Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |24 March 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२४ मार्च चालू घडामोडी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ६ व्हिजन डॉक्युमेंटची घोषणा, म्हणाले, “भारत आज …”
- सध्या देशात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या सर्वात आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये ५जी सेवा सुरु झाली आहे. आता देश ६जी नेटवर्कच्या दिशेने प्रगती करत आहे. देशात ५जी यशस्वी लॉन्चिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडिया ६ व्हिजन डॉक्युमेंटची घोषणा केली आहे. तसेच ६जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) टेस्ट बेड लॉन्च केला आहे. विज्ञान भवन येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) प्रादेशिक कार्यालय आणि इनोव्हेशन सेंटरचे उदघाटन केले.
- ITU उद्घटनाच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ६जी R&D टेस्ट बेडमुळे देशात नवीन टेक्नॉलॉजीचा वेगाने अवलंब करण्यासाठी मदत होणार आहे. भारत ६जी व्हिजन डॉक्युमेंट आणि ६जी टेस्ट बेड देशामध्ये नवकल्पना, क्षमता निर्माण आणि वेगाने टेक्नॉलॉजी अवलंब करण्यासाठी एक योग्य वातावरण तयार करेल. ४जी सेवेच्या आधी भारत केवळ दूरसंचार टेक्नॉलॉजीचा वापरकर्ता होता. परंतु ”भारत आज जगातील दूरसंचार टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा निर्यातदार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.”
- तसेच पंतप्रधान म्हणाले, भारत ५जी च्या मदतीने संपूर्ण जगाची कार्यसंस्कृती बदलण्यासाठी भारत अनेक देशांसोबत काम करत आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ” या १०० नवीन लॅब्स भारताच्या गरजांनुसार 5G अॅप्लिकेशन्स विकसित करण्यात मदत करतील. मग ते 5G स्मार्ट क्लासरूम्स असो, शेती असो, इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा आरोग्य सेवा असो, भारत प्रत्येक दिशेला वेगाने काम करत आहे.”
- भविष्यातील टेक्नॉलॉजी प्रमाणात करण्यासाठी भारत ITU सह एकत्रितपणे काम करेल. तसेच नवीन भारत ITU क्षेत्रीय कार्यालय 6G साठी योग्य वातावरण तयार करण्यास मदत करेल.त्याच वेळी देशामध्ये ६जी टेस्ट बेड सुरु करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. भारत २०३० पर्यंत हाय-स्पीड 6G कम्युनिकेशन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
अजून एक गौप्यस्फोट होणार! Hindenburg नं केली घोषणा; लवकरच नवा अहवाल होणार जाहीर
- काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्ग रीसर्चनं भारतातील अदाणी उद्योगसमूहासंदर्भात जारी केलेल्या अहवालामुळे देशात मोठी खळबळ उडाली. विशेषत: शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ झाली. अदाणी समूहातील कंपन्यांचे शेअर्स वेगाने जमिनीवर कोसळले. देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदाणींची गच्छंती झाली. तर अनेक आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातून अदाणी समूहाला ‘डीलिस्ट’ करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर हिंडेनबर्गच्या त्या अहवालाचे पडसाद अजूनही भारतीय बाजारपेठेत आणि राजकीय वर्तुळात जाणवत असताना आता पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट करण्यासाठी हिंडेनबर्ग सज्ज झालं आहे.
- भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास हिंडेनबर्ग रीसर्चच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये संस्थेनं अजून एक अहवाल जाहीर करण्याची तयारी चालवली असल्याचं सांगण्यात आलं आहे. “नवीन अहवाल लवकरच..अजून एक मोठा खुलासा”, असं या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता हिंडेनबर्ग कुणाचा आणि विशेषत: कुठल्या देशातल्या गैरव्यवहारांचा खुलासा करणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
“आशा आहे की ही भारतीय कंपनी नसेल!”
- दरम्यान, हिंडेनबर्गच्या या अहवालावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी “आशा आहे की यावेळी आणखीन एक भारतीय कंपनी नसावी. यावेळी बदल म्हणून एखादी चायनिज कंपनी बघा”, असा सल्ला हिंडेनबर्गला दिला आहे. तर काहींनी “ही एक अमेरिकन कंपनी असेल, जिचा प्रमुख भारतीय असेल”, असा अंदाजही वर्तवला आहे.
- हिंडेनबर्गच्या अहवालामुळे झालेल्या नुकसानातून अजूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न अदाणी समूह आणि गौतम अदाणी करत असताना राजकीय वर्तुळात विरोधकांनी अदाणींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करत सत्ताधारी भाजपाला सातत्याने लक्ष्य केलं आहे.
आयपीएलआधी जिओने लॉन्च केले ‘हे’ तीन जबरदस्त प्लॅन्स, दररोज तीन जीबी डेटा आणि…
- लवकरच IPL २०२३ सुरु होणार आहे. ३१ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. मात्र ते सुरु होण्याआधीच क्रिकेटप्रेमींनी आयपीएलचे जुने सामने मॅचेस टीव्हीवर, मोबाईलवर बघायला सुरुवात केली आहे. मात्र क्रिकेटरसिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असणाऱ्या Reliance Jio ने आपल्या वापरकर्त्यांसाठी ३ जबरदस्त क्रिकेट प्लॅन लॉन्च केले आहेत. कोणत्या अडथळ्याशिवाय वापरकर्त्यांना आयपीएलचे सामने बघता यावेत म्हणून कंपनीने हे प्लॅन्स लॉन्च केले आहेत.
- जिओने लॉन्च केलेल्या नवीन प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. जेणेकरून त्यांना आयपीएलच्या सामन्यांचा आनंद लुटता येईल. या प्लॅन्स व्यतिरिक्त, वापरकर्ते क्रिकेट अॅड-ऑनद्वारे १५० जीबी पर्यंत डेटा मिळवू शकतात. या तिन्ही रिचार्ज प्लॅन काय काय ऑफर्स आहेत ते जाणून घेऊयात.
- ९९९ रुपयांचा jio cricket plan – जर का तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय आयपीएलच्या संपूर्ण सीझनचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जिओचा ९९९ रुपयांचा क्रिकेट प्लॅन घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळते. दररोज ३जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. या प्लॅनमध्ये २४१ रुपयांचे मोफत व्हाउचर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला ४० जीबी डेटा मिळू शकतो.
- ३९९ रुपयांचा jio cricket plan – जिओने लॉन्च केलेल्या क्रिकेट प्लॅनमध्ये तुम्ही ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन खरेदी करू शकता. यामध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच यातही दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना या प्लॅनसह ६१ रुपयांचे मोफत व्हाउचर देत आहे. ज्यामध्ये ६ जीबी देता मिळतो. तसेच यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील करता येणार आहे.
- २१९ रुपयांचा jio cricket plan – २१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. जीओचा ३ जीबी डेटा मिळणारा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. मात्र या प्लॅनची वैधता खूपच कमी आहे. यामध्ये तुम्हाला फक्त १४ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनसह वापरकर्त्यांना २५ रुपयांच्या मोफत व्हाऊचरच्या मदतीने २ जीबी मोफत डेटा मिळवू शकतात. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा देखील मिळणार आहे.
धोनीसारखाच ‘हा’ खेळाडू रेल्वेत करत होता नोकरी; IPL मध्ये एन्ट्री मारताच बनला करोडपती
- आयपीएल एक असा मंच आहे, जिथे युवा खेळाडू त्यांचं कौशल्य दाखवतात आणि आख्ख्या जगात नावलौकीक करतात. आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडूंचं भाग्य उजळलं आहे. यावेळी आयपीएलच्या लिलावात अनेक खेळाडू करोडपती बनले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भारतीय खेळाडूबाबत सांगणार आहोत, जो धोनीसारखाच रेल्वेत नोकरी करत होता. हा खेळाडू आयपीएलचा किताब चारवेळा जिंकला आहे.
- रेल्वेत केली नोकरी अन् IPL मध्ये बनला करोडपती – आरसीबीने आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये फिरकीपटू कर्ण शर्माचा त्यांच्या संघात समावेश केला होता. भेदक गोलंदाज म्हणून कर्ण शर्माने क्रिकेटच्या मैदानात छाप टाकली आहे. कर्ण शर्माच्या जीवनाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. धोनीप्रमाणेच कर्णही रेल्वेत नोकरी करत होता. कर्णला बालपणापासूनच क्रिकेट खेळायची आवड होती. कौंटुबिक परिस्थिती पाहून कर्णने २००५ मध्ये रेल्वेत फोर्थ ग्रेडची नोकरी केली. कर्ण रेल्वे रुळाची दुरुस्ती करणे आणि लोखंडी रॉड उचलण्याचं काम करत होता. परंतु, २०१४ मध्ये कर्णचं नशिब अचानक पालटलं. २०१४ मध्ये झालेल्या आयपीएल सीजन ७ मध्ये हैद्राबाद संघाने त्याला ३.७५ कोटी रुपयांत खरेदी केलं आणि कर्ण लागलीच करोडपती बनला.
- कर्ण शर्माचा आंतरराष्ट्रीय करिअर – कर्णने २००७ मध्ये रेल्वे रणजी संघातून क्रिकेटच्या करिअरला सुरुवात केली होती. कर्णने सप्टेंबर २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय करिअरला सुरवात केली. त्याचवर्षी डिसेंबरमध्ये कर्णला श्रीलंकाविरुद्ध वनडे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. कर्णने भारतासाठी एकूण चार सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला पाच विकेट्स मिळाले आहेत. कर्णने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ७.९१ च्या इकोनॉमी रेटने ५९ विकेट मिळाले आहेत.
अपघात रोखण्यासाठी सरकारने आणली स्वतंत्र योजना; रस्ता सुरक्षेसाठी निधी राखीव ठेवणार, आरटीओकडे नियोजनाची जबाबदारी
- मागील काही वर्षांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने आता ठोस पावले उचलली आहेत. यानुसार राज्यात स्वतंत्र योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. या निधीतूनच जिल्ह्यात विविध विभागांत अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. या योजनेची जबाबदारी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओ) सोपवण्यात आली आहे.
- प्रत्येक जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समित्या अस्तित्वात आहेत. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. या समित्यांमार्फत जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेचा आढावा घेतला जातो. विविध यंत्रणांच्या समन्वयाने उपाययोजनाही सुचवण्यात येतात. असे असले तरी त्या उपाययोजना प्रत्यक्षात होताना दिसत नाहीत. कारण त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसते. त्यामुळे सरकारने जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजना ही नवी योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- या योजनेत जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. रस्त्यांवर सूचना फलक, वाहतूक चिन्हे लावण्याबाबत हे सर्वेक्षण असेल. त्यानंतर आवश्यक ठिकाणी सूचना फलक आणि दिशादर्शक फलक लावण्यात येतील. याचबरोबर अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार आहेत. यात स्पीड गन, स्पीड इंडिकेटर, रिफ्लेक्टर बसवणे आणि खड्डे बुजविणे, तात्पुरते पर्यायी रस्ते करणे या गोष्टींचा समावेश असेल.
आरटीओकडून ‘अॅक्शन प्लॅन’
- आरटीओकडून जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहर, तसेच ग्रामीण भागातील अपघातप्रवण आणि गर्दीची ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार आहेत. आरटीओकडून अपघातप्रवण आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत. संबंधित यंत्रणा तेथे या सूचनांची अंमलबजावणी करतील.
चॅरिटी चषक बुद्धिबळ स्पर्धा – कार्लसनची प्रज्ञानंदवर मात:
- पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदवर मात करत चॅरिटी चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच या विजयासह कार्लसनने गेल्या महिन्यात एअरिथग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षीय प्रज्ञानंदकडून झालेल्या पराभवाची परतफेडही केली.
- चॅरिटी चषक स्पर्धेतील सामन्यात काळय़ा मोहऱ्यांसह खेळणाऱ्या कार्लसनने सुरुवातीपासून वर्चस्व प्रस्थापित केले. त्याला प्रत्युत्तर देणे प्रज्ञानंदला शक्य झाले नाही आणि ४३ चालींअंती कार्लसनने विजयाची नोंद केली.
- त्यानंतर प्रज्ञानंदने शेवटून दुसऱ्या फेरीत विश्वचषक विजेत्या यान-क्रिस्टॉफ डूडाला पराभूत करण्याची किमया साधली. मात्र अखेरच्या फेरीत त्याला स्पेनच्या डेव्हिड अॅन्टोनकडून पराभव पत्करावा लागल्याने तो बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला.
पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ:
- पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा या पदावरील दुसरा कार्यकाळ सुरू झाला. परेड ग्राऊंडवर झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील आणखी आठ सहकाऱ्यांना शपथ देण्यात आली.
- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे दोन आठवडय़ांनी झालेल्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक उच्चपदस्थ नेते उपस्थित होते. राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमित सिंग यांनी मंत्र्यांना शपथ दिली.
- उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत ७० पैकी ४७ जागांसह दणदणीत विजय मिळवून भाजप पुन्हा सत्तेवर आला असला, तरी धामी हे खातिमा या त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघातून निवडून येऊ शकले नव्हते. आता मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी त्यांना सहा महिन्यांच्या आत आमदार म्हणून निवडून येणे आवश्यक आहे.
- धामी यांच्यासह शपथ घेणाऱ्या भाजप आमदारांमध्ये सत्पाल महाराज, धनसिंह रावत, सुबोध उनियाल, प्रेमचंद अग्रवाल, रेखा आर्य, गणेश जोशी, चंदन राम दास व सौरभ बहुगुणा यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे पुत्र सौरभ, बागेश्वरचे आमदार चंदन राम दास व हृषिकेशचे आमदार प्रेमचंद अग्रवाल यांच्याव्यतिरिक्त इतर मंत्री यापूर्वी धामी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात होते. अग्रवाल हे यापूर्वीचे विधानसभा अध्यक्ष होते. उत्तराखंड मंत्रिमंडळात जास्तीत जास्त १२ मंत्री असू शकतात.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण नाहीच ; त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला:
- राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी)चे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करणारा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल बुधवारी मंत्रिमंडळाने स्वीकारला.
- मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय अहवालात एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी समजणे आणि महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सरकारच्या विभागामार्फत करणे ही मागणी मान्य करणे कायद्यातील तरतुदीनुसार तसेच प्रशासकीय आणि व्यावहारिक बाबी विचार घेता शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिल्यानंतरही विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेला संप एसटी कर्मचाऱ्यांनी सुरूच ठेवला आहे. विलीनीकरणाबाबत नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला.
- आज हा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडून तो स्वीकारण्यात आला. यासंदर्भात १ एप्रिलपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल असे ५ एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. तसेच संपाबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी कालच विधानसभेत स्पष्ट केले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार आता मराठीत ; राज्य सरकारकडून कायद्यात सुधारणा:
- राज्याची राजभाषा मराठी असतानाही कायद्यातील पळवाटा शोधत प्रशासकीय कारभारात इंग्रजीला प्राधान्य आणि मराठीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका, नियोजन प्राधिकरण लवकरच कारवाईच्या कचाटय़ात सापडणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद – महापालिका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठीची सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे मुंबई महापालिका, एमएमआरडीए, सिडको यांना आपला कारभार मराठीतच करावा लागेल.
- मराठीचा राजभाषा म्हणून स्वीकार करण्यात आल्यानंतर सन १९६४ च्या महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार १मे १९६६ पासून राज्यातील सर्व शासकीय कामकाजात मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आाहे. त्यानुसार विधिमंडळाचे कामकाज, सरकारचे कायदे, तसेच शासकीय कामकाज मराठीत केले जाते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि नियोजन प्राधिकरणे सरकारी कार्यालयात मोडत नसल्याने त्यांना आजवर मराठीची सक्ती करता येत नव्हती.
- राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मराठीचा वापर सोयीनुसार केला जातो. मात्र अनेकवेळा इंग्रजीचा वापर मोठय़ाप्रमाणात केला जातो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ, सिडको, म्हाडा अशा संस्थामध्ये कामकाजात इंग्रजीचाच अधिक प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे लोकांची गैरसोय होते.
- होणार काय – यापुढे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था आणि नियोजन प्राधिकरणे, महामंडळामध्ये सर्व कामकाज मराठीतच करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी राजभाषा अधिनियमात सुधारणा करण्यात येणार असून सरकारी कार्यालयाप्रमाणेच राज्यातील सर्व निमशासकीय- स्थानिक स्वराज्य संस्थांना या कायद्याच्या कक्षेत आणले जाणार आहे.
- आज विधेयक – गुरुवारी याबाबतचे सुधारणा विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे विधेयक संमत झाल्यानंतर राजभाषा अधिनियमाच्या सर्व तरतूदी स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू होणार आहेत.
देश ३१ मार्चपासून निर्बंधमुक्त! ; केंद्र सरकारचा निर्णय – मुखपट्टी, अंतरनियम पालन मात्र आवश्यक:
- देशात दोन वर्षांपूर्वी करोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आह़े करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी मुखपट्टीचा वापर आणि अंतरनियमाचे पालन यापुढेही करावे लागणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केल़े
- देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वप्रथम २४ मार्च २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या होत्या़ करोना रुग्णआलेखातील चढ-उतारानुसार त्यात वेळोवेळी बदल करण्यात आल़े आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने जोखीम-मूल्यांकनाधारित धोरणाचा अवलंब करण्याची सूचना करताना केंद्राने बुधवारी सार्वजनिक कार्यक्रम आणि आर्थिक व्यवहार पूर्ववत करण्याची गरज व्यक्त केली़
- याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आह़े रुग्ण निदान, देखरेख, रुग्णशोध, उपचार, लसीकरणावर भर देत रुग्णालयांतील पायाभूत सुविधांच्या क्षमतवाढीवर गेल्या दोन वर्षांत चांगले काम झाले आह़े तसेच करोनाबाबत सर्वसामान्य जनतेतही मोठी जागरूकता आली आहे, असे भल्ला यांनी या पत्रात म्हटले आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सुमारे २० हजार असून, करोनाचा दैनंदिन संसर्गदरही ०.२८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, देशात लशींच्या एकूण १८१.५६ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत, हेही उल्लेखनीय असल्याचे भल्ला यांनी नमूद केले.
- या सर्व बाबी विचारात घेऊन, करोनाला आळा घालण्याच्या उपाययोजनांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदी यापुढे लागू करण्याची गरज नाही, असा निर्णय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
‘आयपीएल’साठी २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी:
- इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या अध्यायाला शनिवारपासून मुंबईत प्रारंभ होत असून, स्टेडिमयमध्ये २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे, असे संयोजकांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. वानखेडे स्टेडियमवर २६ मार्चला गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. करोनाच्या साथीतून सावरल्यानंतर प्रथमच ‘आयपीएल’साठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे.
- ‘‘मुंबईत वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम तसेच पुण्याच्या गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर हे सामने होणार असून, करोनाच्या शिष्टाचारांचे पालन करीत २५ टक्के प्रेक्षकांना ते पाहता येतील,’’ असे संयोजकांनी म्हटले आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या दोन नव्या संघांच्या समावेशामुळे यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये ७४ सामने होतील. यापैकी ७० साखळी सामने मुंबईत होणार आहेत. साखळी सामन्यांच्या तिकीट विक्रीला बुधवारपासून प्रारंभ झाला असून, http://www.iplt20.com आणि http://www.BookMyShow.com या संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- ‘आयपीएल’मधील कोलकाता नाइट रायडर्सच्या पहिल्या पाच सामन्यांना ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिंन्स आणि आरोन फिंच मुकणार आहेत, अशी माहिती संघाचे प्रेरक डेव्हिड हसी यांनी बुधवारी दिली. त्यामुळे कोलकाता संघाला धक्का बसला आहे. कोलकाताची सलामीची लढत २६ मार्चला चेन्नई सुपर किंग्जशी आहे. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा ५ एप्रिलला संपणार आहे. कोलकाताचा पाचवा सामना १० एप्रिलला होणार आहे. जैव-सुरक्षा परिघाच्या आव्हानामुळे अॅलेक्स हेल्सने आधीच माघार घेतली आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२४ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २३ मार्च २०२३ चालू घडामोडी
- २२ मार्च २०२३ चालू घडामोडी
- २१ मार्च २०२३ चालू घडामोडी
- २० मार्च २०२३ चालू घडामोडी
- १९ मार्च २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |