२७ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२७ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |27 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२७ फेब्रुवारी चालू घडामोडी

युक्रेनप्रश्नी शांतता प्रक्रियेत योगदानास भारत तयार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

  • रशिया-युक्रेन संघर्षांवर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज असून, कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास भारत तयार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांना दिली. प्रदूषणमुक्त ऊर्जा, व्यापार, संरक्षण आणि नवीन तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंदर्भात उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.
  • जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ हे शनिवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. यावेळी झालेल्या उभयपक्षी चर्चेत रशिया-युक्रेन संघर्ष, ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’, ‘फिनटेक’, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आदी मुद्यांवर भर देण्यात आला. शोल्झ यांच्याबरोबरील बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदींनी नमूद केले, या समस्यांचे निराकरण केवळ संयुक्त प्रयत्नांनीच शक्य आहे आणि ‘जी-२०’ च्या अध्यक्षपदी असतानाही भारत या दिशेने प्रयत्न करत आहे.
  • ‘‘युक्रेनमधील घडामोडी सुरू झाल्यापासून भारताने हा संघर्ष संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवण्याचा आग्रह धरला आहे. भारत कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास तयार आहे.’’
  • अशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडातील देशांवर युक्रेन संघर्षांचा नकारात्मक प्रभाव पडू नये, यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. या युद्धामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची पायाभूत सुविधा व उर्जा यंत्रणा नष्ट झाली आहे. आपण हिंसाचार करून (देशांच्या) सीमा बदलू शकत नाही, असे शोल्झ यांनी निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धा : महाराष्ट्राचा हर्षिल दाणी उपांत्य फेरीत

  • महाराष्ट्राच्या हर्षिल दाणीने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करताना वरिष्ठ राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. महिला विभागातून आकर्षि काश्यप, अस्मिता चलिहा, आदिती राव आणि अनुपमा उपाध्याय यांनी उपांत्य फेरी गाठली.
  • म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या हर्षिल दाणीने आपली आगेकूच कायम राखली. ताकदवान आणि नियंत्रित फटक्यांच्या जोरावर हर्षिलने यश योगीचे आव्हान २१-१०, २१-५ असे ३० मिनिटांत संपुष्टात आणले.
  • हर्षिलने कमालीच्या आत्मविश्वासाने खेळ करताना लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. २-२ अशा बरोबरीनंतर पहिल्या गेममध्ये हर्षिलने ६-३ अशा स्थितीत सलग ८ गुणांची कमाई करताना १४-६ अशी मोठी आघाडी घेतली आणि तीच कायम राखत मोठय़ा फरकाने पहिला गेम जिंकला.
  • दुसऱ्या गेमलाही हर्षिलचे वर्चस्व होते. गेमच्या उत्तरार्धातील १२-१२ अशी बरोबरी वगळता हर्षिल यशचा सामना करू शकला नाही. या एकमेव बरोबरीनंतर हर्षिलने यशला केवळ तीनच गुण मिळू दिले. उपांत्य फेरीत हर्षिलसमोर प्रियांशू राजावतचे आव्हान असेल.
  • पुरुष एकेरीत दुसऱ्या मानांकित श्रीकांतने कार्तिकेय गुलशन कुमारचे आव्हान २१-१०, २१-१८, २१-१६ असे मोडून काढले. ही लढत ५९ मिनिटे चालली. श्रीकांतची गाठ एम. मिथुनशी पडणार आहे. एम. मिथुनने अनुभवी सौरभ वर्माचे आव्हान १५-२१, २१-१९, २१-१९ असे मोडून काढले.

वर्धा : ओबीसी मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह नाशकात; १ मार्चपासून अर्ज करता येणार

  • ओबीसी मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह नाशकात सुरू झाले आहे. राज्य स्थापन झाल्यानंतर प्रथमच अशी विशेष व्यवस्था उपलब्ध झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
  • महाज्योतीचे माजी संचालक दिवाकर गमे यांनी २४ फेब्रुवारीस नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत हा मुद्दा लावून धरला होता. २० मार्चला त्याचे उदघाटन होणार आहे. दोनशे मुलींची प्रवेशक्षमता असलेल्या या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी १ ते १५ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
  • निवड समिती २०० मुलींची निवड करेल. २० मार्चला रीतसर प्रवेश होतील. याबाबत प्रक्रिया होऊनही वसतिगृह सुरू न झाल्याने प्रा.गमे यांनी शासनास नोटीस दिली होती. सुरू न झाल्यास नाशिक येथे आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अखेर हे काम मार्गी लागले, याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. प्रवेशात ७५ ओबीसी, ७५ मराठा व ५० आर्थिक दुर्बल घटकांच्या मुलींना प्रवेश मिळणार आहे.

प्रीमियर लीग फुटबॉल : मँचेस्टर सिटी संघाचा विजय

  • पहिल्या सत्रात केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर मँचेस्टर सिटी संघाने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये बॉर्नमाऊथ संघावर ४-१ असा विजय मिळवला.
  • सामन्याच्या पहिल्या सत्रात सिटीच्या झंझावातासमोर बॉर्नमाऊथच्या बचावफळीचा निभाव लागला नाही. ज्युलिअन अल्वारेझ (१५व्या मिनिटाला), अर्लिग हालँड (२९व्या मि.) व फिल फोडेन (४५व्या मि.) यांनी गोल सिटीला मध्यंतरापर्यंत ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
  • दुसऱ्या सत्रात, ख्रिस मेफामने (५१व्या मि.) केलेल्या स्वयंगोलमुळे सिटीच्या आघाडीत आणखी भर पडली. बॉर्नमाऊथकडून जेफरसन लेर्माने (८३व्या मि.) गोल करत आघाडी काहीशी कमी केली. यानंतर सिटीच्या बचावफळीने त्यांना एकही गोल करण्याची संधी न देता आघाडी अखेपर्यंत कायम राखत विजय नोंदवला. हालँडचा सध्याच्या प्रीमियर लीग हंगामातील हा २७वा गोल आहे.
  • अन्य सामन्यात, गॅब्रिएल मार्टिनेलीच्या (४६व्या मिनिटाला) निर्णायक गोलच्या जोरावर आर्सेनलने लिस्टर सिटीवर १-० अशा विजयाची नोंद केली. तर, लिव्हरपूल व क्रिस्टल पॅलेस यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला.

रशियाने माघार घ्यावी; संयुक्त राष्ट्रांचा ठराव; युक्रेनमधील पेचावर भारतासह ३२ देश तटस्थ

  • युक्रेनमधील युद्ध संपवून रशियाने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी करणारा गैरबंधनकारक ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मंजूर केला. भारताने मात्र तटस्थ राहून या ठरावावर मतदान केले नाही. या ठरावाद्वारे युक्रेनमध्ये व्यापक, न्याय्य व चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याची गरज अधोरेखित केली गेली.
  • या ठरावावर संयुक्त राष्ट्र आमसभेच्या १९३ सदस्य राष्ट्रांपैकी ३२ देशांनी मतदान केले नाही. त्यात भारतही होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ‘युक्रेनमध्ये व्यापक, न्यायसंगत व कायमस्वरुपी शांतता प्रस्थापनेसाठी संयुक्त राष्ट्रांची सनद (चार्टर) सिद्धांत’ ठराव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाच्या बाजूने १४१ मते पडली, तर सात मते विरोधात पडली. या युद्धाच्या एक वर्षांनंतरही युक्रेन व रशिया या दोघांनाही मान्य असलेला तोडगा शोधण्यास जगाला यश आले आहे का, असा सवाल मात्र भारताने उपस्थित केला.
  • हा ठराव मंजूर झाल्यानंतर भारताच्या बाजूने स्पष्टीकरण देताना, संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या, की युक्रेन संघर्षांला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे आमसभेने स्वत:ला काही प्रश्न विचारणे महत्वाचे आहे.
  • आम्ही युक्रेन व रशिया या दोघांनाही मान्य असलेल्या संभाव्य तोडग्यापर्यंत पोहोचलो आहोत का? रशिया व युक्रेन या दोन्ही बाजूंचा सहभाग नसलेली कोणत्याही प्रक्रियेतून आपल्याला विश्वासार्ह व सार्थ तोडगा मिळू शकणार आहे का? जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या समकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची यंत्रणा आणि विशेषत: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद कुचकामी ठरली नाही का? युक्रेनमधील परिस्थितीबद्दल भारताला अतीव चिंता वाटते.

मयांक अगरवाल शेष भारताचा कर्णधार:

  • कर्नाटकचा कर्णधार मयांक अगरवाल ग्वाल्हेर येथे एक मार्चपासून मध्य प्रदेशविरुद्ध सुरू होणाऱ्या इराणी चषकासाठी शेष भारताचे नेतृत्व करणार आहे.
  • अगरवाल नुकत्याच झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
  • हा सामना सुरुवातीला इंदूर येथे होणार होता.
  • मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एक मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीमुळे हा सामना ग्वाल्हेर येथे स्थानांतरित करण्यात आला.

ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा कोरले विश्वचषकावर नाव:

  • आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील फायनल सामना रविवारी पार पडला.
  • केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय मिळला.
  • त्याचबरोबर सलग तिसऱ्यादा आणि एकूण सहाव्यांदा महिला टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले.
  • प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 6 बाद 156 धावा केल्या होत्या.
  • ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये चॅम्पियन बनला आहे.
  • ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा महिला टी-20 विश्वचषकात विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे.

बेथ मुनीने फायनल सामन्यात रचला इतिहास:

  • ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला टी-20 विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून इतिहास रचला.
  • ऑस्ट्रेलियन संघासाठी नाणेफेक जिंकून डावाची सुरुवात करणाऱ्या मुनीने 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
  • त्याचबरोबर महिला टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम सामन्यात दोन अर्धशतके झळकावणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली.
  • बेथ मुनीने 53 चेंडूत 74 धावांची खेळी केली.
  • महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम बेथ मुनीच्या नावावर आहे.

टी-20 विश्वचषकात शबनिम इस्माईलने रचला इतिहास:

  • महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जात आहे.
  • या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघावर 19 धावांनी मात केली.
  • त्याचबरोबर सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
  • विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने 2 बळी घेत इतिहास रचला.
  • ती या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे.
  • शबनीम इस्माईलने महिला टी-20 विश्वचषकातील 32 सामन्यांत 43 बळी घेतले आहेत.
  • या बाबतीत तिने 27 सामन्यात 41 बळी घेणाऱ्या इंग्लंडच्या अन्या श्रबसोलेला मागे टाकले आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२७ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.