१८ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१८ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |18 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१८ फेब्रुवारी चालू घडामोडी

गुगलने ४५३ भारतीयांना कामावरून काढलं, सुंदर पिचाई म्हणाले…

  • सध्या जगभरात दिग्गज टेक कंपन्यांसह विविध क्षेत्रातील कंपन्या जागतिक मंदीचे कारण देत अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यातच Google या दिग्गज टेक कंपनीने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. पुन्हा एकदा Google ने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुगलच्या भारतातील युनिट्समधून कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे.
  • गुगलने आपल्या भारताच्या युनिटमधील ४५३ कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या बिझनेसलाईनच्या अहवालानुसार या ४५३ भारतीय कमर्चाऱ्यांना (Google indian Employee layoff) काढून टाकण्याची कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली आणि याची माहिती मेलद्वारे देण्यात आली. हा मेल गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी पाठवला आहे.गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांची सहमतीही या मेलमध्ये नमूद करण्यात आली आहे.
  • अहवालानुसार, अनेक कारणांमुळे कमर्चाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असून, सुंदर पिचाई यांनी या सर्व निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे मान्य केले आहे.या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पाठवलेल्या मेमो मध्ये त्यांनी दावा केला होता की, गुगलचे यूएसच्या बाहेरील Google कमर्चाऱ्यांना स्थानिक नियमांनुसार स्थानिक पद्धतींनुसार समर्थन मिळेल. google ने भारतातील ४५३ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र जागतिक स्तरावर किती कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे किंवा कंपनीने मध्ये अजून कमर्चारी कपात होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शी इज अनस्टॉपेबल : भारतीय नौदलातील महिलांची अनोखी जनजागृती मोहीम

  • भारतीय नौदल आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली – लोंगेवाल – दिल्ली या मार्गावर १२ दिवसांच्या ऑल इंडिया विमेन कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नौदलाच्या ताफ्यातील साहसी महिलांद्वारा या रॅलीचे संचालन होत आहे. भारतीय नौदलामध्ये अधिकारी होण्यासाठी अनेक अकल्पित आव्हानांना धैर्याने, दृढ निश्चय – संयमाने सामोऱ्या जाणाऱ्या महिलांच्या शौर्यगाथा ठळकपणे मांडण्यात येणार आहेत.
  • भारतीय नौदल आणि जीप इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली आयोजिण्यात आली आहे. दिल्लीपासून सुरू होत जयपूर, बिकानेर, जैसलमेर, लोंगेवाला, जोधपुर, उदयपूर असा सुमारे २३०० किमीचा प्रवास करत या रॅलीचा समारोप दिल्लीमधे होईल. नौदलातील महिला अधिकाऱ्यांच्या योगदाना प्रकाशझोतात आणणे, तरूणींना भारतीय नौदलामध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करणे, लोंगेवाला युद्धस्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणे, संपूर्ण रॅलीमार्गात नौदलातील वीरांगनांशी संवाद साधणे, एनडब्ल्यूडब्ल्यूए (नेव्ही वेल्फेअर अॅण्ड वेलनेस असोसिएशन) दिनाचे औचित्य म्हणून एनडब्ल्यूडब्ल्यूएचे उद्देश, हेतू सर्वांपर्यंत पोहोचवणे आदी उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. ‘शी इज अनस्टॉपेबल’ हे या रॅलीचे बोधवाक्य आहे. या मोहिमेचे आभासी उद्घाटन नौदल प्रमुख अॅडमिरल आर. के. हरी कुमार यांच्याहस्ते पार पडले.
  • शी इज अनस्टॉपेबल’ या अनोख्या रॅलीमध्ये महिला नौदल अधिकारी आणि खलाशी तसेच जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेल्या नौदल अधिकाऱ्यांच्या पत्नींचा समावेश आहे. भारतीय नौदलामध्ये आपल्या भरीव कामगिरीने बदल घडवून आणणाऱ्या आणि संपूर्ण नौदलासाठी आदर्श ठरलेल्या महिलाही यात सहभागी होणार आहेत. या आगळ्या साहस मोहिमेविषयी जीप इंडियाच्या प्रमुख निपुण जे. महाजन म्हणाल्या, केवळ संपूर्णपणे महिलांसाठी खास अशी मोहीम राबविणाऱ्या भारतीय नौदलाच्या पाठीशी उभे राहणे हे आम्हांला सन्माननीय वाटते. एक ब्रँड म्हणून आम्ही नेहमीच महिला नेतृत्व आणि सर्वच क्षेत्रातील महिलांच्या समानतेवर विश्वास ठेवत आलो आहोत.

IPLचे बिगुल वाजले! पहिला सामना ३१ मार्चला तर २८ मे रोजी अंतिम सामना; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

  • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) माहिती दिली की, पहिला सामना ३१ मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. याचाच अर्थ युवा स्टार हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात अनुभवी महेंद्रसिंग धोनीचे आव्हान असेल. २८ मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
  • ५२ दिवसांत १० संघांमध्ये ७० लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर चार प्लेऑफ सामने खेळवले जातील. अशा प्रकारे या स्पर्धेत एकूण ७४ सामने होणार आहेत. १८ डबल हेडर असतील (एका दिवसात दोन सामने). सर्व सामने देशभरातील एकूण १२ मैदानांवर खेळवले जातील. साखळी फेरीत एक संघ आपल्या घरच्या मैदानावर सात सामने आणि विरोधी संघाच्या मैदानावर सात सामने खेळेल. गेल्या वेळी गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळला. पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला होता.
  • आयपीएल २०१९ नंतर प्रथमच सर्व संघांच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे २०२० मध्ये यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याच वेळी, २०२१ मध्ये भारतात काही मैदानांवर सामने खेळवले गेले होते, परंतु कोरोना महामारीमुळे ते मध्यभागी थांबवले गेले आणि यूएईमध्ये पूर्ण झाले. २०२२ मध्ये ही स्पर्धा संपूर्णपणे भारतात खेळली गेली, परंतु मुंबई-पुणे येथे लीग सामने आणि अहमदाबाद-कोलकता येथे प्लेऑफ सामने खेळले गेले.
  • सर्व १० संघ साखळीमध्ये १४-१४ सामने खेळावे लागतील – सर्व १० संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ १४-१४ सामने खेळेल. या दरम्यान, प्रत्येक संघाला त्यांच्या घरी ७ सामने खेळावे लागतील, तर उर्वरित ७ सामने विरोधी संघाच्या मैदानावर खेळावे लागतील. अशा प्रकारे प्रत्येक संघ ७ होम आणि ७ अवे सामने खेळेल.

गुंतवणूकदारांच्या हितासाठी संपूर्ण पारदर्शकता आवश्यक

भांडवली बाजार नियामक प्रणालीच्या (सेबी) मजबुतीकरणासाठी तज्ज्ञ समितीवर कोणाची नियुक्ती करावी याबाबतच्या सूचना बंद लिफाफ्यातून देण्याचा केंद्राचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आणि गुंतवणूकदारांचे हितरक्षण करताना संपूर्ण पारदर्शकता राखली जावी, असे सुनावले.

यूट्यूबच्या CEO पदी भारतीय वंशाच्या नील मोहन यांची नियुक्ती:

  • यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार सुसान व्होजिकी या आपल्या पदावरून पायउतार झाल्या आहेत.
  • आता अमेरिकास्थित भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • याबाबत यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने घोषणा केली आहे.
  • यूट्यूब हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म आहे.
  • सुसान व्होजिकी गुगलच्या जाहिरात विभागात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.
  • नील मोहन यांनी 2008 साली गुगलमधून आपल्या कामाला सुरुवात केली होती.
  • 2015 साली ते यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून रुजू झाले.

भारतीय नौदलातील महिलांची अनोखी जनजागृती मोहीम:

  • भारतीय नौदल आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली – लोंगेवाल – दिल्ली या मार्गावर 12 दिवसांच्या ऑल इंडिया विमेन कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
  • नौदलाच्या ताफ्यातील साहसी महिलांद्वारा या रॅलीचे संचालन होत आहे.
  • भारतीय नौदलामध्ये अधिकारी होण्यासाठी अनेक अकल्पित आव्हानांना धैर्याने, दृढ निश्चय – संयमाने सामोऱ्या जाणाऱ्या महिलांच्या शौर्यगाथा ठळकपणे मांडण्यात येणार आहेत.
  • भारतीय नौदल आणि जीप इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली आयोजिण्यात आली आहे.
  • दिल्लीपासून सुरू होत जयपूर, बिकानेर, जैसलमेर, लोंगेवाला, जोधपुर, उदयपूर असा सुमारे 2300 किमीचा प्रवास करत या रॅलीचा समारोप दिल्लीमधे होईल.

शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाकडे:

  • राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला.
  • आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले.
  • त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना’ गमवावी लागली आहे.
  • केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते.
  • मात्र, शुक्रवारी आयोगाने अंतिम निकाल देताना, शिंदे गटाचे हंगामी पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह तातडीने गोठवण्यात आल्याचे स्पष्ट केले.
  • तसेच शिवसेनेच्या 2018च्या घटनेमध्ये, लोकप्रतिनिधी कायदा व पक्षांतर्गत लोकशाहीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार दुरुस्ती करावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे.

पुजारा 100वी कसोटी खेळणारा 13वा भारतीय क्रिकेटपटू:

  • भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रवेश करताच मोठी कामगिरी करेल.
  • 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चेतेश्वर पुजारा भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा 13वा क्रिकेटपटू ठरणार आहे.
  • आपल्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत तो भारताचा एक प्रमुख फलंदाज म्हणून समोर आला.
  • चेतेश्वर पुजाराने भारतासाठी 99 सामन्यात 7021 धावा केल्या आहेत.
  • यादरम्यान त्याने 19 शतके आणि 34 अर्धशतके झळकावली. नाबाद 206 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१८ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.