२५ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२५ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |25 April 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२५ एप्रिल चालू घडामोडी

लतादीदींच्या आठवणीने आशा भोसले भावूक; ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान

  • भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सोमवारी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना लतादीदींच्या आठवणी विशद करताना आशाताई भावूक झाल्या, तर हाजी अली येथे लता मंगेशकर यांचे ४० फुटांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली.मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या पुण्यतिथिनिमित्त मंगेशकर प्रतिष्ठानद्वारे प्रदान करण्यात आलेल्या सर्व पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह आणि एक लाख एक हजार एक रोख रुपये असे होते.
  • कला, संगीत, समाजसेवा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल पंकज उधास यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट नाटक व उत्कृष्ट नाटय़निर्मितीचा पुरस्कार ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या गौरी थिएटर्स या संस्थेला, समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेसाठी श्री सदगुरु सेवा ट्रस्ट, साहित्य क्षेत्रासाठी ग्रंथाली प्रकाशनाला वागविलासिनी पुरस्कार, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रसाद ओक आणि चित्रपट क्षेत्रासाठी विद्या बालन या सर्व मान्यवरांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • यावेळी पुणे येथील एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा सन्मान करण्यात आला. राजबाग, लोणी येथे विश्वनाथ कराड यांनी विश्वशांती कला अकादमी स्थापन केली. या अकादमीचे अध्यक्षपद गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सांभाळले होते. लता मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी कराड यांनी उत्तराखंड येथे सरस्वती नदीच्या उगमस्थानी सरस्वतीचे मंदिर बांधून मूर्तीसमोर लता मंगेशकर यांचा पुतळा उभारला होता. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या या सोहळय़ाला कला, संगीत अशा विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व गायक हरिहरन यांच्या गायनाची आणि आसाम येथील नृत्य कलाकारांचे कथ्थक नृत्य पाहण्याची पर्वणी रसिकांना मिळाली.

पुणे: उमेदवारांचा डेटा सुरक्षित, प्रश्नपत्रिका मिळवणे अशक्य

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आयोजित स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका समाजमाध्यमात आल्याने रविवारी खळबळ उडाली होती. त्यानंतर आयोगाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. त्यानंतर एमपीएससीने या प्रकरणाबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले. स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिक ऑनलाइन नाहीत. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने प्रश्नपत्रिका मिळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केवळ बाह्य दुव्यावर उपलब्ध केलेल्या काही पीडीएफ स्वरुपातील प्रवेशपत्रांव्यतिरिक्त अन्य कोणताही विदा नाही. उमेदवारांच्या विदाशी छेडछाड झालेली नाही, असे एमपीएससीने सोमवारी स्पष्ट केले.
  • एमपीएससीतर्फे ३० एप्रिलला होऊ घातलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षेची प्रवेशपत्रे समाजमाध्यमांत फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. त्याशिवाय त्याशिवाय समाजमाध्यमावरील समूहावर एमपीएससी उमेदवारांचा विदा ‘लीक’ झाल्याचा, प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली.
  • त्यानंतर एमपीएससीकडून उमेदवारांची प्रवेशपत्रे समाजमाध्यमात आल्याची कबुली देत उमेदवारांचा विदा सुरक्षित असल्याचा, प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा खुलासा केला. तसेच सीबीडी बेलापूर येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रणालीची अधिक तपासणी करून एमपीएससीने पुन्हा सोमवारी सविस्तर माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

चीन लवकरच टेलिकॉम क्षेत्रात नवीन पाऊल टाकणार? ‘या’ निर्णयामुळे अमेरिकेची वाढली चिंता

  • संपूर्ण जगभरामध्ये आता ५ जी नेटवर्कची चर्चा सुरु आहे. जगातील अनेक देशांमध्ये ५जी नेटवर्क सुरु करण्यात आले आहे. भारतात सुद्धा रिलायन्स जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी अनेक शहरांमध्ये आपली ५जी सेवा सुरु केली आहे. मात्र आता चीन लवकरच या पुढील म्हणजे ६जी नेटवर्क लॉन्च करण्याची शक्यता आहे. ६जी वर चीनने काम करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. ४ जी नेटवर्कपेक्षा ५ जी नेटवर्क २० पटींनी वेगवान आहे. मात्र ६ जी लॉन्च झाल्यास हे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणारे नेटवर्क असणार आहे.
  • ६ जी वायरलेस इंटरनेट हे स्पीड, स्पेक्ट्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सुरक्षा आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत आणखी प्रगती करेल अशी अपेक्षा आहे. सध्या अनेक देशांमध्ये ५ जी सुरु झाले असले तरी बरेच देश ५ जी नेटवर्कसाठी संघर्ष करत आहेत. यामध्ये चीन देश लवकरच ६ जी वायरलेस नेटवर्क लॉन्च करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तसेच चीन अल्ट्रा फास्ट वायरलेस इंटरनेटचे टेस्टिंग देखील करत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्याचा स्पीड १०० Gbps इतका आहे. असे झाल्यास हे नेटवर्क ५जी पेक्षा कितीतरी पटीने वेगवान असणार आहे.

चीनच्या यशामुळे अमेरिकेला भरली धडकी

  • ६जी नेटवर्क पहिल्यांदा कोण सुरु करणार याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये आपण मागे राहू की काय अशी भीती अमेरिकेला आहे.गेल्या शुक्रवारी, व्हाईट हाऊसने वायरलेस कनेक्टिव्हिटीच्या पुढील पिढीवर चर्चा करण्यासाठी उद्योग क्षेत्रामधील नेत्यांची भेट घेतली. इतर देश हे ६ जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या स्टॅंडर्डमध्ये आघाडीवर असतील आणि आपण मागे राहू अशी भीती अमेरिकेला सतावत आहे. मेरिकेला सर्वात जास्त चिंता ही चीनची आहे. थोडक्यात चीनने जर खरोखरच ६ जी नेटवर्क सुरू केले तर अमेरिकेची चिंता वाढणार आहे.

‘मन की बात’मुळे लोकांचे मोदींशी भावनिक नाते!‘आयआयएम-रोहतग’चे सर्वेक्षण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमाची रविवारी (३० एप्रिल) शतकपूर्ती होत असून या कार्यक्रमामुळे लोकांचे मोदींशी भावनिक नाते निर्माण झाल्याची बाब आयआयएम-रोहतगच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
  • देशभर १०० कोटींहून अधिक लोकांनी हा कार्यक्रम एकदा तरी ऐकलेला असून २३ कोटी नागरिक नियमित श्रोते आहेत तर, ४१ टक्के हा कार्यक्रम अधूनमधून ऐकतात. महिन्याच्या अखेरच्या रविवारी मोदी किमान अर्धा तास ‘मन की बात’ कार्यक्रमातून लोकांशी संवाद साधतात. हा कार्यक्रम लोकांना प्रोत्साहन देणारा वाटतो. मोदींची संवाद साधण्याची कला लोकांना या कार्यक्रमाकडे अधिक आकर्षित करते, असे निष्कर्षही नोंदवण्यात आले आहेत.
  • मोदींकडे विविध विषयांची सखोल माहिती असते, त्यांच्याशी भावनिक नाते जोडता येते, नेता म्हणून मोदी अत्यंत शक्तिशाली असून धाडसी निर्णय घेण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. मोदींना लोकांबद्दल सहानुभूती आहे. ते कुठल्याही विषयावर लोकांशी थेट संवाद साधतात व योग्य मार्गदर्शन करतात, असे सव्र्हेक्षणात सहभागी झालेल्या लोकांचे म्हणणे आहे.

मोदी सरकारबद्दल सकारात्मक दृष्टिकोन

  • ‘मन की बात’ ऐकल्यानंतर लोकांवर सकारात्मक परिणाम होतो. हा कार्यक्रम ऐकल्यानंतर सव्र्हेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के लोकांना देश उभारणीच्या कामामध्ये सहभागी झाले पाहिजे असे वाटू लागले. ५५ टक्क्यांनी जबाबदारी नागरिक झाल्याचे सांगितले. ६३ टक्के लोकांचा मोदी सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला, मोदी सरकारवरील विश्वास वाढल्याचे ५९ टक्के लोकांनी सांगितले. नागरिकांचे जीवनमान सुधारल्याचे ५८ टक्के लोकांना वाटले. सरकारची कार्यपद्धती व देशाच्या प्रगतीबाबत आशावादी झाल्याचे ७३ टक्के लोकांचे म्हणणे होते.

Reliance Jioचा नवीन रेकॉर्ड; एका महिन्यात युजर्सनी वापरला तब्बल ‘इतका’ अब्ज डेटा; जाणून घ्या

  • सध्या देशभरात Reliance Jio हे सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जिओचे ५ जी नेटवर्क सुरू झाले आहे. जिओच्या बाबतीत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. जिओ वापरकर्त्यांनी एका महिन्यात थोडे थोडकं नव्हे तर तब्बल १० एक्झाबाइट्स म्हणजेच १० अब्ज जीबी डेटा वापरला आहे. २०१६ ला रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर हा सर्वात मोठा आकडा आहे.
  • इतिहासमध्येच प्रथमच एकाच कंपनीच्या वापरकर्त्यांनी १० एक्झाबाइट्स डेटा वापरला आहे. याआधी देशभरात उपलब्ध असणाऱ्या सर्व नेटवर्कवरील डेटाचा वापर फक्त ४. ६ एक्झाबाइट्स इतका होता. मार्च तिमाहीमध्ये jio नेटवर्कवरील डेटाचा वापराचा आकडा हा ३०.३ एक्झाबाइट इतका होता. रिलायन्स जिओने आपल्या तिमाही निकालामध्ये याचा खुलासा केला आहे.
  • Jio टू 5G (Jio True SG) रोलआउटने डेटा वापर वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. Jio वापरकर्ते आता दरमहा सरासरी २३.१ GB डेटा खर्च करत आहेत. प्रत्येक Jio वापरकर्ता २ वर्षांपूर्वीच्या तुलनेत दरमहा सुमारे १० GB अधिक डेटा वापरत आहे. जिओ नेटवर्कवरील डेटा वापराची ही सरासरी टेलिकॉम उद्योगाच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे.

२३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये ५ जी सेवा

  • तिमाही निकालांनुसार,मार्च २०२३ पर्यंत ६० हजार साईट्सवर ३. ५ लाख ५जी सेल स्थापित केले होते. देशभरातील २३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये जिओने आपली ५ जी सेवा सुरु केली आहे. मोठ्या संख्येने लोकं जिओची ५जी सेवा वापरत आहेत. खूप वेगाने ५जी सेवा सर्वत्र रोलआऊट करत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या वर्ष अखेरपर्यंत संपूर्ण देशामध्ये ५जी सेवा सुरु करण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे.

अवघ्या 36 तासांत 7 शहरं आणि 5300 किमीचा प्रवास! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने विविध दौऱ्यांवर असतात. त्यांचे परदेशी दौरेही तितकेच गाजतात. सध्या भारतात निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. कर्नाटकात निवडणुका लागल्या आहेत. तर, येत्या काही महिन्यांत देशभरात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकांआधीच त्यांनी दौऱ्यांना सुरुवात केली आहे. असाच दौरा आजपासून सुरू झाला आहे. अवघ्या ३६ तासांत ते तब्बल ५ हजार ३०० किमीचा दौरा करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याची सर्वत्र चर्चा आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या विविध दौऱ्यांमध्ये व्यस्त असणार आहेत. ३६ तासांत ते जवळपास ५ हजार ३०० किमीचा प्रवास करणार आहेत. या प्रवासात ते सात शहरांमध्ये आठ कार्यक्रमांना हजेरी लावणार असून महत्त्वाच्या बैठकाही घेणार आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशात पोहोचले असून त्यानंतर तेथून दक्षिणेकडील केरळ आणि मग पश्चिमेतील दादरा नगर हवेली येथेही ते भेट देणार आहे. या तीन राज्यातील दौऱ्यांनंतर ते उद्या, २५ एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत परततील.
  • आज सकाळीच ते मध्य प्रदेशातील रिवा येथे पोहोचले. यासाठी त्यांनी दिल्ली ते खजुराहो असा ५०० किमीचा प्रवास केला. राष्ट्रीय पंचायती राज दिनाकरता ते रिवाला भेट देणार आहेत. हा कार्यक्रम झाल्यावर ते काजुराहोला परत येऊन केरळातील कोचीपर्यंत प्रवास करणार आहेत. जवळपास १७०० किमीचा प्रवास केल्यानंतर ते युवम कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणार आहेत.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२५ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.