२१ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२१ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |21 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२१ फेब्रुवारी चालू घडामोडी

‘स्लम सॉकर’ प्रकल्पाला लॉरेओ पुरस्कारासाठी नामांकन

  • नवी दिल्ली स्थित ‘स्लम सॉकर’ या फुटबॉल प्रकल्पाला या वर्षीच्या प्रतिष्ठेच्या लॉरेओ जागतिक क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे.
  • खेळांच्या माध्यमातून गरजू मुले आणि युवकांचे आयुष्य बदलण्यात साहाय्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देणे हा ‘लॉरेओ स्पोर्ट्स फॉर गुड’ पुरस्काराचा हेतू आहे. या पुरस्कारासाठी ‘स्लम सॉकर’सह अन्य चार व्यक्ती/संस्थांना नामांकन मिळाले आहे. राजधानी दिल्ली येथील झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षित करणे आणि त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढणे हा ‘स्लम सॉकर’ प्रकल्पाचा उद्देश आहे.
  • लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी विश्वचषक विजेत्या अर्जेटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेसी, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिकसह ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार मिळवणारा फ्रान्सचा तारांकित फुटबॉलपटू किलियन एम्बापे, ‘फॉम्र्युला १’ विजेता मॅक्स व्हेस्र्टापेन, टेनिसपटू राफेल नदाल, पोल वॉल्टपटू मोंडो डुप्लान्टिस आणि बास्केटबॉलपटू स्टेफ करी यांना नामांकन मिळाले आहे.
  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या अमेरिकेच्या धावपटू शेली-अ‍ॅन फ्रेझर-प्राइस आणि सिडनी मॅक्लॉक्न-लेव्हरोन यांच्यासह जलतरणपटू केटी लडेकी, फुटबॉलपटू अलेक्सिया पुतेयास, स्किंगपटू मिकाएला शिपरीन आणि टेनिसपटू इगा श्वीऑनटेक यांना लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी मानांकन देण्यात आले आहे. तसेच विश्वचषक विजेता अर्जेटिना फुटबॉल संघ, चॅम्पियन्स लीग विजेता रेयाल माद्रिद संघ, ‘एनबीए’ विजेता गोल्डन स्टेट वॉरियर्स संघ, ‘फॉम्र्युला १’मधील ओरॅकल रेड बूल रेसिंग संघ, फ्रान्स रग्बी संघ आणि इंग्लंड महिला फुटबॉल संघ हे लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम संघाच्या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत.

तुर्कस्तानहून परतलेल्या भारतीय मदत पथकांचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

  • भूकंपग्रस्त तुर्कस्तानमध्ये तैनात करण्यात आलेल्या भारताच्या मदत व आपदा निवारण पथकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कौतुक केले. गेल्या काही वर्षांत भारताने स्वत:ची ओळख केवळ स्वयंपूर्ण देश म्हणूनच नव्हे, तर नि:स्वार्थी देश म्हणून बळकट केली आहे, असे ते म्हणाले.
  • भूकंपग्रस्त तुर्कस्तानला शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिल्यानंतर, राष्ट्रीय आपदा निवारण दलाची (एनडीआरएफ) एकूण तीन पथके ७ फेब्रुवारीला तेथे पाठवण्यात आली होती. भारतीय लष्कराचे वैद्यकीय पथकही  भूकंपग्रस्त लोकांच्या सेवेसाठी तेथे तैनात करण्यात आले आहे.
  • ‘तुम्ही मानवतेची मोठी सेवा केली असून, भारताला अभिमान वाटावा असे काम केले आहे. आम्ही जग हे एक कुटुंब असल्याचे मानतो आणि संकटात त्याच्या कुठल्याही सदस्याला त्वरित मदत करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे समजतो’, असे भूकंपग्रस्त तुर्कस्तानहून परतलेल्या पथकांच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले. जगात कुठेही संकट उद्भवते, तेव्हा प्रतिसाद देणारा पहिला देश होण्यास भारत तयार असतो, असेही त्यांनी सांगितले.

Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण

  • सध्या जगातील दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Apple , Microsoft सह अनेक टेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र TCS या दिग्गज कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीची शक्यता दिसत नाही आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा कोणताही हेतू नाही.
  • TCS चे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, TCS कंपनी स्टार्टअप कंपन्यांमधून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार आहे. तसेच पुढे बोलताना लक्कड म्हणाले, माझे हे विधान अशा वेळी आले आहे की, जगभरातील दिग्गज टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.
  • सध्या जगातील दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Apple , Microsoft सह अनेक टेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र TCS या दिग्गज कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीची शक्यता दिसत नाही आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा कोणताही हेतू नाही.
  • TCS चे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, TCS कंपनी स्टार्टअप कंपन्यांमधून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार आहे. तसेच पुढे बोलताना लक्कड म्हणाले, माझे हे विधान अशा वेळी आले आहे की, जगभरातील दिग्गज टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.

Chrome ब्राऊजरसाठी Googleने आणले ‘हे’ दोन भन्नाट फिचर्स; आता लॅपटॉपची बॅटरी आणि मेमरी दोन्हीही वाचणार

  • Google Chrome चा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ऑफिस, शाळा, किंवा तुमच्या वैयक्तिक कामासाठी क्रोमचा वापर होतो. यावर आपल्याला ज्या विषयाबद्दल माहिती हवी असते त्याची माहिती मिळवता येते. मात्र आता करून वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलने क्रोममध्ये दोन नवीन फीचर्स आणले आहेत. या फीचर्समुळे वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. गुगलने आणलेले हे फीचर्स कोणते व त्यांचा वापरकर्त्यांना कसा फायदा होणार आहे हे आपण जाणून घेऊयात.
  • गुगल क्रोममध्ये Google ने दोन फीचर्स आणली आहेत. ज्यामुळे तुमची बॅटरी आणि मेमरी सेव्ह होऊ शकणार आहे. क्रोममध्ये गुगलने एनर्जी आणि मेमरी सेव्हर मोड हे फिचर आणले आहे. हे अपडेट तुम्हाला विंडो, मॅक, क्रोम OS आणि linux साठी देण्यात आले आहेत.
  • परफॉर्मन्स टॅबमध्ये तुम्हाला Google Chrome ची दोन दिसतील. गुगल क्रोमचे मेमरी सेव्हर फिचर मेमरीमधून निष्क्रिय टॅब्सबद्दलची माहिती डिलीट करते. ज्यावर तुम्ही काम करत आहात तेवढ्याच टॅब्सची माहिती हे फिचर क्रोममध्ये चालू ठेवते. नवीन फिचर वापरकर्त्यांना मन्युअली वेबसाईट कनेक्ट करण्याची परवानगी देते जिथे त्यांना मेमरी सेव्हर सुरु ठेवायचे आहे.
  • तसेच तुम्हाला क्रोमच्या परफॉर्मन्स टॅबमध्ये Energy saver हे फिचर देखील मिळणार आहे. तुम्ही क्रोम वापरत असताना हे फीचर ऑन केले की, ते तुमच्या डिव्हाइसच्या बॅटरीचा कमीत कमी वापर करेल. हे फिचर सुरु होताच बॅकग्राऊंड अ‍ॅक्टिव्हिटी, अ‍ॅनिमेशन आणि व्हिडीओ फ्रेम व स्मूथ स्क्रोलिंग हे बंद होतात. ज्यामुळे बॅटरीचा कमीत कमी वापर होतो. तुमची सिस्टीम चार्ज होत नसेल तेव्हा आणि तुमच्या सिस्टीमची बॅटरी २० टक्क्यापर्यंत कमी होईल तेव्हा तुम्ही हे फिचर सूर करू शकता. या दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडला की chrome हे एनर्जी सेव्हर मोड फिचर आपोआप सुरु करेल.
  • Google Chrome चे हे नवीन अपडेट Chrome V110 वर आले असून कंपनी हे अपडेट टप्प्याटप्प्याने आणत आहे. त्यामुळे नवीन अपडेट काही वापरकर्त्यांना दिसत नाही आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेची आज पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. शिवाय, ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात निवडणुक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यासर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूस शिवसेनेकडून आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीसंदर्भात मंत्री व प्रवक्ते दिपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर (शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण देण्याचा आदेश) आज संध्याकाळी शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. याशिवाय या बैठकीत काही नवीन पदाधिकारी निवडले/नियुक्त केले जाऊ शकतात, असेही दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.

भविष्य निर्वाह निधीमध्ये अतिरिक्त पेन्शनचा पर्याय:

  • भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत (ईपीएस) अतिरिक्त भविष्य निर्वाह निधी मिळविण्याचा (पेन्शन) पर्याय कर्मचाऱ्यांना आता उपलब्ध झाला आहे.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) याबाबतची प्रक्रिया प्रसिद्ध केली आहे.
  • भविष्य निर्वाह निधीमध्ये एकूण योगदानाच्या 8.33 टक्के अतिरिक्त रक्कम देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना असेल.
  • सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 4 महिन्यांची मुदत संपण्यास 15 दिवस शिल्लक असताना ईपीएफओने परिपत्रक काढून सूचना जारी केल्या आहेत.
  • नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (सुधारित) योजना 2014 ग्राह्य ठरवली होती.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२१ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.