२५ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२५ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |25 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२५ फेब्रुवारी चालू घडामोडी

‘एअर इंडिया’चे ‘भरती उड्डाण’ ; ९०० वैमानिक, ४,२०० कर्मचाऱ्यांची पदे भरणार

  • एअर इंडिया यंदा ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे. 
  • वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या कंपन्यांकडून ७० मोठय़ा विमानांसह ४७० विमाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्याशिवाय ३६ विमाने भाडय़ाने घेतली जाणार आहेत. त्यापैकी दोन ‘७७७-२०० एलआर’ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात दाखलही झाली आहेत.  
  • टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोटय़ातील एअर इंडिया १८ हजार कोटींना खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने आपला आकार आणि सेवा या दोन्हींचा विस्तार करण्याची योजना आखली. त्याअंतर्गत मे-२०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात एअर इंडियाने १,९०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली आणि १,१०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. प्रतिभावान युवकांना संधी दिल्याने एअर इंडियाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा वेग वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.
  • भारतीय आदरातिथ्याचे प्रशिक्षण – भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना १५ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये त्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये शिकवली जातील. तसेच त्यांना भारतीय आदरातिथ्य आणि टाटा समूहाची संस्कृती यांचा सर्वोत्तम मिलाफ घडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांची शिफारस

  • अमेरिकेतील भारतीय वंशाचे कंपनी व्यवस्थापन तज्ज्ञ अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. गुरुवारी याबाबत घोषणा करताना अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी आर्थिक सर्वसमावेशकता आणि वातावरण बदल या क्षेत्रांमध्ये बंगा यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली.
  • जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिल मालपास यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असून मे महिन्यापर्यंत नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. जागतिक बँकेमध्ये अमेरिकेची हिस्सेदारी अधिक असल्यामुळे सर्वसाधारणपणे तेथील प्रशासनाने शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष होण्याचा प्रघात आहे. असे असल्याने बंगा यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. जागतिक बँकेच्या संचालक मंडळाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन जागतिक संस्थांपैकी एकीच्या सर्वोच्चपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसण्याची ही पहिलीच वेळ ठरेल. यापैकी जागतिक बँकेमध्ये अमेरिका तर नाणेनिधीमध्ये युरोपातील व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्षपदी असते.
  • बंगा यांचा परिचय – अजयपाल सिंग बंगा यांचा जन्म १९५९ साली पुण्यात झाला. हैदराबादमध्ये प्राथमिक शिक्षण आणि दिल्लीत उच्चशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या आयआयएममधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी नेस्ले, पेप्सिको यासारख्या अनेक बडय़ा कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली. मास्टरकार्ड कंपनीमध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहिलेले बंगा १ जानेवारी २०२२पासून जनरल ॲटलांटिक कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. २०१६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी

  • मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आज अखेर केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
  • देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या निर्णयाचं स्वागत करत देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने करून दाखवलं, असंही फडणवीस ट्विटमध्ये म्हणाले.
  • खरं तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
  • पण राज्यात सत्तांतर घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावाला स्थगिती दिली. औरंगाबाद शहराचं नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याचा नवा प्रस्ताव मंजूर केला. यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. अखेर आज या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

विराट कोहलीने खरेदी केला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का

  • क्रिकेटपटू विराट कोहलीने नुकताच अलिबागमधील आवास गावात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. विराट कोहली सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत त्यांचा मोठा भाऊ विकास कोहली याने अलिबागमध्ये बंगला खरेदी करण्याची सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे.
  • विराट आणि अनुष्काची अलिबागमधील पहिली मालमत्ता नाही. या जोडप्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबागमध्ये १९.२४ कोटी रुपयांना फार्महाऊस खरेदी केले होते. त्याने १.१५ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती आहे.
  • हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीने आवास व्हिलेजमधील २,००० चौरस फुटाच्या व्हिलावर ६ कोटी रुपये खर्च केले आहेत. या मालमत्तेवर त्यांनी ३६ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. या व्हिलामध्ये ४०० स्क्वेअर फूटचा स्विमिंग पूलही असल्याचं सांगण्यात येत आहे. बॉलीवूड अभिनेता संजय खानची मुलगी आणि हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खान हिने या प्रकल्पाचे इंटीरियर डिझाइन केले आहे.
  • वकील महेश म्हात्रे हे आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपीचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. त्यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “आवास हे नैसर्गिक सौंदर्यामुळे सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. तसेच, मांडवा जेटी आवासपासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे आणि स्पीड बोटींनी मुंबईचे अंतर आता फक्त १५ मिनिटांवर आणले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडला धक्का ; प्रथमच महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

तझमिन ब्रिट्स (५५ चेंडूंत ६८ धावा) आणि लॉरा वोल्व्हार्ड (४४ चेंडूंत ५३) या सलामीवीरांची अप्रतिम फलंदाजी, तसेच अयाबोंगा खाका (४/२९) आणि शबनिम इस्माइल (३/२७) या वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी इंग्लंडला सहा धावांनी पराभवाचा धक्का देत महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठली.

उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ४ बाद १६४ अशी धावसंख्या केली. प्रत्युत्तरात इंग्लंडला १८ चेंडूंत २८ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी अयाबोंगा खाकाने तीन धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद करत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने वळवला. इंग्लंडचा डाव २० षटकांत ८ बाद १५८ धावांवर मर्यादित राहिला.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२५ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.