२ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 2 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२ जानेवारी चालू घडामोडी

रोनाल्डो नव्या वर्षांपासून सौदी अरेबियात खेळणार:

  • आधुनिक फुटबॉलमधील तारांकित खेळाडू पोर्तुगालचा ख्रिस्तिआनो रोनाल्डो नव्या वर्षांत सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळणार आहे. फुटबॉल विश्वातील त्यातही मध्य आशियातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते. अल नासर क्लबने आपल्या क्लबची जर्सी घेतलेल्या रोनाल्डोचे छायाचित्र समाज माध्यमावर टाकून या घडामोडीची माहिती जाहीर केली. रोनाल्डोचा हा करार सर्वात मोठा मानला जात असला, तरी कराराची रक्कम अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.
  • या नव्या करारामुळे युरोपातील एक आघाडीचा खेळाडू प्रथमच आशियातून खेळताना दिसणार असून, रोनाल्डोचा हा करार २०२५ पर्यंत असेल. रोनाल्डोशी झालेल्या करारामुळे केवळ आमच्या क्लबलाच यश मिळणार नाही, तर स्थानिक लीग आणि देशातील फुटबॉलपटूंना सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असे क्लबच्या वतीने सांगण्यात आले आहे.
  • पाच  बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी ३७ वर्षीय रोनाल्डोचा हा कारकीर्दीमधील अखेरचा करार मानला जात आहे. कराराची नेमकी रक्कम गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली, तरी प्रसार माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार प्रति वर्षी तब्बल २० कोटी डॉलर (१७ अरब रुपये) इतकी घसघशीत असेल. यामुळे आता रोनाल्डो फुटबॉल विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरेल.
  • फुटबॉल विश्वातील एका नव्या देशात खेळण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे रोनाल्डोने म्हटले आहे. मला जे काही मिळवायचे होते, ते मी युरोपमध्ये खेळताना मिळविले. त्यामुळे आता वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच मी आशियात खेळण्याचा निर्णय घेतला असेही रोनाल्डो म्हणाला. कतार विश्वचषक स्पर्धेत रोनाल्डोची कामगिरी निराशाजनक राहिली होती. बाद फेरीत तर त्याला राखीव खेळाडूंत बसविण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा आजपासून:

  • महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहुउद्देशीय महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाना सोमवारपासून (२ जानेवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा १२ जानेवारीपर्यंत राज्यातील विविध आठ केंद्रांवर पार पडेल.
  • महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना गेली २३ वर्षे या स्पर्धेसाठी प्रयत्नशील होती. अखेर या स्पर्धेला मुहूर्त सापडला असून, राज्यातील १० हजार ४५६ खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. एकूण ३९ क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश असून, राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी हे व्यासपीठ उभे करण्यात आल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर, राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते.
  • स्पर्धेत राज्यातील सर्वोत्तम आठ संघ सांघिक, तर सर्वोत्तम आठ खेळाडू वैयक्तिक प्रकारात सहभागी होतील. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ जानेवारीला म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या वेळी विविध आठ केंद्रांवरून आलेल्या क्रीडा ज्योत एकत्र करून मुख्य मैदानावरील ज्योत प्रज्वलित करण्यात येईल.
  • या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासन मुख्य प्रायोजक असून एकूण १९ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आयोजनात कमतरता राहू नये यासाठी आवश्यकतेनुसार निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही सरकारने दिली आहे.

नोटबंदीचा निर्णय योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे:

  • केंद्र सरकारने २०१६ साली केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे. २०१६ सालातील नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने १००० व ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. या निर्णयानंतर रातोरात १० लाख कोटी रुपये चलनातून बाद करण्यात आले होते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जनतेला संबोधित करत नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाद्वारे एका झटक्यात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या होत्या.
  • या निर्णयानंतर देशभरात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. नोटा बदलण्यासाठी नागरिकांना आपली कामे सोडून रांगेत उभे राहावे लागले होते. रांगेत उभे राहिल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त तेव्हा समोर आले होते.
  • याच कारणामुळे मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध केला होता. मोदी सरकारच्या याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जीएसटी संकलनात डिसेंबरमध्ये १५ टक्के वाढ; १.४९ लाख कोटी जमा:

  • वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) डिसेंबर २०२२ मधील महसूल संकलन १५ टक्क्यांनी वाढून १.४९ लाख कोटींवर पोहोचले. सुधारित उत्पादनाचे सुधारित प्रमाण आणि विनियोग मागणीतील वाढीचे हे निदर्शक आहे. तसेच हे या करविषयक नियमांचे चांगल्या अनुपालनाचेही निदर्शक आहे.
  • या करसंकलनापोटी महसूल १.४० लाख कोटींवर राहण्याचा डिसेंबर हा सलग दहावा महिना आहे. नोव्हेंबरमधील कर संकलन सुमारे १.४६ लाख कोटी होते.
  • अर्थ मंत्रालयाने या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले, की डिसेंबर २०२२ मध्ये ‘जीएसटी’चा एकूण महसूल १,४९,५०७ कोटी संकलित झाला. यात केंद्रीय ‘जीएसटी’ (सीजीएसटी) २६ हजार ७११ कोटी, राज्याचा ‘जीएसटी’ (एसजीएसटी) ३३ हजार ३५७ कोटी, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आजीएसटी) ७८ हजार ४३४ कोटी (आयातीवर संकलित ४० हजार २६३ कोटींसह) आणि उपकरापोटी ११ हजार ५ कोटी (आयातीवर संकलित ८५० कोटींसह) एवढा महसूल संकलित झाला.
  • डिसेंबर २०२२ चा महसूल मागील वर्षी याच महिन्यात झालेल्या ‘जीएसटी’ संकलनापेक्षा १५ टक्के जास्त आहे, मागील वर्षी हा महसूल १.३० लाख कोटींच्या आसपास होता. या महिन्यात आयातीतून मिळणारा महसूल आठ टक्क्यांनी अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारापोटीचा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा १८ टक्क्यांनी अधिक आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये ७.९ कोटी ‘ई वे बिले’ झाली. ऑक्टोबर २०२२ मध्ये जारी केलेल्या ७.६ कोटी ‘ई-वे बिलां’च्या तुलनेत लक्षणीय होती.
  • एप्रिलमध्ये ‘जीएसटी’पोटी सुमारे १.६८ लाख कोटींचे विक्रमी महसूल संकलन झाले होते. मेमध्ये सुमारे १.४१ लाख कोटी, जून (१.४५ लाख कोटी), जुलै (१.४९ लाख कोटी), ऑगस्ट (१.४४ लाख कोटी), सप्टेंबर (१.४८ लाख कोटी), ऑक्टोबर (१.५२ लाख कोटी) ), नोव्हेंबर (१.४६ लाख कोटी) आणि डिसेंबर (१.४९ लाख कोटी) एवढे संकलन झाले आहे.

पॅलेस्टाईन-इस्रायल प्रश्नावरील ठरावावर भारत तटस्थ:

  • इस्रायलने पॅलेस्टाईनच्या भूभागाचा दीर्घकाळपर्यंत ठेवलेला ताबा आणि विलिनीकरणाच्या कायदेशीर परिणामांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मत मागण्याच्या संयुक्त राष्ट्र आमसभेतील ठरावावर भारत तटस्थ राहिला. अमेरिका आणि इस्रायलने ठरावाच्या विरोधात मतदान केले. भारतासह ब्राझील, जपान, म्यानमार, फ्रान्स आदी देश तटस्थ राहिले.
  • ‘पूर्व जेरुसलेमसह इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशातील पॅलेस्टिनी नागरिकांच्या मानवी हक्कांवर परिणाम करणाऱ्या इस्रायली आचरणाची पद्धत’ या ठरावाचा मसुदा शुक्रवारी ८७ विरुद्ध २६ मतांनी मंजूर झाला. भारतासह ५३ देश तटस्थ राहिले. या ठरावाद्वारे आंतरराष्ट्रीय न्यायालयास विनंतीचा निर्णय घेण्यात आला. १९६७ पासून पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशावर इस्रायलचा ताबा, आक्रमणामुळे पॅलेस्टिनी नागरिकांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकारांच्या उल्लंघनाचे कायदेशीर परिणाम काय होतील, याबाबत सल्ला देण्याची विनंती या न्यायालयाला करण्यात येणार आहे.
  • तसेच जेरुसलेम या पवित्र शहराची लोकसंख्यानिहाय रचना, वैशिष्टय़े व स्थिती बदल, येथे लागू केलेले पक्षपाती कायदे याबाबत कायदेशीर उपाययोजना सुचवण्याचीही विनंती करण्यात येणार आहे. त्याच बरोबर इस्रायलची धोरणे व कार्यपद्धतीमुळे येथील कायदेशीर ताब्याच्या वैधतेवर कोणते परिणाम होत आहेत, तसेच इतर देश व संयुक्त राष्ट्रांना यामुळे कोणत्या कायदेशीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, याबाबतही न्यायालयाने सल्ला देण्याची विनंती या ठरावाद्वारे केली गेली आहे.

जीएसटी संकलनात डिसेंबरमध्ये 15 टक्के वाढ:

  • वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) डिसेंबर 2022 मधील महसूल संकलन 15 टक्क्यांनी वाढून 1.49 लाख कोटींवर पोहोचले.
  • सुधारित उत्पादनाचे सुधारित प्रमाण आणि विनियोग मागणीतील वाढीचे हे निदर्शक आहे.
  • तसेच हे या करविषयक नियमांचे चांगल्या अनुपालनाचेही निदर्शक आहे.
  • या करसंकलनापोटी महसूल 1.40 लाख कोटींवर राहण्याचा डिसेंबर हा सलग दहावा महिना आहे.
  • नोव्हेंबरमधील कर संकलन सुमारे 1.46 लाख कोटी होते.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय:

  • मोदी सरकारने 2016 साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला.
  • केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैधच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
  • केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण 58 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
  • या याचिकांवरील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने 7 डिसेंबर 2022 रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.
  • तसेच आरबीआय कायद्यातील कलम 26 (2) हेदेखील असंवैधानिक ठरवले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

टीम इंडियातील खेळाडूंना पास करावी लागणार ‘डेक्सा’ चाचणी:

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या वाढत्या दुखापतीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
  • याआधी खेळाडूंना संघात निवड होण्यापूर्वी केवळ यो-यो चाचणी द्यावी लागत होती, परंतु आता बोर्डाने डेक्सालाही निवड निकषांचा एक भाग बनवले आहे.
  • या स्कॅनमध्ये कोणतीही समस्या आढळल्यास खेळाडूची संघात निवड केली जाणार नाही.
  • यो-यो चाचणी व्यतिरिक्त, नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी (NCA) पॅनेलने खेळाडूंना खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यापूर्वी चाचणीचा आणखी एक वैज्ञानिक स्तर जोडण्यासाठी डेक्सा स्कॅन जोडण्याची शिफारस देखील केली.
  • शरीराची रचना आणि हाडांचे आरोग्य मोजण्यासाठी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय मानक म्हणजे डेक्सा स्कॅन, 10-मिनिटांची चाचणी जी संपूर्ण शरीराचे मोजमाप करते.
टीम इंडियातील खेळाडूंना पास करावी लागणार ‘डेक्सा’ चाचणी:

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.