१७ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१७ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |17 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१७ फेब्रुवारी चालू घडामोडी

एअर इंडिया एकूण ८७० विमानं खरेदी करणार; कराराची किंमत लाखो कोटींमध्ये

  • टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडिया कंपनीने दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रांसच्या एअरबस कंपन्यांसोबत करार करत ४७० विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पून्हा आणखी ३७० विमानं घेणार असल्याचे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगतिले आहे. यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात एकूण ८७० विमानं काही पुढील वर्षात दाखल होणार आहेत. एअर इंडियाचे वरिष्ठ वाणिजिक्य आणि रुपांतरण विभागाचे अधिकारी निपुण अग्रवाल यांनी बुधवारी लिंक्डिनवर लिहिलेल्या एका पोस्टमधून याचा खुलासा झाला आहे. तसेच एअर इंडियाच्या करारानंतर भारत आणि जगभरात या कराराचे कौतुक केले गेले, लोकांचे हे प्रेम आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असेही अग्रवाल म्हणाले.
  • एअर इंडियाने मंगळवारी फ्रांसच्या एअरबसकडून २५० तर अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून २२० विमाने घेणार आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातलला सर्वात मोठा आणि ऐतिहासिक असा हा करार आहे. आता निपुण अग्रवाल यांनी सुचित केल्याप्रमाणे हा करार आणखी मोठा होणार आहे. कारण या ४७० विमानांच्या खरेदीमध्ये आणखी ३७० विमानांची भर पडणार आहे. त्यामुळे ऐकूण खरेदी करण्यात येणाऱ्या विमानांची संख्या ८४० होणार आहे.
  • जुन्या करारानुसार जे ४७० विमानं घेतली जाणार होती, त्यामध्ये पुढच्या दशकापर्यंत ३७० विमानांची वाढ करण्यात येणार आहे. त्याबरोबर विमानाच्या इंजिनाची देखभालीसाठी सीएफएम इंटरनॅशन रोल्स रोयस आणि जीई एरोस्पेस या कंपन्यांसोबत करार करण्यात आल्याची माहती अग्रवाल यांनी दिली. मात्र सर्व विमानांच्या आगमनाची तारीख अजून निश्चितपणे सांगण्यात आलेली नाही. एअरबसचे ए ३५० हे विमान याचवर्षी भारतात येईल. तर एअरबसच्या ए३२१ न्यूओस आणि इतर विमानांची डिलिव्हरी पुढील वर्षात मिळेल.

जगात पुन्हा भारताचा डंका! यूट्यूबच्या CEO पदी भारतीय वंशाच्या नील मोहन यांची नियुक्ती

  • यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार सुसान व्होजिकी या आपल्या पदावरून पायउतार झाल्या आहेत. आता अमेरिकास्थित भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने घोषणा केली आहे.
  • यूट्यूब हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म आहे. सुसान व्होजिकी गुगलच्या जाहिरात विभागात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. या २०१४ साली यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती झाली. पण, कौटुंबिक, आरोग्य आणि वैयक्तिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी यूट्यूबचा राजीनामा देत असल्याचा सुसान व्होजिकी यांनी सांगितलं.
  • नील मोहन यांनी २००८ साली गुगलमधून आपल्या कामाला सुरुवात केली होती. २०१५ साली ते यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून रुजू झाले. नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी १५ वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यानंतर आता यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार पदी नील मोहन यांनी नियुक्ती झाली आहे. दरम्यान, सुसान व्होजिकी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अल्फाबेट इंकच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांची पडले.

साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! शिर्डीत नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त; समृद्धी महामार्ग, वंदे भारतनंतर मिळाली तिसरी भेट

  • शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज(गुरुवार) सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत.
  • शिर्डीसाठी ही गेल्या दोन महिन्यांतील तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आणि आता नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. गेल्या काही कालखंडापासून यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे तातडीने हा परवाना देण्याबाबत आग्रह धरला आणि आज(गुरुवार) सकाळी डीजीसीएकडून हा परवाना प्राप्त झाला.
  • सध्या शिर्डीला १३ विमानसेवा – शिर्डी विमानतळही देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये सुरु झाले होते. आता या सुविधेमुळे शिर्डी यात्रा तर सुलभ होईलच. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल, तेव्हा साधारणत: मार्च/एप्रिलपासून आता रात्रीचीही विमानसेवा यामुळे प्रारंभ होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिर्डीला १३ विमानसेवा आहेत.

पाणी सुरक्षा हा चिंतेचा विषय- पंतप्रधान

  • पाणी सुरक्षा हा मोठा चिंतेचा विषय असल्याचे सांगून, देशाच्या निसर्गाशी असलेल्या ‘भावनिक नात्याचे’ पुनरुज्जीवन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. या नात्यालाच जग ‘कायमस्वरूपी विकास’ म्हणते, असे त्यांनी सांगितले.
  • आध्यात्मिकतेचा प्रसार करणारे ब्रह्मकुमारीज आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालय यांची संयुक्त देशव्यापी मोहीम असलेल्या ‘जल अभियानाचे’ उद्घाटन करताना मोदी बोलत होते. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील ब्रह्मकुमारीजच्या अबू रोड मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी दूरचित्रसंवादाद्वारे संबोधित केले. पाण्याचे संवर्धन हा सामूहिक चिंतेचा विषय असायला हवा असे सांगतानाच, जलप्रदूषण आणि भूजलाच्या पातळीत होणारी घट याबाबत मोदी यांनी चिंता व्यक्त केली.
  • ही जनजागृती पुढील आठ महिने देशभर राबवली जाणार असून, त्याद्वारे १० कोटी लोकांशी संपर्क साधला जाणार आहे. ‘एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येमुळे पाणी सुरक्षा हा भारतासाठी अतिशय चिंतेचा विषय आहे. ही आपणा सर्वासाठी सामूहिक जबाबदारी आहे. पाणी असेल, तरच उद्याचा दिवस असेल त्यासाठी आपल्याला आजपासूनच मिळून प्रयत्न करावे लागतील’, असे मोदी म्हणाले. जलसंवर्धन हा हजारो वर्षे भारताच्या अध्यात्माचा भाग राहिलेला आहे. त्यामुळेच आपण पाण्याला ईश्वर आणि नद्यांना माता म्हणतो. ज्या वेळी एखादा समाज निसर्गाशी असा भावनिक संबंध स्थापित करतो, तेव्हा जग त्याचे वर्णन ‘कायमस्वरूपी विकास’ असा करते, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

त्रिपुरामध्ये ८१ टक्के मतदान, केंद्रांवर मोठय़ा रांगा; ब्रू स्थलांतरितांचे अनेक वर्षांनंतर मतदान

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. एकूण ८१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. मतदानासाठी राज्यातील विविध मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. तुरळक घटना वगळता राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले. २ मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

त्रिपुरा विधानसभेची सदस्य संख्या ६० असून सत्ता स्थापनेसाठी ३१ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ७९ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी मतदानाची निर्धारित वेळ वाढवून रात्री ९.३० करण्यात आली होती. यंदा गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झाले आहे. राज्यात नुकत्याच पुनस्र्थापित करण्यात आलेल्या ब्रू स्थलांतरितांनी प्रथमच मतदानात भाग घेतला. राज्यात ब्रू निर्वासितांची एकूण लोकसंख्या ३७,१३६ असून त्यापैकी १४,००५ मतदानासाठी पात्र आहेत.

मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर:

  • राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यंदा कोल्हापूरचे प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर झाला आहे.
  • तर ग्रंथाली प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विभागाच्या सन 2022च्या पुरस्कारांची घोषणा केली.
  • यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कारांचा समावेश आहे.
  • विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
  • प्रा. नलगे यांनी कथा कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या 90 आहे.
  • श्री. पु. भागवत पुरस्कार पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला जाहीर झाला आहे. 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ
  • तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कारासाठी द. ता. भोसले यांची निवड झाली आहे. रोख 2 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना जाहीर झाला आहे. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी) कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना जाहीर झाला आहे. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

आता आग्रा किल्ल्यावर साजरी होणार शिवजंयती:

  • पुरातत्व खात्याने आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे.
  • आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’मध्ये शिवजयंती साजरी करता येईल, असं पुरातत्व खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
  • महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मागितली होती.
  • मात्र, त्यांना वारंवार परवानगी नाकारण्यात आली होती.

संरक्षण क्षेत्रातील 75 टक्के खरेदी देशांतर्गत:

  • संरक्षण क्षेत्रासाठी असलेल्या एकूण भांडवली खर्चाच्या तरतुदीपैकी, 2023-24 साली देशांतर्गत संरक्षण उत्पादकांकडून खरेदीसाठी भारत 75 टक्के रक्कम खर्च करेल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिली.
  • निरनिराळी शस्त्रे व इतर लष्करी साहित्य यांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
  • 201 सामंजस्य करार, 53 महत्त्वाच्या घोषणा आणि नऊ उत्पादने बाजारात आणणे अशा 266 भागीदारींवर एअरो-इंडिया प्रदर्शनात शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • यातून संरक्षण क्षेत्रात सुमारे 80 हजार कोटींचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.
  • सामंजस्य करारांमध्ये, हेलिकॉप्टर इंजिन्सचा आराखडा, विकास, उत्पादन आणि नेहमीसाठी देखरेख यांकरिता संयुक्त उपक्रमासाठी हिंदूस्तान एरॉनॉटिक्स लि. आणि फ्रान्सचे साफ्रान हेलिकॉप्टर इंजिन्स यांच्यातील कराराचा समावेश आहे.
  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भारतातील संरक्षण उद्योगांतील उच्चपदस्थ नेते आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘बंधन’ कार्यक्रमात करार आणि सामंजस्य करार यांच्यावर औपचारिकरीत्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Velocity ने लॉन्च केला भारतातील पहिला AI असिस्टंट ‘Lexi’:

  • सध्या जगभरात फक्त टेक्नॉलॉजी क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात OpenAI ChatGpt ची चर्चा सुरु आहे.
  • OpenAI ने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने विकसित केलेल्या ChatGpt चॅटबॉट आणि त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी Google ने देखील आपले Bard चॅटबॉट लॉन्च केला आहे.
  • यामध्ये भारतात देखील देशातील पहिला इंटिग्रेटेड चॅटबॉट लॉन्च केला आहे.
  • भारतीय वित्तीय कंपनी Velocity ने देशातील पहिला ChatGPT इंटिग्रेटेड चॅटबॉट लॉन्च केला आहे.
  • या कंपनीने या चॅटबॉटचे नाव Lexi असे ठेवले आहे.
  • Velocity ने AI चा फायदा घेऊन सध्याच्या अ‍ॅनालिटिक्स टूल व्हेलॉसिटी इनसाइट्ससह ते एकत्रित करण्यात आले आहे.
  • Velocity Insights वापरणारे भारतीय ई-कॉमर्स ब्रँड मेटा मालकीच्या WhatsApp वर दैनंदिन व्यावसायिक रिपोर्ट मिळवू शकतात.
  • हे ई-कॉमर्स साइट्सना त्यांची व्यवसाय कार्ये विकसित करण्यास मदत करणार आहे.

दीप्ती शर्मा भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी बनली पहिली गोलंदाज:

  • दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याला केपटाऊन येथे सुरुवात झाली.
  • सामन्यात अष्टपैलू खेळाडू भारताची स्टार गोलंदाज दीप्ती शर्माने शानदार कामगिरी करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • टी20फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी ती पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे.
  • तिने पूनम यादवचा 98 विकेट्सचा विक्रम मोडत 100 विकेट्स घेत नवीन विक्रमाची नोंद केली.
  • सामन्यात एकाचा षटकात दोन विकेट्स घेत तिने नवीन विक्रम केला.
  • आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदच्या नावावर आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१७ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.