२२ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२२ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |22 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२२ फेब्रुवारी चालू घडामोडी

बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी राज्यात १७ गैरप्रकार उघडकीस

  • राज्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी काटेकोर पद्धतीने कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी १७ गैरप्रकार उघडकीस आले असून, सर्वाधिक गैरप्रकारांची नोंद पुणे विभागात झाली.
  • राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवारी सुरू झाली. या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार विभागीय मंडळ, जिल्हाधिकारी स्तरावर भरारी आणि बैठे पथकाची प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्यवस्था, परीक्षा केंद्र परिसरातील १०० मीटर परिसरातील छायाप्रतीची दुकाने बंद केली जातील. तसेच सहायक परीरक्षकाचे जीपीएसद्वारे ट्रॅकिंग आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात १७ गैरप्रकार झाल्याचे समोर आले.
  • राज्य मंडळाने संकलित केलेल्या माहितीनुसार सर्वाधिक सात गैरप्रकारांची नोंद पुणे विभागात झाली. तर नागपूर आणि औरंगाबाद विभागात प्रत्येकी तीन, अमरावती आणि लातूर विभागात प्रत्येकी एक, नाशिक विभागात दोन गैरप्रकार झाल्याचे आढळून आले.

संयुक्त राष्ट्रांच्या पोषण मोहीम समन्वयकपदी भारतीय वंशाच्या अफशान खान

  • भारतीय वंशाच्या अफशान खान यांची संयुक्त राष्ट्रांच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’च्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुटेरेस यांनी त्यासंबंधी घोषणा केली.
  • अफशान खान यांच्याकडे कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व आहे. ‘पोषण वर्धन मोहीम’ कुपोषण असलेल्या ६५ देशांमध्ये राबवण्यात येते, त्यामध्ये भारताच्या चार राज्यांचाही समावेश आहे. सर्व प्रकारच्या कुपोषणाचे २०३० पर्यंत उच्चाटन करणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे.
  • सर्व संबंधितांना सहभागी करून, जगातील सर्व प्रकारचे कुपोषण थांबवण्यासाठी पोषण वर्धन रणनीतीची अंमलबजावणी करणे हे अफशान खान यांचे काम असेल. त्यांनी मॅकगिल विद्यापीठातून राज्यशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर सार्वजनिक धोरण या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली.
  • अफशान खान यांनी १९८९ मध्ये मोझाम्बिक येथे युनिसेफसाठी काम करायला सुरुवात केली. सध्या त्या पूर्व युरोप आणि मध्य आशियामध्ये कार्यरत आहेत. ‘विमेन फॉर विमेन इंटरनॅशनल’ या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
अफशान खान

तुर्कस्तानहून परतलेल्या भारतीय मदत पथकांचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

  • भूकंपग्रस्त तुर्कस्तानमध्ये तैनात करण्यात आलेल्या भारताच्या मदत व आपदा निवारण पथकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कौतुक केले. गेल्या काही वर्षांत भारताने स्वत:ची ओळख केवळ स्वयंपूर्ण देश म्हणूनच नव्हे, तर नि:स्वार्थी देश म्हणून बळकट केली आहे, असे ते म्हणाले.
  • भूकंपग्रस्त तुर्कस्तानला शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिल्यानंतर, राष्ट्रीय आपदा निवारण दलाची (एनडीआरएफ) एकूण तीन पथके ७ फेब्रुवारीला तेथे पाठवण्यात आली होती. भारतीय लष्कराचे वैद्यकीय पथकही  भूकंपग्रस्त लोकांच्या सेवेसाठी तेथे तैनात करण्यात आले आहे.
  • ‘तुम्ही मानवतेची मोठी सेवा केली असून, भारताला अभिमान वाटावा असे काम केले आहे. आम्ही जग हे एक कुटुंब असल्याचे मानतो आणि संकटात त्याच्या कुठल्याही सदस्याला त्वरित मदत करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे समजतो’, असे भूकंपग्रस्त तुर्कस्तानहून परतलेल्या पथकांच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले. जगात कुठेही संकट उद्भवते, तेव्हा प्रतिसाद देणारा पहिला देश होण्यास भारत तयार असतो, असेही त्यांनी सांगितले.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : रुद्रांक्षचा पुन्हा सुवर्णवेध

  • भारताचा जगज्जेता नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावले. या पदकासह भारताचे स्पर्धेतील वर्चस्वही कायम राहिले. भारताची आतापर्यंत तीन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके झाली आहेत.
  • सोमवारी आर. नर्मदा नितीनच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर रुद्रांक्षने मंगळवारी वैयक्तिक गटात आपल्या अव्वल मानांकनास साजेशी कामगिरी करताना पुन्हा सोनेरी यश संपादन केले. सुवर्णपदकाच्या लढतीत त्याने जर्मनीच्या मॅक्सिमिलियन उल्ब्रिचचा १६-८ असा पराभव केला. मानांकन फेरीतही रुद्रांक्षने २६२ गुणांचा वेध घेत अव्वल क्रमांकासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. उल्ब्रिचचे २६०.६ गुण होते. त्यापूर्वी पात्रता फेरीत ६२९.३ गुण मिळवत रुद्रांक्ष सातव्या क्रमांकाने मानांकन फेरीसाठी पात्र ठरला होता.
  • सुवर्णपदकाच्या लढतीत पहिल्या सात फैऱ्यानंतर रुद्रांक्ष आणि उल्ब्रिचमध्ये ७-७ अशी बरोबरी होती. मात्र, पुढील तीनही फैऱ्यांमध्ये रुद्रांक्षने सरशी साधताना १३-७ अशी आघाडी मिळवली. अखेरीस रुद्रांक्षने लढतीत १६-८ असा विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले.  भारताचे दिव्यांश सिंह पन्वर आणि हृदय हजारिका हे अन्य दोन नेमबाज पात्रता सिद्ध करू शकले नाहीत.
  • भारतीय नेमबाजांनी सोमवारी एअर रायफल आणि पिस्तूल प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व राखले होते. यामध्ये नर्मदा-रुद्रांक्ष जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते. वरुण तोमरने पहिल्या दिवशी कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वरुणने रिदम संगवानच्या साथीने १० मीटर पिस्तूल प्रकारातील मिश्र दुहेरीत सुवर्ण यश मिळवले.

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे, सलग दुसऱ्या वर्षी प्रश्नपत्रिकेत चुका

  • राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे समोर आले आहे. दोन प्रश्नांसाठी केवळ सूचना देण्यात आल्या, तर एका प्रश्नासाठी प्रश्न न देता थेट उत्तरच देण्यात आले आहे. त्यामुळे या तीन प्रश्नांचे सहा गुण विद्यार्थ्यांना देण्याची मागणी करण्यात आली असून, सलग दुसऱ्या वर्षी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याचे समोर आले आहे.
  • राज्यभरात बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यंदा कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने काटेकोर उपाययोजना केल्या. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिकेतील ए ३ आणि ए ५ या प्रश्नांसाठी केवळ सूचना नमूद केलेल्या होत्या, तर ए ४ या प्रश्नात प्रश्नाऐवजी थेट उत्तरच देण्यात आले होते. त्यामुळे या तीन प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला.
  • अनेकांना प्रश्नच कळले नाही, तर काहींनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षीही इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मंगळवारच्या इंग्रजी विषयाच्याच प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आल्याने मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
  • विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यात येईल – इंग्रजी विषयाची सभा विषय तज्ज्ञ आणि विभागीय मंडळांचे प्रमुख नियामक यांच्यासमवेत आयोजित करण्यात आली होती. मात्र धोरणात्मक मागण्यांबाबत शिक्षकांचा बहिष्कार असल्याने सभा होऊ शकली नाही. इंग्रजी विषयाच्या त्रुटींबाबत मुख्य नियामकांची संयुक्त सभा घेऊन संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यात येईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

क्रिकेट चाहत्यांसाठी खुषखबर! IPL सामन्यांचा आनंद आता मोफत लुटता येणार

भारत हा देश क्रिकेटप्रेमी देश म्हणून ओळखला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही ठिकाणी खेळाला जाणारा हा खेळ आहे. लवकरच आता IPL २०२३ सुरु होणार आहे. काही दिवसांपूर्वीच याचा लिलाव देखील पार पडला आहे. सुमारे एक ते दीड महिना आयपीएलच्या मॅचेस सुरु असतात. मात्र IPL च्या दृष्टीने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Ipl संदर्भात Reliance Jio ने एक घोषणा केली आहे. जिओ ने सांगितले आहे की, इंडियन प्रीमिअर लीग २०२३ (IPL) आता jio cinema वॉर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहे. ३१ मार्चपासून आयपीएल २०२३ ला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या टीममध्ये होणार आहे. jio cinema वर सर्व आयपीएलचे सामने 4K रिझोल्यूशन (UltraHD) मध्ये ऑनलाइन स्ट्रीम केले जाणार आहेत. या आधी फक्त IPL केवळ Disney+ Hotstar वरच स्ट्रीम केले जात होते आणि यासाठी तुम्हाला सब्स्क्रिप्शन घ्यावे लागत होते.

FIFA World Cup 2022 Multicam फीचरसह JioCinema वर वापरकर्ते सर्व ७४ सामन्यांदरम्यान कॅमेरा अनेक अँगलमध्ये स्विच करू शकणार आहेत. jiophone वापरकर्ते IPL २०२३ मोफत पाहू शकणार आहेत कारण या फिचर फोनमध्ये आधीपासूनच JioCinema सपोर्ट उपलब्ध आहे. अ‍ॅपच्या मदतीने वापरकरते फोनवरच स्कोअर आणि पिच हीट मॅप सारखी आकडेवारी बघू शकणार आहेत. मोठ्या स्क्रीन म्हणजेच टीव्हीवर सामना पाहणारे वापरकर्ते पूर्ण माहितीसह सामना बघू शकणार आहेत.

मोठी पर्यावरण हानी झालेल्या 50 विभागांत महाराष्ट्र:

  • हवामान बदलामुळे जगभरातच पर्यावरणाची हानी होत आहे.
  • या पर्यावरण हानीमध्ये जगभरातील जे 50 विभाग आघाडीवर आहेत, त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब यासह भारतातील नऊ राज्यांचा समावेश आहे.
  • हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या ‘क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह’ने हा अभ्यास केला आहे.
  • या प्रदेशांची तुलना पूर, जंगलातील आग, उष्णतेची लाट आणि समुद्राच्या पाणी पातळीतील वाढीमुळे इमारती आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या मॉडेलच्या अंदाजानुसार केली आहे.
  • चीन आणि भारतावर विशेष लक्ष केंद्रित करतानाच या प्रदेशातील 2050 मध्ये अव्वल 200 पैकी अर्ध्याहून अधिक जोखीम असलेल्या प्रांतांच्या यादीत आशिया खंड आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.

ओला भारतात उभारणार जगातील सर्वात मोठे EV HUB:

  • इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola इलेक्ट्रिक भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये एक ईव्ही हब स्थापन करणार आहे.
  • ज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे सेल, ईव्ही तयार करण्याच्या सुविधा आणि डीलर – सप्लायर असतील.
  • ईव्ही हब हे एकाच ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वात मोठे सपोर्टींग इकोसिस्टीम बनेल असे कंपनीचे म्हणणे आहे.
  • ओलचे ईव्ही हब संपूर्ण ईव्ही इकोसिस्टीमला एका छताखाली आणेल.
  • ज्यामध्ये आम्ही टू-व्हिलर , फोर-व्हिलर आणि सेलमध्ये एक मजबूत वर्टिकल इंटिग्रेटेड मोबिलिटी कंपनी होईल असे त्यांनी कंपनीच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

बॉर्डर-गावस्कर करंडक सलग चौथ्यांदा भारताकडे:

  • भारतीय संघाने दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात केली.
  • यासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली.
  • त्यामुळे भारतीय संघ ही मालिका गमावणार नाही आणि बॉर्डर-गावस्कर करंडक सलग चौथ्यांदा आपल्याकडे राखणार हेदेखील सुनिश्चित झाले.
  • भारताने 2016 सालापासून बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी होणाऱ्या कसोटी मालिकांमध्ये वर्चस्व गाजवले आहे.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रुद्रांक्षचा पुन्हा सुवर्णवेध:

  • भारताचा जगज्जेता नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावले.
  • या पदकासह भारताचे स्पर्धेतील वर्चस्वही कायम राहिले.
  • भारताची आतापर्यंत तीन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके झाली आहेत.
  • सोमवारी आर. नर्मदा नितीनच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर रुद्रांक्षने मंगळवारी वैयक्तिक गटात आपल्या अव्वल मानांकनास साजेशी कामगिरी करताना पुन्हा सोनेरी यश संपादन केले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२२ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.