३० डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३० डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 30 December 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३० डिसेंबर चालू घडामोडी

देशात कुठूनही मतदानाची सुविधा; एका यंत्राला ७२ मतदारसंघ जोडण्याची चाचपणी; काँग्रेसचा विरोध:

  • देशांतर्गत स्थलांतरित नागरिकांना आपापल्या मतदारसंघात न जाता कुठूनही मतदान करता यावे, यासाठी खास सुविधा पुरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. दूरस्थ मतदानाच्या सुविधेसाठी मतदानयंत्राचे प्रारूप तयार करण्यात आले असून, १६ जानेवारी रोजी राजकीय पक्षांसमोर सादरीकरण होणार आहे. मात्र काँग्रेसने या प्रस्तावाला आपला विरोध असल्याचे जाहीर केले आहे.
  • देशातील विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी बहुमतदारसंघीय दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांचा वापर केला जाऊ शकतो. दूरस्थ मतदारकेंद्रातील एका मतदारयंत्राला एकाचवेळी ७२ मतदारसंघ जोडलेले असतील. या मतदारसंघांतील नोंदणीकृत मतदाराचे मत हे मतदानयंत्र स्वीकारेल.
  • केंद्रीय निवडणूक आयोगाला या सुविधेची अंमलबजावणी करण्यापूर्वी कायदेशीर तसेच, तांत्रिक पूर्तता करावी लागेल. त्याआधी प्रायोगिक तत्त्वावर यंत्रणा राबवण्यापूर्वी मतदानयंत्राच्या प्रारूपावर सविस्तर चर्चा करण्यासाठी राजकीय पक्षांसमोर सादरीकरण केले जाणार आहे.
  • ३१ जानेवारीपर्यंत लेखी सूचना वा हरकती पाठवण्याचे आवाहन पक्षांना केल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. देशातील स्थलांतरितांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी, रोजगार, लग्न, शिक्षण अशा विविध कारणांमुळे प्रामुख्याने ग्रामीण भागांतील लोक देशांतर्गत स्थलांतर करतात. त्यापैकी ८५ टक्के देशांतर्गत स्थलांतर आपापल्या राज्यामध्येच होते. या स्थलांतरित मतदारांना त्यांच्या विद्यमान निवासाच्या ठिकाणाहून मतदानाच्या दिवशी आपल्या घरी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे दूरस्थ मतदानाची सुविधा पुरवण्याचा विचार गांभीर्याने केला गेला, असे आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे.

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखरनच विक्रम लिमये, अजित रानडे, अंबानी-अदानी पुत्र सदस्यपदी:

  • राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलपर्यंत विकासित करण्यासाठी विविध क्षेत्रांच्या वाढीचे धोरण ठरविण्याकरिता राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानभेत केली. या परिषदेच्या अध्यक्षपदी ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • परिषदेच्या सदस्यपदी विक्रम लिमये, डॉ. अजित रानडे, मिलिंद कांबळे, एस. एन. सुब्रमण्यम, अंबानी आणि अदानी यांच्या पुत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलपर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. त्याच्या पूर्ततेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. त्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरची (एक ट्रिलियन डॉलर) करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उद्योग, ऊर्जा, बँकिंग, सामाजिक क्षेत्र, नियोजन, अभियांत्रिकी, शिक्षण, कृषी, वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या समितीत राहतील. 

करोना रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; चीनसह सहा देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आता:

  • चीन आणि इतर देशांमध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. करोनाच्या BF.7 या व्हेरियंटचा धोका वाढू नये यासाठी काही निर्णय घेण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता आरटी पीसीआर टेस्ट बंधनकारकर करण्यात आली आहे.
  • या सहा देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आता प्रवास सुरु करण्याआधी एअर सुविधा पोर्टलवर टेस्टचा रिपोर्ट अपलोड करावा लागणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सहा देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता १ जानेवारीपासून आरटी-पीसीआरचा निगेटीव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. चीन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्यानंतर हा खबरदारीचा उपाय घेण्यात येत आहे.
  • जानेवारी महिन्यात भारतात करोनाचा फैलाव जलदगतीने होऊ शकतो, अशी शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर मोघमपणे काही प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येत होती. बुधवारी झालेल्या सहा हजार करोना चाचण्यांपैकी ३९ लोक करोना पॉझिटिव्ह आढळले होते.

पेलेंनी खरोखरच युद्ध थांबवले होते का? जाणून घ्या काय घडलं होतं ५३ वर्षांपूर्वी:

  • महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले ब्राझीलचे दिग्गज पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या मुलीने गुरुवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर दुजोरा दिला. कोलन कॅन्सरशी झुंज देत असलेल्या ब्राझीलच्या माजी फुटबॉलपटूने केमोथेरपी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. या महान खेळाडूच्या निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की १९६० मध्ये पेले यांच्यामुळे एक युद्ध थांबले होते. चला जाणून घेऊया या घटनेबद्दल.
  • गोष्ट १९६९ सालची – पेले यांनीन त्याच्या कारकिर्दीचा बराचसा काळ सँटोस फुटबॉल क्लबमध्ये घालवला. पेले यांच्यामुळे १९६० च्या दशकात सॅंटोस फुटबॉल क्लब जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल क्लबपैकी एक होता. हा संघ जगभर ओळखला गेला आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये भाग घेतला. असाच एक सामना ४ फेब्रुवारी १९६९ रोजी नायजेरियातील युद्धग्रस्त भागात खेळला गेला होता. या सामन्यात सँटोसचा सामना बेनिन सिटीच्या क्लबशी झाला होता. सँटोसचा संघ २६ जानेवारी १९६९ रोजी नायजेरियाला पोहोचला. तेव्हा तेथील परिस्थिती गंभीर होती.
  • नायजेरियात सुरू होते गृहयुद्ध – तेव्हा नायजेरियात गृहयुद्ध सुरू होते. नायजेरिया आणि बियाफ्रा यांच्यात युद्ध झाले. या लढ्यात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर लाखो लोक बेघर झाले होते. दरम्यान, पेले येथे येताच नायजेरिया आणि बियाफ्रा यांच्यातील युद्ध ४८ तासांपेक्षा जास्त काळ थांबले होते. इतिहासकार गुरमन गोर्चे यांनी सांगितले की, सामन्यापूर्वी ब्राझीलचे खेळाडू आणि अधिकारी संघाच्या सुरक्षेबाबत खूप चिंतेत होते. अशा स्थितीत नायजेरियातील युद्ध थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा सामना खेळवला जाऊ शकला. त्या सामन्यात सँटोसने बेनिन सिटीच्या क्लबचा २-१ असा पराभव केला. मात्र, या घटनेबाबत वेगवेगळ्या गोष्टीही सांगण्यात आल्या. १९७७ मध्ये पेले यांच्या पहिल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख नव्हता.

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे ८२ व्या वर्षी कॅन्सरने निधन:

  • फुटबॉल विश्वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते.
  • पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. १९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.
  • पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष निगरानीत ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले.
  • पेले यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पेले यांचा फोटो शेअर करत दिली. प्रेम आणि प्रेरणा हीच पेले यांची खासियत होती,असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. महान फुटबॉलपटूच्या निधनाचे वृत्त समजताच जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली.

जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा – हम्पी सहाव्या स्थानी:

  • गतविजेत्या कोनेरू हम्पीला (७.५ गुण) ‘फिडे’ जागतिक जलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटात सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खुल्या गटात युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने (९ गुण) चांगली कामगिरी करताना नववे स्थान मिळवले.
  • खुल्या गटात उझबेकिस्तानच्या नोदिर्बेक अब्दुसात्तोरोव्हने ९.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. त्याच्यात आणि नवव्या स्थानावरील गुकेशमध्ये केवळ अध्र्या गुणाचा फरक होता. गुकेशने १०व्या फेरीत इस्रायलचा अनुभवी खेळाडू बोरिस गेकफंडवर विजयाची नोंद केली. पुढील फेरीत त्याने जॉर्जियाच्या जोबाव्हा बादुरला पराभूत केले. त्यानंतरच्या दोन फेऱ्यांत त्याने विजेत्या अब्दुसात्तोरोव्ह आणि अलेक्झांडर ग्रीशूकला बरोबरीत रोखले.
  • याच गटात मित्राभा गुहा (८.५), विदित गुजराथी (७.५) आणि हरिश भरतकोटी (७) यांनी अनुक्रमे १५, ४५ आणि ६०वे स्थान मिळवले. महिलांमध्ये हम्पीचे अखेरच्या दिवशी विजेती अलेक्झांड्रा कोस्तेनिउक, अ‍ॅन्टोआनेटा स्टेफानोव्हा आणि गुल्नार मामादोव्हा यांच्याविरुद्धचे सामने बरोबरीत सुटले. युवा आर. वैशालीने ७ गुणांसह १४वे स्थान मिळवले. वंतिका अग्रवाल (६) आणि पद्मिनी राऊत (५.५) यांना अनुक्रमे ३८ आणि ४९व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागतासाठी सरकारची नवीन नियमावली; मुंबईतील ‘या’ ठिकाणी जमण्यास असेल मनाई:

  • गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यातून करोनाचा प्रसार होऊ शकतो, त्यामुळे राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सोबतच ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय.
  • राज्यात २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला कार्यक्रमासाठी सभागृह बूक करण्यात आले असतील तर तिथे आसनक्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी असेल. तसेच याठिकाणी गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतर राखले जाईल, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर केला जाईल, याकडे लक्ष देणं आवश्यक असेल. ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलंय.
  • ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करू नये. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी याठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये. नववर्षाच्या निमित्ताने कोणत्याही धार्मिक, सांस्कतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची आतिषबाजी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

देशाच्या नवनिर्मितीसाठी कामाला लागा ; आयआयटी पदवीधरांना पंतप्रधानांचे आवाहन:

  • सरधोपट मार्ग सोडून आव्हानांचा स्वीकार करावा आणि येत्या २५ वर्षांत आपल्याला जसा देश पाहिजे आहे, त्यासाठी काम सुरू करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयआयटीच्या पदवीधरांना केले. देशघडणीच्या कार्यात आतापर्यंत आपण खूप वेळ वाया घालविला आहे, अशी खंतही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूरच्या ५४ व्या पदवीदान समारंभात मोदी बोलत होते. तरुणांनी देशाची धुरा आता आपल्या खांद्यावर घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
  • मोदी म्हणाले की, स्वातंर्त्यप्राप्तीनंतर भारतानेही आपला नवा प्रवास सुरू केला आहे. त्यानंतर २५ वर्षांच्या काळात देश स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी मोठे काम व्हायला पाहिजे होते, पण बराचसा वेळ वाया घालविण्यात आला. देशाचा खूप वेळ वाया गेला. या दरम्यान दोन पिढय़ा गेल्या, पण आता आपल्याला एक क्षणही वाया घालवून चालणार नाही. देशाच्या विकासाची आघाडी आता तरुणांना सांभाळावी आणि योग्य मार्गाने आपले काम सुरू करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
  • यावेळी पंतप्रधानांनी ब्लॉकचेन आधारित पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना बहाल केली. समारंभाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

रिलायन्समध्ये मोठा नेतृत्वबदल होणार? खुद्द मुकेश अंबानींनीच दिले संकेत; म्हणाले, “आता:

  • देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात श्रीमंत उद्योगसमूहांपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि रिलायन्समध्ये आता मोठा नेतृत्वबदल होण्याची शक्यता आहे. खुद्द रिलायन्स समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी त्यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. रिलायन्स फॅमिली डेच्या निमित्ताने मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूहातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि भागधारकांशी संवाद साधला.
  • यावेळी मुकेश अंबानी यांनी भविष्यात रिलायन्सची वाटचाल कशा पद्धतीने होईल, याविषयी भाष्य केलं. यावेळीच बोलताना मुकेश अंबानी यांनी रिलायन्समध्ये मोठे नेतृत्वबदल होणार असल्याचं भाष्य केलं आहे. त्यामुळे आता अंबानी कुटुंबाची तिसरी पिढी उद्योगविश्वात रिलायन्सचं नाव मोठं करण्यासाठी टेकओव्हर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • न्यूज १८नं दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स फॅमिली डेच्या दिवशी अर्थात मंगळवारी २८ डिसेंबर रोजी मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला आहे. रिलायन्स सध्या या प्रक्रियेमधून जात असून आकाश अंबानी, इशा अंबानी आणि अनंत अंबानी या उद्योगाला नव्या उंचीवर नेतील असं देखील विधान मुकेश अंबानी यांनी केलं आहे.

एका दिवसात दुप्पट रुग्णवाढ ; मुंबईतील २५१० जणांसह राज्यात ३९०० नवे करोनाबाधित:

  • करोनाने पुन्हा डोके वर काढले असून, बुधवारी दिवसभरात राज्यात ३,९०० रुग्ण आढळल़े त्यात सर्वाधिक २५१० रुग्ण मुंबईत आढळले आहेत़ मुंबईसह ठाणे परिसरात एका दिवसात दुप्पट रुग्णवाढ नोंदविण्यात आली आह़े
  • गेल्या काही दिवसांपासून मोठी रुग्णवाढ नोंदविणाऱ्या मुंबईत बुधवारी अडीच हजाराहून अधिक रुग्ण आढळल़े  मंगळवारी मुंबईत १३७७ रुग्ण आढळले होत़े  म्हणजे एका दिवसात मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या दुप्पट झाली़  ठाणे जिल्ह्यातही बुधवारी ४९३ रुग्ण आढळल़े  मंगळवारच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आह़े
  • गेल्या २४ तासांत राज्यात २० करोना रुग्णांचा मृत्यू झाला़  दिवसभरात १३०६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतल़े  राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १४ हजार ६५ इतकी झाली आहे.
  • ओमायक्रॉनचे ८५ नवे रुग्ण – राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचे ८५ नवे रुग्ण आढळल़े  त्यातील ३४ रुग्ण मुंबईतील असून, नागपूर आणि पिंपरी चिंचवडला प्रत्येकी तीन, नवी मुंबई, पुणे मनपा प्रत्येकी २ रुग्ण आहेत़ 

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखरनच विक्रम लिमये:

  • राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलपर्यंत विकासित करण्यासाठी विविध क्षेत्रांच्या वाढीचे धोरण ठरविण्याकरिता राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानभेत केली.
  • या परिषदेच्या अध्यक्षपदी ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • परिषदेच्या सदस्यपदी विक्रम लिमये, डॉ. अजित रानडे, मिलिंद कांबळे, एस. एन. सुब्रमण्यम, अंबानी आणि अदानी यांच्या पुत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2027 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलपर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.
  • त्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरची (एक ट्रिलियन डॉलर) करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • उद्योग, ऊर्जा, बँकिंग, सामाजिक क्षेत्र, नियोजन, अभियांत्रिकी, शिक्षण, कृषी, वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या समितीत राहतील.
  • निती आयोगाच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र इन्स्टिय़टय़ूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’(-मित्र) या संस्थेची स्थापन आधीच करण्यात आली असून, त्यांचे काम 1 जानेवारीपासून सुरू होईल.

अहमदनगरचं नामांतर ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ करण्याचा प्रस्ताव:

  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव हे अहमदनगरला देण्यात यावं असा प्रस्ताव केंद्र सरकारला लवकरच पाठवण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.
  • अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने करण्यात याविषयीचा प्रश्न भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तारांकित केला होता.
  • या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र विधानसभेने औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यासंबंधीचे दोन वेगळे प्रस्ताव एकमताने मंजूर केले.
  • हे दोन्ही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.
  • अहिल्याबाईंचा जन्म अहमदनगरमधल्या चौंडी गावात झाला त्यामुळे हे नामांतर करावं असं पडळकर यांनी पत्रात नमूद केलं होतं.

पोस्टातील ठेवींवर वाढीव व्याज:

  • केंद्र सरकारने, येत्या 1 जानेवारीपासून ठराविक अल्पबचत योजनांवरील व्याजदरात 0.20 ते 1.1 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
  • अल्पबचत योजनांतील गुंतवणुकीवर देय व्याजदराच्या तिमाहीगणिक फेरनिर्धारण करताना ही सुधारणा करण्यात आली आहे.
  • ज्येष्ठ नागरिक ठेव योजनेसह, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) या पोस्टाच्या बचत योजनांना वाढीव व्याज मिळणार आहे.
  • मात्र सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि सुकन्या समृद्धी या योजनांवरील व्याजदरांत बदल करण्यात आलेले नाहीत.
  • वाणिज्य बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली जात असताना, सरकारनेही अल्पबचत योजनांवरील व्याजदर वाढविणे क्रमप्राप्त होते.
  • त्यानुसार सुधारण करण्यात आलेले वाढीव व्याज दर हे नववर्षांत 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 कालावधीसाठी लागू असतील.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३० डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.