२ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 2 December 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२ डिसेंबर चालू घडामोडी

जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर:

  • सध्या फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेचा थरार सुरू आहे. कतारमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक संघ पूर्ण ताकदीनीशी प्रयत्न करत आहे. मात्र स्पर्धेच्या १३ व्या दिवशी जपानच्या विजयामुळे जर्मनीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. जपानने स्पेनच्या संघाचा २-१ ने पराभव केल्यामुळे जर्मनीचा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला आहे.
  • फिफा विश्वचषक स्पर्धेच्या १३ व्या दिवशी इ गटात स्पेनचा सामना जपानशी तर कोस्टारिकाचा सामना जर्मनीशी झाला. या दोन्ही सामन्यांत चांगलीच अटीतटीची लढत झाली. मात्र जपानने स्पेन संघावर विजय मिळवल्यामुळे जर्मनीचा संघ थेट स्पर्धेबाहेर फेकला गेला. जर्मननीने कोस्टारिका संघावर ४-२ असा मोठा विजय मिळवूनदेखील त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जपानने स्पेनवर २-१ असा विजय मिळवला.
  • तीन मिनिटांत २ गोल – जपानने स्पेनवर थरारक विजय मिळवला. पहिल्या डावात स्पेनने जपावर १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात जपानने दमदार कामगीरी केली. जपानच्या खेळाडूंनी दुसऱ्या डावात ४८ आणि ५१ व्या मिनिटाला दोन गोल गेले. परिणामी धावफलक १-२ असा झाला. अवघ्या तीन मिनिटात जपानने दोन गोल केल्यामुळे स्पेनला पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह जपानने बाद फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. तर जर्मनीचा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. जर्मनीने २०१४ साली विश्वचषक जिंकण्याची किमया केली होती. मात्र २०१८ साली हा संघ साखळी सामन्यांतच स्पर्धेबाहेर फेकला गेला होता.

अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर:

  • भारताचे माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांची त्रसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीवर निवड झाली आहे. भारताच्या माजी क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक या आधीपासून सल्लागार समितीचा भाग आहेत. मल्होत्रा, परांजपे आणि नाईक यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) नवी राष्ट्रीय निवड समिती नेमण्याची जबाबदारी असेल.
  • ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला आलेल्या अपयशानंतर ‘बीसीसीआय’ने निवड समितीची उचलबांगडी केली होती. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीवर हरिवदर सिंग, सुनील जोशी आणि देबाशीष मोहंती यांचा समावेश होता.
  • मल्होत्रा आणि परांजपे यांची अनुक्रमे मदन लाल आणि रुद्र प्रताप सिंह यांच्या जागी सल्लागार समितीवर निवड झाली आहे. केवळ माजी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असणाऱ्या नाईक या सल्लागार समितीवर कायम आहेत.

MPSC ने निवडलेल्या १११ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती; नियुक्तीपत्रासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक:

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ( एमपीएससी ) निवड झालेल्या १११ उमेदवारांना नियुक्ती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आज ( १ नोव्हेंबर ) या उमेदवारांना यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार होते. पण, त्यापूर्वी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने उमेदवारांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते आक्रमक झाले आहेत.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०१९ साली परिक्षा घेण्यात आली होती. त्यातील उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले जाणार होते. त्याआधाची १११ उमेदवारांच्या नियुक्तीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इब्लूएस प्रवर्गातून नियुक्ती देण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
  • याबाबत बोलताना मराठा नेते विनोद पाटील म्हणाले, “१०४३ उमेदवारांपैकी १११ जणांना सोडून नियुक्ती देण्यास हरकत नाही, असे न्यायालयाने सांगितलं. उच्च न्यायालयाने १११ जणांना नियुक्ती देण्यास नाकारलं नाही. पण, त्यांना ज्या प्रवर्गातून नियुक्ती देण्यात आली आहे, त्यावर न्यायालयाचा आक्षेप आहे. आता राज्य सरकारने सुपर मेमरी पद्धतीने उमेदवारांनी नियुक्ती करावी,” अशी मागणी विनोद पाटील यांनी केली.
  • मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी म्हटलं की, “अभियांत्रिकी उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बोलावलं होतं. ९ तारखेल्या सचिवांच्या झालेल्या बैठकीत एसईबीसीमधून इब्लूएसमध्ये उमेदवारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, सामान्य प्रशासन विभागाने सरकार आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली.”

गुजरातमधील ‘मिनी आफ्रिका’ पहिल्यांदा करणार मतदान; पारंपरिक नृत्य करत व्यक्त केला आनंद:

  • गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान करण्यात येत आहे. हा दिवस गुजरातमधील जांबूर या गावासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘मिनी आफ्रिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावातील लोक आज पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी खास आदिवासी मतदान केंद्रची उभारणी करण्यात आली आहे. पारंपरिक वेशभूषेसह आदिवासी नृत्य करत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
  • आफ्रिकन वंशाचा हा सिद्दी समाज जुनागढच्या नवाबाशी संबंधित आहे. या नवाबाने त्यांना आफ्रिकेतून भारतात आणलं होतं. “हे लोक पूर्व आफ्रिकेचे गुलाम, नाविक आणि सैनिकांचे वंशज आहेत. या लोकांना शतकानुशतके अरब मुस्लीम व्यापाऱ्यांनी भारतीय राजघराण्यासह पोर्तुगीजांसाठी पाठवले आहे”, असे गुजरात पर्यटन विभागाच्या एका लेखात नमुद आहे. ही लोकं आता गुजरातच्या गीर जिल्ह्यातील मधुपूर जांबूर गावात राहतात. या गावातील एकूण ३ हजार ४८१ मतदारांपैकी ९० टक्के मतदार सिद्दी समाजाचे आहेत.
  • गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान येत्या ५ डिसेंबरला होणार आहे. तर ८ डिसेंबरला हिमाचल प्रदेशसह गुजरात या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. गुजरातमध्ये आज होत असलेल्या मतदानात जवळपास २ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १९ जिल्ह्यांमधील ८९ मतदारसंघासाठी सध्या गुजरातमध्ये मतदान सुरू आहे. या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ७८८ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
  • गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे. यावेळी भाजपाला आम आदमी पक्षानेदेखील मोठं आव्हान निर्माण केलं आहे. मात्र, खरी लढत ही भाजपा आणि काँग्रेसमध्येच असल्याचं भाजपा नेते अमित शाह यांनी म्हटले आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.