२५ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२५ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |25 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२५ मार्च चालू घडामोडी

आरटीई प्रवेश अर्जांसाठी आज शेवटचा दिवस

  • शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत शनिवारी (२५ मार्च) संपणार आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५३ हजार ६७२ अर्ज दाखल झाले आहेत.
  • आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे काही पालकांना अर्ज करता न आल्याने, कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने अर्ज करता आला नाही. त्यामुळे पालक आणि संघटनांच्या मागणीमुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्जांसाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली.
  • यंदा प्रवेश प्रक्रियेत ८ हजार ८२८ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागा उपलब्ध आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अर्जांची संख्या ७० हजारांनी वाढली आहे. अर्जांसाठी शनिवार शेवटचा दिवस असल्याने अर्जसंख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रकियेची माहिती https://rte25admission.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

5G सेवेमध्ये Airtel ने रिलायन्स जीओला मागे टाकले, ‘इतक्या’ शहरांत हायस्पीड इंटरनेट सेवा सुरू

  • सध्या देशामध्ये Reliance Jio, Airtel आणि VI या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. यामध्ये जिओ आणि एअरटेलने आपले ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. एअरटेल कंपनी भारती एअरटेल आपल्या 5G इंटरनेट सेवेचा झपाट्याने विस्तार करत आहे. या स्पर्धेमध्ये कंपनीने शुक्रवारी देशातील २३५ नवीन शहरांमध्ये आपली अल्ट्रा-फास्ट ५जी सेवा Airtel 5G Plus लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
  • Airtel ने नवीन २३५ शहरांमध्ये 5G Plus लॉन्च केल्यानंतर आता देशभरातील ५०० शहरांमधील ग्राहकांसाठी एअरटेल ५जी नेटवर्क उपलब्ध असणार आहे. त्याच वेळी जीओला मागे टाकत देशातील ५०० शहरांमध्ये ५जी इंटरनेट सेवा सुरु करणारी पहिली टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल ही देशातील ५जी सेवा सुरु करणारी कंपनी आहे. Airtel ने हैदराबादमध्ये भारतातील पहिले लाइव्ह 5G नेटवर्क सादर केले होते. तसेच बंगळुरूमधील BOSCH सुविधेमध्ये भारतातील पहिले खाजगी 5G नेटवर्क देखील सादर केले होते.
  • Airtel 5G Plus लॉन्च दरम्यान भारती एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखॉन म्हणाले, ऑक्टोबर २०२२ मध्ये ५जी सेवा देणारी एअरटेल ही पहिली कंपनी होती. आजचे मेगा लॉन्च हे देशातील प्रत्येक एअरटेल ग्राहकाला अल्ट्रा-फास्ट एअरटेल 5G प्लसशी जोडण्याचे आमचे वचन आहे. आधी आम्ही ५०० शहरांमध्ये पोचलो आहोत. तसेच दररोज ३० ते ४० शहरांना जोडत आहोत.
  • मार्च २०२४ पर्यंत सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भाग कव्हर करण्यासाठी त्यांचे 5G रोलआउट करण्याच्या मार्गावर आहे असे कंपनीने अलीकडेच म्हटले आहे. Airtel 5G Plus सेवा उपलब्धता झपाट्याने विस्तारत राहील, देशातील सर्व शहरे आणि गावे कव्हर करेल, कारण कंपनी देशव्यापी कव्हरेजसाठी काम करत आहे. अरटेल आता जम्मूच्या वरच्या उत्तरेकडील शहरापासून कन्याकुमारीच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत प्रत्येक मोठ्या शहरात 5G सेवा देत आहे.

ब्रिटनच्या संसदेत आता टिकटॉकवर बंदी, ‘या’ कारणाने घेतला निर्णय

  • अल्पावधीत लोकप्रिय झालेले चिनी बनावटीचे सोशल मीडिया अ‍ॅप टिकटॉकवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टिकटॉकसह अन्य अ‍ॅप गुगल प्लेस्टोरमधून हटवले होते. अशातच आता ब्रिटनच्या संसदेनेही टिकटॉकबाबत मोठा निर्णय घेतला आहे. संसदीय नेटवर्कमधून टिकटॉकला ब्लॉक करण्यात आलं आहे.
  • स्काई न्यूज ने दिलेल्या माहितीनुसार, हाउस ऑफ कॉमन्स आणि हाउस ऑफ लॉडर्सने घोषणा केली की, सायबर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयाचं पालन करण्यात येणार आहे.
  • टिकटॉकला संसदेची सर्व उपकरणे आणि नेटवर्कमधून ब्लॉक करण्यात येणार असल्याचं संसदेतील एका प्रवक्त्याने सांगितलं. “संसदेचे सायबर सुरक्षेपासून बचाव करणं ही आमची प्राथमिकता आहे. पण, आम्ही आमच्या सायबर किंवा अंतर्गत सुरक्षेबाबतीतील धोरणांवर अधिक भाष्य करू शकत नाही.”
  • या निर्णयाचं कंजर्वेटिव नेते इयान डंकन स्मिथ यांनी स्वागत केलं आहे. ट्वीट करत स्मिथ यांनी म्हटलं की, “टिकटॉकला संसदेच्या सर्व उपकरणांमधून ब्लॉक करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आणि चांगला आहे. सरकारी फोनमधून टिकटॉकला बंदी घातल्यानंतर आता मंत्र्यांनाही त्यास वापरण्यास बंदी घातली पाहिजे.”

“महात्मा गांधींकडे कोणतीही पदवी नव्हती, तरीही…”; जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचं विधान चर्चेत!

  • जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी महात्मा गांधींबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती, असं ते म्हणाले. सिन्हा यांचं हे विधान चांगलंच चर्चेत असून यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. दरम्यान, काँग्रेसनेही या विधानावरून खोचक शब्दांत टीका केली आहे.
  • इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी ग्वाल्हेरच्या आईटीएम विद्यापीठात डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या स्मृतीपित्यर्थ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे विद्यार्थ्यांना, ‘केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण मिळवणे नाही’ हे समजवण्याच प्रयत्न करत होतो. ते म्हणाले, आपल्यापैकी अनेकांना वाटतं की गांधीजींकडे कायद्याची पदवी होती. मात्र, हे खरं नाही. त्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती. त्यांचं शिक्षण केवळ हायस्कूलपर्यंत झालं होतं. पण ते अशिक्षित होते असं कोणीही म्हणणार नाही. त्यांच्याकडे कायद्याची पदवी नसली तरी कायद्याचा अभ्यास करण्याची त्यांची पात्रात होती. शिक्षण कमी असतानाही ते राष्ट्रपिता झाले. त्यामुळे केवळ पदवी घेणे म्हणजे शिक्षण घेणे असं होत नाही.
  • मनोज सिन्हा यांच्या या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांचे मीडिया सल्लागार पीयूष बबेले यांनी मनोज सिन्हा यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. जेव्हापासून पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणी यांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित करण्यात येतोय, तेव्हापासून भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. महात्मा गांधी हे बॅरिस्टर होते. तुमच्या वादात त्यांना का ओढताय?, असं ते म्हणाले.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : रुद्रांक्षला सलग दुसरे पदक; पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक गटात कांस्य; चीनचे वर्चस्व

  • भारताच्या रुद्रांक्ष पाटीलने विश्वचषक स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना शुक्रवारी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. रुद्रांक्षचे स्पर्धेतील हे सलग दुसरे कांस्यपदक ठरले. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी चीनने सोनेरी यश मिळवले.
  • टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या चीनच्या शेंग लिहाओने पुरुष, तर जागतिक विजेत्या हुआंग युटिंगने महिला विभागात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत आतापर्यंत चीनने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह आपले वर्चस्व राखले आहे. दुसऱ्या स्थानावरील भारताने तीन कांस्य आणि प्रत्येकी एक सुवर्ण व रौप्यपदक मिळवले आहे.
  • गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या ठाण्याच्या रुद्रांक्षने पुन्हा आपली गुणवत्ता सिद्ध केली. रुद्रांक्षने गुरुवारी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र सांघिक गटात आर. नर्मदा नितीनसह कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर शुक्रवारी वैयक्तिक गटातही त्याने पदकाची कमाई केली. पात्रता फेरीत रुद्रांक्षने ६३१ गुणांसह चौथ स्थान मिळवले होते. त्यानंतर अव्वल आठ नेमबाजांच्या मानांकन फेरीत एक वेळ तो पदकापासून फार दूर होता. मात्र, पाच फेऱ्यांच्या चौथ्या संधीमध्ये त्याने सर्वाधिक ५३.५ गुणांचा वेध घेत स्वत:ला पदकाच्या शर्यतीत कायम राखले. चीनचे तीन नेमबाज २०व्या संधीपर्यंत पहिल्या तीन क्रमांकावर होते. पाचव्या संधीला रुद्रांक्ष चीनच्या यु हाओनानविरुद्ध ०.८ गुणांनीच मागे होते. तेव्हा रुद्रांक्षने ५२.६ गुणांचा, तर युने ५१.५ गुणांचा वेध घेतला. त्यामुळे रुद्रांक्षचे कांस्यपदक निश्चित झाले. सुवर्णपदक विजेत्या शेंगचे २६४.२, तर रौप्यपदक विजेत्या डू लिशूचे २६३.३ गुण होते.
  • अंतिम फेरीत शेंगने १७-१३ अशी सरशी साधली. महिला विभागात भारताची रमिता ६३२.३ गुणांची कमाई करून पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आली. अंतिम फेरी गाठणाऱ्या आठ नेमबाजांत रमिता एकमेव भारतीय होती. कांस्यपदकाच्या शर्यतीत कझाकस्तानच्या अ‍ॅलेक्झांड्रा ले (२६१.२) हिने रमिताला (२६०.५) मागे टाकले.

मार्चअखेरमुळे पुणे शहरातील पाच दस्त नोंदणी कार्यालये सुरू

  • शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेला सलग सात दिवसांचा संप आणि मार्चअखेर यामुळे मालमत्ता खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालयांत गर्दी होत आहे. त्यामुळे शनिवारी (२५ मार्च) सुटीच्या दिवशी शहरातील पाच दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत.
  • नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील ९८ बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांत सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे नोंदविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या सात दस्त नोंदणी कार्यालयांबरोबरच संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांत त्यांच्या प्रकल्पातील सदनिकांची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे.
  • शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सात दिवस शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज विस्कळित झाले होते. १ एप्रिलपासून नवे चालू बाजार मूल्यदर (रेडीरेकनर) लागू होणार आहे.
  • रेडीरेकनर दरांत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांची मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे कासारवाडी, एरंडवणा, शासकीय मुद्रणालय (फोटोझिंको) या ठिकाणी दस्त नोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी शपथविधीसाठी २५ मार्च हा दिवस का निवडला? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रातील गणितं:

  • देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. आज म्हणजेच २५ मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. लखनौच्या एकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असं असताना शपथविधीसाठी आजचा दिवस का निवडला यासाठी ज्योतिष जाणकारांमध्ये खलबतं सुरु झाली आहे. ज्योतिषांच्या मते, शपथविधीसाठी २५ मार्च ही तारीख निवडण्यामागे एक विशेष कारण आहे.
  • १४ मार्चपासून सूर्य ग्रह मीन राशीत असल्याने खरमास सुरू आहे. हा खरमास १४ एप्रिलपर्यंत राहील. खरमासमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे. यादरम्यान घरबांधणी, मुंडन, विवाह असे कोणतेही संस्कार कार्य करत नाही अशी मान्यता आहे. पण या सर्व प्रतिकूल योगांमध्ये एक शुभ योगही तयार होत आहे. २४ मार्च रोजी बुध मीन राशीत आल्याने बुधादित्य योग तयार झाला आहे. याला ज्योतिषशास्त्रात राजयोग म्हणून संबोधलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि सूर्याचा संयोग बुद्धिमत्ता आणि कौशल्याने सत्ता चालवण्याचे शक्ति प्रदान करतो. खरमास असूनही हा योग शुभ मानला गेला आहे. तर होळीपूर्वी शपथ न घेण्यामागे होलाष्टक असण्याचे कारण सांगण्यात आलं होतं.
  • नक्षत्राबद्दल बोलायचे झाले तर, २५ तारखेला नक्षत्र खूप चांगले आहे आणि या दिवशी स्थिर योग तयार होत आहे. ज्या दरम्यान केलेले कोणतेही काम स्थिर असते, अशी मान्यता आहे. या दिवशी मूळ नक्षत्र अष्टमी तिथी आहे ज्याला शीतला अष्टमी असेही म्हणतात. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, अशा वेळी जे काम हाती घेतलं जातं, त्यात कोणताही अडथळा येत नाही, त्यामुळे२५ तारखेला योगी आदित्यनाथ आपल्या मंत्रिमंडळासह शपथ घेणार आहेत. २०२४ मध्ये केतूच्या महादशानंतर शुक्राची महादशा सुरु होणार आहे. हा काळ योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ असेल.

९ मे पर्यंत युद्ध संपवा; रशियन सैन्याला आदेश:

  • रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे सध्या संपूर्ण जगावर चिंतेचं वातावरण असताना लवकरच हे युद्ध संपण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या लष्करानेच असा दावा केला आहे. युक्रेन लष्कराच्या दाव्यानुसार, ९ मे रोजी रशिया हे युद्ध संपवू इच्छित आहे. Kyiv Independent च्या वृत्तानुसार, युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफच्या गुप्तचर सूत्रांनी दावा केला आहे की, रशियन सैन्याला युद्ध ९ मे पर्यंत संपलं पाहिजे असा आदेश देण्यात आला आहे.
  • ९ मे हा दिवस रशियामधील नाझी जर्मनीवरील विजय म्हणून साजरा केला जातो. दरम्ान रशिया आपल्या हजारो नागरिकांना त्यांच्या देशात घेऊन जात असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. या नागरिकांना ओलीस ठेवत आम्हाला युद्धात माघार घेण्यास भाग पाडण्याचा कट असल्याचाही त्यांचा दावा आहे.
  • असोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार, युक्रेनचे लोकपाल डेनिसोवा यांनी चार लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या इच्छेविरोधात रशियात नेण्यात आलं असून त्यामध्ये ८४ हजार लहान मुलं असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे रशियानेही जवळपास हीच संख्या दिली असून या लोकांना रशियाला जायचे होते असा प्रतिदावा केला आहे.
  • दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पाश्चिमात्य देशांनी नवे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून युक्रेनला माणुसकीच्या आधारावर मदत करण्याचं वचन दिलं. पण युक्रेनच्या राष्टाध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मागितलेल्या मदतीच्या तुलनेत लष्करी सहाय्य कमी मिळत आहे.

रेल्वेचे खासगीकरण होणार नाही ! केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही:

  • रेल्वेची सामाजिक बांधिलकी सर्वाधिक महत्त्वाची असल्याने रेल्वे क्षेत्राचे खासगीकरण केले जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी राज्यसभेत रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजासंदर्भातील चर्चेच्या उत्तरात दिली.
  • रेल्वे क्षेत्रात २००९-१४ या काळात २ लाख ४२ हजार ७०९ रोजगार देण्यात आले. त्या तुलनेत २०१४ पासून आत्तापर्यंत ३ लाख ४४ हजार ६४६ नोकऱ्या दिल्या गेल्या. १ लाख ४० हजार ७१३ पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत, अशी माहिती देत रेल्वे मंत्रालयाने भरती थांबवल्याचा विरोधकांचा आरोप वैष्णव यांनी फेटाळला. 
  • काँग्रेसच्या काळात रेल्वे क्षेत्रातील विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले पण, त्यामध्ये दूरदृष्टी नव्हती. कुठे स्टेशन उभे करायचे आहे, कुठे रेल्वे सुरू करायची आहे, ही माहिती म्हणजे व्हिजन नव्हे. रेल्वे क्षेत्राचे अत्याधुनिकीकरण होत असून विशिष्ट ध्येय ठरवून कामे पूर्ण केली जात आहेत. २०१४-१९ मध्ये दरवर्षी ३,४४० किमी विद्युतीकरण केले गेले, ५० हजार कमीचे विद्युतीकरण झाले आहे. आगामी ३०-४० वर्षांचा आढावा घेतला जाणार आहे, असे वैष्णव म्हणाले.

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी भारतभेटीवर:

  • चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे गुरुवारी सायंकाळी भारतभेटीवर येऊन पोहोचले. सुमारे दोन वर्षांपूर्वी पूर्व लडाखमधील संघर्षांमुळे दोन्ही देशांतील संबंध तणावाचे झाल्यानंतर या दोन देशांत सर्वोच्च पातळीवर होत असलेली ही पहिलीच भेट आहे.
  • वांग हे काबूलहून नवी दिल्लीला आले असून, शुक्रवारी सायंकाळी त्यांची परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा होऊ घातली आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, आधी जाहीर न करता होत असलेल्या चिनी परराष्ट्रमंत्र्यांच्या या भेटीचा संबंध रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवरील भू-राजनैतिक घडामोडींशी असून, रशियावर लादल्या जाणाऱ्या प्रखर आर्थिक निर्बंधांचा सामना करण्यात त्या देशाला मदत करण्याची आपली इच्छा असल्याचे संकेत चीनने दिले आहेत. मात्र, या चर्चेत पूर्व लडाखमधील सीमावादापासून भारत आपले लक्ष विचलित होऊ देण्याची शक्यता नसून, या भागातील सर्व आघाडीच्या ठिकाणांवरून फौजा पूर्णपणे माघारी घेण्याचा तो आग्रह धरण्याची अपेक्षा आहे.

‘यूएनएससी’तील युक्रेनसंबंधी ठरावावर भारत तटस्थ:

  • युक्रेनमधील मानवी संकटाबाबत रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) गुरुवारी मांडलेल्या ठरावावर तटस्थ राहून, आपण रशियाच्या बाजूने नसल्याचे संकेत भारताने दिले. या ठरावात युक्रेनवर टीका करण्यात आली होती. ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली समर्थनाची ९ मते न मिळाल्याने हा ठराव संमत होऊ शकला नाही.
  •  रशिया पुरस्कृत ठरावावर भारताने तटस्थ राहण्याचा प्रसंग प्रथमच घडला आहे. यापूर्वी युक्रेनमधील युद्धावर झालेल्या मतदानात, रशियाच्या कृतीवर टीका करणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चिमात्य देशांनी पुरस्कृत केलेल्या ठरावांवर भारत तटस्थ राहिला होता. या ताज्या घडामोडीतील, आपली तटस्थता दर्शवण्याचा भारताचा प्रयत्न प्रतििबबित झाला आहे.
  • न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये ठराव मांडला जात असताना आणि भारताने तटस्थतेचे धोरण स्वीकारले असताना परराष्ट्र सचिव  हर्षवर्धन श्रृंगला तेथे होते. रशिया व चीनने ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर भारतासह यूएनएससीचे उर्वरित १२ सदस्य तटस्थ राहिले.

स्विस खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, कश्यप उपांत्यपूर्व फेरीत:

  • जागतिक अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या भारताच्या सातव्या मानांकित किदम्बी श्रीकांतने गुरुवारी फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवत स्विस खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकावरील श्रीकांतने क्रमवारीत ६०व्या क्रमांकावरील पोपोव्हला एक तास आणि १३ मिनिटे चाललेल्या सामन्यात १३-२१, २५-२३, २१-११ असे पराभूत केले. पुढील फेरीत श्रीकांतची द्वितीय मानांकित डेन अँडर्स अँटनसेनशी होणार आहे.
  • माजी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपला उपांत्यपूर्व फेरीत पुढे चाल मिळाली आह़े त्याचा प्रतिस्पर्धी ऑलिम्पिक विजेत्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनने सामन्यातून माघार घेतली. तिसऱ्या मानांकित सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचे पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत आव्हान संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या प्रमुद्या कुसुमावर्दना आणि येरेमिआ ईरिच योचे याकोब रॅम्बिटॅन जोडीकडून १९-२१, २०-२२ अशा फरकाने सात्त्विक-चिराग जोडीने पराभव पत्करला.
  • महिला एकेरीत दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या हॉजमार्क काईर्सफेल्डवर सरळ गेममध्ये विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. माजी विश्वविजेत्या सिंधूने पहिल्या सामन्यात बुधवारी हॉजमार्कवर २१-१४, २१-१२ असा विजय मिळवला.  अश्मिता छलिहाने आठव्या मानांकित क्रिस्टी गिल्मॉरकडून १८-२१, २०-२२ अशी हार पत्करली.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२५ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.