१ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 1 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१ जानेवारी चालू घडामोडी

पॅलेस्टाईन-इस्रायल प्रश्नावरील ठरावावर भारत तटस्थ:

  • इस्रायलने पॅलेस्टाईनच्या भूभागाचा दीर्घकाळपर्यंत ठेवलेला ताबा आणि विलिनीकरणाच्या कायदेशीर परिणामांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मत मागण्याच्या संयुक्त राष्ट्र आमसभेतील ठरावावर भारत तटस्थ राहिला.
  • अमेरिका आणि इस्रायलने ठरावाच्या विरोधात मतदान केले.
  • भारतासह ब्राझील, जपान, म्यानमार, फ्रान्स आदी देश तटस्थ राहिले.
  • ‘पूर्व जेरुसलेमसह इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशातील पॅलेस्टिनी नागरिकांच्या मानवी हक्कांवर परिणाम करणाऱ्या इस्रायली आचरणाची पद्धत’ या ठरावाचा मसुदा शुक्रवारी 87 विरुद्ध 26 मतांनी मंजूर झाला.
  • भारतासह 53 देश तटस्थ राहिले.
  • तसेच जेरुसलेम या पवित्र शहराची लोकसंख्यानिहाय रचना, वैशिष्टय़े व स्थिती बदल, येथे लागू केलेले पक्षपाती कायदे याबाबत कायदेशीर उपाययोजना सुचवण्याचीही विनंती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा आजपासून:

  • महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहुउद्देशीय महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाना आजपासून सुरुवात होणार आहे.
  • ही स्पर्धा 12 जानेवारीपर्यंत राज्यातील विविध आठ केंद्रांवर पार पडेल.
  • महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना गेली 23 वर्षे या स्पर्धेसाठी प्रयत्नशील होती.
  • अखेर या स्पर्धेला मुहूर्त सापडला असून, राज्यातील 10 हजार 456 खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
  • एकूण 39 क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश असून, राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी हे व्यासपीठ उभे करण्यात आल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

बॅडिमटन निवड चाचणीतून सायना नेहवालची माघार:

  • राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदक विजेती बॅडिमटनपटू सायना नेहवालने आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणाऱ्या राष्ट्रीय निवड चाचणीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आशियाई स्पर्धा 14 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत दुबईत पार पडणार आहे.
  • या स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी सायनासह आकर्षी काश्यप आणि मालविका बनसोड यांची निवड करण्यात आली होती.
  • आशियाई स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची आधीच निवड झाली असून दुसऱ्या महिला खेळाडूच्या स्थानासाठी या तिघींची निवड चाचणी रंगणार होती.
  • मात्र, या तिघींपैकी सायना आणि मालविका यांनी निवड चाचणीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
  • सिंधू, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांच्यासह पुरुष दुहेरी जोडी सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांना जागतिक मानांकनामुळे भारतीय संघात थेट प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.