Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |24 February 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२४ फेब्रुवारी चालू घडामोडी
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांची शिफारस
- अमेरिकेतील भारतीय वंशाचे कंपनी व्यवस्थापन तज्ज्ञ अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. गुरुवारी याबाबत घोषणा करताना अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी आर्थिक सर्वसमावेशकता आणि वातावरण बदल या क्षेत्रांमध्ये बंगा यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली.
- जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिल मालपास यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असून मे महिन्यापर्यंत नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. जागतिक बँकेमध्ये अमेरिकेची हिस्सेदारी अधिक असल्यामुळे सर्वसाधारणपणे तेथील प्रशासनाने शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष होण्याचा प्रघात आहे. असे असल्याने बंगा यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे.
- जागतिक बँकेच्या संचालक मंडळाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन जागतिक संस्थांपैकी एकीच्या सर्वोच्चपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसण्याची ही पहिलीच वेळ ठरेल. यापैकी जागतिक बँकेमध्ये अमेरिका तर नाणेनिधीमध्ये युरोपातील व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्षपदी असते.
‘मेटा’ पुन्हा एकदा करणार कर्मचाऱ्यांची कपात, सात हजार कर्मचाऱ्यांना दिले…
- सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदी मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. सध्या सर्वत्रच कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा कमर्चाऱ्यांची कपात करण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊयात.
- फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअॅप यांच्या मूळ कंपनी असलेल्या Meta मध्ये काही दिवसांत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. मेटा प्लॅटफॉर्म पुनर्रचना आणि downsizing करण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंतले आहे. यासह कंपनी नोकऱ्यांमध्ये कपात करण्याचा पुन्हा एकदा विचार करत आहे. जर असे झाले तर याचा फटका हजारो कर्मचाऱ्यांना बसू शकतो असे वॉशिंग्टन पोस्टने बुधवारी सांगितले.
- मेटा कंपनीने या आधीच आपल्या हजारो कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन केले आहे. त्यांच्या कामगिरीवर त्यांना कंपनीने खराब कामगिरी असे रेटिंगसुद्धा दिले आहे. कंपनीने आपल्या ७००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सरासरीपेक्षा कमी रेटिंग दिले आहे. यासह कंपनीने बोनस देण्याचा पर्यायही वगळला आहे. या कारणांमुळे मेटामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
- मेटाने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के म्हणजे ११,००० कर्मचाऱ्यांना २०२२ मध्ये काढून टाकले होते. मागच्या वर्षातील कर्मचारी कपात ही मेटाच्या १८ वर्षांच्या इतिहासातील पहिले कर्मचारी कपात होती. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी देखील आपल्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
करोनानंतर प. बंगालमध्ये ‘ॲडिनोव्हायनस’ने घातले थैमान; जाणून घ्या या आजाराची लक्षणे आणि उपचार
- २०१९-२० मध्ये करोना महामारीला सुरुवात झाली. जगभरामध्ये पसरलेल्या या रोगाने लाखो लोकांचा बळी घेतला. पहिल्या लाटेनंतर करोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट उदयास आला. एकूण परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारद्वारे टाळेबंदी करण्यात आली. पुढे प्रकरण स्थिर झाल्यानंतर हळूहळू सर्वकाही सुरु करण्यात आले. करोनाचे संकट असतानाच एका नव्या विषाणूमुळे एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगाल राज्यामध्ये ॲडिनोव्हायरस विषाणूने पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवला आहे.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एंटरिक डिसीजेस (NICED) या संस्थेद्वारे कोलकाता शहरामधील नागरिकांचे परिक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण परिक्षणामध्ये किमान ३० टक्के नागरिक या विषाणूने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर गंभीरपणे लक्ष देण्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. केंद्राच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागानुसार, ॲडिनोव्हायरस हा विषाणू स्पर्श किंवा हवेमार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहचतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत असला तरी, लहान बालकांना त्याचा जास्त धोका असल्याचे म्हटले जात आहे.
- मध्यम आकार असलेले अविकसित ॲडिनोव्हायरस विषाणूंमुळे फ्लूचे संक्रमण होते. मानवांसाठी धोकादायक असलेल्या ॲडिनोव्हायरस विषाणूचे ५० प्रकार असल्याचेचा दावा संशोधकांनी केला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्यांना आणि श्वसनाचे त्रास असणाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग लवकर होऊ शकतो. या विषाणूच्या संसर्गामुळे सर्दी, ताप, श्वसनाचे आजार संभवतात. पश्चिम बंगालमध्ये ॲडिनोव्हायरसमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याने तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मार्करम सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदी
- दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू एडीन मार्करमची इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. यंदाच्या ‘आयपीएल’ला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे.न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली सनरायजर्सने गतहंगामात सहा सामन्यांत विजय मिळवले होते, तर आठ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हैदराबादचा संघ आठव्या स्थानी राहिला होता. त्यानंतर यंदाच्या खेळाडू लिलावापूर्वी सनरायजर्सने विल्यम्सनला संघमुक्त केले. त्यामुळे सनरायजर्सचा संघ नव्या कर्णधाराच्या शोधात होता.
- सनरायजर्सच्याच मालकीच्या ईस्टर्न केप संघाने मार्करमच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० लीगमध्ये जेतेपद मिळवले होते. त्यामुळे आता सनरायजर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये मार्करम चांगल्या लयीत होता. त्याने ३६६ धावा करण्यासह ११ गडीही बाद केले. त्यामुळे त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
- वॉर्नरकडे दिल्लीचे नेतृत्व – दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत अपघातात दुखापतग्रस्त झाल्याने यंदाच्या ‘आयपीएल’ला मुकणार आहे. त्यामुळे दिल्लीला नव्या कर्णधाराची निवड करावी लागेल. यासाठी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
- अष्टपैलू अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग कर्णधारपदासाठी वॉर्नरला पसंती देणे अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२४ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २३ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- २२ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- २१ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- २० फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १९ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |