२१ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२१ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |21 February 2024

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२१ फेब्रुवारी चालू घडामोडी

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरिमन यांचं निधन

  • प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस नरिमन यांचे बुधवारी नवी दिल्लीत निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
  • नोव्हेंबर १९५० पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. तर, १९६१ मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी ७० वर्षांहून अधिक काळ कायद्याचा सराव केला आहे. सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि १९७२ पासून नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत होते. मे १९७२ मध्ये ते मुंबईहून दिल्लीला गेले तेव्हा त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले.

कोण होते फली एस नरिमन?

  • १० जानेवारी १९२९ रोजी रंगून येथे जन्मलेले फली नरिमन यांचे शालेय शिक्षण विविध ठिकाणी झाले. मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी मिळवली. फली यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत जावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती; पण त्यांनी मात्र सरळ मुंबईतील सरकारी विधि महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुवर्णपदकासह त्यांनी विधि शाखेची पदवी मिळवली. मग मुंबई उच्च न्यायालयात १९५० पासून त्यांनी वकिली सुरू केली. वीस वर्षे वकिली केल्यानंतर १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ बनले. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता लक्षात घेऊन १९७२ मध्ये केंद्र सरकारने अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी त्यांची नियुक्ती केली. १९७५ पर्यंत ते या पदावर होते. 
  • इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करताच त्याचा निषेध म्हणून त्यांनी लगेच आपल्या पदाचा राजीनामा दिला व खासगी वकिली सुरू केली. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर नरिमन हे युनियन कार्बाइड कंपनीचे वकील होते. मात्र  पीडितांची भयानक अवस्था पाहिल्यानंतर ‘आयुष्यात केलेली ही सर्वात मोठी चूक’ अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिलीच, पण या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड घडवून आणताना पीडितांना ४७ कोटी डॉलरची भरपाई मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पाकिस्तानमध्ये PML-N, PPP पक्षांत युतीची घोषणा, लवकरच शाहबाज शरीफ घेणार पंतप्रधानपदाची शपथ!

  • राष्ट्रीय निवडणूक झाल्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा चालू होती. मात्र आता या दोन्ही पक्षांचे युतीवर एकमत झाले असून सत्तेत कोणाचा किती सहभाग असेल, कोणाला किती पदे मिळणार तसेच पंतप्रधानदी कोणाची निवड होणार? या सर्वांचा त्यांनी प्रभावी तोडगा काढला आहे. पीएमएल-एन आणि पीपीपी या दोन्ही पक्षांत युती झाली असून लवकरच ते पाकिस्तानमध्ये सरकारची स्थापना करणार आहेत.

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

  • पीपीपी आणि पीएमएल-एन या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत पाकिस्तानमध्ये मंगळवारी रात्री एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमच्यात युती झाली असून लवकरच आम्ही सत्तास्थापनेचा दावा करू, अशी घोषणा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होतील तर पीपीपीचे सह-अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून निवड केली जाईल. शाहबाज यांच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणते मंत्रिपदं दिली जातील, याचा तपशील नंतर जाहीर केला जाईल असे झरदारी यांनी यावेळी सांगितले.

कोणाचा किती जागांवर विजय?

  • पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय निवडणूक झाली होती. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धांदल झाली आहे, असा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे निवडणूक लढवण्यावर बंदी असलेल्या पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांचा गट या निवडणुकीत सर्वांत मोठा गट म्हणून समोर आला होता. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्रानुसार एकूण ९३ जागांवर अपक्ष उमेदवारांचा तर पीएमएल-एन पक्षाचा ७५ आणि पीपीपीचा ५४ जागांवर विजय झाला.

भारतीयांना मिळणार परदेशात फिरण्याची संधी! व्हिसाची चिंता सोडा, लगेच तिकीट बुक करा

  • अनेक भारतीयांना परदेशात फिरण्याची आवड असते. परदेशात फिरण्यासाठी व्हिसा आवश्यक असतो. व्हिसा मिळवणे काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मोठ्या प्रक्रियेला समारे जावे लागते. काही देशांमध्ये परदेशी नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश दिला जात नाही. पण आजच्या काळात काही देशांमध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे ज्यामुळे प्रवाशांना प्रवासापूर्वी व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) म्हणजे परदेशी नागरिकाचे देशात आगमन झाल्यानंतर दिला जाणारा व्हिसा. या सुविधेमुळे परदेशी नागरिकांना परदेशातील प्रवास सुखकर होतो.
  • व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) सुविधांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे भारतीय पासपोर्ट धारकांसाठी परदेशात प्रवास करणे सोपे आणि अधिक सोयीचे झाले आहे. कारण अलीकडील हेन्ली पासपोर्ट इंडेक्स अहवालानुसार, “भारतीय पासपोर्ट जागतिक क्रमवारीत ८० व्या स्थानावर पोहोचला आहे ज्यामुळे भारतीय नागरिकांना २०२४ पर्यंत ५७ देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवास करण्याची परवानगी मिळते. व्हिसा ऑन अरायव्हलसाठी अर्ज करण्यासाठी, एखादी व्यक्ती सामान्यतः विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांना आवश्यक असलेली आवश्यक कागदपत्रे सादर करते. पण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) म्हणजे आगमन व्हिसा विशिष्ट कालावधीसाठी आणि पूर्वनिश्चित शुल्क दिल्यानंतर जारी केला जातो.

खंड-देश-मुक्कामाचा कालावधी

  • आफ्रिका-बुरुंडी(Burundi) -३० दिवस
  • आफ्रिका- केप वर्दे (Cape Verde)-३० दिवस
  • आफ्रिका-कोमोरोस(Comoros)-४५ दिवस
  • आफ्रिका-जिबूती(Djibouti)-३१ दिवस
  • आफ्रिका-इथिओपिया(Ethiopia)- १ महिना
  • आफ्रिका-गिनी-बिसाऊ(Guinea-Bissau)- ९० दिवस
  • आफ्रिका-मादागास्कर (Madagascar)-६० दिवस
  • आफ्रिका-मॉरिटानिया(Mauritania)- ९० दिवस
  • आफ्रिका-रवांडा(Rwanda)-३० दिवस
  • आफ्रिका-सेशेल्स(Seychelles) ३ महिने
  • आफ्रिका-सोमालिया(Somalia) ३० दिवस
  • आफ्रिका-टांझानिया(Tanzania) ३० दिवस
  • आफ्रिका-टोगो(Togo) ७ दिवस
  • आशिया-कंबोडिया (Cambodia) ३० दिवस
  • आशिया-इराण (Iran) ३० दिवस
  • आशिया-जॉर्डन (Jordan) ३० दिवस
  • आशिया-लाओस(Laos)३० दिवस
  • आशिया-मलेशिया (Malaysia)३० दिवस
  • आशिया-मालदीव (Maldives)३० दिवस
  • आशिया-मंगोलिया(Mongolia) ३० दिवस
  • आशिया-म्यानमार (Myanmar) ३० दिवस
  • आशिया-नेपाळ (Nepal)९० दिवस
  • आशिया-ओमान (Oman)१० दिवस
  • आशिया-कतार (Qatar)३० दिवस
  • आशिया-श्रीलंका (Shri Lanka) ३० दिवस
  • आशिया-तिमोर-लेस्टे (Timor-Leste)३० दिवस
  • आशिया-तैवान(Taiwan -Leste) १४दिवस
  • आशिया-थायलंड (Thailand) १५ दिवस
  • आशिया-व्हिएतनाम(Vietnam) ३० दिवस
  • युरोप-आर्मेनिया(Armenia) १२० दिवस
  • युरोप-बेलारूस (Belarus) ३० दिवस
  • युरोप-जॉर्जिया (Georgia) ९० दिवस
  • युरोप-तुर्की (Turkey)३० दिवस
  • उत्तर अमेरिका- सेंट लुसिया(Saint Lucia) ६ आठवडे
  • उत्तर अमेरिका-त्रिनिदाद आणि टोबॅगो(Trinidad and Tobago) ९० दिवस
  • उत्तर अमेरिका-ओशनिया मार्शल बेट(Marshall Islands) ९० दिवस
  • मायक्रोनेशिया(Micronesia)३० दिवस
  • उत्तर अमेरिका-नौरू(Nauru) १४ दिवस
  • उत्तर अमेरिका-पलाऊ(Palau) ३० दिवस
  • उत्तर अमेरिका-सामोआ(Samoa) ८०दिवस
  • उत्तर अमेरिका-तुवालु(Tuvalu)१ महिना
  • दक्षिण अमेरिका- बोलिव्हिय(Bolivia) -९० दिवस

AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा!

  • गेल्या काही दिवसांपासून एआय या नव्या तंत्रज्ञानाची प्रचंड चर्चा आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असल्याचंही म्हटलं जातंय. क्रिएटीव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना या एआयचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे एआयच्या उदयामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. परंतु, एआयमुळे नोकऱ्या जाणार नसून नोकऱ्यांमध्ये वाढ होईल, असा विश्वास आयबीएम इंडिया आणि दक्षिण आशियाचे संचालक संदीप पटेल यांनी व्यक्त केलाय. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
  • आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी तंत्रज्ञानात झालेली प्रगती आणि त्यावर आधारी नवकल्पनांबाबत त्यांची निरिक्षणे शेअर केली. “एआयमुळे नोकरींच्या संधीमध्ये वाढ होणार आहे. जेव्हा नव्या नोकरीची भूमिका असते तेव्हा सर्व भीती व्यक्त करतात”, असं संदीप पटेल म्हणाले. यावेळी त्यांनी इंटरनेट क्रांतीचाही उल्लेख केला. “इंटरनेटमुळे वृत्तपत्र छपाईसारख्या अनेक विशिष्ट क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या. परंतु, वेब डिझाईन, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग आणि वेब प्रकाशनसारख्या नवीन नोकऱ्या उदयास आल्या. या नव्या नोकऱ्यांमुळे आता लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे”, असंही संदीप पटेल म्हणाले.

रिस्किलिंग काळाची गरज

  • पटेल यांनी रिस्किलींगचा मुद्दा अधोरेखित केला. “सध्या ४६ टक्के भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑटोमेशन आणि एआय टुल्सससह सहयोग करण्यासाठी सक्रियपणे प्रशिक्षण देत आहेत किंवा त्यांना पुन्हा कौशल्य शिकवत आहेत. जे या दिशेने पुढील प्रयत्नांसाठी महत्त्वपूर्ण वाव दर्शवितात.”
  • “या परिस्थितीची सरकारला चांगली जाणीव असल्याचंही ते म्हणाले. ते म्हणाले की, अनेक संस्थांमध्ये अनेक कर्मचारी नवं एआय आणि ऑटोमेशन टुल्ससह काम करण्यास उत्सुक आहेत. सध्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचं सर्वांत मोठं आव्हान आहे. प्रत्येकजण कोडर किंवा एआय डेव्हलपर असू शकत नाही. परंतु, या विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचं आहे”, असंही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाचा राजकीय फायदा होणार का ?

  • मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये एकमताने मंजूर झाल्यानंतर त्याचे राजकीय श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाली आहे. विधेयक मंजूर होताच विधान भवनाच्या बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयजयकार करण्यात आला आणि शिंदे यांच्यामुळेच आरक्षण मिळाल्याचे त्यांच्या समर्थकांनी अधोरेखित केले.
  • ओबीसी मतपेढी दुखवू नये यासाठी भाजपने फारसा जल्लोष न करता विशेष खबरदारी घेतली होती. यापूर्वी दोनदा आरक्षणाचा निर्णय घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्याचा निवडणुकीत फारसा राजकीय लाभ झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत शिंदे गट वा महायुतीला या आरक्षणाचा किती फायदा होईल का, याची आता उत्सुकता असेल.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२१ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.