१९ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१९ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 19 November 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१९ नोव्हेंबर चालू घडामोडी

आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला २५ सुवर्णपदके:

  • भारतीय नेमबाजांनी कोरियात दाएगू येथे झालेल्या १५व्या एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत २५ सुवर्णपदकांची कमाई करताना आपली छाप पाडली. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी भारताने दोन सुवर्णपदके पटकावली. मनू भाकर आणि सम्राट राणा जोडीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कुमार गटात सांघिक सुवर्णपदक जिंकले. तसेच रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू यांनी याच स्पर्धा प्रकारात वरिष्ठ गटातून सोनेरी यश मिळवले. त्यामुळे भारताने या स्पर्धेत २८ प्रकारांतून २५ सुवर्णपदके मिळवून वर्चस्व राखले.
  • संगवान-सिद्धू जोडीने अचूक लक्ष्य साधताना मिश्र सांघिक गटात कझाकस्तानच्या व्हॅलेरी रखीमधान-इरिना युनुस्मेमटोवा जोडीचा १७-३ असा पराभव केला. शिवा नरवाल आणि युविका तोमर जोडीला कांस्यपदकाच्या लढतीत कोरियन जोडीकडून ६-१६ असा पराभव पत्करावा लागला.
  • कुमार गटात याव स्पर्धा प्रकारात मनू-सम्राट जोडीने (५७८ गुण) पात्रता फेरीतून दुसऱ्या क्रमांकासह अंतिम फेरीत प्रवेश केला. उझबेकिस्तानची जोडी ५७९ गुणांसह आघाडीवर होती. अंतिम फेरीत मात्र भारतीय जोडीने उझबेकिस्तानच्या निगिना सैदकुलोवा-मुखम्मद कामालोव जोडीवर १७-३ अशी मात केली.

‘एसटी’च्या ताफ्यात येणार पाच हजार इलेक्ट्रिक आणि दोन हजार डिझेल बसगाड्या:

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
  • दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता-टापटीपपणा ठेवून गाड्यांची निगा राखा आणि राज्यातील जनतेला दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
  • राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत, यापूर्वीच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या दोन हजार बसेस घेण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करून ५ हजार१५० इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली. या बसगाड्या घेण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून कर्ज घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. इलेक्ट्रिक बसेस या वातानुकुलित असल्याने त्याचे सध्याच्या वातानुकूलित बसेस पेक्षा तिकिटदर कमी ठेवून सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

देशाच्या अवकाश क्षेत्रात खासगी ‘विक्रमा’रंभ:

  • अवघ्या चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नवउद्योगाने संपूर्ण विकसित केलेल्या ‘विक्रम-एस’ उपग्रह प्रक्षेपकाद्वारे तीन उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशातील नियोजित कक्षेत शुक्रवारी भारतातर्फे सोडण्यात आले. याद्वारे भारताच्या अवकाश मोहिमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाची नांदी झाली आहे. आतापर्यंत भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) या दिग्गज सरकारी संस्थेची यात मक्तेदारी होती.
  • चेन्नईपासून सुमारे ११५ किलोमीटरवरील ‘इस्रो’च्या सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी साडेअकराला हे प्रक्षेपण झाले. ‘स्कायरूट एरोस्पेस’ या खासगी नवउद्योगाने (स्टार्ट अप) निर्मित केलेल्या या उपग्रह प्रक्षेपकाला ‘विक्रम-एस’ असे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांचे नाव देऊन त्यांच्या या क्षेत्रातील योगदानास औचित्यपूर्ण अभिवादन करण्यात आले आहे. २०२० मध्ये केंद्राने अवकाश क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले केल्यानंतर ही प्रक्षेपकाची यशस्वी निर्मिती व प्रक्षेपण करणारी ‘स्कायरूट एरोस्पेस’ ही भारतातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे.
  • ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर’ या अवकाशविषयक नियामक संस्थचे अध्यक्ष पवन गोएंका यांनी येथील ‘इस्रो’च्या मोहीम नियंत्रण केंद्रातून बोलताना सांगितले, की ‘स्कायरूट एरोस्पेस’द्वारे ‘मिशन प्रारंभ’ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. या प्रक्षेपकाने ‘स्कायरूट’ने नियोजित केलेली ८९.५ किलोमीटरची उंची आणि १२१.२ किलोमीटरची कक्षाश्रेणी नेमकी गाठली आहे. नियोजनानुसार हे प्रक्षेपक कार्यान्वित झाले. त्यामुळे ‘स्कायरूट एरोस्पेस’ने उपग्रह प्रक्षेपकातील उपप्रणीली निर्मितीची आपली क्षमता सिद्ध केली आहे. भारतीय खासगी क्षेत्रासाठी अवकाश क्षेत्रातील ही एक नवी सुरुवात आहे. आपल्या सर्वासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.
  • या मोहिमेत तीन व्यावसायिक उपग्रह आहेत. यापैकी दोन देशांतर्गत ग्राहकांचे असून, एक परदेशी ग्राहकाचा आहे. ६ मीटर उंच उपग्रह प्रक्षेपक वाहन जगातील पहिल्या काही सर्व-संमिश्र प्रक्षेपकांपैकी एक आहे. त्यात प्रक्षेपकाच्या स्थैर्यासाठी ‘३-डी पिंट्रेड सॉलिड थ्रस्टर’ आहेत.

यूएईच्या १७ वर्षीय क्रिकेटपटूने रचला विश्वविक्रम, सचिन तेंडुलकरला मागे टाकून घेतली भरारी:

  • संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) युवा खेळाडू अयान अफझल खानने शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) नेपाळविरुद्धच्या, तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने इतिहास रचला. अफझल खानने प्रथम फलंदाजीत अर्धशतक झळकावले आणि नंतर गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्याच्या जोरावर त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसनी घातली आहे.
  • या सामन्यात ८व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अफझल खानने ६३ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५४ धावा केल्या. त्यामुळे यूएई संघाने ९ गडी गमावून १७६ धावा केल्या. तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
  • प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाने आसिफ शेख (नाबाद ८८) आणि ज्ञानेंद्र मल्ला (६४ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४०.१ षटकांत ४ गडी गमावून विजय मिळवला. गोलंदाजीत अफझलने १० षटकात २७ धावा देत १ बळी घेतला. कृपया सांगा की या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफझल खानने १४ धावांत ४ बळी घेतले होते, हा त्याचा या फॉर्मेटमधील पदार्पण सामना होता.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करणारा आणि एका सामन्यात ४ विकेट घेणारा अफझल खान हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या १७ वर्षे ३ दिवसांत हा पराक्रम करून त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडले आहे. अफझल खानने १७ वर्षे २१० दिवस वयात हा पराक्रम करणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद अमीरचा विक्रम मोडला. तर सचिन तेंडुलकरने १८ वर्षे १८१ दिवसांत हे स्थान मिळवले आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१९ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.