२९ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२९ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 29 November 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२९ नोव्हेंबर चालू घडामोडी

IFFI 2022
53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) पणजी, गोवा येथे संपन्न झाला
व्हॅलेंटिना मॉरेल दिग्दर्शित आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स या स्पॅनिश भाषेतील चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘नो एंड’ या तुर्की चित्रपटासाठी नादेर सेव्हर यांना देण्यात आला.
वाहिद मोबाशेरी यांना नो एंड चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (पुरुष) सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला.
आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स चित्रपटासाठी डॅनिएला मारिन नवारो हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) चा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला.

राष्ट्रीय:

उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी दिल्लीतील कुशल कारागिरांना शिल्प गुरू आणि राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा धर्मांतराचा मूलभूत अधिकार नाही: केंद्र सरकार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत फ्रान्सचे सशस्त्र सेना मंत्री सेबॅस्टिन लेकोर्नू यांच्यासोबत चौथा भारत-फ्रान्स वार्षिक संरक्षण संवाद साधला.
भारत आणि मलेशिया 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान मलेशियामध्ये “हरिमाऊ शक्ती-2022” लष्करी सराव करणार आहेत.

आर्थिक:

सरकारने ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ला आर्थिक गुन्हेगारांची माहिती SFIO, CCI आणि NIA सह आणखी 15 एजन्सींना शेअर करण्याची परवानगी दिली.
ऊर्जा मंत्रालयाने शक्ती धोरणांतर्गत 5 वर्षांसाठी 4,500 मेगावॅट वीजपुरवठा योजना सुरू केली
S&P ग्लोबल रेटिंग्सने FY23 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 7% पर्यंत कमी केला आहे

आंतरराष्ट्रीय:

WHO ने वर्णद्वेष, भेदभाव या चिंतेचा हवाला देत मंकीपॉक्सचे नाव बदलून mpox केले

क्रीडा:

टेनिस: स्पेनमधील मालागा येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कॅनडाने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव करून डेव्हिस कप विजेतेपद पटकावले.
माजी क्रीडापटू पी.टी. उषा IOA (भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन) च्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या.

घानाची कोरियावर संघर्षपूर्ण मात:

 • जिगरबाज कोरियाचा कडवा प्रतिकार ३-२ असा मोडून काढत घानाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. येथील एज्युकेशन नॅशनल स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात कोरियन संघाचा प्रतिकार मोडून काढताना घानाच्या खेळाडूंची कसोटी लागली.
 • कमालीचा आक्रमक खेळ करणाऱ्या घाना संघाकडून मोहम्मद सालिसु (२४वे मिनिट) आणि मोहम्मद कुडुस (३४, ६८वे मिनिट), कोरियाकडून चो गुए सुंगने (५८, ६१वे मिनिट) दोन गोल केले.
 • घाना संघाने विजय मिळविला असला, तरी कोरियाच्या खेळाडूंनी त्यांना अखेरच्या मिनिटापर्यंत झुंजवले. सामन्याच्या अखेरच्या १० मिनिटांच्या भरपाई वेळेतील कोरियाची आक्रमणे घानाच्या बचाव फळीवर नुसतीच दडपण आणणारी नाही, तर त्यांची धडधड वाढवणारी होती. मात्र, कोरियाला बरोबरी साधण्यात अपयश आले.
 • सामन्याच्या पूर्वार्धात जॉर्डन आयुच्या खेळाने घानाचे वर्चस्व राहिले. गोल करण्याच्या संधी निर्माण करणाऱ्या आयुच्या पासवर २४व्या मिनिटाला सालिसु, तर ३४व्या मिनिटाला कुडुसने गोल नोंदवून घानाला मध्यंतरापर्यंत २-० असे आघाडीवर कायम राखले होते. 

प्रत्येक तालुक्यात हेलीपॅड उभारण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश; वैद्यकीय मदतीसाठी होणार उपयोग:

 • राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करत असताना प्रत्येक तालुक्यात हेलीपॅड तयार करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. भविष्यात या हेलीपॅडचा उपयोग वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने ‘सी-प्लेन’ सुविधा सुरू कराण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
 • आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात पार पाडली. या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि मान्यवरांसह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
 • या बैठकीत राज्यातील विमानतळे आणि काही ठिकाणी असलेल्या धावपट्ट्यांविषयी चर्चा करण्यात आली. राज्यात एकूण १५ विमानतळ असून २८ धावपट्ट्या (एअर स्ट्रीप्स) आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर होत आहे. तर शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती कपूर यांनी दिली.
 • विमानतळांच्या विस्तारीकरणासोबतच राज्यात असलेल्या धावपट्ट्यांचेही विस्तारीकरण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलीपॅड तयार करण्यात यावं. त्यासाठी जागा निश्चित करावी. गंभीर रुग्णाला एअर लिफ्ट करण्याकरिता आणि इतर वैद्यकीय मदतीसाठीदेखील या हेलीपॅडचा उपयोग होऊ शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय पर्यटनदृष्ट्या गोसीखुर्द, कोयना, कोकण समुद्र किनारपट्टी याभागात ‘सी- प्लेन’ सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

घटत्या लोकसंख्येमुळे जपान सरकार चिंताग्रस्त:

 • जपानमध्ये यावर्षी जन्मलेल्या बालकांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा विक्रमी नीचांकी असल्याने सरकारी प्रवक्त्याने याचे वर्णन ‘गंभीर परिस्थती’ असे केले आहे. घटत्या जन्मदरामुळे जपानमध्ये गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला असून अधिक विवाह आणि मूल जन्माला घालण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचा निर्णय जपानच्या सरकारने घेतला आहे.
 • जपानमध्ये यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात एकूण ५,९९,६३६ बालकांचा जन्म झाला. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या ४.९ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी ८,११,००० बालकांचा जन्म झाला होता. जपानमध्ये लोकसंख्येचा दर घसरत असल्याने जपानी सरकारने चिंता व्यक्त केली असून लोकसंख्या वाढीसाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचे आश्वासन जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी दिले.
 • जपान ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र राहणीमानाचा खर्च जास्त आणि मंदावलेली वेतनवाढ अशी परिस्थती देशात आहे. बालके, महिला आणि अल्पसंख्याक यांच्यासाठी सर्वसमावेशक समाज बनवण्यात जपानमधील पुराणमतवादी सरकार मागे पडले आहे. या सर्वाचा परिणाम लोकसंख्येवर झाला आहे.  सरकारने गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपनासाठी सबसिडीची देयके आणि इतर योजना करूनही त्याचा मर्यादित परिणाम झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड:

 • ऋतुराज गायकवाडने सोमवारी कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने यूपीविरुद्ध १५९ चेंडूत नाबाद २२० धावांची खेळी केली. ज्यामध्ये १० चौकार आणि १६ षटकार लगावले. त्याने एकाच षटकात ७ षटकारांसह ४३ धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ गडी गमावून ३३० धावा केल्या आहेत.
 • या स्पर्धेतील शेवटच्या ८ डावांमधील ऋतुराजचे हे सहावे शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावता येतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग आहे. २५ वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे १३वे शतक आहे.
 • डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंग डावातील ४९ वे षटक टाकत होता. त्याने ५वा चेंडू नो बॉल टाकला. यावरही ऋतुराजने षटकार ठोकला. अशाप्रकारे, त्याने एकाच षटकात ७ षटकार लगावत एकूण ४३ धावा केल्या. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका षटकात ७ षटकार लगावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. सामन्याच्या सुरुवातीला यूपीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
 • महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ४१ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. राहुल त्रिपाठी ९ आणि सत्यजीत ११ धावा करून बाद झाले. मात्र कर्णधार आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड एक बाजू सांभाळून खेळत राहिला. त्याने अंकित बावणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अंकित ५४ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२९ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.