३० नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३० नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 30 November 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३० नोव्हेंबर चालू घडामोडी

राष्ट्रीय:

भारतीय हवाई दल 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आग्रा एअरफोर्स स्टेशनवर वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) सराव ‘समन्वय 2022’ आयोजित करत आहे.
माजी IAS अधिकारी प्रीती सुदान यांची UPSC सदस्य म्हणून नियुक्ती
29 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यान, नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय जग्वार दिवस साजरा करण्यात आला
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी विधानसभेने मंजूर केलेली खासगी विद्यापीठाची विधेयके परत केली

आर्थिक:

CBDC (सेंट्रल बँक डिजिटल करन्सी) मध्ये किरकोळ सहभागासाठी पायलट प्रोजेक्ट 1 डिसेंबरपासून चार शहरे आणि चार बँकांमध्ये सुरू होईल: RBI
सरकारने सेंद्रिय बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली
iNCOVACC, भारत बायोटेकची जगातील पहिली इंट्रानासल लस सीडीएससीओ (सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन) ची मान्यता प्राप्त

नवी दिल्ली येथे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेची 7 वी आवृत्ती होत आहे
टाटा समूहाने विस्तारासोबत एअर इंडियाच्या विलीनीकरणाची घोषणा केली; सिंगापूर एअरलाइन्सला 25% स्टेक मिळेल
YouTube ने जुलै-सप्टेंबरमध्ये भारतात 1.7 दशलक्ष व्हिडिओ काढून टाकले, जे जगातील सर्वाधिक आहे
ग्रुपएम मीडियाचे सीईओ प्रशांत कुमार यांची AAAI (अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया) च्या अध्यक्षपदी निवड

आंतरराष्ट्रीय:

पॅलेस्टिनी लोकांसोबत आंतरराष्ट्रीय एकता दिवस 29 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो
यूएन पॅनेलने ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट बॅरियर रीफला ‘धोक्यातील जागतिक वारसा स्थळ’ म्हणून सूचीबद्ध करण्याची शिफारस केली आहे.
अमेरिका: हवाईच्या मौना लो या जगातील सर्वात मोठ्या सक्रिय ज्वालामुखीचा 40 वर्षांत प्रथमच उद्रेक झाला.
इटली : इस्चिया बेटावर भूस्खलनात सात ठार

इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा गाठली बाद फेरी, अमेरिकेने आठ वर्षांनंतर राऊंड १६ मध्ये केला प्रवेश:

  • मार्कस रॅशफोर्ड (५०, ६८व्या) आणि फिल फोडेन (५१व्या) यांनी केलेल्या गोलमुळे इंग्लंडने फिफा विश्वचषक स्पर्धेतील ब गटातील सामन्यात वेल्सचा ३-० असा पराभव केला. १९६६ चा चॅम्पियन इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा बाद फेरी गाठली आहे. इंग्लंड आणि वेल्सला पूर्वार्धात एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात परिस्थिती बदलली. इंग्लंडने दोन मिनिटांत दोन गोल करत सामन्याचे चित्रच पालटले.
  • ५०व्या मिनिटाला, रॅशफोर्डने फ्री किकवर वेल्सच्या बचावपटूंची जाळी भेदत उत्कृष्ट किक मारली, ज्यावर चेंडू स्विंग होऊन थेट गोल पोस्टमध्ये गेला. डायव्हिंग करूनही गोलरक्षक गोल वाचवू शकला नाही. त्यानंतर बॉक्समधील हॅरी केनच्या पासवर फोडेनने दमदार शॉट २-० असा केला. दोन गोलने पिछाडीवर पडलेल्या वेल्सचा बचाव ढासळू लागला. या सामन्यात आपला दुसरा आणि संघाचा तिसरा गोल करताना रॅशफोर्डने पुन्हा एकदा याचा फायदा घेतला.
  • केल्विन फिलिप्सने दिलेल्या पासवर मँचेस्टर युनायटेडच्या खेळाडूने संधीचे सोने केले. विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील इंग्लंडचा हा १०० वा गोल होता. ५६व्या मिनिटाला डेन जेम्सने वेल्ससाठी गोल करण्याचा प्रयत्न केला. किफर मूरनेही प्रयत्न केला पण गोल करू शकला नाही. पहिल्या सत्रात वेल्सने कडवी झुंज दिली पण दुसऱ्या सत्रामध्ये गॅरेथ बेलच्या बदलीनंतर वेल्स कमकुवत झाला तर इंग्लंडचे खेळाडू अधिक आक्रमक बनले.

लिपिक, टंकलेखक पदांसाठी जानेवारीत जाहिरात:

  • राज्यातील लिपिक, टंकलेखक या सर्व रिक्त पदांची जाहिरात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रसिद्ध होणार आहे. तसेच १५ डिसेंबपर्यंत राज्यातील सर्व विभागांच्या रिक्त पदांचा तपशील गोळा करून त्यानुसार मागणी असलेल्या पदांचा तपशील राज्य लोकसेवा आयोगाला कळवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भरतीबद्दल आढावा घेतला. या वेळी भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. या वेळी पदभरतीसंदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक टंकलेखक या पदासाठी पदभरती होणार आहे. या संदर्भातील जाहिरात जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात प्रसिद्ध होणार आहे. या अनुषंगाने १५ डिसेंबपर्यंत सर्व विभागांनी आपली मागणीपत्रे आयोगाकडे पाठवलीच पाहिजेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
  • रिक्त पदांची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत. ज्या विभागांचा आकृतिबंध अंतिम झालेला आहे, अशा विभागांना सरळसेवा भरती हिश्शातील १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच ज्या विभागांचा आकृतिबंध अंतिम झालेला नाही, अशा विभागांना सरळसेवा भरती हिश्शातील ८० टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अराजपत्रित गट-ब, गट-क व गट-डमधील पदे टीसीएस व आयबीपीएस या कंपन्यांमार्फत परीक्षा घेऊन भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  •  सध्या सर्व प्रशासकीय विभागांना पदभरती लवकर करण्याच्या अनुषंगाने निर्देश आले असून आढावाही घेण्यात येत आहे. बिंदुनामावली प्रमाणित नसल्याने होणारा विलंब टाळण्यासाठी सर्व विभागीय कार्यालये, मागासवर्ग कक्ष यांना व्हीसीद्वारे बिंदुनामावली तात्काळ तपासून देण्यास सांगितले आहे.

महत्त्वाची बातमी – पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ:

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी बातमी दिली आहे. अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
  • प्रसारमाध्यमांना माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पोलीस भरतीच्या संदर्भात आतापर्यंत आमच्याकडे ११ लाख ८० हजार अर्ज आलेले आहेत. तथापि काही ठिकाणांहून ही तक्रार येते आहे की, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख आम्ही १५ दिवसांनी वाढवतो आहे. १५ दिवस अधिकचे आम्ही देत आहोत, त्यामुळे उर्वरीत ज्या तक्रारी आहेत, त्याही दूर होतील.”
  • याशिवाय, “नॉन क्रिमिलीयरच्या संदर्भातही काही तक्रारी आल्या होत्या. मागील वर्षीचं नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र यावर्षी मिळतं. त्यामुळे मागील वर्षीचं त्यांनी यावर्षी घेतल्यावर ते ग्राह्य धरलं जाणार आहे. ही अडचणही दूर करण्यात आलेली आहे. भूकंपग्रस्तांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस भरती संदर्भातील ज्या काही मागण्या होत्या, त्या सगळ्या आम्ही मान्य केलेल्या आहेत.” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास:

  • टोयोटा-किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर याचं निधन झालं आहे. कंपनीनेच मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. विक्रम किर्लोस्कर हे ६४ वर्षांचे होते.
  • “आमच्या सद्भावना त्यांचे कुटुंबिय आणि मित्र परिवाराबरोबर आहेत. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत,” असं कंपनीने ट्विटरवरुन सांगितलं आहे.
  • बंगळुरुमध्ये मुख्यालय असलेल्या बायकॉन या औषध क्षेत्रातील कंपनीचे एक्झिक्युटीव्ह चेअरपर्सन किरण मुझूमदार-शॉ यांनीही विक्रम किर्लोस्करांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. “विक्रम यांच्या निधनाच्या वृत्तामुळे धक्का बसला आहे. तो माझा फार चांगला मित्र होता. गितांजली, मानसी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे,” असं किरण यांनी म्हटलं आहे.

अ‍ॅपलकडून ट्विटर अ‍ॅप हटवण्याची धमकी, एलॉन मस्क यांचा गंभीर आरोप:

  • ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे मालक तथा अब्जाधीश एलॉन मस्क आणि अ‍ॅपल या कंपनीमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. अ‍ॅपल कंपनीने आपल्या अ‍ॅप स्टोअरमधून ट्विटर अ‍ॅप हटवण्याची धमकी दिली आहे, असा दावा एलॉन मस्क यांनी केला आहे. तसेच अ‍ॅपलने ट्विटरवर जाहिरात देणे बंद केले आहे. अ‍ॅपल कंपनीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तिरस्कार आहे का? असा सवालही एलॉन मस्क यांनी केला आहे. मस्क यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली असून अ‍ॅपल कंपनीने यावर अद्याप आपले स्पष्टीकरण दिलेले नाही.
  • एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटर खात्यावर काही सलग ट्वीट केले आहेत. ‘अ‍ॅपल कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. अ‍ॅपल कंपनीने ट्विटवरवर जाहिराती देणे जवळजवळ बंदच केले आहे. अ‍ॅपल कंपनीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भीती वाटते का? अ‍ॅपलने आणखी कोणाकोणावर अशी सेन्सॉरशीप लादलेली आहे. अ‍ॅपलने त्यांच्या अ‍ॅप स्टोअरवरून ट्विटर हे अ‍ॅप हटवण्याचीही धमकी दिलेली आहे. मात्र ही धमकी नेमकी का दिली, याबाबत त्यांनी काहीही सांगितलेले नाही,’ असे एलॉन मस्क आपल्या ट्वीट्समध्ये म्हणाले आहेत.
  • अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरून ग्राहकांनी काही अ‍ॅप्स खरेदी केल्यास ३० टक्के छुपा कर आकारला जातो, याबाबत तुम्हाला माहिती आहे का, असा सवालही एलॉन मस्क यांनी केला आहे. ग्राहकांना प्रभावित करणाऱ्या सर्व सेन्सॉरशीप अ‍ॅपलने सार्वजनिक करायला हव्यात का? असे विचारत एलॉन मस्क ट्विटरवर एक पोल घेत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेमध्येच व्यक्तिस्वातंत्र्य नसेल तर आगामी काळातील जुलूमशाहीचे ते द्योतक आहे, असा इशाराही मस्क यांनी दिला आहे.
  • मस्क यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर अ‍ॅपल कंपनीने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र मस्क यांच्या आरोपांमुळे ट्विटर आणि अ‍ॅपल यांच्यात वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३० नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.