२९ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२९ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |29 September 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२९ सप्टेंबर चालू घडामोडी

भारताने नेमबाजीत पटकावले चौथे सुवर्णपदक; सरबजोत, अर्जुन आणि शिवाची कमाल

 • आशियाई क्रीडा २०२३ च्या स्पर्धेत भारताला चौथे सुवर्णपदक मिळाले आहे. भारताने गुरुवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवसाची सुरुवात सुवर्ण पदकाने केली. भारताच्या पुरुष संघाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर दोन नेमबाजांनी वैयक्तिक अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताकडून सरबजोत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिवा नरवाल यांनी अंतिम फेरीत चीनचा पराभव करून अव्वल स्थान मिळविले.
 • भारतीय नेमबाजांनी सध्या सुरू असलेल्या खेळांमध्ये चार सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली आहेत. भारतीय त्रिकुटाने पात्रता फेरीत एकूण १७३४ गुण मिळवले, जे चीनच्या संघापेक्षा एक गुण जास्त आहे. चीनला रौप्य तर व्हिएतनामला (१७३०) कांस्यपदक मिळाले. सरबजोत आणि उर्जन यांनीही आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून ते अद्याप वैयक्तिक पदकाच्या शर्यतीत आहेत.

नेमबाजीतील सांघिक स्पर्धेत भारताचे तिसरे सुवर्णपदक –

 • पात्रता फेरीत सरबजोतने ५८०, चीमाने ५७८ आणि नरवालने ५७६ गुण मिळवले. नेमबाजीतील सांघिक स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी, भारताने १० मीटर एअर रायफल आणि महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे. २२ वर्षीय सरबजोतने पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर राहून वैयक्तिक अंतिम फेरीत प्रवेश केला. सरबजोतने यावर्षी भोपाळ येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत वरिष्ठ स्तरावर पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. चीमानेही आठवे स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली. पात्रतेमध्ये सरबजोतची मालिका ९७, ९६, ९७, ९७, ९६ आणि ९५ होती, तर चीमाची मालिका ९७, ९६, ९७, ९७, ९६ आणि ९५ अशी होती. पात्रतामध्ये १४व्या स्थानावर राहिलेल्या नरवालची मालिका ९२, ९६, ९७, ९९, ९७ आणि ९५ अशी होती.

रोशिबिना देवी इतिहास रचण्यास मुकली –

 • मात्र, याआधी भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवी इतिहास रचण्यास मुकली. वास्तविक, रोशीबिना देवीला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, परंतु अंतिम सामन्यात ती हरली. चीनच्या खेळाडूने महिलांच्या ६० किलो गटात रोशिबिना देवीला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. रोशीबिना देवी आज फायनल जिंकण्यात यशस्वी ठरली असती, तर तिने इतिहास रचला असता. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला वुशूमध्ये कधीही सुवर्णपदक जिंकता आले नाही. रोशिबिना देवीला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण ती हुकली.

गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’ का म्हणतात? असा आहे मोरया गणपतीचा इतिहास!

 • गणरायाचं नाव जेव्हा जेव्हा आपण घेतो, तेव्हा आपण ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असंच हमखास म्हणतो; पण गणपती बाप्पाच्या पुढे ‘मोरया’ का लावतात हे अनेकांना माहित नाही. महासाधु गणेश भक्त मोरया गोसावी हे मोरेश्वराचे मोठे भक्त होते.
 • मोरया गोसावी यांनी चिंचवडमध्ये संजीवन समाधी घेतली असून त्या ठिकाणी असलेल्या मंदिराला आजही गणेश भक्त मोठ्या भक्ती-भावाने भेट देतात.

‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन

 • १९६० च्या दशकात भारतात आलेल्या हरित क्रांतीचे जनक मानले गेलेले ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचं गुरुवारी निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. २००४ साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं.

स्वामीनाथन यांची कारकिर्द

 • एम. एस. स्वामीनाथन यांनी १९६१ ते १९७२ या ११ वर्षांच्या काळात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिलं. १९७२ ते १९७९ या काळात ते आयसीएआरचे महासंचालक आणि केंद्रीय कृषीय विभागाचे सचिव म्हणून काम पाहात होते. पुढच्याच वर्षी त्यांची कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. १९८० ते ८२ या तीन वर्षांत त्यांनी नियोजन आयोगाचे उपसंचालक आणि त्यानंतर सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला. १९८२ ते ८८ या ७ वर्षांत त्यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्युटचे महासंचालक म्हणूनही काम केलं.

शेतकरी आत्महत्या व राष्ट्रीय शेतकरी आयोग

 • २००४ साली वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या अध्यक्षपदी स्वामीनाथन यांची नियुक्त करण्यात आली. स्वामीनाथन आयोगानं २००६ साली त्यांचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालात, शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी मिळणारा हमीभाव हा मालाच्या उत्पादनाच्या खर्चाच्या किमान दुप्पट असावा अशी शिफारस स्वामीनाथन आयोगाने केली होती.

पहिला जागतिक अन्न पुरस्कार!

 • एम. एस. स्वामीनाथन यांचा १९८७ साली पहिल्या विश्व अन्न पुरस्काराने (World Food Prize) सन्मान करण्यात आला. यानंतर स्वामीनाथन यांनी चेन्नईमध्ये एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापनाही केली.
 • एम. एस. स्वामीनाथन यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याशिवाय एच. के. फिरोदिया पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९७१) व अल्बर्ट आईनस्टाईन वर्ल्ड सायन्स अवॉर्ड (१९८६) हे दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कारही मिळाले होते.

हे भारताचे धोरण नाही!; कॅनडाच्या आरोपांना जयशंकर यांचे प्रथमच जाहीर उत्तर

 • ‘कॅनडामध्ये खलिस्तान टायगर फोर्सचा नेता हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असण्याची शक्यता आहे’, या जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपाला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी प्रथमच जाहीर उत्तर दिले. ‘हे भारत सरकारचे धोरण नाही’, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. तसेच कॅनडाकडे याविषयी काही नेमकी, सुसंगत माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी असेही त्यांनी सांगितले.
 • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केल्यानंतर जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र संबंधविषयक परिषदेमध्ये अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत केनेथ जस्टर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांविषयी तुम्हाला काही म्हणायचे आहे का असा प्रश्न जस्टर यांनी विचारला. त्यावर जयशंकर म्हणाले की, ‘एक, आम्ही त्यांना सांगितले की हे भारत सरकारचे धोरण नाही. दोन, आम्ही सांगितले की तुमच्याकडे याविषयी काही नेमकी, सुसंगत माहिती असेल तर ती आम्हाला द्या. त्याचा तपास करण्यास आम्ही तयार आहोत’. 
 • जयशंकर पुढे म्हणाले की, या सर्व गोष्टी संदर्भानीच समजून घेणे आवश्यक आहे. कारण संदर्भाशिवाय संपूर्ण चित्र स्पष्ट होणार नाही. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये कॅनडामध्ये फुटीरवादी शक्ती, संघटित गुन्हे, हिंसा, मूलतत्त्ववाद यांच्याशी संबंधित संघटित गुन्हेगारी वाढली आहे. या सर्व गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. भारताने त्याविषया कॅनडाला बरीच माहिती दिली आहे. भारतालाही नेमकी तथ्ये आणि माहिती मिळाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. ‘फाइव्ह आईज गटा’मध्ये याबद्दल माहितीची देवाणघेवाण झाली या चर्चेबद्दल, ‘मी त्यांचा भाग नाही’, असे सांगून त्यांनी काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला.

‘भारत-रशिया संबंध अतिशय स्थिर’

 • भारत आणि रशियादरम्यानचे संबंध अतिशय स्थिर असल्याचे जयशंकर यांनी या संवादादरम्यान स्पष्ट केले. तसेच हे द्विपक्षीय संबंध कायम टिकवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. सोव्हिएत रशियाच्या काळापासून आणि त्यानंतरही भारत-रशिया संबंध स्थिर आहेत असे ते म्हणाले.

अमृतकाळ आणि जागतिक महासत्तापदाकडे वाटचाल

 • पुढील २५ वर्षांचा काळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार केलेला अमृतकाळ असून यादरम्यान भारत विकसित देश होण्यासाठी आणि जागतिक महासत्ता होण्यासाठीही प्रयत्न करेल असे जयशंकर या संवादादरम्यान म्हणाले. सध्या भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून आमचे हितसंबंध, जबाबदाऱ्या, योगदान वाढले आहे असे त्यांनी सांगितले.

मालिका विजयानंतर टीम इंडियाची ट्रॉफी उंचावणारे कोण होते ‘ते’ चौघे? चाहत्यांना पडला प्रश्न

 • भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका बुधलारी पार पडली. मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला. मात्र, संघाने याआधीच पहिले दोन सामने जिंकून मालिकेवर कब्जा केला होता. पहिल्या दोन सामन्यात केएल राहुलने भारतीय संघाची कमान सांभाळली होती. रोहित शर्मा आणि वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. मालिका विजयानंतर टीम इंडियाने ट्रॉफीसह सेलिब्रेशन केले. मात्र, टीम इंडियाची ट्रॉफी उंचावणारे अनोळखी चार चेहरे कोण होते? जाणून घेऊया.

कोण होते ते चौघे?

 • तिसऱ्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी केएल राहुलला ट्रॉफी दिली. यानंतर राहुलने ही ट्रॉफी चाहत्यांसाठी अनोळखी असलेल्या चार स्थानिक खेळाडूंच्या हातात दिली. हे चौघे कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. खरे तर ते दुसरे कोणी नसून सौराष्ट्रकडून क्रिकेट खेळणारे धर्मेंद्र सिंग जडेजा, पारीक मंकंद, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई हे होते.
 • वास्तविक तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाकडे केवळ १३ खेळाडू होते. अशा परिस्थितीत रमेंद्रसिंग जडेजा, पारीक मंकंद, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई यांनी सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंना मदत केली. या खेळाडूंनी सामन्यादरम्यान टीम इंडियालाड्रिंक्स देण्यातही मदत केली. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणातही सहकार्य केले.
 • सामन्यापूर्वी रोहित शर्माने स्पष्ट केले होते की, त्यांच्या संघात केवळ १३ खेळाडू आहेत. अनेक खेळाडूंना व्हायरल ताप आला होता आणि विश्वचषक २०२३ सुरू होण्यापूर्वी अनेकजण त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. रोहित म्हणाला होता, ‘आमचे अनेक खेळाडू आजारी आहेत आणि उपलब्ध नाहीत. तसेच वैयक्तिक कारणांमुळे अनेक खेळाडू घरी गेले आहेत. या सामन्यात आमचे एकूण १३ खेळाडू आहेत.’

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही –

 • सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मोहम्मद सिराज बाद होणारा संघाचा शेवटचा फलंदाज होता. ५० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅमरून ग्रीनकरवी त्याला कर्णधार पॅट कमिन्सने झेलबाद केले. सिराजने आठ चेंडूत एक धाव काढली. प्रसिद्ध कृष्णा खातेही न उघडता नाबाद राहिला.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२९ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.