर्वेटरी फॉर स्टडी ऑफ आक्र्टिक्ट क्लायमेट  या मोहिमेअंतर्गत  उपकरणे बसवण्यात आलेले जहाज आर्टिक्ट समुद्रातील बर्फात ऑक्टोबर ते मार्च २०२० या कालावधीत ठेवून नोंदी घेण्यात आल्या. 

शाळा प्रवेशाचा घसरता टक्का २०२५ पर्यंत कायम ; ‘एनसीईआरटी’च्या अहवालातील अंदाज:

 • देशभरातील पहिली ते चौथीच्या शाळा प्रवेशांत २०११मध्ये  सुरू झालेली घसरण २०२५ पर्यंत कायम राहण्याचा अंदाज राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ‘प्रोजेक्शन अँड ट्रेंड्स’ अहवालाद्वारे वर्तवला आहे.
 • एनसीईआरटीने १९५०पासूनचे कल अहवालाद्वारे मांडले आहेत. १९५०मध्ये देशात २ हजार १७१ शाळा आणि २.३० कोटी विद्यार्थी होते. देशातील प्राथमिक शाळांच्या स्तरावर २०११पर्यंत वाढ होत होती. मात्र २०११पासून प्रवेशाचे घटत असलेले प्रमाण २०२५पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. २०११ ते २०२५ या कालावधीत शाळा प्रवेश १४.३७ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. त्यात १३.२८ टक्के मुले, तर १५.५४ टक्के मुली आहेत, असे एनसीईआरटीच्या शैक्षणिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
 • देशभरात १९५० ते २०१६ या कालावधीत पहिली ते दहावीच्या प्रवेशात जवळपास ९०० टक्के वाढ झाली. त्यातील मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण वेगाने, म्हणजे जवळपास एक हजार टक्क्यांनी वाढले. उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील प्रवेशात अनुक्रमे २०१६ आणि २०१९मध्ये घट होण्यास सुरुवात झाली. उच्च प्राथमिक स्तरावर  मुले, मुली आणि एकूण प्रवेश घटण्याची सुरुवात २०१६मध्ये झाली. या कालावधीत जवळपास ९.४७ टक्क्यांनी प्रवेश घटले.
 • त्यातील ८.७ टक्के मुले, तर १०.९४ टक्के मुली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शाळा प्रवेश हा घटक लोकसंख्येशी संबंधित आहे. त्यामुळे संबंधित वयोगटातील लोकसंख्या कमी झाल्यास त्याचा परिणाम प्रवेशावर होतो. १९९१च्या जनगणनेच्या तुलनेत २०११च्या जनगणनेमध्ये शून्य ते सहा वयोगटाचे प्रमाण १८ टक्क्यांवरून १३.१२ टक्क्यांपर्यंत कमी झाले. 

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१६ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.