३० मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३० मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |30 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३० मार्च चालू घडामोडी

‘हा’ आहे IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; भारताच्या ‘या’ खेळाडूंनीही मारली बाजी, पाहा १५ वर्षांची यादी

  • आयपीएलचा १६ वा सीजन ३१ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सीएसके यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. जगात सर्वात श्रीमंत टूर्नामेंट म्हणून इंडियन प्रीमियर लीगकडे पाहिलं जातं. या आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडूंना कोट्यावधी रुपये देऊन खरेदी केलं जातं. खेळाडूंच्या संपूर्ण क्रिकेट करिअरचा आढावा घेऊन आयपीएलच्या लिलावात खेळाडूंवर बोली लावली जाते. अशातच आम्ही तुम्हाला आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.
  • इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन यंदाच्या आयपीएल २०२३ मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंजाब किंग्जने सॅम करनला १८.५० कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. तर ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरून ग्रीन दुसरा महागडा खेळाडू ठरला असून मुंबई इंडियन्सने ग्रीनला १७.५ कोटी रुपयांत खरेदी केलं. दरम्यान, आयपीएल इतिहासात आतापर्यंत कोणते खेळाडू कोट्यावधी रुपयांच्या घरात पोहोचले, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

  • १) सॅम करन – पंजाब किंग्ज, १८.५० कोटी, IPL 2023
  • २) इशान किशन – मुंबई इंडियन्स, १५.२५ कोटी, IPL 2022
  • ३) ख्रिस मॉरिस – राजस्थान रॉयल्स, १६.२५ कोटी, IPL 2021
  • ४) पॅट कमिन्स – कोलकाता नाईट रायडर्स, १५.५ कोटी, IPL 2020
  • ५) जयदेव उनादकट, राजस्थान रॉयल्स, वरुण चक्रवर्ती, किंग्ज इलेव्हन पंजाब, ८.४ कोटी, IPL 2019
  • ६) बेन स्टोक्स (राजस्थान रॉयल्स), १२.५ कोटी, IPL 2018
  • ७) बेन स्टोक्स (आरपीएस), १४.५ कोटी, १४.५ कोटी, IPL 2017
  • ८) शेन वॉटसन, (आरसीबी), ९.५ कोटी, IPL 2016
  • ९) युवराज सिंग, (डीडी), १६ कोटी, IPL 2015
  • १०) युवराज सिंग, (आरसीबी), १४ कोटी, IPL 2014
  • ११) ग्लेन मॅक्सवेल, मुंबई इंडियन्स, ६.३ कोटी, IPL 2013
  • १२) रविंद्र जडेजा, (सीएसके), १२.८ कोटी, IPL 2012
  • १३) गौतम गंभीर (केकेआर), १४.९ कोटी, IPL 2011
  • १४) शेन बॉण्ड, (केकेआर) कायरन पोलार्ड (एमआय), ४.८ कोटी, IPL 2010
  • १५) केविन पीटरसन, (आरसीबी), अॅंण्ड्र्यू फ्लिंटॉप, (सीएसके), ९.८ कोटी, IPL 2009
  • १६) एस एस धोनी (सीएसके), ९.५ कोटी, IPL 2008

रशियाकडून तेल आयातीत मोठी वाढ, ‘रॉसनेफ्ट’ कंपनीशी इंडियन ऑईलचा करार

  • भारतातील सरकारी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसी) रशियातील बडी तेलउत्पादक कंपनी ‘रॉसनेफ्ट’सोबत करार केला असून याअंतर्गत रशियातून कच्च्या तेलाची आयात मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात येणार आहे.
  • ‘रॉसनेफ्ट’ने जारी केलेल्या निवेदनानुसार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इगोर सेचिन यांनी अलिकडेच भारताला भेट दिली. यावेळी सेचिन आणि आयओसीचे अध्यक्ष माधव वैद्य यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप पुरी उपस्थित होते. ‘रॉसनेफ्ट’ आणि भारतीय तेल कंपन्यांसोबत आगामी काळात अधिकाधिक व्यापार वाढविण्याबरोबरच डॉलरऐवजी स्थानिक चलनांमध्ये व्यवहार करण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
  • रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपातील देशांनी रशियाकडून आयात घटविली आहे. त्यानंतर भारतासह काही देशांना रशियाकडून स्वस्तात तेलाची निर्यात केली जात आहे.गेल्या वर्षभरात रशियाकडून भारतातील तेल आयातीत २० पट वाढ झाली असून मार्चमध्ये रशियाच्या ‘उरल्स ग्रेड क्रूड’चा भारत हा सर्वात मोठा आयातदार देश ठरला आहे.

भारताचा पाकिस्तानला पुन्हा दणका; सहा महिन्यांत दुसऱ्यांदा केलं सरकारी ट्विटर खातं ब्लॉक!

  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अलीकडेच युक्रेनच्या उत्तरेला असलेल्या बेलारूसमध्ये ‘डावपेचात्मक अण्वस्त्रे’ (टॅक्टिकल) सज्ज ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. वर्षभर युद्ध लढल्यानंतरही युक्रेनमध्ये रशियाला फारशी मजल मारता आली नसल्यामुळे आता पुतिन यांनी अण्वस्त्र धमकीचे आयुध पुन्हा एकदा बाहेर काढले आहे. यामुळे रशियाची अण्वस्त्रे थेट युरोपच्या उंबरठ्यावर येणार असल्यामुळे या घोषणेने तणावात भरच पडली आहे.
  • या कारवाईचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तान सरकारच्या ट्विटर खात्यावर, “भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचं भारतातील ट्विटर खातं निलंबित करण्यात आलं आहे”, असा संदेश लिहिला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारचं ट्विटर खातं अमेरिका आणि इतर देशांमध्ये सक्रीय राहणार आहे.
  • गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा पाकिस्तान सरकारचं ट्विटर खातं ब्लॉक करण्यात आलं आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात भारतातील कायद्यांनुसार पाकिस्तानचे ट्विटर खाते भारतीय युजर्सना दिसू नये अशी मागणी केंद्र सरकारने ट्विटरकडे केली होती. या मागणीनुसार ट्विटरने कारवाई करत पाकिस्तान सरकारचं ट्विटर खातं ब्लॉक केलं होतं.

UPI चार्जेसबाबत NPCI ने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, “बँक किंवा ग्राहकांना…”

  • सध्या डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेआहे. आपण ऑनलाईन व्यवहारांसाठी UPI वापरत असाल तर ही तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून UPI ​​व्यवहार महाग होणार आहेत. तुम्ही २,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे भरल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक परिपत्रक जारी केले आहे. काही वेळातच या परिपत्रकाबाबत NPCI ने स्पष्टीकरण दिले आहे.
  • NPCI ने UPI पेमेंटवर चार्जेस आकारल्याचे वृत्त नाकारले आहे. NPCI ने म्हटले आहे की,UPI द्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. NPCI ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील सर्वाधिक ९९.९ टक्के UPI व्यवहार फक्त बँक खात्यांद्वारे केले जातात.
  • NPCI ने सांगितले की बँक किंवा ग्राहकांना UPI पेमेंटसाठी कोणतेही चार्जेस द्यावे लागणार नाहीत. तसेच, UPI व्यवहार एका बँकेतून दुसऱ्या बँकेत केला गेला तरी वापरकर्त्यांना कोणतेही चार्जेस भरावे लागणार नाहीत. तसेच नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI Wallets) आता इंटरऑपरेबल UPI इकोसिस्टमचा भाग आहेत. हे लक्षात घेऊन, NPCI ने PPI वॉलेट्सना इंटरऑपरेबल UPI इकोसिस्टमचा एक भाग होण्यासाठी परवानगी दिली आहे. इंटरचेंज चार्ज फक्त PPI मर्चंट ट्रान्झॅक्शन्स (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स मर्चंट ट्रान्झॅक्शन्स) वर लागू होणार आहे.यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
  • NPCI च्या परिपत्रकानुसार, Google Pay, Paytm, PhonePe किंवा इतर अ‍ॅप्सद्वारे केलेल्या पेमेंटवर १.१ टक्क्यांपर्यंत इंटरचेंज चार्ज भरावा लागणार होता. मात्र त्याबाबत NPCI स्पष्टीकरण दिले आहे. तसेच पेटीएमनेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

भारतीय रेल्वेचं Premium Tatkal Ticket म्हणजे काय? यातून वेटिंग लिस्टमधून…

  • भारतात रेल्वचे सर्वात मोठे जाळे आहे. लाखो प्रवासी दररोज या रेल्वेने प्रवास करतात. परंतु प्रवासासाठी ट्रेनचे तिकीट महत्वाचे असते, हे तिकीट अनेक प्रकारे बुक केले जाते. अनेकजण प्लॅटफॉर्मच्या तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट बुक करतात. तर अनेकजण वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करतात. लांबपल्ल्याच्या ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये प्रवाशांना तात्काळ तिकीट बुकिंगचे ऑप्शन असते. हे तात्काळ तिकीट रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी बुक करता येते. पण तात्काळ तिकीटप्रमाणे प्रीमियम तात्काळ बुकिंग या ऑप्शनमधूनही प्रवाशांना तिकीट बुक करण्याची सुविधा आहे. पण प्रीमियम तात्काळ तिकीट म्हणजे काय आणि त्याद्वारे तिकीट कधी बुक करता येते? तसेच यातून तिकीट बुक केल्यानंतर कन्फर्म सीट मिळते का? याशिवाय बुक केलेले तिकीट रद्द झाले, तर पैसे परत येतात की नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ…
  • प्रीमियम तात्काळ तिकीट बुकिंग म्हणजे काय? (What Is Premium Tatkal Ticket Booking) : भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग व्यतिरिक्त आणखी एक कोटा सुरु केला आहे. जो अगदी तात्काळ तिकीट बुकिंगप्रमाणेच आहे. ज्याचे नाव प्रीमियम तात्काळ तिकीट असे आहे. प्रीमियम तात्काळ कोट्यातून प्रवाश्यांना तात्काळ कोट्यातून ज्याप्रकारे तिकीट बुक करतात तसेच बुकिंग करावे लागते. यातही तिकीट बुकिंग एक दिवस आधी सकाळी १० वाजता सुरू होते. यातील एसी क्लासच्या तिकिटसाठी सकाळी १० वाजल्यापासून बुकिंग सुरु होते, परंतु नॉन एसी क्लासच्या तिकीटासाठी सकाळी ११ वाजल्यापासून बुकिंग सुरु होते. यातील एक खास गोष्ट म्हणजे प्रीमियम तात्काळ तिकीटाची किंमत डायनॅमिक असते, म्हणजे या ट्रेनचे प्रवासी भाडे सतत बदलत असते. यामध्ये तात्काळ तिकीट बुकिंगपेक्षा जास्त तिकीट भाडे असू शकते.
  • प्रीमियम तात्काळ तिकीट हे तात्काळ तिकीटापेक्षा वेगळे का आहे? (Difference Between Tatkal Ticket and Premium Tatkal Ticket) : आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तात्काळ तिकीट आणि प्रीमियम तात्काळ तिकीटमध्ये नेमका काय फरक आहे. यातील फरक म्हणजे, तात्काळ तिकीटांच्या किंमत स्थिर असते, ज्यात किलोमीटर किंवा क्लासच्या आधारावर एक निश्चित रक्कम दिलेली असते. पण प्रीमियम तात्काळ तिकीट कॅटेगरीमध्ये तिकीटांचे दर स्थिर नसतात. या तिकीटाचे प्रवासी भाडे सतत बदलते. ज्यावेळी प्रीमियम तात्काळ तिकीटांची मागणी जास्त असेल त्यावेळी तिकीटांचे दरही खूप जास्त असतील. हे दर तात्काळ तिकीटांपेक्षा जास्त असतात. प्रवाशांना हे तिकीट फक्त आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवरूनच बुक करता येते. परंतु तात्काळ तिकीट प्रवासी आयआरसीटीसी व्यतिरिक्त इतर अनेक वेबसाइटवरून बुक करु शकतात.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३० मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.