२८ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२८ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |28 December 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२८ डिसेंबर चालू घडामोडी

महिला सवलत योजनेमुळे एसटीचे उत्पन्न ९१५ कोटींवर

  • राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या महिला व ज्येष्ठ नागरिक या दोन्ही सवलत योजना राज्य परिवहन महामंडळाच्या पथ्यावर पडू लागल्या असून महामंडळाच्या तिजोरीत दरमहा भर पडत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या या योजनामुळे राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून उत्पन्नात वाढ झाली आहे.
  • मे २०२२ मध्ये एसटीने ९ कोटी ५० लाख (प्रवाशांच्या ये-जा करण्यावर संख्या मोजली जाते) प्रवासी प्रवास करीत होते. सवलती दिल्याने ही संख्या १६ कोटी लाख झाली असून उत्पन्न ६०० कोटी ८२ लाखांवरून थेट ९१५ कोटी ८० लाख झाले आहे. विविध ३१ प्रकारच्या सवलतींसाठी राज्य सरकार महामंडळाला १४४९ लाख रुपये देणे लागत आहे. सरकारने एसटीला बळ देण्यासाठी १,१४४ कोटी रुपये अदा केले आहेत. त्यामुळे एसटीची आर्थिक घडी सुधारण्यास मदत होणार आहे.
  • राज्यात एसटीचे मोठे जाळे विणले गेले आहे. राज्यातील प्रत्येक खेडय़ापर्यंत पोहोचणारे हक्काचे साधन म्हणून एसटीकडे पाहिले जात आहे. १५ हजार ९२२ सरकारच्या व ४६७ भाडेतत्त्वावर चालणाऱ्या एसटी दिवसाला ५० लाख किलोमीटर प्रवास करीत आहेत. या सेवेतून एसटीला दररोज २७ कोटी रुपये उत्पन्न मिळते. वर्षांला हे उत्पन्न ९ हजार ८५५ कोटी रुपयांच्या घरात जाते. मात्र ८७ हजार कर्मचारी व २५१ आगारांवर होणारा खर्च जवळपास तेवढाच असल्याने एसटी नेहमीच तोटय़ात असल्याचे चित्र आहे.

प्रवाशांच्या संख्येत वाढ

  • स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, अपंग यांच्यासह ३१ घटकांना एसटीच्या वतीने सवलतीच्या दरात तिकीट दर आकारला जात आहे. या तिकीट दरातील फरक हा शासनाच्या वतीने एसटी महामंडळाला अदा केला जात आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या मे महिन्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागिरकांना एसटी प्रवास मोफत करण्यात आला, तर महिलांसाठी महिला दिनापासून ही सवलत तिकीट दरात ५० टक्के देण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे.

विद्यापीठांनी एम.फिल.चे प्रवेश थांबवण्याचे आदेश यूजीसीने का दिले?

  • देशात एम.फिल. (मास्टर्स ऑफ फिलॉसॉफी) पदवीला मान्यता नसल्याचे नमूद करत विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी या अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले. युजीसीच्या आदेशामुळे आतापर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवलेल्या विद्यापीठांसमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे.
  • युजीसीने या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. काही विद्यापीठे एम.फिल. अभ्यासक्रमासाठी नवे अर्ज मागवत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र एम.फिल. या पदवीला देशात मान्यता नाही. युजीसी (किमान मानके आणि पीएच.डी. देण्यासाठीची प्रक्रिया) अधिनियम २०२२ तील नियम १४ मध्ये उच्च शिक्षण संस्थांनी एम.फिल. अभ्यासक्रम न राबवण्याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले आहे.
  • युजीसी अधिनियम २०२२ बाबतचे राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी एम. फिल. अभ्यासक्रमाचे प्रवेश तातडीने थांबवावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही एम.फिल. अभ्यासक्रमाला प्रवेश न घेण्याचे आवाहन युजीसीकडून करण्यात आले आहे.

‘आयबी’मध्ये तब्बल इतक्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, नोकरीची सुवर्णसंधी…

  • सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीमध्ये काम करण्याची संधी आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेडच्या भरती प्रक्रियेची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध केलीये. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत.
  • या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. mha.gov.in या वेबसाइटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. याचसाईटवरून तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया २२६ पदांची होत आहे. थेट आयबीमध्ये नोकरी करू शकतात.
  • या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १६ जानेवारी २०२४ आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया तब्बल २२६ पदांसाठी होत आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी, अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव बदललं!

  • रामलल्लाच्या स्वागती जय्यत तयारी सुरू झाली आहे. राम मंदिराच्या सजावटीला सुरुवात झाली असून हजारो भक्तगण मंदिराला भेट देत आहेत. तसंच, मंदिर प्रशासनाकडूनही नियोजन आढावा घेतला जात आहे. दरम्यान, राम मंदिराला भेट देण्याकरता येणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्येत ट्रेनमार्गे जाणाऱ्या भक्तांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण, अयोध्या जंक्शनचे आता नामबदल करण्यात आले आहे. अयोध्या जंक्शनचं आता अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलं आहे.
  • अयोध्येतील भाजप खासदार लल्लू सिंह यांनी बुधवारी (२७ डिसेंबर) फेसबूकवर पोस्ट करून ही माहिती दिली. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असतील. याआधी ३० डिसेंबरला पंतप्रधान अयोध्येतील नवीन विमानतळ आणि नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत.
  • लल्लू सिंह यांनी एक्सवर माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली , लोकभावनेच्या अपेक्षेनुसार नव्याने बांधलेल्या भव्य अयोध्या रेल्वे स्थानकाचे अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे. त्याबद्दल, आदरणीय संत, अयोध्यावासीय आणि भक्तांच्या वतीने मी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

विमानतळाचंही होणार उद्घाटन

  • प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी अयोध्येत उत्साह संचारला आहे. त्याआधी, ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन विमानतळ आणि नव्याने बांधलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि अयोध्येला हजारो कोटी रुपयांचे प्रकल्पही भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी जवळपासच्या जिल्ह्यातील लोकही अयोध्येत येणार आहेत.

दक्षिण कोरियाचा अभिनेता ली-सून-क्यूनचा मृत्यू 

  • ऑस्कर विजेता चित्रपट ‘पॅरासाइट’मधील दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध अभिनेता ली-सून-क्यून (वय ४८) याचा मृत्यू झाला आहे. सोल येथे एका कारमध्ये ली-सून-क्यून बुधवारी मृतावस्थेत आढळून आला.  धक्कादायक बाब म्हणजे लीची कथित ड्रग्सच्या वापराबद्दल चौकशी सुरू आहे.
  • उत्तर सोलमधील रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये पोलीस आणि आपत्कालीन अधिकाऱ्यांना ली बेशुद्ध अवस्थेत सापडला. तो मरण पावला असल्याचे आपत्कालीन अधिकाऱ्यांनी नंतर जाहीर केले. तत्पूर्वी ली बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेणे सुरू होते, असे  सेओंगबक पोलिसांनी सांगितले. लीचा मृतदेह नंतर जवळच्या सोल रुग्णालयात नेण्यात आला.
  • लीने एका बार होस्टेसच्या निवासस्थानी बेकायदा ड्रग्ज घेतल्याच्या आरोपांबाबत त्याची पोलीस चौकशी सुरू होती. त्याला ड्रग्ज प्रकरणात अडकविण्यात आले आहे. तो काय ड्रग घेत आहे हे त्याला माहीत नव्हते, असे लीने आपल्या बचावात म्हटले होते, असे योनहॅप वृत्तसंस्थेने म्हटले आहे.२०२० मध्ये ‘पॅरासाइट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अन्य तीन विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटात लीने एका श्रीमंत कुटुंब प्रमुखाची भूमिका साकारली होती.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२८ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.