Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 27 August 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२७ ऑगस्ट चालू घडामोडी
फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी उठवली.

१. सर्वोच्च न्यायालयानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची प्रशासकीय समिती बरखास्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ-फिफानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी उठवली आहे.
२. या निर्णयामुळे 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या सतरा वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
३. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कामकाजात तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावाच्या कारणावरून फिफानं 15 ऑगस्ट रोजी भारतीय महासंघाला निलंबित केलं होतं.
४. दरम्यान, फिफाच्या या निर्णयावर केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहारमंत्री अनुराग ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
सुमारे १०० वर्षांनंतर नागालँडला मिळालं नवं रेल्वे स्थानक.

- नागालँडला शंभर वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर शोखुवी हे नवीन रेल्वे स्थानक मिळालं आहे.
- दिमापूर स्टेशन १९०३ मध्ये खुलं झालं होतं. त्यानंतर काल नागालँडच्या मुख्यमंत्र्यानी पहिल्या प्रवासी रेल्वे सेवेला प्रारंभ केला.
- डोनी पोलो एक्सप्रेस शोखूवि स्थानकापासून काल प्रथम रवाना झाली.
- या सेवेमुळे नागालँडसह बाजूच्या राज्यांनाही फायदा होणार असुन प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणानुसार हा विकास होत असल्याचं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी जोडीनं पटकावलं जेतेपद.

- जागतिक बॅडमिंटन महासंघानं टोकियो इथं आयोजित केलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं आज कांस्यपद पटकावलं.
- जागतिक मानांकनात सातव्या क्रमांकावर असलेली ही जोडी उपांत्य फेरीत मलेशियाच्या अरॉन शिया आणि सो वुई या जोडीकडून पराभूत झाली.
पाकिस्तानमध्ये पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून राष्ट्रीय आणीबाणी अधिकृतपणे घोषित.

- पाकिस्तानमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज राष्ट्रीय आणीबाणी अधिकृतपणे घोषित केली.
- परामुळे आतापर्यंत ९३७ जणांनी आपले प्राण गमावले असून ३० दशलक्ष नागरिक बेघर झाले आहेत.
- मान्सूनच्या या संततधार पावसाला पाकिस्तान सरकारनं हवामानामुळे निर्माण झालेलं मानवतावादी संकट म्हटलं आहे.
- हवामान विभागाच्या अहवालानुसार पावसामध्ये असामान्य वाढ झाल्यामुळे देशभर, विशेषतः पाकिस्तानच्या दक्षिण भागात ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- पाकिस्तानच्या सिंध आणि बलुचिस्तान भागाला पुरस्थितीचा सर्वात जास्त फटका बसल्याचं पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. आपल्या देशातली पूरस्थिती हाताळण्यामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायानं आपल्याला मदत करावी अशी विनंती पाकिस्ताननं केली आहे.
इग्लंडचा जेम्स अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला आहे

- इग्लंडचा जेम्स अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५० विकेट्स पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
- तयाने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राचा (९४९ बळी) विक्रम मोडला.
- आतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणजे श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज, मुथय्या मुरलीधरन (१,३४७ विकेट), दिवंगत ऑसी फिरकी महान शेन वॉर्न (१,००० विकेट) आणि भारतीय फिरकी महान अनिल कुंबळे (९५६ विकेट) आहेत.
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
Q.1 2022 चा पुलित्झर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
उत्तर फहमिदा अजीम
Q.2 DRDO चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर डॉक्टर समीर कामत
Q.3 जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेन ची सुरुवात कोणत्या देशात करण्यात आली?
उत्तर जर्मनी
Q.4 लिबर्टी मेडल 2022 हे खालीलपैकी कोणाला देण्यात येणार आहे?
उत्तर झेलेन्स्की
Q.5 अलीकडेच जगभरात एकट्याने उड्डाण करण्याचा विक्रम कोणी केला आहे?
उत्तर मेक रुदरफोर्ड
Q.6 साहित्य अकादमी पुरस्कार 2022 युवा पुरस्कार हिंदी भाषेसाठी कोणाला देण्यात आला?
उत्तर भगवंत अनमोल
Q.7 युनेस्कोने 2022 चा शांततेचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला सन्मानित केला?
उत्तर अंजेला मार्केल
Q.8 NDTV मध्ये कोणत्या ग्रुपने 29.2% भागीदारी मिळवली आहे?
उत्तर अदानी ग्रुप
Q.9 U-20 ज्युनिअर जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोण प्रथम क्रमांक वर आले आहे?
उत्तर जपान
_
दिनविशेष
२७ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी :
- २६ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- २५ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- २४ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- २३ ऑगस्ट२०२२ चालू घडामोडी
- २२ ऑगस्ट२०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |