Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |20 February 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२० फेब्रुवारी चालू घडामोडी
कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजार धावा
- भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत २५ हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील सहावा फलंदाज ठरला. मात्र, त्याने हा टप्पा सर्वात कमी सामन्यांत गाठण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात ८ धावा केल्यानंतर कोहलीने हा विक्रम आपल्या नावावर केला. कोहलीचा हा ४९२वा आंतरराष्ट्रीय सामना होता. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत २५ हजार धावा पूर्ण करण्यासाठी या सामन्यात कोहलीला ५२ धावांची आवश्यकता होती. त्याने पहिल्या डावात ४४ धावा, तर दुसऱ्या डावात २० धावा केल्या. आता कोहलीच्या नावावर २५,०१२ धावा आहेत.
- २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीने कारकीर्दीत २५ हजार धावा ५४९व्या डावात पूर्ण केल्या. त्यामुळे सर्वात कमी डावांत हा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ५७७व्या डावात अशी कामगिरी केली होती.कोहलीच्या कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यांत ८१९५ धावा, २७१ एकदिवसीय सामन्यांत १२,८०९ धावा, ११५ ट्वेन्टी-२० सामन्यांत ४००८ धावा केल्या आहेत.
‘नीट’ परीक्षेच्या वैधतेला तमिळनाडू सरकारचे आव्हान
- देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (नीट) वैधतेला आव्हान देणारी याचिका तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. अशा प्रकारे एकच सामायिक परीक्षा आयोजित करणे हे संघराज्यवादाच्या तत्त्वाचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप राज्याने केला आहे.
- सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस यांसारखे पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रम, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ ही वैद्यकपूर्व प्रवेश परीक्षा घेतली जाते.
- ‘नीट’ सारख्या परीक्षांमुळे शिक्षणाबाबत निर्णय घेण्याची राज्यांची स्वायत्तता हिरावून घेतली जाणार असल्यामुळे, या परीक्षांमुळे घटनेच्या मूलभूत रचनेचा भाग असलेल्या संघराज्यवादाचे उल्लंघन करतात, असा आरोप राज्य सरकारने घटनेच्या अनुच्छेद १३१ अन्वये दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.
- पैसे देण्याच्या क्षमतेवर आधारित प्रवेश, कॅपिटेशन फी आकारणे, मोठय़ा प्रमाणावरील अनियमितता, विद्यार्थ्यांची पिळवणूक, नफेखोरी आणि व्यापारीकरण आदी गैरप्रकार रोखण्यासाठी नीट परीक्षा आवश्यक असल्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने २०२० साली ही परीक्षा वैध ठरवली होती, मात्र सरकारी जागांवरील प्रवेशाच्या बाबतीत हे आधार लागू नसून, हे तर्क केवळ खासगी महाविद्यालयांतील जागांसाठी लागू आहेत, असे अमित तिवारी या वकिलामार्फत सादर केलेल्या याचिकेत राज्य सरकारने म्हटले आहे.
दक्षिण अफ्रिकेतून भारतात आले आणखी १२ चित्ते, ग्वाल्हेरमध्ये उतरलं वायुसेनेचं विमान
- ग्वाल्हेर या ठिकाणी १२ आणखी चित्ते पोहचले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून आणण्यात आलेले हे पाहुणे आता भारतात वास्तव्य करणार आहेत. या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या गॅलेक्सी ग्लोबमास्टर सी १७ या विशेष विमानातून भारतातल्या ग्वाल्हेर या ठिकाणी आणण्यात आलं आहे. विशिष्ट बॉक्समधून हे चित्ते भारतात आणले गेले आहेत.
- कूनो अभयअरण्यात राहणार चित्ते – या १२ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे. याआधीही चित्ते भारतात आणले आहेत. भारतातली चित्त्यांची संख्या वाढावी या अनुषंगाने दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात एक करार झाला होता. याआधी ८ चित्ते भारतात आणले गेले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात १२ चित्ते आणले गेले आहेत.
- चित्ता भारतातून १९५२ मध्येच नामशेष – १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. मध्य प्रदेशातील जंगलात सोडण्यात आलेले चित्ते नामिबियातील आहेत. त्यांना या वर्षांच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराखाली आणण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुनो नॅशनल पार्कमध्ये आठ चित्ते सोडले आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधानांच्या हस्तो चित्ता सोडणे हा भारतातील वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन आणि वैविध्य आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे, निवेदनात म्हटले आहे.
साक्षरतेलाच शिक्षण समजल्यामुळे देशापुढे संकट इतिहासतज्ज्ञ; रोमिला थापर यांचे मत
- ‘साक्षरता म्हणजेच शिक्षण’ असा समज समाजावर लादला गेल्यामुळे देशापुढे संकट उभे राहिले आहे, असे परखड मत नामवंत इतिहासतज्ज्ञ रोमिला थापर यांनी व्यक्त केले, तसेच स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांमध्ये असलेला बुद्धिवाद सध्याच्या राजकीय नेत्यांमध्ये दिसत नाही अशी खंतही व्यक्त केली. इतिहासतज्ज्ञ एस. इरफान हबीब यांनी लिहिलेल्या मौलाना आझाद यांच्या चरित्राच्या प्रकाशन सोहळय़ामध्ये त्या प्रमुख पाहण्या म्हणून बोलत होत्या.
- ‘केवळ बाराखडी शिकणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्यामुळे मनाचे दरवाजे उघडणे हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट असल्याची जाणीव थापर यांनी आपल्या भाषणातून करून दिली. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळचे अनेक नेते बुद्धिवादी होते. ते वाचत असत, विचार करत असत आणि भविष्यात चांगला समाज घडवण्यासाठी ते वचनबद्ध होते. आता ते वातावरण हरवले आहे’ असे त्या म्हणाल्या.
- स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून काम करताना मौलाना आझाद यांनी सर्व भारतीयांना वय वर्षे १४ पर्यंत शिक्षण अनिवार्य करण्याचा पुरस्कार केला होता. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे असा विचार त्यांनी मांडल्याची आठवण थापर यांनी करून दिली.
राज्यांना सर्व थकबाकी तातडीने अदा; वस्तू-सेवा कर परिषदेनंतर अर्थमंत्र्यांची घोषणा
अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यांना १६,९८२ कोटींची थकबाकी त्वरित अदा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. शनिवारी येथे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक झाल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. या बैठकीत द्रवरूप गूळ, पेन्सिल शार्पनर यावरील कर घटविण्यात आला आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२० फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १९ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १८ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १७ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १६ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १५ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |