३ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 3 December 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३ डिसेंबर चालू घडामोडी

अंदमानच्या बेटांना ‘परमवीर चक्र’ विजेत्यांची नावे:

  • केंद्र सरकारने अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील २१ निर्मनुष्य बेटांना देशाचा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार असलेल्या ‘परमवीर चक्र’प्राप्त शूर सैनिकांची नावे दिली आहेत. या २१ बेटांपैकी १६ उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यात आहेत, तर पाच बेटे दक्षिण अंदमानमध्ये आहेत.
  • अंदमान-निकोबार बेटांचे खासदार कुलदीप राय शर्मा यांनी संरक्षण व स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने या शूर सैनिकांची नावे २१ बेटांना नाव देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले.
  • उत्तर व मध्य अंदमानमधील ‘आयएनएएन ३७०’ क्रमांकाच्या पहिल्या निर्जन बेटाला मेजर सोमनाथ शर्माचे नाव देण्यात आले. आता ते ‘सोमनाथ द्वीप’ म्हणून ओळखले जाईल. त्यांना ‘परमवीर चक्रा’चा पहिला सन्मान प्राप्त झाला होता. शर्मा यांना ३ नोव्हेंबर १९४७ रोजी श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानी घुसखोरांशी दोन हात करताना आपला हौतात्म्य प्राप्त झाले. बडगामच्या लढाईत त्यांच्या शौर्य आणि बलिदानासाठी त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात सुभेदार आणि मानद कॅप्टन करम सिंग यांना वीरमरण प्राप्त झाले होते.
  • ‘आयएनएएन ३०८’ क्रमांकाच्या बेटाला ‘करमसिंग द्वीप’ असे नाव देण्यात आले. तसेच मेजर राम राघोबा राणे, नाईक जदुनाथसिंग, कंपनी हवालदार मेजर पिरूसिंग शेखावत, कॅप्टन गुरबचनसिंग सलारिया, लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा मगर, सुभेदार जोगिंदर सिंग साहनन, मेजर शैतानसिंग भाटी, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुजरेरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, कर्नल होशियार सिंग दहिया, सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मल जीतसिंग सेखोन, मेजर रामस्वामी परमेश्वरन, कॅप्टन बाणा सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे आणि सुभेदार मेजर संजय कुमार या सर्व परमवीर चक्राने सन्मानित योद्धय़ांची नावे या बेटांना देण्यात आली आहेत.

६० टक्के मतदान : गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात मतदारांचा निरुत्साह:

  • गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. दक्षिण गुजरात आणि कच्छ- सौराष्ट्र प्रदेशातील ८९ मतदारसंघांत मतदान झाले असून मतदानाची अंदाजे टक्केवारी ६०.२३ आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.  २०१७ मध्ये पहिल्या टप्प्यात ६६.७५ टक्के मतदान झाले होते.
  • मतदान सकाळी ८ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ वाजता संपले. मात्र काही मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेपूर्वी मतदार आले आणि रांगेत उभे असल्याने तिथे मतदान करण्याचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
  • पहिल्या टप्प्यात ७८८ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. काही घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेलमध्ये (व्हीव्हीपीएटी) बिघाड झाल्याने काही ठिकाणी मतदान थांबवण्यात आले. मात्र सदोष युनिट बदलण्यात आल्यानंतर मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
  • तापी जिल्ह्यात सर्वाधिक ७२.३२ टक्के मतदान झाले. या आदिवासीबहुल जिल्ह्यात व्यारा आणि निझर हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. ६८.०९ टक्के मतदानासह नर्मदा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सौराष्ट्रमधील भावनगरमध्ये सर्वात कमी ५१.३४ टक्के मतदान झाले. नवसारी, डांग, वलसाड आणि गीर सोमनाथ या चार जिल्ह्यांतही ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले.

१४ वर्षांनंतर सौराष्ट्र बनला चॅम्पियन! महाराष्ट्रावर पाच गडी राखून मात, ऋतुराजचे शतक ठरले व्यर्थ:

  • अहमदाबाद येथे महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात विजय हजारे ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना झाला. सौराष्ट्रचा संघ १४ वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन बनला आहे. २००७-०८ च्या मोसमात शेवटच्या वेळी संघ चॅम्पियन बनला होता. सौराष्ट्राच्या शेल्डन जॅक्सनच्या खेळीने महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यावर छाया पडली. सौराष्ट्राने हा सामना पाच गडी राखून जिंकला.
  • सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राने ५० षटकांत नऊ गडी गमावून २४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सौराष्ट्रने ४६.३ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. हार्विक देसाई ५० आणि समर्थ व्यास १२ धावा करून बाद झाला. जय गोहिल खाते उघडू शकला नाही.
  • तत्पूर्वी, महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली होती. पवन शहा चार धावा करून बाद झाला. त्याचवेळी सत्यजित बाचेने २७ धावांची खेळी केली. अंकित बावणे काही विशेष करू शकला नाही आणि २२ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने शतक झळकावले. १३१ चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १०८ धावा करून तो धावबाद झाला. विजय हजारे स्पर्धेच्या या मोसमातील ऋतुराजचे हे सलग तिसरे शतक ठरले. याआधी त्याने उपांत्य फेरीत यूपीविरुद्ध नाबाद २२० आणि आसामविरुद्ध १६८ धावांची खेळी केली होती. याशिवाय ऋतुराजने रेल्वेविरुद्ध स्पर्धेच्या सुरुवातीला नाबाद १२४ धावांची खेळी केली होती.
  • अजीम काझी ३३ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला तर सौरभ नवलेने १३ धावा केल्या. २०२२ च्या अंडर-१९ विश्वचषकाचे हिरो राजवर्धन हंगरगेकर आणि विकी ओस्तवाल यांना खातेही उघडता आले नाही. मुकेश चौधरी दोन धावा करून बाद झाला. नौशाद शेख ३१ धावा करून नाबाद राहिला. सौराष्ट्रकडून चिराग जानीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी कर्णधार जयदेव उनाडकट आणि पार्थ भुतला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

अंदमानच्या बेटांना ‘परमवीर चक्र’ विजेत्यांची नावे:

  • केंद्र सरकारने अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील २१ निर्मनुष्य बेटांना देशाचा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार असलेल्या ‘परमवीर चक्र’प्राप्त शूर सैनिकांची नावे दिली आहेत. या २१ बेटांपैकी १६ उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यात आहेत, तर पाच बेटे दक्षिण अंदमानमध्ये आहेत.
  • अंदमान-निकोबार बेटांचे खासदार कुलदीप राय शर्मा यांनी संरक्षण व स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने या शूर सैनिकांची नावे २१ बेटांना नाव देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले.
  • उत्तर व मध्य अंदमानमधील ‘आयएनएएन ३७०’ क्रमांकाच्या पहिल्या निर्जन बेटाला मेजर सोमनाथ शर्माचे नाव देण्यात आले. आता ते ‘सोमनाथ द्वीप’ म्हणून ओळखले जाईल. त्यांना ‘परमवीर चक्रा’चा पहिला सन्मान प्राप्त झाला होता. शर्मा यांना ३ नोव्हेंबर १९४७ रोजी श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानी घुसखोरांशी दोन हात करताना आपला हौतात्म्य प्राप्त झाले. बडगामच्या लढाईत त्यांच्या शौर्य आणि बलिदानासाठी त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात सुभेदार आणि मानद कॅप्टन करम सिंग यांना वीरमरण प्राप्त झाले होते. ‘आयएनएएन ३०८’ क्रमांकाच्या बेटाला ‘करमसिंग द्वीप’ असे नाव देण्यात आले. तसेच मेजर राम राघोबा राणे, नाईक जदुनाथसिंग, कंपनी हवालदार मेजर पिरूसिंग शेखावत, कॅप्टन गुरबचनसिंग सलारिया, लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा मगर, सुभेदार जोगिंदर सिंग साहनन, मेजर शैतानसिंग भाटी, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुजरेरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, कर्नल होशियार सिंग दहिया, सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मल जीतसिंग सेखोन, मेजर रामस्वामी परमेश्वरन, कॅप्टन बाणा सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे आणि सुभेदार मेजर संजय कुमार या सर्व परमवीर चक्राने सन्मानित योद्धय़ांची नावे या बेटांना देण्यात आली आहेत.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.